एकूण 26200 परिणाम
मे 21, 2019
पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील नामांकित 'बर्गर किंग'मध्ये बर्गर खाण्यासाठी गेलेल्या एका रिक्षाचालकाच्या बर्गरमध्ये काचेचे तुकडे आढळले. रिक्षाचालकाने बर्गर खाल्ले, त्यानंतर त्यास खोकला आणि त्यापाठोपाठ तोंडातुन रक्त येऊ लागल्याने उपचारासाठी रुग्णलयात दाखल केले. त्याच्या मित्रांनी बर्गरची...
मे 21, 2019
पुणे : अकरावीसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेचा अर्ज हा संकेतस्थळावर भाग एक (वैयक्तिक माहिती) आणि भाग दोन (पसंतीक्रम) अशा दोन टप्प्यांमध्ये भरावयाचा आहे. भाग एक भरण्याची प्रक्रिया दहावीच्या निकालापूर्वी सुरू होईल. या भागामध्ये माहिती एकदाच भरून ती प्रमाणित (अप्रूव्ह) करून घ्यावयाची...
मे 21, 2019
पुणे : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालासाठी तीन आठवडे बाकी असतानाच केंद्रीय प्रवेशप्रक्रिया समितीने अकरावी प्रवेशाची तयारी सुरू केली आहे. यासाठी अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया पुढील सोमवारपासून (ता. 27) सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी  या प्रक्रियेतील विभागीय अधिकाऱ्यांना...
मे 21, 2019
पुणे : कडेवर येण्यास नकारत रडणाऱ्या अडीच वर्षांच्या बालिकेला पित्याने मारहाण करून पायाने जमिनीवर रगडल्याची धक्कादायक घटना ताडीवाला रस्ता परिसरात घडली. यात ही बालिका गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी ताडीवाला रस्त्यावर राहणाऱ्या 39 वर्षीय पित्याला अटक केली आहे. बालिकेच्या...
मे 21, 2019
पुणे : कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरणी हॉंगकाँग बँकेद्वारे 14 कोटी रुपये सायबर गुन्हेगारांनी काढण्याचा प्रयत्न केला होता. ही रक्कम हॉंगकाँग बँकेकडून मिळावी, यासाठी कॉसमॉस बँक व पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून पाठपरावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता कॉसमॉस बँकेचे 14...
मे 21, 2019
सेलिब्रिटी टॉक - नीना कुलकर्णी मी आतापर्यंत केलेल्या सगळ्याच भूमिका मला आव्हानात्मक वाटल्या आहेत. कारण फक्त भूमिका साकारून सगळं होत नाही आजूबाजूला काय घडत आहे, हे समजून घेऊन भूमिका साकारावी लागते. सगळ्यांशी जमवून घेऊन अभिनय करावा लागतो. प्रत्येक जण स्वतःचा अभिनय करत राहिला, तर लोकांपर्यंत ती...
मे 21, 2019
कम बॅक मॉम - गायत्री सोहम आईपण नेमकं काय असतं, हे मी अगदी लहान वयात अनुभवलं आहे. म्हणजेच वयाच्या २२व्या वर्षी मी आई झाले. त्यामुळं आपसूकच लहान वयातच सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर आल्या. त्यातही मी सिंगल मदर. त्यामुळं माझा मुलगा सोहमची जबाबदारी माझ्याकडंच होती. शिवाय प्रेग्नंसीदरम्यान माझं वजन ८६ किलो...
मे 21, 2019
हेल्थ वर्क संपूर्ण आयुष्य विश्रांती घेण्यातच घालवणाऱ्यांना विश्रांतीमधील मजा कधीच कळणार नाही. उत्तम संतुलित व्यायाम झाल्यावरच विश्रांतीची मजा कळते. प्रत्यक्ष व्यायाम करणे ही शरीराला आपण देत असलेली एक चेतना आहे. विश्रांती घेताना शरीराची झीज भरून निघतेच, पण त्याचबरोबर शरीर पूर्वीपेक्षा थोडे अधिक...
मे 21, 2019
पुणे - झोपडपट्ट्यांमध्ये घराची खरेदी अथवा विक्री करायची असेल किंवा घर बांधायचे असले तरी त्या-त्या परिसरातील ‘भाई’ किंवा आजी-माजी नगरसेवकांच्या कथित कार्यकर्त्यांना ‘कमिशन’ द्यावेच लागते. कधी मंडळाची वर्गणी म्हणून, तर कधी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाईची भीती दाखवून नागरिकांकडून...
मे 21, 2019
पुणे - दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसानेही (वळीव) या वर्षी आतापर्यंत हजेरी लावली नाही. मुंबई, पालघर आणि नगरमध्ये तर वळवाची एकही सर पडली नाही. त्यामुळे राज्यातील उन्हाचा चटका वाढत असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले आहे. राज्यात १ मार्च ते १९ मे या ८०...
मे 21, 2019
पुणे - राज्य सरकारच्या नगर विकास खात्याकडून पुन्हा एकदा पुण्यावर अन्याय करण्यात आल्याचे समोर आले आहे. पुणे शहरासह राज्यातील सर्व महापालिकांच्या हद्दीत नऊ मीटर रुंदीच्या आतील रस्त्यावर टीडीआर वापरण्यास परवानगी न देण्याचा निर्णय घेतला असताना त्यातून नाशिक शहर वगळण्यात आले...
मे 21, 2019
पुणे - शहरात घडणाऱ्या घटनांची वेळेत खडानखडा माहिती मिळावी, यासाठी आता पोलिसांनी ‘चौकीदारां’ना खबरे बनविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ७ हजार खासगी सुरक्षारक्षकांचे नेटवर्क तयार केले आहे. सुरक्षारक्षकांच्या बैठका, व्हॉट्‌सॲप ग्रुपच्या माध्यमातून पोलिस ठाण्यांच्या पातळीवरून त्यांच्याशी...
मे 21, 2019
बालक-पालक फटक्‍यांशिवाय लागते ती खरी शिस्त, मात्र मुलांना ती लागावी यासाठी पालकांनीही काही शिस्त पाळावी लागते. त्यासाठीच्या या काही टिप्स -  पुढच्या वेळी सौम्य व्हा सर्व मुलांशी एकाच तऱ्हेनं सरसकट वागून चालत नाही. डॉ. अनुराधा सोवनी म्हणतात, ‘‘मुलाचं वय कितीही असो, त्याची समजुतीची, जबाबदारीची जाणीव...
मे 21, 2019
पुणे - ‘बाळा, काकांना वन टू फिफ्टी आणि पोएम म्हणून दाखव!’ घरात पाहुणे आले, की आपल्या ३ ते ४ वर्षांच्या मुलाला पालक हमखास असे सांगतात. पाठीवरच्या दप्तराच्या ओझ्याचा प्रश्‍न निकाली निघाला नसतानाच नर्सरीपासून मुलांना शिक्षणाचेच ‘ओझे’ वाटायला सुरवात होते. आंतरराष्ट्रीय मापदंडामुळे पहिल्या...
मे 21, 2019
खेड शिवापूर - पुणे-सातारा महामार्गावरील येथील टोल नाक्‍यावर सोमवारी (ता. २०) बिबट्याच्या बछड्यांची तस्करी करणाऱ्या तीन जणांना राजगड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तीन ते चार महिने वयाचे बिबट्याचे दोन बछडे ताब्यात घेण्यात आले. त्यांना कात्रज (पुणे) येथील वन्यजीव...
मे 21, 2019
पुणे - कष्टाची तयारी असेल, तर दरमहा चांगले उत्पन्न मिळविता येते, हे राम यांच्या उदाहरणातून अधोरेखित झाले आहे. सकाळी सहा ते साडेआठपर्यंत सोसायट्यांमध्ये गाड्या धुऊन आणि दिवसा साडेनऊ ते पाच वाजेपर्यंत नोकरी करून राम सुमारे ३५-४० हजार रुपयांचे उत्पन्न दरमहा मिळवत आहेत. अभियांत्रिकीच्या...
मे 21, 2019
पुणे - जिल्ह्यातील अंगणवाड्यांची सर्व माहिती आता दररोज ऑनलाइन जमा केली जाणार आहे. यासाठी सर्व अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन दिले जाणार आहेत. या मोबाईलमध्ये ऑनलाइन माहिती जमा करण्यासाठीचे ‘कॉमन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर’ (कॅस) कार्यान्वित केले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या...
मे 21, 2019
पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील फुकट्या प्रवाशांवर जरब बसविण्यासाठी पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी १०० रुपयांचा दंड तीनशे रुपये केला खरा; पण कारवाई निम्म्याने घटली आहे. तिप्पट दंडामुळे प्रवाशांवर जरब बसल्याचा प्रशासन दावा करीत असले, तरी हा दंड...
मे 21, 2019
ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ४५.९, तर पुण्यात मे महिन्यातील उच्चांकी तापमान पुणे - राज्यात उन्हाची काहिली वाढली असून, येत्या शुक्रवारपर्यंत (ता. २४) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यात सर्वाधिक तापमान आज ब्रह्मपुरी येथे ४५.९ अंश...
मे 21, 2019
मुंबई - राज्यातील विविध २० जिल्ह्यांमधील १४६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक ; तसेच ६२ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदांच्या आणि विविध ग्रामपंचायतींमधील ६ हजार ७१९ सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी २३ जून २०१९ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे, अशी...