एकूण 608 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
कुडाळ - रायगडावर 24 ला वसुबारस तिथीला रात्री शिवचैतन्य सोहळा आयोजित केला आहे, अशी माहिती श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड अध्यक्ष सुनिल पवार यांनी माहिती दिली आहे. यानिमित्त 23 ते 25 या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, असेही त्यांनी सांगितले.  श्री. पवार म्हणाले,""...
ऑक्टोबर 19, 2019
म्हाकवे - श्री क्षेत्र आप्पाचीवाडी (ता. चिक्कोडी) येथील श्री हालसिद्धनाथांची भोंब यात्रेची लाखो भाविकांच्या साक्षीने उत्साहात सांगता झाली. महाराष्ट्रसह कर्नाटकातील सीमावासीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या नाथांची पाच दिवस यात्रा चालली.  ढोलांचा आवाज, कैताळांचा निनाद, बासरीच्या सुरांनी परिसर दुमदुमला. ‘...
ऑक्टोबर 18, 2019
पट्टणकोडोली - येथील श्री विठ्ठल बिरदेव व देवी भागीरथीसाठी भाविकांच्या देणगीतून साकारलेली चांदीची पालखी आज मंदिरात आणण्यात आली. तब्बल ३३ किलो चांदी ही पालखी तयार करण्यासाठी लागली आहे.  पाच राज्यांत प्रसिद्ध असणाऱ्या विठ्ठल बिरदेवाचे आगळे वेगळे महत्त्व आहे. 1970 साली...
ऑक्टोबर 13, 2019
तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजाभवानी मातेच्या अश्विनी यात्रेनिमित्त रविवारी (ता.13) लाखो भाविकांनी दर्शन घेतले. यात्रेसाठी शनिवारी (ता.12) रात्रीपासूनच भाविकांचा ओघ शहरात सुरू झाला होता. दिवसभरात शहरातील सर्वच रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते.   तुळजाभवानी मातेच्या अश्विनी यात्रेनिमित्त...
ऑक्टोबर 09, 2019
जेजुरी : सनई- चौघड्याचा मंगलमय सूर, फटाक्‍यांची आतषबाजी, शोभेच्या दारूचा लख्ख उजेड व भंडाऱ्याची उधळण, अशा जल्लोषपूर्ण वातावरणात जेजुरीत मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजता खंडोबाच्या दोन्ही पालख्यांच्या भेटीचा सोहळा रंगला. या उत्सवाची सतरा तासानंतर सांगता झाली. उत्सव मंगळवारी सायंकाळी सहा वाजता सुरू...
ऑक्टोबर 09, 2019
तुळजापूर - कुंकवाची उधळण, संबळाचा कडकडाट आणि ‘आई राजा- उदो उदो’च्या जयघोषात तुळजाभवानी मातेचा सीमोल्लघंन सोहळा मंगळवारी (ता. आठ) उत्साहात झाला. तुळजाभवानी मातेचा सीमोल्लघंन सोहळा शौर्याचे प्रतीक आहे. सोहळ्यापूर्वी सोमवारी (ता. सात) रात्रीपासून तुळजाभवानीमातेचे मंदिर प्रथेनुसार खुले ठेवण्यात आले...
ऑक्टोबर 08, 2019
तुळजापूर (जि. उस्मानाबाद) ः कुंकवाची उधळण, संबळाचा कडकडाट आणि "आई राजा- उदो उदो'च्या जयघोषात तुळजाभवानी मातेचा सीमोल्लघंन सोहळा मंगळवारी (ता. आठ) उत्साहात झाला. तुळजाभवानी मातेचा सीमोल्लघंन सोहळा शौर्याचे प्रतीक आहे. सोहळ्यापूर्वी सोमवारी (ता. सात) रात्रीपासून तुळजाभवानीमातेचे मंदिर प्रथेनुसार...
ऑक्टोबर 08, 2019
जोतिबा डोंगर - ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात व गुलाल-खोबरे, विविधरंगी फुले यांची उधळण करत आज सकाळी जोतिबा देवाचा पहिला पालखी सोहळा झाला. ‘चांगभलं’च्या गजरात मुख्य मंदिराभोवती पालखीच्या प्रदक्षिणा झाल्या.  या सोहळ्यासाठी आज राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक आले होते. आजपासून...
ऑक्टोबर 08, 2019
पिंपरी - ‘दसरा सण मोठा, आनंदाला नाही तोटा...’ असा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला विजयादशमी अर्थात दसरा सण. या सणासाठी शहरातील बाजारपेठा भगव्या व पिवळ्या झेंडूच्या फुलांनी सजल्या आहेत. सोने खरेदीचा मुहूर्त साधतानाच नवीन वाहन, गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली. इलेक्‍ट्रॉनिक...
ऑक्टोबर 07, 2019
तुळजापूर (जि. उस्मानाबाद) ः तुळजाभवानी मातेच्या नवरात्रात झालेल्या नऊ दिवसांच्या विविध धार्मिक कार्यक्रमांनंतर सोमवारी (ता. सात) घटोत्थापन झाले. तत्पूर्वी मंदिरातील होमकुंडावर अजाबळी अर्पण करण्यात आला. तुळजाभवानी मंदिरात सकाळी नित्य अभिषेक झाले. यावेळी मुख्य भोपे पुजारी सचिन संभाजीराव पाटील यांनी...
ऑक्टोबर 03, 2019
कोल्हापूर - भले तेथे उद्योगाची चाके सुरू नसतील. भले तेथे कामगारांचे अस्तित्व राहिले नसेल. पण, तरीही कष्टकरी, श्रमिकांच्या दारात जाऊन त्यांना दर्शन देण्याची प्रथा अंबाबाईच्या पालखीने आज पाळली. नवरात्रातील ललित पंचमीची पालखी आज प्रथेप्रमाणे शाहू छत्रपती मिल्सच्या आवारात गेली. अर्थात मिल...
ऑक्टोबर 03, 2019
कोल्हापूर - दुष्ठ शक्तीचा नाशकरून प्रजेला सुख शांती देण्यासाठी त्र्यंबोली देवीने कोल्हासूर राक्षसाचा वध केला याच धार्मिक कृतीच्या स्मृती जागवणारी कोहाळ पंचमी यात्रा आज त्र्यंबोली देवी टेकडीवर भरली. हजारो भाविकांच्या साक्षीने गौरी गुरव या बालिकेकडून कोहाळ रूपी कोल्हासूराच वध झाला आणि अवघ्या क्षणात...
सप्टेंबर 27, 2019
कोल्हापूर - नवरात्रोत्सवासाठी अंबाबाई मंदिरासह शंभर मीटर अंतरापर्यंत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात राहणार आहे. परिसरात बसवविण्यात आलेल्या 60 सीसी टीव्ही कॅमेऱ्याद्वारे प्रत्येक गोष्टीवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी दहशतवाद विरोधी पथकासह, राज्य राखीव दल आणि...
सप्टेंबर 18, 2019
पुणे - मोरगाव म्हटले, की अष्टविनायकांपैकी एक गाव, एवढीच ओळख तुम्हाला माहिती असेल; परंतु आणखी एक वेगळी ओळख या गावाची आहे. ती म्हणजे विजयादशमी, अर्थात दसऱ्याला रात्रभर गावात शोभेच्या दारूची आतषबाजी केली जाते. यासाठी लागणारे भुईनळे तयार करण्याची लगबग तेथील कुंभारवाड्यात सुरू झाली आहे.  दसऱ्यासाठी...
सप्टेंबर 14, 2019
सातारा ः पुढच्या वर्षी लवकर या... या जयघोषात लाडक्‍या गणरायाला सातारकरांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. तब्बल साडेसोळा तास चाललेल्या मिरवणुकीनंतर सुमारे 88 मंडळांच्या बाप्पांना निरोप देण्यात आला.  गेले 11 दिवस अत्यंत उत्साहात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची गुरुवारी (ता.12) सांगता झाली. विविध...
सप्टेंबर 13, 2019
पुणे : पुण्यातील सर्व महत्त्वाच्या गणपतींचे वाजतगाजत विसर्जन झाले असून इतर मंडळांच्या विसर्जन मिरवणूकी सुरू आहेत. पुण्याचे आराध्य दैवत दगडुशेठ हलवाई गणपतीचे सकाळी 7 वाजून 54 मिनिटांनी विसर्जन झाले, तर अखिल मंडई मंडळाचा गणपती सकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी विसर्जन झाला.  Video : दगडुशेठ हलवाई गणपतीचा...
सप्टेंबर 11, 2019
सार्वजनिक मंडळांकडून जय्यत तयारी सुरू; विद्युत रोषणाईसह फुलांच्या सजावटीवर भर पुणे - राज्यभरातील गणेशभक्तांचे लक्ष लागून राहिलेल्या पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी लगबग सुरू झाली आहे. गणेशोत्सवाची सांगता गुरुवारी (ता. १२) अनंत चतुर्दशीला होत असताना लाडक्‍या बाप्पाला वाजत गाजत निरोप देण्यासाठी...
सप्टेंबर 09, 2019
गणेशोत्सव2019 : पुणे - मराठा मित्र मंडळ गेल्या तीस वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. मंडळाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष उमेश शेडगे यांनी दिली. मंडळाची स्थापना १९७० मध्ये राजेंद्र साळुंके, गिरीश...
सप्टेंबर 09, 2019
गणेशोत्सव2019 : पुणे - कोथरूडमधील करिश्‍मा हाउसिंग सोसायटीतील यंदाच्या गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू होता पंढरीचा राणा. विठुरायाच्या नामाचा गजर करत येथे दिंडीही काढण्यात आली. सोसायटीच्या गणेशोत्सव समितीच्या अध्यक्षा सविता पानसरे म्हणाल्या, ‘‘यंदा पंढरपूर व विठुमाउलीच्या भेटीला निघालेली वारी हा विषय...
सप्टेंबर 06, 2019
सिंधुदुर्ग -  ओटवणे गावाच्या एकतेचे प्रतिक म्हणून येथील कुळघरातील अर्थात गावच्या गणपती उत्सवाचे पाहिले जाते. जवळपास साडेचारशे वर्षाची परंपरा असलेल्या या गणेशोत्सवाला गावात खूप मोठे महत्त्व आहे.  सुमारे साडेचारशे वर्षापूर्वीची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या ओटवणे गावाची धार्मिकता सर्वानच परिचीत आहे....