एकूण 152 परिणाम
फेब्रुवारी 13, 2019
महाबळेश्वर - पाच रुपयांत ‘एटीएम’द्वारा एक लिटर शुद्ध पाणी हे येथील पालिकेच्या सत्ताधारी भाजपने पर्यटकांना दाखविलेले स्वप्न अखेर गाजर ठरले आहे.  केंद्र शासनाने नगरपालिकांसाठी स्वच्छता अभियान २०१८ ही स्पर्धा जाहीर केली होती. महाबळेश्वर व पाचगणी पालिकेने या स्पर्धेत अव्वल येण्यासाठी आटोकाट प्रयत्न...
फेब्रुवारी 05, 2019
येवला - शहराच्या पाणीयोजनेचा साठवण तलाव आटल्याने तालुक्यासाठी टँकर भरल्या जाणाऱ्या विहिरींचाही पाणी उपसा होऊ लागला आहे. यामुळे टँकर भरण्यासाठी अडचण होत असून, ग्रामीण भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. रोजच टँकरग्रस्त गावे वाढत असून खेपा वाढवण्याची मागणी होत असल्याने यामुळे विहीर अधिग्रहण...
फेब्रुवारी 05, 2019
अकोला - राज्यातील भूजलाची पातळी दिवसेंदिवस घटत आहे. अकोला जिल्ह्यात अलीकडे काही शेतकऱ्यांनी शेतात बोअर खणल्यावर एक हजार फूट खोलीपर्यंत जाऊनही पाणी लागले नाही.  नोव्हेंबर २०१८ मध्ये भूजल सर्वेक्षण विभागाने दिलेल्या अहवालातही भूजलपातळी मोठ्या प्रमाणावर खालावल्याचा उल्लेख होता. सरकारच्या भूजल अधिनियम...
डिसेंबर 17, 2018
पुणे - शहराची लोकसंख्या ३५ लाख, मिळकतींचा (घरे) आकडा पावणेनऊ लाख, महापालिकेत समाविष्ट झालेली गावे आणि तेथील लोकसंख्या वेगळीच...! इतक्‍या मोठ्या प्रमाणात विस्तारलेल्या पुण्यात नळजोड किती असावीत, या प्रश्‍नाचे उत्तर महापालिका दोन वेगवेगळ्या आकड्यांत देते. पहिला आकडा १ लाख ६० हजार, तर दुसरा आकडा ३ लाख...
डिसेंबर 14, 2018
मुंबई - राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने अनिर्बंध पाणी उपसा रोखण्यावर भर दिला आहे. त्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली असून, यापुढे जलाशय अथवा कालव्यातून पाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. राज्य सरकारने ऑक्टोबरअखेर १५० तालुक्यात तसेच...
नोव्हेंबर 12, 2018
पौड - मुळशी तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यात भातपिकाच्या अतोनात नुकसानीमुळे दुष्काळाची छाया गडद झाली आहे. खाण्यासाठी दाणा आणि जनावरांसाठी पेंढाही शिल्लक राहिला नाही. केवळ शेतीवर उपजीविका करणाऱ्या या भागातील बळिराजावर उपासमारीचे संकट कोसळलेले आहे. मात्र सरकारने तालुक्‍याच्या पूर्व भागातील शहरीकरण...
ऑक्टोबर 29, 2018
नाशिक - गंगापूर व दारणा नदीवरील धरणातून जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यासंदर्भातील वाद सध्या विकोपाला गेला आहे. या धरणांमधून पाणी सोडल्यास शेतकऱ्यांकडून संभाव्य आंदोलनाची शक्‍यता गृहित धरून शहर-जिल्हा पोलिस प्रशासनाकडून चोख पोलिस बंदोबस्ताची तयारी करण्यात आली आहे. तसेच, कायदा व सुव्यवस्था अबाधित व...
ऑक्टोबर 24, 2018
केळघर - टॅंकरग्रस्त असलेल्या व पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या तळोशी गावाने पाणीटंचाईवर मात केली. तनिष्कांच्या मागणीनुसार सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून शिवकालीन तळ्यातील गाळ काढण्यात आला. सध्या तळे पूर्ण भरल्याने पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे.  गावाच्या चारही बाजूंना उंच उंच डोंगररांगा आहेत. येथील...
ऑक्टोबर 23, 2018
औरंगाबाद - शहराची तहान भागविण्यासाठी आता परिसरातील नैसर्गिक जलस्रोतांचा अभ्यास करण्यात येत आहे. सभापती राजू वैद्य यांच्या पुढाकारानंतर जलतज्ज्ञ तथा शिरपूर पॅटर्नचे जनक सुरेश खानापूरकर यांनी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला असून, शहराच्या गरजेपेक्षा तिप्पट पाणी तेही कमी विजेचा वापर करून मिळू शकते,...
ऑक्टोबर 16, 2018
अमरावती - प्रत्येकालाच आपली कार चकाचक असलेली हवी असते. चिखलात वा धुळीने माखलेली कार चकाचक करण्यासाठी वॉशिंग सेंटरमध्ये जवळपास ५० लिटरहून अधिक पाण्याचा वापर केला जातो. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसेही खर्च करावे लागतात. कार स्वच्छ करण्यासाठी वॉशिंग सेंटरला जाऊन ती चकाचक केली जाते; परंतु पाण्याचा...
ऑक्टोबर 15, 2018
पुणे - शिवाजीनगर पोलिस वसाहतीला ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये तीन दिवसांपासून पाणी नसल्यामुळे पोलिसांच्या कुटुंबीयांनी मुलाबाळांसमवेत फर्ग्युसन रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. पोलिस वसाहतीमध्ये पाणी नसल्यामुळे कुठलीच कामे होऊ करता येत नसल्यामुळे पोलिसांच्या पत्नी संतप्त झाल्या. अखेर रविवारी सकाळी...
ऑक्टोबर 14, 2018
सोलापूर : राज्यातील 355 पैकी 172 तालुक्‍यांमध्ये सरासरीच्या 25 ते 75 टक्‍के पाऊस पडला आहे. सरकारने जाहीर केलेल्या 172 तालुक्‍यांतील बाधित क्षेत्राचा शासकीय यंत्रणेकडून "महामदत' या ऍपद्वारे सर्व्हे सुरू झाल्याचे नैसर्गिक आपत्ती विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, नुकसान भरपाई कधीपर्यंत मिळणार हे...
ऑक्टोबर 06, 2018
गोंदवले - अपुऱ्या पावसामुळे यंदा आंधळी तलाव पूर्णपणे आटला आहे. पाण्यासाठी इतर पर्यायही राहिलेला नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांतच भीषण पाणीटंचाई निर्माण होणार असल्याने दहिवडीसह गोंदवलेकर ग्रामस्थांतून चिंता व्यक्त होत आहे. आंधळी तलावावर अवलंबून असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेतून दहिवडी व...
सप्टेंबर 17, 2018
औरंगाबाद - ‘डीएमआयसी’अंतर्गत बिडकीन येथे उभारण्यात येत असलेल्या महाकाय औद्योगिक शहरात पायाभूत सुविधांची कामे वेळेच्याही पुढे आहेत. येथे येण्यासाठी उत्सुक असलेल्या उद्योगांनी निर्धास्तपणे यावे, त्यांना जायकवाडीतून येणाऱ्या एमआयडीसीच्या जलवाहिनीतून पाण्याचा अविरत पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती...
सप्टेंबर 11, 2018
केत्तूर - उजनी धरण 100 टक्के भरले असले तरी, पावसाने सोलापूर जिल्ह्याकडे पाठ फिरवली आहे. परतीचा पाऊस न झाल्यास सोलापूरसह नगर जिल्ह्याचीही भिस्त उजनी धरणातील पाण्यावर राहणार आहे. त्यामुळे धरणातील पाण्याच्या काटेकोर नियोजनाची गरज आहे. शेती व्यवसाय व ग्रामीण भागाचा अर्थकणा मजबूत ठेवायचा असेल तर...
सप्टेंबर 06, 2018
पिंपरी - महापालिकेच्या वतीने तीन ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची (एसटीपी) उभारणी करण्यास ऑक्‍टोबरमध्ये प्रारंभ होणार आहे. चिखली, पिंपळे निलख आणि बोपखेल येथील या नियोजित प्रकल्पांची एकूण क्षमता प्रतिदिन ३२ दशलक्ष लिटर (एमएलडी) आहे. दीड वर्षात पूर्ण होणाऱ्या या प्रकल्पासाठी २२.१६ कोटी रुपये खर्च...
ऑगस्ट 14, 2018
पाटण - काही अपवाद वगळता २३ जूनपासून सातत्याने पाऊस सुरू असल्याने कोयना धरणाचा पाणीसाठा शंभर टीएमसीच्या उंबरठ्यावर आहे. पाणीपातळी २१५८.०६ फूट व एकूण पाणीसाठा ९८.७८ टीएमसी असून गतवर्षीच्या तुलनेत ११ टीएमसी पाणीसाठा जास्त आहे. पाणीसाठा नियंत्रणासाठी...
ऑगस्ट 10, 2018
वाल्हे - वाल्हे (ता. पुरंदर) येथील पूर्वेकडील वाड्यावस्त्या पावसाने दडी मारल्यामुळे तहानलेल्याच होत्या. मात्र, पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टने नुकतेच पिण्याच्या पाण्याचे दोन टॅंकर सुरू करून तहानलेल्या वाड्यावस्त्यांना दिलासा दिला. त्यामुळे वाल्हे ग्रामपंचायतीच्या वतीने श्री दगडूशेठ गणपती...
ऑगस्ट 07, 2018
मुंबई - राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी दिली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यंदा पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरच्या संख्येत वाढ झाली आहे. पावसाअभावी पिके करपत आहेत. पुढील काही दिवसांत पाऊस पडला नाही तर परिस्थिती आणखी बिकट...
ऑगस्ट 02, 2018
औरंगाबाद - वारंवार अभय योजना राबवूनही प्रतिसाद मिळत नसल्याने आता केवळ एक हजार रुपयांमध्ये शहरातील बेकायदा नळ कनेक्‍शन नियमित करण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ही मोहीम १५ ऑगस्टपासून सुरू केली जाणार आहे.  शहरात असलेले सुमारे दीड लाख बेकायदा नळ कनेक्‍शन नियमित करण्यासाठी...