एकूण 793 परिणाम
फेब्रुवारी 16, 2019
मुंबई - गेल्या वर्षी खरीप हंगामात अपुऱ्या पर्जन्यमानामुळे दुष्काळ जाहीर केलेल्या १५१ तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना पीक नुकसानपोटीचा सुमारे १ हजार ४५४ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता आज राज्य शासनाने वितरित केला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी दिली....
फेब्रुवारी 15, 2019
सातारा - लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर स्वग्राम, मागील निवडणुकीतील कामकाज पाहणे या निकषांवर महसूल विभागातील आठ अधिकाऱ्यांना बदलीचा फटका बसणार आहे. तशीच स्थिती ग्रामविकास विभागातील चार अधिकाऱ्यांवर ओढवण्याची दाट शक्‍यता आहे. तसे झाल्यास प्रशासकीय कामकाजावर परिणाम होणार आहे.  लोकसभा...
फेब्रुवारी 14, 2019
पुणे - मुद्रांक शुल्क न भरलेल्या, नियमापेक्षा कमी भरलेल्या सदनिकाधारकांसाठी अथवा म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) आणि सिडकोच्या प्रकल्पातील सदनिकेची नोंदणी न केलेल्या रहिवाशांसाठी अभय योजना राबविण्यास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे अशा प्रकल्पातील...
फेब्रुवारी 14, 2019
सोलापूर - राज्य सरकारने चारा छावण्यांसाठी तीनशे कोटी रुपयांची तरतूद केली असून, छावण्यांचे प्रस्ताव जिल्हास्तरावर येत आहेत. परंतु, अद्यापही छावण्या सुरू झाल्या नसल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव सुभाष उमराणीकर यांनी सांगितले. दुष्काळी तालुक्‍यांमधून आतापर्यंत एक हजार ४०३...
फेब्रुवारी 12, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दुष्काळी भागातील जनतेचा रोष कमी करण्यासाठी राज्य सरकारने आणखी साडेचार हजार गावांमध्ये दुष्काळी उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या जाचक दुष्काळी संहितेमुळे या साडेचार हजार गावांना दुष्काळाची मदत मिळणे शक्‍य नाही. त्यामुळे राज्य सरकारने स्वत:...
फेब्रुवारी 12, 2019
मुंबई - साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे पत्राचाळ, चिरागनगर, घाटकोपर येथील स्मारक हे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने म्हाडाच्या सहकार्याने उभारावे, असा निर्णय सोमवारी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. हे स्मारक अण्णा भाऊंच्या...
फेब्रुवारी 08, 2019
पुणे - प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी राखीव शासकीय जमिनीच्या बेकायदा हस्तांतरण प्रक्रियेमध्ये आणखी मोठे मासे गळाला लागतील, अशी शक्‍यता परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त सुहास बावचे यांनी व्यक्त केली. या प्रकरणात बेकायदा हस्तांतरण झालेली ६० एकर जमिनीच्या खोट्या नोंदी रद्द केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.  ...
फेब्रुवारी 08, 2019
मुंबई - महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील जमिनीवर अनधिकृतपणे अतिक्रमण करून बांधण्यात आलेली घरे अधिकृत करण्याचा मार्ग सरकारने मोकळा केला आहे. अतिक्रमण करणारा नागरिक ‘प्रधानमंत्री आवास योजने’त पात्र असेल तर त्याच्या घराचे बांधकाम अधिकृत करून सदरची जमीन त्याला भाडेपट्ट्याने द्यावी, असे आदेश आज नगर...
फेब्रुवारी 07, 2019
पुणे : नदीपात्रातील रस्त्यातील अडथळे एक महिन्यामध्ये दूर करण्याचे आदेश पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आदेश आमदार विजय काळे यांनी नदीपात्रातील रस्त्याच्या विषयावर गुरुवारी महापालिकेत बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त...
फेब्रुवारी 07, 2019
पुणे - प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी राखीव असलेल्या जमिनीच्या बेकायदा हस्तांतरण प्रकरणात शिरूरच्या तत्कालीन नायब तहसीलदार गीतांजली नामदेव गरड यांना बुधवारी सायंकाळी समर्थ पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यात साठ एकरांपेक्षा जास्त, म्हणजे कोट्यवधी रुपये किमतीच्या जमिनींचे बेकायदा हस्तांतरण झाल्याचे समोर...
फेब्रुवारी 02, 2019
मुंबई  - मजास येथील उद्यान, मैदान, तसेच रस्त्यांसाठी आरक्षित असलेला भूखंड ताब्यात घेण्याची मागणी शिवसेनेसह कॉंग्रेसनेही केली आहे. भूखंडावर झोपड्या असल्याने हा भूखंड ताब्यात घेणे महाग असल्याचे सांगत महापालिका प्रशासनाने भूखंड ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिका...
जानेवारी 31, 2019
मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्तांच्या पुनर्विकासास विलंब करणाऱ्या विकसकांना दर महिन्याला दंड आकारण्यात येणार आहे. रेडिरेकनरच्या 0.30 दराने हा दंड आकारण्याबरोबर मुदतवाढ दिल्याच्या दिवसाशी असलेल्या दराप्रमाणे भांडवली दराची वसुली करण्याचा निर्णयही महानगरपालिकेने घेतला आहे. तसे सुधारित धोरण...
जानेवारी 26, 2019
सोलापूर : दुष्काळ, गारपीट, अवकाळी अन्‌ गडगडलेले शेतमालांचे दर, बॅंकांचा कर्जवाटपात ठेंगा व सरकारी मदतीची प्रतीक्षा आणि डोक्‍यावरील सावकाराचे कर्ज या प्रमुख कारणांमुळे मागील पाच वर्षांत राज्यात तब्बल 14 हजार 74 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली आहे. त्यामध्ये अमरावती विभाग अव्वल असून औरंगाबाद विभाग...
जानेवारी 24, 2019
गडचिरोली - तीन नागरिकांच्या हत्येनंतर कसनासूर गावात दहशतीचे वातावरण  असल्याने ग्रामस्थांनी दोन दिवसांपासून कुटुंबासह ताडगाव येथील पोलिस ठाण्यात आश्रय घेतला आहे. दरम्यान मृतांवर मंगळवारी (ता. २२) रात्री ताडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. छत्तीसगडच्या सीमेलगत असलेले कसनासूर गाव वर्षभरापूर्वी ४०...
जानेवारी 22, 2019
चिखलदरा, अकोट : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या प्रतिबंधित क्षेत्रातील पुनर्वसनाचा मुद्दा आता चांगलाच पेटला असून, या आंदोलनाने मंगळवारी (ता. 22) हिंसक वळण घेतले. गेले आठ दिवसांपासून प्रतिबंधित वनक्षेत्रामध्ये अवैधपणे घुसून तेथे ठाण मांडून बसलेल्या पुनर्वसित आदिवासींनी मंगळवारी पोलिस व वन विभागाच्या...
जानेवारी 13, 2019
येरवडा : राज्यातील भिक्षेकरी स्वीकार केंद्रात भिक्षेकऱ्यांना महिन्याला केवळ पाच रुपये पगार दिला जातो. सध्या पाच रुपयांमध्ये चहासुद्धा मिळत नाही, मात्र सुमारे सहा दशकांपूर्वीच्या सामाजिक कायद्याच्या आधारे हा पगार दिला जात आहे. राज्यातील महापालिका हद्दीत भिक्षेकऱ्यांची समस्या मोठी आहे. त्यामुळे...
जानेवारी 09, 2019
पुणे - एकीकडे झोपडपट्टी पुनर्वसन योजनांसाठी विकसक पुढे येण्यास तयार नसताना भाऊ पाटील रस्ता येथील झोपडपट्टीधारकांनी एकत्र येत स्वत:चे पुनर्वसन स्वत:च करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे (...
जानेवारी 07, 2019
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा निर्मिती आणि प्रभावी प्रचारयंत्रणा राबविण्यासाठी भाजपने जाहीर केलेल्या समितीमध्ये खासदार नारायण राणे यांचा समावेश करण्यात आला आहे. यानिमित्ताने त्यांचे पुनर्वसन केल्याचे मानले जात आहे.  भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी समित्यांची घोषणा केली आहे. ‘...
जानेवारी 07, 2019
पुणे - शहरातील गरिबांना स्वस्तात घरे देणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याची तयारी महापालिकेतील सत्ताधारी करीत आहेत. मात्र, महापालिकेच्या हक्काच्या हजारो घरांचा (सदनिका) हिशेब सत्ताधारी, विरोधक वा प्रशासनालाही लागत नाही. महापालिकेच्या मालकीच्या...
जानेवारी 05, 2019
जळगाव : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्यावतीने शहरात आयोजित करण्यात आलेल्या "महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत झालेल्या जनसुनावणीतील समुपदेशनामुळे जिल्ह्यातील पाच कुटुंब (पती-पत्नी) पुन्हा एकत्र नांदावयास तयार झाली आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी...