एकूण 30 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
अजून पाच दिवस असाच पाऊस पडला तर पुण्यात उभ्या असलेल्या भाजपच्या उमेदवारांविरोधात असलेल्यांना प्रचाराची गरजच पडणार नाही... खरंय ते. गेल्या महिन्याभरात अशी वेळ अनेकदा येऊन गेली. सायंकाळी किंवा रात्री पाऊस पडावा आणि त्याने पुणेकरांचं जगणं नकोनकोसं करुन टाकावं... आज निवडणुका लढविणाऱ्या प्रत्येकानं...
ऑक्टोबर 09, 2019
कोथरूड : कोथरूड भागातील मुख्य कर्वे रस्ता परिसरात बुधवारी (ता.9) आलेल्या मुसळधार पावसामुळे महर्षी कर्वे पुतळा चौकात रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कोथरूडमध्ये ढगफुटीसारख्या मुसळधार पावसास सुरुवात झाली. आणि अवघ्या पंधरा मिनिटांतच कर्वे रस्त्याला नदीचे...
ऑक्टोबर 03, 2019
पुणे : भारतीय जनता पार्टीच्या कसबा विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार मुक्ता शैलेश टिळक यांनी गुरुवारी (ता.3) उमेदवारी अर्ज दाखल केला. कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे टिळक यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून समाजातील विविध घटकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्याचीच...
ऑगस्ट 28, 2019
पुणे - महापालिकेत समाविष्ट केलेल्या तेवीस गावांमध्ये मिळकतीचे "प्रॉपर्टी कार्ड' तयार करण्याचे  काम सुरू होऊन बारा वर्षे झाली. मात्र, अद्यापही ते पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे महापालिकेने या कामासाठी भूमी अभिलेख विभागाला दिलेले दोन कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. त्यातच आता नव्याने अकरा...
ऑगस्ट 25, 2019
पुणे : महापालिकेत समाविष्ट झालेल्या 11 गावांचा विकास आराखडा (डीपी) तयार करण्यासाठी सध्याच्या जमीन वापराचे (ईएलयू) नकाशे तयार करण्यात येत आहेत. ही गावे महापालिकेत येण्यापूर्वी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) दिलेल्या बांधकाम परवानग्या आणि बेकायदा बांधकामे...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई : मुंबईत आग लागण्याच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत असून यातील जास्त घटना या शॉर्टसर्किट झाल्यामुळे होत असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे मुंबईत १ ऑक्‍टोबर २०१८ ते ३१ मार्च २०१९  या केवळ सहा महिन्यांच्या काळात आग लागणे, घरांची पडझड अशा एकूण चार हजार ३१८ घटना घडल्या असून त्यात आगीच्या एक...
जुलै 12, 2019
पुणे - आपत्ती निवारणाच्या ‘देवदूत’ योजनेच्या ठेकेदाराने पुणे महापालिकेकडून दीड वर्षात २५ कोटी रुपये वसूल करूनही कर्मचाऱ्यांना महिन्याचा पगारही वेळेत मिळत नसल्याची बाब उघड झाली आहे. पगारात सातशे रुपयांची वाढ दिली. मात्र, त्याची वर्षभराच्या फरकाची रक्कम दिली नसल्याची...
जुलै 06, 2019
पुणे -  आपत्तीच्या काळातच बेजबाबदारपणा दाखविणाऱ्या महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला राज्य सरकारनेही फटकारले. उजवा मुठा कालवा फुटून झालेली दुर्घटना आणि पाटील इस्टेटमधील आगीच्या घटनेदरम्यान या विभागातील अधिकारी वेळेत घटनास्थळी पोचले नसल्याचा ठपका राज्य सरकारने महापालिकेवर ठेवला...
जुलै 04, 2019
पुणे - शहरात पूरस्थिती किंवा अन्य आपत्ती ओढविल्यास पुणेकरांना वाचविण्यासाठी महापालिकेकडे चार बोटींशिवाय इतर साधने नाहीत. परंतु आपत्ती निवारणासाठी चार वर्षांत तब्बल ३३ कोटींचा खर्च दाखविला आहे. पण एकही नवे साधन खरेदी केलेले नाही. २०११ मध्ये खरेदी केलेल्या बोटी दाखवून बिले काढल्याचा संशय...
जून 13, 2019
पुणे - महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून अवाजवी दराने केली जाणारी बाकखरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. त्यामुळे मागील आर्थिक वर्षात मध्यवर्ती भांडार विभागाकडून बाकखरेदी करण्यात आली. या खरेदीत बाकांची किंमत जवळपास निम्म्याने कमी होऊन प्रत्येकी ५ हजार ५९८ रुपयांवर आली...
जून 10, 2019
पुणे  - गटारांवरील झाकणातूनही (चेंबर) पैसे कमविले जाऊ शकतात? कधी ऐकिवात नसावे; पण तेही घडते आहे. ही झाकणे रस्त्यापासून खाली-वर झाल्याने त्यांची समपातळी करण्यासाठी महापालिकेने तब्बल ४० लाख रुपयांच्या निविदा काढल्या आहेत. त्यात, एका झाकणाचा खर्च एक लाखाच्या घरात दाखविला आहे. हा खर्च...
मे 11, 2019
येरवडा (पुणे) : नव्याने समावेश झालेल्या अकरा गावातील जिल्हा परिषदेचे आरोग्य केंद्र व शाळांची इमारती व मालमत्ता अद्याप पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात आल्या नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागाला आरोग्याच्या तर शिक्षण विभागाला शैक्षणिक सुविधा देण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. तर...
मे 03, 2019
पुणे - महापालिकेतील शहर सुधारणासह चारही विषय समित्यांचे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून सत्ताधारी भाजपने लांब ठेवल्यानंतर शिवसेनेनेही आता ताठर भूमिका घेण्यास सुरवात केली आहे. भाजपच्या ताब्यात येणाऱ्या अकरापैकी चार प्रभाग समित्यांची मागणी करीत, भाजपची अडवणूक केली. मात्र,...
मे 01, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीत एकत्रित येत विरोधकांवर तोफ डागणाऱ्या भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीला आता तडे जाण्यास सुरवात झाली आहे. महापालिकेतील चारपैकी एका विषय समितीचे अध्यक्षपद घेण्याचा भाजपचा प्रस्ताव शिवसेनेने धुडाकावून लावत, सत्तेत वाटा देताना भाजप आखडता हात घेत आहे, असा ठपका ठेवला; तर...
फेब्रुवारी 10, 2019
पुणे - तलावांत जलपर्णी उगवली नसतानाही तिच्या नावाखाली पुणेकरांचे तब्बल २३ कोटी हडप करण्याचा महापालिकेतील पदाधिकारी, अधिकारी आणि ठेकेदारांचा डाव ‘सकाळ’मधील वृत्तामुळे उधळला गेला आहे. हे वृत्त प्रसिद्ध होऊन चोवीस तास होण्याआधीच या कामाच्या निविदा जादा दरानेच आल्याची कुबली देत, पाषाण आणि...
जानेवारी 25, 2019
वारजे - महानगरपालिकेतर्फे वारजे येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम साकारण्यात येत आहे. ३० हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या या स्टेडियमसाठी तीस कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. ‘डे-नाइट’ खेळ खेळता येतील, अशी या स्टेडियमची रचना असून, तीन वर्षांत काम पूर्ण करण्यात येणार आहे. या स्टेडियमध्ये दोन...
जानेवारी 14, 2019
पुणे - महापालिकेतील प्रमुख पदाधिकारी-नगरसेवकांनी कार्यकर्त्यांची बडदास्त ठेवण्याचे फर्मान सोडल्याने सगळ्याच दालनांत ‘चाय पे चर्चा’ रंगत आहे. या पाहुणचाराचा मागील वर्षातील खर्च ६० लाख रुपये आहे. यात स्थायी समितीने आघाडी घेतली असून, वर्षभरात सात लाख रुपयांचा चहा पाजला आहे.   चहापानाचा हा...
जानेवारी 09, 2019
पुणे : भारतीय पुरातत्त्व विभागाने ‘आगाखान पॅलेस’ मुळे नगर रस्त्यावरील मेट्रो मार्गाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आता मेट्रो वनाझ ते रामवाडी व्हाया कल्याणीनगर धावणार आहे. त्यासाठी तब्बल दोनशे ते अडीचशे कोटी रूपयांचा जादा खर्च येणार आहे. मात्र ‘महामेट्रो’ ने या बदललेल्या मार्गासाठी...
जानेवारी 04, 2019
पुणे - सुरळीत वाहतुकीसाठी उड्डाण पूल, पादचारी व वाहनचालकांसाठी भुयारी मार्ग, लहान मुलांसह ज्येष्ठांसाठी उद्याने, आरोग्य व्यवस्था आणि झोपडपट्टी निर्मूलन योजना, अशा सेवा-सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेने आखलेले विविध प्रकल्प ‘टक्केवारी’त अडकले आहेत. या कामांमधून नगरसेवक व अधिकाऱ्यांना...
ऑक्टोबर 20, 2018
उल्हासनगर : कल्याण न्यायालयाच्या आदेशान्वये उल्हासनगरातील तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात एक्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. काल शुक्रवारी 19 तारखेेला उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा गुन्हा रद्द केला आहे. या गुन्ह्यामुळे माझ्यासह परिवाराला मानसिक स्थितीचा सामना...