एकूण 26 परिणाम
ऑगस्ट 25, 2019
आजचे आपण सगळे होमो सेपिअन्स प्रजाती. दोन लाख वर्षांपूर्वी तिचा पूर्व आफ्रिकेत विकास झाला. ‘सेपिअन्स’मधील आपलीच ही वाटचाल वाचली की अवतीभवतीचं सगळं अगदीच किरकोळ वाटायला लागतं. एरवी चिंतेत टाकणाऱ्या, विचलित करणाऱ्या किंवा आनंद-दुःख देणाऱ्या घटनांबाबत आपण स्थितप्रज्ञ बनतो जणू. किमान ७० हजार वर्षं...
जुलै 07, 2019
पंढरपूर : पंढरपूरला चंद्रभागेच्या पैलतीरावर स्नानासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी इस्कॉनने सुमारे 15 कोटी रुपये खर्च करून नवीन भव्य घाट बांधला आहे. आषाढी दशमी दिवशी (ता.११) रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या घाटाचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा होणार असून, या घाटाचे प्रभूपाद घाट असे नामकरण करण्यात...
जून 02, 2019
अखेर आमचा बलून योग्य ठिकाणी जमिनीवर अलगद टेकला. चालकाला धन्यवाद देऊन आम्ही खाली उतरलो. एखाद्या पक्ष्यासारखा केलेला स्वैर, आनंदी विहार आता संपला होता. गेला तासभर आम्ही जणू काही स्वप्नभूमीतच संचार करत होतो... त्या दिवशी भल्या पहाटे आम्ही दोघं - मी आणि यजमान- निघालो होतो बलूनमधून हवाई सफर करण्यासाठी....
मे 28, 2019
न्यूजर्सीमधील मराठीजनांसाठी एक मोठा सोहळा नुकताच साजरा झाला.. येथील हजारो मराठी कुटुंबांनी ईस्ट ब्रुन्स्विकमध्ये झालेल्या त्या सोहळ्यास आवर्जून हजेरी लावली. निमित्त होतं 'मराठी विश्व'च्या ४० व्या वर्धापनदिनाचं! हा सोहळा ६ आणि ७ एप्रिल रोजी झाला. दीर्घ काळापासून न्यूजर्सीमध्ये राहणारे चंद्रकांत आणि...
एप्रिल 17, 2019
पंढरपूर - चैत्र शुद्ध भागवत एकादशीच्या दिवशी राज्याच्या विविध भागांतून आलेले सुमारे अडीच लाखांहून अधिक भाविक मोठ्या भक्तिभावाने चैत्र वारी सोहळ्यात सहभागी झाले होते. टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषामुळे पंढरी भक्तिमय झाली होती. विठ्ठलाच्या दर्शनाची रांग आज गोपाळपूर रस्त्यावर गेली होती....
फेब्रुवारी 16, 2019
पंढरपूर - श्री विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने माघी यात्रेच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सुमारे तीन लाखांहून अधिक भाविक येथे दाखल झाले आहेत. आज माघी दशमीच्या दिवशी चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आज 13 तास लागत होते. माघी एकादशीचा...
नोव्हेंबर 30, 2018
लेखाच्या भाषांतराकडे वळण्यापूर्वी माझे परिचयात्मक दोन शब्द: ’महामार्ग-जलमार्ग-अभियान’ (आधीचे नांव One Belt One Road-OBOR आता नवीन नांव Belt and Road Initiative-BRI, मराठीत ‘म-ज-अ’) हा विशाल प्रकल्प आणि ’चीन पाकिस्तान आर्थिक हमरस्ता’ (’सीपेक’) हा त्यातलाच एक छोटा उपप्रकल्प या विषयावरील एक उद्बोधक...
नोव्हेंबर 20, 2018
हॉटेलच्या वेटिंगमध्ये थांबले असताना चमचमीत पदार्थांबरोबर अनेकविध प्रश्‍नांनी मनात गर्दी केली. तेवढाच छान टाइमपास झाला. त्या दिवशी, कामाला बाई येणार नव्हती. एकच बाई धुणीभांडी, झाडू-पोशा करून पोळ्या करून द्यायची, "बाई आज येणार नाही, आपण बाहेर जाऊ, हिंडू फिरू खाऊन घरी परत येऊ,' असे ह्यांना स्पष्ट...
नोव्हेंबर 19, 2018
मराठी असोसिएशन सिडनी इनकॉर्पोरेटेड (MASI) ही एक नॉन-प्रॉफिट ऑर्गनायझेशन  संस्था आहे जी भारतातून ऑस्ट्रेलियामध्ये न्यू साऊथ वेल्स आणि एसीटी या प्रांतात स्थायिक झालेल्या मराठी संस्कृतीत जन्मलेल्या लोकांनी ३० वर्षांपूर्वी स्थापन केली. मूळ उद्देश हाच की इथे ऑस्ट्रेलियातसुद्धा ही संस्कृती जपावी, ...
नोव्हेंबर 06, 2018
१ प्रश्न, २ व्यक्ति, ३०० उत्तरे!! या साऱ्याची सुरूवात झाली ती कानन शहाच्या एका साध्यासुध्या प्रश्नाने, 'येथे मुंबईकर कोण आहेत?' मग प्रवीण भोसले याने पुढाकार घेतला आणि एक ऑनलाइन समाजच निर्माण केला! अमेरिकेतील डलास-फोर्टवर्थ मधील मुंबईकरांची ही कहाणी. कानन शहा हिने ऑगस्ट मध्ये हा प्रश्न फेसबुक वरील...
सप्टेंबर 22, 2018
तुमचा हेतू चांगला असेल तर चंबळचे डाकूही तुम्हाला मदत करतात, असा अनुभव आहे. लहानमोठ्या अनेक सायकलसफरी केल्यानंतर आम्ही मित्रांनी सायकलवरून थेट नेपाळमधे जायचे ठरवले. त्या काळी आजच्यासारखे गुगल नव्हते. त्यामुळे रस्ते आणि उतरायची ठिकाणे याची माहिती सहज उपलब्ध नव्हती. आम्हाला वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल्स...
सप्टेंबर 13, 2018
तीन नावाड्यांची गोष्ट तुम्ही ऐकली आहे का? ऐकाच मग आता. बरे का, कुठल्याही गोष्टीत असते, तसे एक गाव होते. कुठल्याही गावालगत असते, तशी तिथंही एक नदी वाहात होती. कुठल्याही नदीला असतो, तसा तिलाही दुसरा किनारा होता. कुणालाही शेजारीण जशी (बायकोपेक्षा) देखणी वाटते, (खुलासा : सन्माननीय अपवाद समाविष्ट), तसा...
जून 28, 2018
करकंब (जि.सोलापूर) : पंढरीच्या आषाढी वारीत मानाचे तीन नंबरचे स्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र पैठण येथील संत एकनाथ महाराजांच्या पालखी मार्गाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असून अनेक ठिकाणी या मार्गावर खडी उचकटली आहे. त्यामुळे सध्या तरी नाथभक्तांसाठी पंढरीची वाट खाचगळग्यांचीच असून येणाऱ्या कालावधीत तरी प्रशासन...
मे 27, 2018
"बसू या का जरा...'' ताई म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता. झ्याजवळ बसून कितीतरी वेळ ती मला न्याहाळत राहिली...""खूप दिवसांनी आलीस. मी रोजच वाट पाहत होते...लवकर लवकर येत जा गं...'' ताईच्या स्वरात अगतिकता होती.... "अगं या संसाराच्या धबडग्यात फुरसतच मिळत नाही. सगळ्याचं करता करता दिवस संपतो कधी...
मे 14, 2018
कोणतीही गोष्ट देताना त्यामागे देणाऱ्याची आपुलकीची भावना असेल, तर घेणाऱ्यालाही समाधान वाटते, त्याचा स्वाद वेगळाच असतो. मध्यंतरी आम्ही दोघे नृसिंहवाडीला गेलो होतो. नृसिंहवाडी तशी आम्हाला नवीन नाही, पण बरेच वेळा जाऊनही नृसिंहवाडीत मुक्काम करता आला नव्हता. कधी मुलांच्या शाळा यांची कामाची गडबड. पण आता...
मे 13, 2018
पंढरपूर : चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील 65 एकरामध्ये मागील वर्षी विविध प्रकारच्या सुमारे तीन हजार रोपांची लागवड करण्यात आली. येथील सामाजिक वनीकरण विभागाने या झाडांची योग्य ती निगा राखल्याने सध्या हा संपूर्ण परिसर हिरव्या वृक्षराजीने बहरला आहे. या वनराईतील झाडांची सामाजिक वनीकरण विभाग पुढील तीन...
मार्च 27, 2018
पंढरपूर - चैत्री यात्रेच्या सोहळ्यासाठी पंढरीत सुमारे दोन लाख भाविक दाखल झाले आहेत. श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, पासष्ट एकर परिसर आणि वाळवंट भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहे. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आज पाच तास लागत होते. उद्या (ता. 27) एकादशी असून, श्री विठ्ठल-...
जानेवारी 02, 2018
इवलालिया मुंगीयेचे मागणे। होआवे तीळभर शहाणे। येवढे प्रार्थोनि रावराणें। वांछा कीजे।। आता ऐका विश्‍वेश्‍वरावो। पतित पामराचा टाहो। तयाचे कोड पुरवाहो। येकदा काई।। उद्दंड आणि उतावीळ। सोकाविला कळिकाळ। सद्‌भावनेला मरगळ। येवोचि नये।।   जळो अनिष्टाची पिलावळ । नष्टावो विखाराचे बीळ। प्रकटो अंतरी घननीळ।...
डिसेंबर 05, 2017
चिक्कोडी - अलीकडच्या काळात महिलादेखील सर्वच क्षेत्रांत पुढे आहेत. सैन्यदलासह वैमानिक म्हणूनही त्या कार्यरत झाल्या आहेत; मात्र मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना पाहून हादरून गेलेले पालक त्यांना घराबाहेर पाठविण्याबाबत काळजीतही आहेत; पण ‘मुलींवरील विश्‍वास दृढ असावा’, असा संदेश त्या पालकांना देत...
ऑक्टोबर 30, 2017
२०१२ सालच्या दिवाळी दरम्यानची गोष्ट आहे. मी दरवर्षी शाळा सुरु होण्याच्या वेळी एका अनाथाश्रमाला भेट द्यायचो. पण त्यावर्षी काही कारणांनी मला ते शक्य झाले नाही. नंतर दिवाळीच्या आधी एका रविवारी सकाळी थोडा निवांत होतो म्हणून सहज अनाथाश्रमाला भेट द्यायला गेलो. जाताना डोक्यामध्ये २-४ हजाराची रक्कम द्यायचा...