एकूण 1358 परिणाम
डिसेंबर 13, 2016
प्लॅस्टिक कचरा जाळल्याने धुराचा त्रास; इंद्रायणी नदीत रसायनमिश्रित पाणी चिखली - कुदळवाडी- मोशी परिसरात दररोजच रसायनमिश्रित कचरा आणि प्लॅस्टिक जाळण्यात येतो. त्याचबरोबर रसायनमिश्रित पाणी इंद्रायणी नदीत सोडले जाते. त्यामुळे हवा आणि पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. यामुळे इंद्रायणीतील...
डिसेंबर 11, 2016
न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांत गुन्हा दाखल नाशिक: कामटवाड्यातील जागेचा व्यवहार करून पावणेपाच लाख रुपये घेऊनही त्या संदर्भातील व्यवहार पूर्ण न करणाऱ्या दोन संशयितांनी महिलेला देवाचे पाणी म्हणून विष पाजून ठार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पीडित महिलेने न्यायालयात दाद मागितली असता न्यायालयाच्या...
डिसेंबर 06, 2016
सांगली - स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता हारगे यांची निवड झाल्याने काँग्रेसच्या पालिकेतील सत्तेला मुळासह हादरा बसला आहे. यानिमित्ताने महापालिका सांभाळायची म्हणजे काय असते याचा पहिला धडा नेत्या जयश्री पाटील आणि विश्‍वजित कदम यांना मिळाला आहे. काँग्रेसमधील दुफळीचा...
डिसेंबर 05, 2016
अमोल, प्रेम उतरणार महापालिकेच्या निवडणुकीत नाशिक - पक्ष कुठलाही असो पाटील सांगतील तिच दिशा, असे कायम सूत्र राहिलेल्या सातपूरच्या पाटील कुटुंबातील अमोल व प्रेम दोघे चुलत बंधू निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. माजी महापौर दशरथ पाटील, दिनकर पाटील व...
नोव्हेंबर 30, 2016
वारजे - नो-पार्किंगमध्ये उभी असलेली वाहने उचलण्याची यंत्रणा नाही, की कारवाईत उचललेली वाहने ठेवण्यासाठी पुरेशी जागा नाही. अशी स्थिती वारजे वाहतूक पोलिसांची झाली आहे. त्यामुळे "नो-पार्किंग'चे फलक लावलेल्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात पार्किंग केली जात आहे. वाहतूक पोलिसांकडे वाहने उचलण्यासाठी टेम्पोच...
नोव्हेंबर 29, 2016
पुणे : शहरातील सुमारे दोन हजारांपैकी तब्बल 1255 झाडे विविध प्रकल्पांच्या आड येत असल्यामुळे ते तोडण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेच्या विविध खात्यांनी वृक्ष प्राधिकरणाला शिफारस केली आहे, तर 325 झाडे धोकादायक अवस्थेतील आहेत. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीकडे नागरिकांचे लक्ष...
नोव्हेंबर 26, 2016
पिंपरी-चिंचवड महापालिका म्हणजे भ्रष्टाचाराचे आगार, चराऊ कुरण. चाळीस वर्षांत इथे डोंगराएवढा भ्रष्टाचार झाला. आजवर एकही महाभाग कधी जाळ्यात आला नव्हता. पावलापावलावर खादाड मंडळी बसलेली. आजवर त्यांना हात लावायची कोणाचीही हिंमत झाली नाही. कारण, "सारे मिळून खाऊ' हा मंत्र होता. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या...
नोव्हेंबर 25, 2016
ठाणे - महापालिकेने एकापाठोपाठ एक विकासकामांचा धडाका लावला आहे. या विकासकामांसाठी निघणाऱ्या निविदा प्रक्रियेत पारदर्शीपणा यावा यासाठी आयुक्त संजीव जयस्वाल यांचे प्रयत्न आहेत. पालिका आयुक्तांचे हे आदेश लेखापाल कार्यालयापर्यंत कितपत पोहोचले, याबाबत साशंकता निर्माण व्हावी अशी परिस्थिती सध्या या विभागात...
नोव्हेंबर 25, 2016
पुणे - संसारात एकमेकांना साथ देणारे पती- पत्नी राजकारणाच्या आखाड्यातही ‘जोडी’नेच विरोधकांचे आव्हान पेलण्यासाठी सज्ज होत आहेत. महापालिका निवडणुकीत एकाच किंवा शेजारच्या प्रभागातून लढण्यासाठी विविध राजकीय पक्षांकडे अनेक ‘श्री’ व ‘सौ’ इच्छुक आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौर प्रशांत जगताप आणि...
नोव्हेंबर 25, 2016
सीमावासीयांनी महामेळाव्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपली एकजूट दाखविली आहे. कर्नाटककडून सातत्याने केली जाणारी दडपशाही, अत्याचार आणि अन्यायाच्या विरोधात आजची तरुण पिढीही नव्या ताकदीने उतरताना दिसल्याने प्रशासन बिथरले आहे. त्यातूनच मराठी तरुणांवर राजद्रोहासारखे खटले दाखल झाले आहेत. महाराष्ट्रात...
नोव्हेंबर 24, 2016
बेळगाव - महापौर सरिता पाटील यांनी मुंबई महापौरांची भेट घेतल्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा तीळपापड झाला आहे. या भेटीमुळे मुख्यमंत्र्यांनी नगरविकासमंत्री रोशन बेग यांच्यासमोर आपली नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय महापौर व उपमहापौरांवरील कारवाईबाबत रात्री होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या...
नोव्हेंबर 20, 2016
औरंगाबाद - महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने शनिवारी (ता. 19) बीड बायपास मार्गावर विशेष मोहीम हाती घेऊन जेसीबीने दिवसभरात 21 अतिक्रमणे भुईसपाट करुन बीड बायपास मोकळा केला. रस्त्याच्या कडेलाच विविध प्रकारचे छोटे शेड उभारून त्यात अतिक्रमणधारकांनी व्यवसाय सुरू केला होता. कारवाईदरम्यान सर्वाधिक...
नोव्हेंबर 19, 2016
तुर्भे - नवी मुंबई महापालिकेच्या येथील डम्पिंग ग्राऊंडच्या विरोधात नागरिकांनी काल (ता. 18) मोर्चा काढला. महापौर सुधाकर सोनवणे यांनी आठ दिवसांत डम्पिंग हलवले जाईल, असे आश्‍वासन त्यांना दिले. त्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले. महापौरांनी हे आश्‍वासन पाळले नाही, तर ठाणे-बेलापूर रस्त्यावर "चक्का जाम'...
नोव्हेंबर 16, 2016
पुणे - महापालिका निवडणुकीसाठी नव्याने केलेल्या 41 प्रभागांपैकी 23 प्रभागांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे मतदार लक्षणीयरीत्या असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सत्तेवर येण्यास आसुसलेल्या भारतीय जनता पक्षाला रिपब्लिकन पक्षाचा वाटा दिल्याशिवाय महापालिकेवर भगवा फडकवता येणार नसल्याचे सध्याचे चित्र आहे. ...
नोव्हेंबर 15, 2016
पुणे -  राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांसह शिवसेनेच्या शहराध्यक्षांची उपस्थिती... भाजपने फिरविलेली पाठ... आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी सुरू असलेली गर्दी आणि संगीताचे सूर... अशा वातावरणात कॉंग्रेस पक्षाचा "दिवाळी फराळा'चा कार्यक्रम रंगला. कॉंग्रेस भवन येथे...
नोव्हेंबर 14, 2016
औरंगाबाद - चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणाला यंदा हिरवा कंदील मिळाला आहे. या विषयीच्या हालचालीही वेगाने सुरू झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी, जिल्हाधिकारी कार्यालय, सिडको, महापालिका विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी विस्तारीकरणासाठी लागणाऱ्या १८२ एकर जमिनीची स्थळपाहणी केली. मंगळवारी...
नोव्हेंबर 14, 2016
ज्या कॉंग्रेसने (महाष्ट्रातील) भाजपला सळो की पळो करून सोडणे अपेक्षित होते तसे होताना मात्र दिसत नाही. विधानसभेचे अधिवेशन असू द्या किंवा घेतलेला कोणताही निर्णय असू द्या! विरोधीपक्षाची भूमिका कॉंग्रेस नव्हे तर शिवसेना घेत आहे. विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे-पाटील नसून उद्धव ठाकरे आहेत की...
नोव्हेंबर 07, 2016
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेसमध्ये पुन्हा बिनसले तर, भाजप- शिवसेना जवळ आल्याचे चित्र आहे. या घटनांचा परिणाम महापालिका निवडणुकीवर होणार असून, त्याचे पडसाद पुण्यातही नजीकच्या काळात उमटण्याची शक्‍यता आहे. त्याचा फायदा भाजपला मिळणार का? राष्ट्रवादी आपली ताकद...
नोव्हेंबर 05, 2016
पुणे - शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी गणेशखिंड रस्ता, जुना पुणे-मुंबई रस्ता आणि जंगली महाराज रस्ता या तीन रस्त्यांवर बीआरटीचे नवे मार्ग सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे 165 कोटी रुपये खर्च येणार असून, तीन वर्षांत तीनही मार्गांवर बीआरटी सेवा सुरू होईल, असे नियोजन...
नोव्हेंबर 03, 2016
पुणे - चिकुनगुनियाच्या डंखाने पुणेकरांना बेजार केले असून, ऑक्‍टोबरमध्ये या रुग्णांची संख्या एक हजारावर गेल्याची नोंद महापालिकेच्या दफ्तरात झाली आहे. गेल्या पाच वर्षांमधील चिकुनगुनियाचा हा सर्वांत मोठा उद्रेक आहे.  जुलैपासून सुरू झालेल्या पावसाचे पाणी शहरात ठिकठिकाणी साचून राहिले. त्यात मोठ्या...