एकूण 1099 परिणाम
मे 23, 2019
येरवडा - मानसिक आजारातून बरे होऊनही संतोषला (नाव बदलले आहे) कुटुंबीय घरी घेऊन जात नव्हते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकारामुळे एका हॉटेलने त्याला नोकरी दिली. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून तो तेथे काम करीत आहे. बरे झालेल्या मनोरुग्णाचे राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारे पुनर्वसन...
मे 22, 2019
ढेबेवाडी - गेल्या अनेक महिन्यांपासून पाटबंधारे विभागासह ठेकेदाराने वाळूसाठी मोठे प्रयत्न केले. पण, जिल्हा प्रशासनाने त्याला दाद न दिल्याने अखेर मराठवाडी प्रकल्पाच्या बांधकामासाठी कृत्रिम वाळूचा आधार घ्यावा लागला आहे. त्यामुळे वाळूने मारले; स्टोनक्रश सॅण्डने तारले, असाच काहीसा प्रकार येथे दिसत आहे...
मे 21, 2019
मुंबई - महापालिकेच्या जोगेश्‍वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयातील सदोष मोतीबिंदू शस्त्रक्रियेमुळे अंधत्व आलेल्या दोन वाहनचालकांचे संसार उघड्यावर आले आहेत. एक डोळा निकामी झाल्याने बेरोजगार झालेल्या या दोघांच्या कुटुंबावर बेघर होण्याचेही दुर्दैव ओढवले आहे. डॉक्‍टरांच्या निष्काळजीपणामुळे डोळे गमावलेल्या...
मे 19, 2019
जळगाव : राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होत असून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचे भारतीय जनता पक्षातर्फे पुनर्वसन करण्यात येत आहे. मात्र त्यांच्याच पक्षाचे नेते एकनाथराव खडसे यांच्याबाबत मात्र अजूनही प्रश्‍नचिन्हच आहे.  राज्यातील भाजप- शिवसेना युती सरकारच्या...
मे 17, 2019
कळस (पुणे): उजनी धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे धरणात गेलेल्या गावांच्या गावखुणा उघड्या पडू लागल्या आहेत. गेल्या काही दशकांपासून पाण्याखाली राहूनही पुरातन वास्तू अद्यापही सुस्थितीत असल्याचे आढळून येत आहे. इंदापूर तालुक्‍यातील पळसदेव येथील ग्रामदैवत पळसनाथाचे मंदिर यंदा पूर्णपणे पाण्याबाहेर आले आहे...
मे 15, 2019
मुंबई - निम्मा महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना शेतकाऱ्यांशी संबंधित असलेल्या राज्याच्या कृषी खत्याला कुणी वाली उरलेला नाही. या खात्याला गेल्या वर्षभरापासून पूर्ण वेळ मंत्री मिळालेला नाही, तर नऊ महिन्यांपासून कृषी खात्याचा अतिरिक्त कार्यभार जलसंधारण सचिवांकडे देण्यात आला आहे. त्यामुळे ऐन...
मे 14, 2019
पुणे - दुष्काळी परिस्थितीत कोरड्या पडलेल्या तलाव व बंधाऱ्यांमधील गाळ काढून तो शेतजमिनींसाठी वापरावा. ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेंतर्गत पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम वेगाने पूर्ण करावे. तसेच, जिल्हा प्रशासनाने दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजनांच्या प्रस्तावांवर विनाविलंब ४८...
मे 14, 2019
सोलापूर - राज्यातील दुष्काळामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. खरीप व रब्बी वाया गेल्याने जगाच्या पोशिंद्यावरच उपाशीपोटी झोपण्याची वेळ आली आहे. तरीही, केंद्र सरकारकडून दुष्काळ निवारणाचे ३१४ कोटी रुपये अद्याप मिळालेले नाहीत. दुसरीकडे, राज्य सरकारने तरतूद केलेल्या साडेचार हजार कोटींतील एक...
मे 14, 2019
नवी मुंबई - मोठा उलवे येथील जिल्हा परिषदेची मराठी शाळा स्थलांतरित करण्याचे पत्र शाळेच्या मुख्याध्यापकांना आल्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित ग्रामस्थांनी सोमवारी सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकांची भेट घेतली. या वेळी शाळेसंदर्भातील प्रलंबित  मागण्या पूर्ण करण्याबाबत चर्चा करण्यात आली. ...
मे 13, 2019
मुंबई : सांगली जिल्ह्यात एकूण 10 तालुक्यांपैकी 5 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी तात्पुरत्या व तातडीच्या उपाय योजना राबविण्यावर प्रशासनाने भर द्यावा. सध्या सांगलीत एकूण 4 चारा छावण्या सुरु असल्या तरी जनावरांची संख्या लक्षात घेऊन वाढीव चारा...
मे 13, 2019
येरवडा - राज्याच्या विविध कारागृहांतील कैद्यांनी हातमाग, यंत्रमाग, सुतारकाम, चर्मकला, लोहारकामातून 2018-19 या आर्थिक वर्षात तेवीस कोटी, तर शेती, मत्स्यव्यवसाय, सेंद्रिय खत निर्मिती यातून चार कोटी अशी 27 कोटींची कमाई कारागृहांना करून दिली आहे, अशी राज्याचे कारागृह महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी दिली...
मे 13, 2019
जिज्ञासाचा जन्म 1970चा. तिच्यात कुठलाही जन्मजात दोष नव्हता. त्यांचं घर माझ्या दवाखान्याशेजारी असल्यानं ती भेटायला यायची. नंतर घर बदलल्यानं तिचं येणं बंद झालं. पुढे संपर्क आला, त्याला निमित्त झालं ते वर्तमानपत्रात आलेली तिची ओळख व तिच्या जगावेगळ्या कर्तृत्वाचा आलेख. मधल्या काळात तिच्या आयुष्यात...
मे 10, 2019
मुंबई -  सर्व जिल्ह्यांतील दुष्काळाचा आढावा संबंधित पालकमंत्र्यांनी घेतला असून दुष्काळी भागातील मागणी व सूचनेनुसार दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना प्राधान्याने करण्यात येत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या निविदा प्रक्रियांच्या कामांना 15 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन...
मे 08, 2019
बामणी - भोकणी (ता. देवणी) मध्यम प्रकल्पामुळं गावांचं पुनर्वसन झालं, दुसरीकडं संसारबी थाटला; पण घोटभर पाण्यासाठी रोज अख्खं गावं हिंडुलालंय. गावांचं झालं, आता एकदाचं जगण्याचं पुनर्वसन हुईल का? अशी भावना बालाजी पाटील यांनी व्यक्त केली. लातूर जिल्ह्यातल्या उदगीरवरून देवणीकडे...
मे 07, 2019
कणकवली - शहरातील महाडिक बिल्डिंगमधील प्रत्येक गाळेधारकाला तसेच अडीच गुंठे जमीन मालकाला मूल्यांकनासह भूसंपादनाची तसेच मालमत्ता संपादनाची कायदेशीर नोटीस दिल्यानंतरच ही बिल्डिंग पाडा; अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू. पोलिस संरक्षण घेऊन चुकीच्या पद्धतीने काम केल्यास शहरवासीय सहन करणार नाहीत, असा इशारा...
मे 06, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीचे राज्यातील मतदान झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यातील दुष्काळाच्या प्रश्‍नावरून आक्रमक झाला आहे. दुष्काळाच्या गंभीर प्रश्‍नावर आवाज उठवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीची ग्रामीण भागात तयारी सुरू केल्याचे मानले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे...
मे 05, 2019
मुंबई - कुलाबा येथील नेव्हीनगर परिसरातील झोपड्यांची संख्या वाढत असल्यामुळे ‘आयएनएस शिक्रा’ या नौदलाच्या तळाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण (एसआरए) सर्वेक्षण करून झोपड्यांच्या पुनर्वसनाबाबत निर्णय घेणार आहे. परंतु, नौदल तळाची सुरक्षा आणि किनारा नियमन क्षेत्र (...
मे 05, 2019
नागपूर : जेवणात शिळी पोळी दिल्याचा राग मनात धरून पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेजाऱ्यांनी वेळीच धाव घेतल्यामुळे महिलेचा जीव वाचला. पोलिसांनी पती सुनील प्रभाकर गोडमारे (40, रा. खापरी, पुनर्वसन सेक्‍टर, 26) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली....
मे 04, 2019
नागपूर : जेवनात शिळी पोळी दिल्याचा राग मनात धरून पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेजाऱ्यांनी वेळीच धाव घेतल्यामुळे महिलेचा जीव वाचला. तिच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. सुनील प्रभाकर गोडमारे (वय 40, खापरी...
मे 03, 2019
पुणे - राजकीय पक्षांचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांना आता नगरसेवक म्हणून मिरविण्याची संधी मिळणार आहे. ती मिळताच ‘व्हिजिटिंग कार्ड’, ‘लेटरहेड’वरही ‘नगरसेवक’ असा उल्लेख होईल. स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात यावी, अशी तंबी उच्च न्यायालयाने महापालिकेला दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये...