एकूण 75 परिणाम
मे 30, 2017
लातूर - पैशाने आर्थिक दारिद्य्र दूर करता येईल; पण मानसिक दारिद्य्र दूर करता येणार नाही. संत साहित्यात समाजसुधारणा, मानसिक दारिद्य्र दूर करणे, आनंदी ठेवण्याची ताकद आहे. त्यामुळे संत साहित्यातील विचारांतूनच महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे मत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार...
मे 29, 2017
लातूर - महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने येथे 29 ते 31 मे या कालावधीत सहावे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन होत आहे. सोमवारी (ता. 29) सकाळी 9.30 वाजता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्‌घाटन होईल. पुढील तीन दिवस या संमेलनाच्या निमित्ताने शेतकरी आत्महत्या,...
मे 28, 2017
पुणे : मराठी साहित्याचा वाचकवर्ग वाढावा म्हणून वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रकाशित झालेल्या जाडजूड आणि वजनदार कादंबऱ्या लघुरूपात वाचकांसमोर आणण्याचे शिवधनुष्य पुण्यातील साहित्यप्रेमी भगिनी मंडळाने उचलले आहे. त्यामुळे पाचशे-सहाशे पानांची कादंबरी अवघ्या ७०-८० पानांत वाचायला...
मे 24, 2017
रत्नागिरी - ‘एक तुतारी दे मज आणून...’ केशवसुतांच्या या कवितेच्या ओळी आळवत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्यकर्त्यांसह भाजप पदाधिकारी व रत्नागिरीकरांनी ‘तुतारी’ एक्‍स्प्रेसचे रेल्वेस्थानकावर स्वागत केले. कोकणचा खऱ्या अर्थाने हा सन्मान झाल्याच्या प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्‍त केल्या. कोकण रेल्वे...
मे 19, 2017
सकाळी साडेसातला अभिनेत्री रीमा लागू गेल्याची 'व्हॉट्‌सऍप'वर बातमी आली, तेव्हा मला तर कोणी तरी ती चेष्टाच केलीय असं वाटलं. अलीकडे अशा अनेकांबद्दलच्या अफवा ऐकल्यानं मी ते गंभीरपणे घेतलंच नाही. उलट अशा अफवांपासून सावध राहण्याची सूचना करण्यासाठी मी रीमालाच फोन लावला. पण तो कोणी उचलेना. मग टीव्ही...
मे 16, 2017
लातूर - महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने येथे ता. 29 ते 31 मे या कालावधीत सहावे अखिल भारतीय मराठी संमेलन होणार असल्याची माहिती वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गहिनीनाथ महाराज औसेकर, तर स्वागताध्यक्षपदी...
मे 16, 2017
मुंबई -  प्रकाश जाधव यांनी आपले आयुष्यच कवितेतून मांडले आहे. प्रत्येक कविता परत वाचावी एवढी अद्‌भुत शक्ती त्यात आहे. हिटलर आई, बाप, भाऊ सगळे कुटुंब त्यांच्या कवितेत आले आहे. इतके सगळे भोगल्यानंतरही समाजातील दुर्बल घटकाला सोबत घेऊन ते चालत आहेत. आपल्या संस्थेमार्फत त्यांनी दुर्बलांना...
मे 14, 2017
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रमय जीवनदर्शनप्रकाशक - आविष्कार प्रकाशन, पुणे (९२२६४२८७९५) / पृष्ठं - १२८ / मूल्य - १५० रुपये डॉ. बाबासाहेब आंबेडर यांच्या जीवनातले अनेक दुर्मिळ क्षण टिपणाऱ्या छायाचित्रांचा हा संग्रह. डॉ. आंबेडकर यांच्या सव्वाशेव्या जयंतीनिमित्त हे पुस्तक प्रकाशित करण्यात आल्यानं...
मे 09, 2017
पुणे - निसर्ग आणि समाज व्यवस्थेमुळे शेतकरी वर्गाचे आयुष्य काळवंडून जाते. या जिवघेण्या अवस्थेतूनदेखील तावूनसुलाखून निघत घट्टपणे उभे राहणाऱ्या माणसांचे जीवन म्हणजे ‘जू’ कांदबरी होय. हे आत्मकथन नव्हे तर आईच्या आयुष्याची फरफरट भोळेपणातून मांडणारे या कादंबरीचे लेखक ऐश्वर्य पाटेकर म्हणजे आजच्या मराठी...
मे 06, 2017
महाबळेश्‍वराच्या कुशीतील जेमतेम साडेतीनशे उंबरा भिलार गावातील पंचवीस उंबऱ्यांआड काही पुस्तके ठेविली असून, ती वाचनासाठी आहेत, ह्याची पर्यटकांनी कृपया नोंद घ्यावी. पर्यटकांनी येथे यावे, स्ट्रॉबेऱ्यांसमवेत पुस्तक-वाचनाचा आनंदही लुटावा, अशी यामागील कल्पना आहे. (स्ट्राबेऱ्या विकत घ्याव्यात!) तथापि, येथे...
मे 05, 2017
भिलार (महाबळेश्‍वर) - मराठी माणूस हा ज्ञानपिपासू असल्याने माध्यमांत कितीही बदल झाले, कितीही डिजिटलायझेशन झाले, तरी वाचन व मराठी भाषेचे महत्त्व कधीही कमी होणार नाही. "पुस्तकाचे गाव' म्हणून इतिहासात नोंद झालेले भिलार गाव साहित्यिक व प्रकाशकांचे डेस्टिनेशन म्हणून उदयाला येईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री...
एप्रिल 26, 2017
दुबई: कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक या संस्थेचे विश्वस्त श्री विनायक रानडे यांच्या पुढाकारातून निर्माण झालेल्या 'ग्रंथ तुमच्या दारी' या वाचन चळवळीचा विस्तार भारतभर तर झालाच आहे; पण भारताव्यतिरिक्त जगाच्या विविध देशातही दर्जेदार मराठी ग्रंथ वाचकांपर्यत पोहोचवण्याचं काम या संस्थेने केले आहे. यूएईतील...
एप्रिल 21, 2017
पुणे - ‘‘भारतीय भाषा आणि संस्कृती या अध्यात्माशी जोडलेल्या आहेत. भाषा जिवंत राहिली तर संस्कृती जिवंत राहते आणि त्यामुळेच देशाची ओळख निर्माण होते; पण सध्या हिंदी, मराठीसारख्या भाषेतून संस्कृत शब्द बाहेर फेकले जात आहेत. लहान मुलांमध्ये या भाषांविषयी गर्व निर्माण केल्यास भाषांचे संरक्षण आणि संवर्धन...
एप्रिल 21, 2017
रितेश देशमुख, प्रियांका चोप्रा ते जॉन अब्राहम व्हाया अक्षयकुमार  कोल्हापूर - बॉलिवूड स्टार अक्षयकुमार, रितेश देशमुख, प्रियांका चोप्रा यांच्यानंतर आता जॉन अब्राहम मराठी सिने निर्मितीत उतरला आहे; मात्र बॉलिवूड स्टार्सना मराठी सिने निर्मितीकडे वळवण्यात पहिल्यांदा भुरळ घातली ती कोल्हापूरच्या...
एप्रिल 19, 2017
पुणे - ‘‘आईनेच मला मराठी भाषेचे बाळकडू पाजले. आईमुळे मी मराठीत लिहायला आणि बोलायलाच शिकलो नाही तर, विचारही मराठीतच करतो. सध्याच्या मराठीतून अनेक शब्द जवळपास लुप्त होत चालले असून, भाषेच्या वाढीसाठी हे योग्य नाही. आपले जुने शब्द घासूनपुसून वापरले पाहिजेत. भाषा ही संवादाऐवजी केवळ संपर्कापुरतीच आवश्‍यक...