एकूण 81 परिणाम
मे 09, 2019
मी मंगळवार पेठेतला. ज्या परिसरात मराठी चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवली गेली, त्याच गल्लीतला. आमच्या तीन पिढ्यांनी जयप्रभा स्टुडिओ असो किंवा एकूणच कलेसाठी सेवा केली. तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधीत्व करताना तोच ध्यास घेऊन मी नृत्य दिग्दर्शनात आलो आणि त्यात नवीन संकल्पना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहे. लवकरच...
एप्रिल 28, 2019
भारतीय जनता पक्षामुळं सन 2014 नंतर उत्तर प्रदेशातली सारी राजकीय समीकरणं आणि गणितं बदलून गेली. समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष यांना आजवर ज्या गणितांवर सत्ता मिळत असे, ती ही गणितं होती. या पार्श्‍वभूमीवर मुलायमसिंह यांचे चिरंजीव अखिलेश यांनी भाजपविरोधी आघाडीची कल्पना मांडायला सुरवात केली. तीत...
एप्रिल 19, 2019
एके काळी महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्षांना संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्‍नावरून पराभवाची धूळ चाखावी लागली होती. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न अद्याप सुटलेला नाही; मात्र निवडणुकांच्या अजेंड्यावरून हा प्रश्‍न गायब झाल्याचे चित्र आहे. सीमाप्रश्‍न हा मराठी माणसांच्या अस्मितेचा प्रश्‍न असूनही राजकीय...
एप्रिल 09, 2019
पंचवीसेक वर्षे झाली कोल्हापुरातून मुंबईला येऊन. पण, आजही कोल्हापूर सोडताना पुढे पुढे ढकललेला एकेक दिवस आठवतो. मुंबईत आल्यानंतर काही काळ संघर्ष जरूर होता. मात्र, ती सुद्धा एक घडण्याची प्रक्रियाच होती. प्रायोगिक, व्यावसायिक रंगभूमी आणि सिनेमांतूनही आजवर भरपूर काही केले. पुढंही बरेच काही करायचे आहे....
मार्च 31, 2019
पंजाब-हरियाना म्हटलं की "दूध-दही-तूप मोठ्या प्रमाणात वापरून तयार केलेले खाद्यपदार्थ', असं समीकरण आपल्या मनात येते. ते खरंही आहे. या सगळ्याचा खाद्यपदार्थांत भरपूर वापर हे तर इथलं वैशिष्ट्य आहेच; मात्र याशिवाय इतरही अनेक वेगळ्या पद्धतीचे खाद्यपदार्थ या राज्यांत बनवले जातात. हरियानातल्या अशाच काही "हट...
मार्च 24, 2019
प्रत्येक पंतप्रधानाच्या काळात काही ना काही भलंबुरं घडत असतं, तसंच ते नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळातही झालं आहे. चांगल्याचा भाजपनं उदोउदो करणं आणि चुकलं ते विरोधकांनी लावून धरणं निवडणुकीच्या मोसमात अपेक्षितच आहे. "साठ महिन्यांनंतर रिपोर्ट कार्ड देतो' म्हणणाऱ्या मोदींना ते द्यायला भाग...
मार्च 09, 2019
अयोध्येत दीर्घकाळ प्रलंबित राहिलेला आणि आंदोलन, राजकीय संघर्ष यामुळे चिघळलेला बाबरी मशीद-राममंदिर जागेचा वाद अखेर कायद्याने नव्हे; तर मध्यस्थांमार्फत सहमतीने सोडविण्याची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. सर्व संबंधित पक्षांना एकत्र आणून चर्चा, तडजोडीतून मार्ग निघाला, तर ते महत्त्वाचे यश असेल,...
मार्च 05, 2019
कणकवली - नाणार प्रकल्प रद्द केल्याच्या कारणावरून भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली.  आज (ता. ५) सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असलेल्या मुख्यमंत्र्यांकडे ते राजीनामा सोपविणार आहेत. पुढील भूमिका लवकरच जाहीर करू, असेही ते म्हणाले. येथील शासकीय...
फेब्रुवारी 27, 2019
जयसिंगपूर - महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष-शिवसेनेने उमेदवारीबाबत सावध पवित्रा घेतला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांची हॅट्‌ट्रीक रोखण्यासाठी पडद्यामागच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. युतीकडून अद्याप उमेदवाराची अधिकृत...
फेब्रुवारी 23, 2019
तमिळनाडूतील राजकारणात ‘ग्लॅमर’चे महत्त्व खूपच आहे; परंतु यंदा त्याची उणीव भासते आहे. राष्ट्रीय पक्षांनी अपेक्षेप्रमाणे आघाड्या केल्या असल्या, तरी राजकीय चित्र धूसर आहे. तमिळनाडूच्या राजकारणातील दोन अत्यंत शक्‍तिशाली नेते आणि एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी एम. करुणानिधी आणि जे. जयललिता यांच्या...
फेब्रुवारी 15, 2019
क्रिकेटमधली सरंजामशाही आता संपली आहे. तिथेही लोकशाही आली. क्रिकेट खेड्यापाड्यात पोचलं. तिथल्या खेळाडूंना निदान संधीची आशा उत्पन्न झाली. ही अत्यंत स्वागतार्ह बाब होय. देशाच्या वेगवेगळ्या भागांतील कुठलाही संघ आता जिंकण्याचं स्वप्न पाहू शकतो, अशी स्थिती आहे. भा रतातलं म्हणजे घरचं क्रिकेट कूस बदलतंय का...
फेब्रुवारी 13, 2019
प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेशच्या मैदानात उतरवून कॉंग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे, तर त्याचवेळी पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसऐवजी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्यांशी कॉंग्रेस आघाडी करणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे लोकसभेच्या 80 जागा...
फेब्रुवारी 02, 2019
नवी दिल्ली : रामायण महाकाव्याने जगाला दिलेली नवी दिशा व मूल्यविचार सर्वत्र पोहचविण्यासाठी महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवाचे आयोजन मुंबईमध्ये 25 ते 28 फेब्रुवारी या काळात करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच जाहीर केले. यंदाच्या सूरजकुंड आंतरराष्ट्रीय मेळाव्यात...
जानेवारी 25, 2019
पुणे : "विश्वास पाटील यांनी मला दिलगिरी व्यक्त करणारे पत्र पाठवलं आहे ते मराठीच्या सांस्कृतिक क्षेत्रातील एक महत्वाचे पत्र आहे. आमच्यात जे काही मतभेद झाले आहेत ते आजच्या कार्यक्रमात संपले आहेत,आजपासून आमची मैत्री घट्ट होईल. ज्याच्याकडे दिल असते तोच दिलगिरी व्यक्त करू शकतो पाटील हे मोठया दिलाचे आहेत...
जानेवारी 25, 2019
पुसेसावळी - कण्हेरखेड (ता. कोरेगाव) हे छोटेसे पण हिंदुस्थानच्या इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या शिंदे सरकारांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. सुभेदार राणोजी शिंदे यांच्यापासून सुरू झालेला या गावाचा ऐतिहासिक प्रवास आजच्या लोकशाहीतील माजी केंद्रीय मंत्री, खासदार ज्योतिरादित्यराजे शिंदे, राजस्थानच्या...
जानेवारी 19, 2019
निवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रदर्शित होणारा "ठाकरे' हा चित्रपट शिवसेनेच्या प्रचाराचा भाग आहे, यात शंका नाही. पण चित्रपटाच्या माध्यमातून प्रचार करण्याचा हा रजतमार्ग किती फळतो ते पाहावे लागेल.  बॉलिवूड, अंडरवर्ल्ड आणि शिवसेना या परदेशातून किंवा परकी नजरेतून मुंबईकडे पाहणाऱ्या अभ्यासकांच्या तीन आवडत्या...
जानेवारी 19, 2019
पुणे - भारताला हजारो वर्षांचा वैभवसंपन्न ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हा इतिहास जसा ग्रंथांमध्ये असतो, तसाच तो जेथे घडला तेथील वस्तूंमध्येही असतो. त्या ऐतिहासिक स्थळांना प्रत्यक्ष भेट देऊन इतिहास तज्ज्ञांकडून त्याचा इतिहास समजावून घेणे म्हणजे ‘वारसा दर्शन’ होय.  अशा अनेक ऐतिहासिक वारशाने पुणे शहर...
जानेवारी 14, 2019
कापड विरले तर त्याला रफू होत नाही किंवा शिऊनही उपयोग होत नाही. वर्तमान सत्ताधारी तथाकथित आघाडीची अवस्था काहीशी अशीच झालेली आहे. एकामागून एक सहकारी व मित्रपक्ष आघाडी सोडत आहेत. पराभवाचे चटके बसले आहेत. कार्यकर्त्यांनाही संकटाची जाणीव होऊ लागली आहे. अशा अवस्थेत मंडळींना भावनिक गोष्टी आठवू लागतात....
जानेवारी 14, 2019
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (108 वेळा लिहिणे) कालचा दिवस मोठ्या गडबडीत गेला. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निमित्ताने दोन दिवस दिल्लीत होतो. पण महाराष्ट्रात राहिलो असतो तर यवतमाळला साहित्य संमेलनाच्या मांडवात जावे लागले असते !! त्यापेक्षा दिल्लीतला मांडव केव्हाही पर्वडला. कार्यकारिणीच्या बैठकीनंतर...
जानेवारी 08, 2019
नाशिक - युतीबाबत सकारात्मकतेचा संदेश द्यायचा अन्‌ नकारात्मक वागायचं, ही भारतीय जनता पक्षाची दुटप्पी भूमिका शिवसेनेला नवीन नाही. शिवसेनेने भाजपाच्या अनेक बारशांच्या घुगऱ्या खाल्या आहेत. शिवसेनेच्या कडव्या हिंदुत्वाची भूमिका भाजपला नको आहे. पण, शिवसेना भाजपचा मस्तवालपणा सहन करणार नाही, अशा शब्दात...