एकूण 1482 परिणाम
फेब्रुवारी 04, 2017
पिंपरी - महापालिका रणसंग्रामात कोणता सैनिक कोणत्या पक्षाचा याचा अखेरच्या क्षणापर्यंत थांगपत्ता लागला नाही. इतक्‍या गुप्त पद्धतीने सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांचे एबी फॉर्म त्या त्या विभागाच्या निवडणूक अधिकाऱ्यांना शेवटच्या क्षणी सादर केले. राजकीय पक्षांच्या या खेळीमुळे बंडखोरीला...
फेब्रुवारी 03, 2017
युती सरकारने एलबीटी रद्द करण्याचे आश्‍वासन व्यापाऱ्यांना दिले होते. त्याप्रमाणे तो रद्ददेखील केला. व्यापाऱ्यांच्या एकीचा विजय झाला; मात्र तरीही आता व्यापाऱ्यांचे आंदोलन कशासाठी? असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे. थकबाकीची वसुली हे महापालिकेचे कामच आहे. मग एलबीटीच्या जुन्या वसुलीवरून चाललेला...
फेब्रुवारी 03, 2017
राज्यात महापालिकांच्या निवडणुका होत असल्या तरी महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लक्ष मुंबईकडे लागून राहिले आहे. कोण जिंकणार मुंबई. शिवसेना की भाजप? असा प्रश्‍न केला जात असताना दुसरीकडे मराठीच्या मुद्यावर लढणारी मनसे मात्र डेंजर झोनमध्ये गेल्याचे दिसून येत आहे. या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप...
फेब्रुवारी 03, 2017
मुंबई - मुंबईसह दहा मोठ्या महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, तसेच कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बडे नेते स्टार प्रचारक म्हणून प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. ...
फेब्रुवारी 03, 2017
पिंपरी - पिंपरी- चिंचवडमध्ये यायला नको म्हणून येथील "पीएमआरडीए'चे कार्यालयही शहरातून हलविण्यात आले. आम्ही सत्तेत आल्यावर सर्व शासकीय कार्यालये शहरात आणू. भाजपला या शहराविषयी आस्थाच नाही, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.  पिंपरीत गुरुवारी (ता. 2) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते...
फेब्रुवारी 03, 2017
पुणे - महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निश्‍चित करताना निवड समितीला केवळ निम्म्या जागांबाबतच एकमत करता आले आणि खासदार-आमदार-पक्षनेत्यांच्या शिफारशी, तसेच मुख्यमंत्र्यांचे सर्वेक्षण यांच्यात विसंवाद झाल्याने उरलेल्या जागांबाबत तिढा निर्माण झाला. यामुळे यादी निश्‍चित करण्यात अंतिम...
फेब्रुवारी 03, 2017
पुणे - गर्द वृक्षराजी, वाहती मुळा-मुठा अन्‌ नदी परिसरात बारा महिने भरणारे वेगवेगळ्या पक्ष्यांचे अनोखे संमेलन, अशी एकेकाळची ख्याती असणारे येरवड्यातील सालीम अली पक्षी अभयारण्याची आज मात्र दुरवस्था झाली आहे. या परिसरात होणारी बेसुमार वृक्षतोड, कचऱ्याचे साम्राज्य, टाकण्यात आलेला राडारोडा आणि...
फेब्रुवारी 03, 2017
औरंगाबाद - स्मार्ट सिटीअंतर्गत पहिल्या टप्प्यात 90 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे, मात्र अजून हा निधी प्राप्त झाला नाही. सार्वजनिक वाहतूक सेवेच्या पहिल्या टप्प्यात सर्वाधिक वर्दळीच्या जालना रोडवर शहर बससेवा सुरू करण्यात येणार आहे. तसेच शहरातील अन्य प्रमुख मार्गांवर बससेवा सुरू करण्याचा निर्णय...
फेब्रुवारी 02, 2017
पुणे - महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसबरोबर आघाडी होण्याची शक्‍यता मावळली असतानाच पुण्यातील सत्ता कायम राखण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षाचे दीड डझन माजी मंत्री आणि ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना उतरविण्याचे नियोजन केले आहे. त्यात, पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार तारिक अन्वर, खासदार...
फेब्रुवारी 02, 2017
सांगली - आपलं शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्यासाठी तरुणाईने पुढाकार घ्यायला हवा. त्यांच्या ताकदीनेच आपली सांगली स्मार्ट करू, असा आशावाद महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी आज येथे व्यक्त केला. सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) व कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय यांच्या संयुक्त...
फेब्रुवारी 01, 2017
सोलापूर - महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात १७ प्रभागांतून ३९ उमेदवारांची यादी आहे. जवळपास ७६ उमेदवार उभे करण्याचे ठरले असून उर्वरित यादी बुधवार, गुरुवारी जाहीर होणार आहे.  छत्रपती शिवाजी चौकातील मनसे कार्यालयात जिल्हा संपर्क प्रमुख...
जानेवारी 31, 2017
मुंबई - मुंबई महापालिकेत कोणत्याही परिस्थिती भाजपला सत्तेवर येऊ द्यायचे नाही. एकवेळ शिवसेना पुन्हा सत्तेवर आली तर चालेल, अशी भूमिका काँग्रेसच्या दिल्ली नेतृत्वाकडून मांडण्यात आल्याची विश्‍वसनीय माहिती पुढे आली आहे. राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत शक्‍य असेल तेथेही भाजपला रोखा,...
जानेवारी 31, 2017
पुणे - महापालिका निवडणुकांसाठी बहुजन समाज पार्टीची पहिली उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांच्या सूचनांनुसार आणि प्रदेश महासचिव संजीव सदाफुले यांच्या अध्यक्षतेखाली एकूण सदतीस उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.  अश्‍विनी वैरागर (प्रभाग 1 अ), मेनका कराळेकर (प्र...
जानेवारी 30, 2017
नाशिक ः नाशिक महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आघाडीचा सूर जुळला आहे. 3 प्रभागातील 4 जागा वादात असून, त्यावर प्रदेशस्तरावरून निर्णय घेतला जाणार आहे. निम्म्या-निम्म्या जागांचे सूत्र निश्‍चितीवर आज अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण...
जानेवारी 29, 2017
रिपब्लिकन पार्टी - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) भाजपसोबत असणार आहे. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत स्टार प्रचारक हे पक्षाचे निरीक्षक राजाभाऊ सरवदे असणार आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना सोलापुरात प्रचारासाठी आणण्याचे प्रयत्न असणार आहेत....
जानेवारी 28, 2017
प्रत्येक ठिकाणी देवच कशाला लागतो ? सरकारी अधिकाऱ्यांना इतकी कसली भीती वाटते की देव सतत जवळ असावेत असे त्यांना वाटते. शिवसेनेच्या दबावाला बळी न पडता फडणवीस सरकारने कार्यालयातील देवांचे फोटो काढण्याचे आदेश दिले पाहिजेत. ऑफिसमध्ये फोटो लावणारा प्रत्येक माणूस जर आपणास मत देईल अशी आशा शिवसेना बाळगून...
जानेवारी 28, 2017
जळगाव - भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची याअगोदर लोकसभा व विधानसभेनंतर झालेली सरकारातील युती कायम आहे. पुढे महापालिका व जिल्हा परिषद, तसेच कोणत्याही निवडणुकीत युती होणार नाही, असे मत राज्याचे जलसंपदामंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी शुक्रवारी व्यक्त केले. भाजप कार्यालयात पत्रकारांशी ते बोलत होते....
जानेवारी 28, 2017
धुळे - शिवसेनाप्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित्त येथे आज झालेल्या महारक्तदान शिबिरात ७२७ दात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. धुळे शहरात पूर्वी झालेल्या शिबिरात शिवसेनेने विक्रमी ५४४ बाटल्या रक्तसंकलन केले. त्यानंतर आज त्याहून अधिक विक्रमी रक्तसंकलन झाले. यातून दात्यांनीही...
जानेवारी 28, 2017
कोल्हापूर - ""विविधतेत ऐक्‍य हीच देशाचे ओळख आहे. तरीही आपण आडनावावरून जात शोधतो. ही विसंगती दूर करून जाती, धर्म, पंथ विसरून देशाच्या प्रगतीसाठी एकसंध झाले पाहिजे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. 68 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती शाहू स्टेडियम येथे झालेल्या...
जानेवारी 28, 2017
येरवडा - जगाने हुकूमशहा हिटलर आणि एकाधिकारशाहीने वागणाऱ्या सद्दाम हुसेन यांना नाकारले आहे. त्यामुळे हुकूमशहासारखे वागणारे नरेंद्र मोदी यांनासुद्धा जनता नाकारेल, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. राम सोसायटीतील अतुरभवन येथे महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुणे शहर राष्ट्रवादी...