एकूण 27259 परिणाम
जून 25, 2019
बुध - नागनाथवाडी (ता. खटाव) येथील विशाल आणि सुश्‍मिता ननावरे (वांगी-इंदापूर) या उच्चशिक्षित नवदाम्पत्याने अनावश्‍यक विवाह खर्चाला फाटा देत मुख्यमंत्री दुष्काळ सहायता निधीत ४० हजारांचा धनादेश देवून समाजापुढे आदर्श ठेवला. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे ननावरे कुटुंबीयांनी दुष्काळग्रस्तांसाठी...
जून 25, 2019
कऱ्हाड - स्वच्छतेत पहिल्या आलेल्या पालिकेने आता ‘वीज बचती’चा उपक्रम हाती घेतला आहे. शासनाच्या ऊर्जा विकास संवर्धन धोरणांतर्गत शहरातील केलेल्या बदलांमुळे पालिकेला वर्षाला सुमारे पाऊण कोटींची बचत करण्यात यश मिळाले आहे. त्यामध्ये पालिकेच्या सर्व मालमत्तांमधील फॉल्टी मीटर्स बदलले, पथदिवे बदलून तेथे...
जून 25, 2019
नाशिक - मुथूट फायनान्सवरील दरोडा आणि खुनाचा छडा लावताना नाशिक पोलिसांनी दरोड्याच्या मुख्य सूत्रधाराला सुरतमधून अटक केली आहे. पाच संशयितांच्या मागावरील पोलिसांचे पथक परराज्यात तळ ठोकून आहे.  पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांनी गुन्ह्याच्या तपासाची माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली....
जून 25, 2019
मुंबई - मराठी शिक्षण कायद्याचा अध्यादेश महिनाभरात काढला जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती "कोमसाप'चे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी दिली. "मराठीच्या भल्यासाठी' या व्यासपीठांतर्गत राज्यभरातील साहित्यिकांसह 24 साहित्य संस्थांनी सोमवारी आझाद...
जून 25, 2019
पुणे - वडील आणि आई अधिकारी असून, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्याची खोटी माहिती सांगून बॅंक कर्मचाऱ्याने मैत्रिणीबरोबर केलेले लग्न न्यायालयाने बेकायदा ठरविले.  दिवाणी न्यायालयातील वरिष्ठ स्तर न्यायाधीश किशोर पाटील यांनी हा निकाल दिला. राजश्री आणि महेश (नावे बदललेली) असे या जोडप्याचे नाव...
जून 25, 2019
मुंबई - ‘मुख्यमंत्री आणि मी काय करायचं ते ठरलंय. पण, मुख्यमंत्रिपदाबाबत तुमचं आणि भाजपचं काय ठरलंय, ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अगोदर जाहीर करायला सांगा. म्हणजे, युतीत मुख्यमंत्रिपदाचा वाद होणार नाही,’ अशा शब्दांत भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी आज शिवसेना आमदारांची फिरकी घेतली. विधानसभा...
जून 25, 2019
पुणे - बालगंधर्व रंगमंदिराची फेरउभारणी करण्याच्या योजनेला गती आली असतानाच ‘मूळ रंगमंदिराला फारसा धक्का लागणार नाही, याची काळजी घेऊ,’ अशी भूमिका महापौर मुक्ता टिळक यांनी सोमवारी मांडली. दुसरीकडे मात्र ‘नवा रंगमंच बांधून नवीन काही करणार आहात का,’ असा प्रश्‍न विचारत ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे यांनी...
जून 25, 2019
मुंबई - राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती आज जाहीर करण्यात आली. विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहात ही घोषणा केली.  लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला मोठा फटका बसला,...
जून 25, 2019
सध्या विदर्भातील शेतशिवारात बियाणे तंत्रज्ञान स्वातंत्र्याची लढाई सुरू आहे. अनेक ठिकाणी प्रतिबंधित 'एचटीबीटी' बियाण्याची पेरणी करून शेतकरी संघटनेने सविनय सरकारी आदेशभंगाचे आंदोलन हाती घेतले आहे. शेतीनिगडित तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य विरुद्ध पर्यावरण संरक्षण अशा कचाट्यात हा प्रश्न सापडला आहे. त्यावर...
जून 25, 2019
शेतशिवारांत बियाणे तंत्रज्ञान स्वातंत्र्याची लढाई सुरू आहे. अनेक ठिकाणी प्रतिबंधित ‘एचटीबीटी’ बियाण्याची पेरणी करून शेतकरी संघटनेने सविनय आदेशभंगाचे आंदोलन हाती घेतले आहे. तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य विरुद्ध पर्यावरण संरक्षण अशा कचाट्यात हा प्रश्न आहे. जनुकसंशोधित बियाण्यांच्या मान्यतेबाबत सरकारच्या...
जून 25, 2019
अमरावती : मुलीचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याने मुलगी झाल्याचा आनंद काय असतो, हे वलगाव येथील मदने कुटुंबीयांनी दाखवून दिले. मुलगी झाल्याने मदने कुटुंबीयातील सदस्यांनी रक्तदान करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. प्रकाश सीताराम मदने व मोहना प्रकाश मदने यांना 17 जून रोजी...
जून 25, 2019
नागपूर : हॉटेलचालकाने प्रतिस्पर्धी हॉटेलचालकाच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवले. हे संबंध उघडकीस आल्यामुळे शनिवारी मध्यरात्री एकाने दुसऱ्याचा चाकूने भोसकून खून करण्याचा प्रयत्न केला. जखमी हॉटेलमालक महेश वरयानी (27, रा. आराधना अपार्टमेंट, पॉवरग्रिड चौक) याचा सोमवारी मृत्यू झाला. याप्रकरणी आकाश छाबडा (...
जून 24, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी पक्षाकडे दाखल करावेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे 1 जुलै पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे असून या अर्जांची छाननी...
जून 24, 2019
पुणे : भाषा निधी मिळाला नाही, तरी चालेल; पण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे, अशी कणखर भूमिका साहित्यिकांनी मुख्यमंत्र्यांसमोर आज मांडली.  'मायमराठीला नडतोय केवळ आईपणा' या वृत्ताद्वारे सकाळने मराठी भाषेचा अभिजात दर्जा दिल्ली दरबारी अडकल्याच्या मुद्द्यास वाचा फोडली. ही बाब साहित्यिकांनी...
जून 24, 2019
नाशिक : फेसबुक, इन्स्ट्राग्राम या सोशल माध्यमांवर माझे अकांऊट नाही तरीही माझ्या नावे अनेक अकांऊटस्‌ असून,त्यावरून अनेक सल्ले वजा संदेश दिले जातात. ते सारे फेक अकांऊट आहे. नाशिक सायबर विभागातर्फे आत्तापर्यंत 19 फेसबुक पेज आणि यु-ट्युब व्हिडिओ डिलीट केले असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-...
जून 24, 2019
मुंबई : सामान्य मुंबईकरांनी जर दोन तीन महिन्यापेक्षा जास्त पाण्याची थकबाकी ठेवली, तर महानगरपालिका  तातडीने जलजोडणी खंडित करते. परंतु मुंबई महानगरपालिका मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय निवासांची कोट्यवधी रूपयांची पाणी थकबाकी ठेवूनही कारवाई करत नाही. मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय...
जून 24, 2019
पुणे : "बालगंधर्व रंगमंदिराचा रंगमंच नवीन बांधून नवीन काही करणार असाल तर क्षमा करा. ब्रिटनला जाणाऱ्या माणसाची यात्रा जोपर्यंत शेक्सपियरच्या थिएटरमध्ये जात नाही तोपर्यंत पूर्ण होत नाही. लाल किल्ल्याचा बुरूज ढासळला तर तो उद्धवस्त करून बांधणार का? ताजमहलावर पाणी पडले म्हणून ते पाडणार का ? एखादे थिएटर...
जून 24, 2019
नाशिक : मुथूट फायनान्सवरील दरोडा आणि हत्त्याप्रकरणाचा छडा लावताना नाशिक पोलीसांनी दरोड्याच्या मुख्य सूत्रधाराला सुरतमधून अटक केली आहे. तर, पाच संशयितांच्या मागावरील पोलीसांचे पथक परराज्यात तळ ठोकून आहेत.       घटनेच्या दुसऱ्या दिवशी दिंडोरीरोडवरील आशावाडी येथे सापडलेल्या दुचाक्‍यांच्या वायरलुपवरील...
जून 24, 2019
देवरी (जि. गोंदिया) ः तालुक्‍यातील डवकी येथील गजानन मंदिरालगत सिमेंटच्या प्लास्टिक पोत्यात गुंडाळलेल्या अवस्थेत नवजात बाळ आढळून आले. ही घटना रविवारी (ता.23) सकाळी सहाच्या सुमारास उजेडात आली. उपचाराकरिता नवजात बाळ देवरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तालुक्‍यातील डवकी परिसरातील गजानन...
जून 24, 2019
मुंबई : अर्थसंकल्पीय भाषणावर बोलताना माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी आज सरकारच्या घोषणा व योजनांची पोलखोल करत जोरदार प्रहार चढवला. अर्थसंकल्पातील तरतूदी व नव्या योजनांची खिल्ली उडवताना त्यांनी निवडणूकीत जनतेला भुलवणारा अर्थसंकल्प असल्याची टीका केली. यावेळी सैराट या चित्रपटातील...