एकूण 5898 परिणाम
एप्रिल 26, 2019
चौसाळा - सध्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात लोकांना दुष्काळी परिस्थितीमुळे तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. बीड तालुक्‍यातील गोलंग्री गावातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी रात्रभर हातपंपावर जागरण करावे लागत आहे. रात्रभर जागरण केल्यावर फक्त हंडाभरच पाणी मिळते; कारण या गावात फक्त एकच...
एप्रिल 26, 2019
सोयगाव - तालुक्‍यात पाणीटंचाईच्या झळा अधिकच तीव्र होत असताना तब्बल ६० गावांना भीषण पाणीटंचाईचा फटका बसला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी पायी भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, तालुक्‍यात पाणीटंचाईचे विदारक दृश्‍य निर्माण झाले असताना तालुका प्रशासनाचे मात्र केवळ आठ गावांचे टॅंकरचे प्रस्ताव...
एप्रिल 26, 2019
औरंगाबाद - शहरात पाण्याची आणीबाणी असताना महापालिकेच्या फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रातून ग्रामीण भागासाठी रोज ८० टॅंकर म्हणजेच एक एमएलडी पाणी दिले जात आहे. हे पाणी बंद करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पाठपुरावा सुरू केला होता. त्यानुसार एक मेपासून खोडेगाव येथील पाणीपुरवठा...
एप्रिल 26, 2019
कोल्हापूर - रसायनयुक्त पाणी जिवाणू आणि काही वनस्पतींचा वापर करून जैविक पद्धतीने शुद्ध करण्याचे संशोधन शिवाजी विद्यापीठाच्या बायोटेक्‍नॉलॉजी विभागाने केले आहे. यामुळे वस्त्रोद्योगातील रंगीत किंवा रासायनिक पाणी शुद्ध करून त्याचा वापर शेती किंवा अन्य औद्योगिक कारणासाठी केला...
एप्रिल 25, 2019
परळी वैजनाथ - परळी शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या तालुक्‍यातील नागापूर येथील वाण मध्यम प्रकल्पाने तळ गाठला असून दीड लाख लोकसंख्येच्या परळी शहरावर पिण्याचे पाण्याचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. या प्रकल्पातील परळीकरांच्या पिण्यासाठी राखीव ठेवलेले पाणी गेले कुठे, असा सवाल येथे नागरिक उपस्थित...
एप्रिल 25, 2019
पाटोदा - सध्या संपूर्ण पाटोदा तालुका हा दुष्काळात होरपळत असून ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये पाण्याचे प्रचड दुर्भिक्ष आहे. राज्याचे जलसंधारणमंत्री राम शिंदे यांची सासरवाडी असलेले व विशेष म्हणजे सासरे गावचे सरपंच असलेल्या तालुक्‍यातील धनगर जवळका या ठिकाणी ऐन दुष्काळात ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांना...
एप्रिल 25, 2019
नागपूर - पूर्व आणि पश्‍चिम नागपूर अशा दोन भागात शहराची सांस्कृतिकच नव्हे तर नैसर्गिक विभागणीही झाली आहे. आर्थिकदृष्ट्या विचार केल्यास पश्‍चिममध्ये अधिक श्रीमंती असली तरी पाणी पातळीत पूर्व अधिक सधन प्रदेश आहे. पश्‍चिमच्या भूगर्भात बेसॉल्ट खडक तर पूर्वमध्ये रूपांतरित खडक असून, त्यात...
एप्रिल 25, 2019
कल्याण - पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहिले असले तरी विविध शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीत 15 जुलैपर्यंत पुरेल इतका मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून कोणतीही पाणी कपात करण्यात येणार नसल्याची माहिती समोर आली असून, यामुळे ठाण्यासह भिवंडी, उल्हासनगर, कल्याण-...
एप्रिल 24, 2019
जिंतूर : घराजवळ असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा गाळात अडकून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी (ता.२४) दुपारी तीनच्या सुमारास कुऱ्हाडी येथे घडली.  पवन दिलीप आढे (वय १४,रा.मंठा) व करण सुभाष निकाळजे (वय ८,रा.कुऱ्हाडी) अशी मृत मुलांची नावे आहेत. याबाबत समजलेल्या माहितीनुसार...
एप्रिल 24, 2019
नागपूर - भूगर्भातील पाण्याचा बेसुमार उपसा आणि अपुऱ्या पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील भूगर्भातील पाण्याच्या साठ्यात मोठी घट झाली आहे. मार्च २०१९ मध्ये घेतलेल्या नोंदीनुसार गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षी भूजल पातळी एक ते अर्धा मीटरने खालावल्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या पाहणीत...
एप्रिल 23, 2019
   यशवंत महादेव भोसेकर. महसूलमध्ये मामलेदार म्हणून सटाणामध्ये ते निवृत्त झाले. 1870-71 मध्ये दुष्काळ पडला असताना त्यांनी सरकारी खजिन्यातून लाखो रुपये जनतेला दिले. मदतीला मामलेदार धावून आले म्हणून जनतेने त्यांना देवत्व दिले. सटाणाकरांनी त्यांचे मंदिर बांधले आणि 1900 मध्ये यात्रोत्सव सुरु झाला. पूनंद...
एप्रिल 22, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : सद्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून उमेदवारांसह नेतेमंडळी घरोघरी, दारोदारी जाऊन मतदारांकडे मतांचा जोगवा मागताना दिसून येत आहेत. दुसरीकडे मात्र जनसामान्यांचा पिण्याच्या पाण्यासाठी लढा सुरू आहे. माळमाथा परिसरातील खुडाणे (ता.साक्री) गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत होती....
एप्रिल 22, 2019
सावंतवाडी - तालुक्‍यात पाणीटंचाईची झळ नसली तरी विहिरींनी तळ गाठला आहे. बऱ्याच गावात हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुढील दीड महिना पाणी पुरेल का? याची ग्रामस्थांना चिंता जाणवत आहे.  दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी उष्णतेच्या झळा मोठ्या प्रमाणात बसत आहेत. पाऊसही सरासरीपेक्षा या...
एप्रिल 22, 2019
घनसावंगी - पाणीटंचाईने जालना जिल्ह्यातील अनेक गावांची होरपळ सुरू आहे. त्यात गुरुपिंपरी (ता. घनसावंगी) या गावाचा समावेश आहे. या गावाला टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून ते पुरेसे नाही. पाण्याअभावी गावातील शंभर हेक्‍टरवरील फळबागा संपुष्टात आल्यासारखी स्थिती आहे. या गावांतील अनेकांनी रोजगारासाठी पुणे,...
एप्रिल 22, 2019
औरंगाबाद - ‘तुमच्या बोअरला पाणी आहे का?’, ‘अहो! ऐकलंत का टाकीत पाणी नाही’, ‘आमचा बोअर पूर्णपणे आटला’, ‘टॅंकरवाल्याला फोन करा?’, ‘हजार रुपये मागतोय एका टॅंकरचे?’, असे संवाद सध्या सातारा-देवळाई परिसरातील घराघरांत ऐकायला मिळत आहेत. हेच चित्र हर्सूल परिसरातील काही भागांत आहे....
एप्रिल 22, 2019
बारमाही पाणी उपलब्ध असलेल्या गावांना पाण्याची नेमकी किंमत कळत नसल्याचे दिसून येते. अशा गावांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांचा समावेश होतो. यातीलच कारभारवाडी (ता. करवीर) हे गाव. ऊस उत्पादक गावामध्ये पाटपाण्याचा अतोनात वापर होत राहिल्याने जमिनीचा पोत बिघडला होता. एकरी केवळ २७ ते...
एप्रिल 22, 2019
गोरेगाव, - येथील इराणीवाडीतील एसआरए प्रकल्पाच्या इमारतीत १२ वर्षांपासून पाणीच आलेले नाही. त्यामुळे ३०० हून अधिक कुटुंबांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतीत २००७ मध्ये झोपडीवासीयांचे पुनर्वसन झाले. या इमारतीला अद्याप ताबा प्रमाणपत्र मिळाले नसल्यामुळे...
एप्रिल 21, 2019
'अहो आमचा भाग फक्त बाहेरून झक्कास दिसतो, आतमधल्या सोसायट्यांमध्ये परिस्थिती वेगळीच आहे...', 'स्मार्ट सिटीच्या नावाखाली आमच्या परिसारची वाट लाऊन टाकलीय हो...', 'गेली काही वर्ष आम्हाला पाणीच नाही, बोअरवेल आणि टँकर मागवून आम्ही आमची पाण्याची 'मूलभूत' गरज भागवतोय...', 'सिमेंटचे रस्ते तयार करून त्यावर...
एप्रिल 21, 2019
नागपूर - कधीकाळी प्रवासात एखादी पाण्याची बाटली विकत घेणारे नागरिक आता सर्रासपणे घरात पिण्यासाठी बाटलीबंद पाण्याचा वापर करू लागले आहेत. त्यामुळे पाणीविक्रीचा व्यवसाय तेजीत सुरू आहे. तसेच पाणीटंचाईमुळे फेब्रुवारीपर्यंत २५ रुपयाला मिळणाऱ्या २० लिटर जारची किंमत एप्रिलमध्ये ५० रुपयांपर्यंत गेली आहे. ...
एप्रिल 21, 2019
नागपूर - शहरात पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली असून, टॅंकरचालक याचा लाभ घेत असल्याचे महापालिकेने शनिवारी पत्रक काढून कबूल केले. पाणी वितरणाचे जाळे नसलेल्या भागात टॅंकरने निःशुल्क पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ‘वसुलीभाई’ टॅंकरचालकांना पैसे देऊ नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे....