एकूण 1565 परिणाम
मार्च 22, 2019
पिंपरी - लाखो रुपये कर्ज काढून फ्लॅट घेतलेत, हक्काचे घर झाल्याचा आनंद झाला, पण तो काही दिवसच टिकला. जिकडे बघावे तिकडे कचराच कचरा, दुर्गंधी आणि भंगाराच्या गोदामांना लागणारी आग, वाढणारी उष्णता व धुराचा त्रास. त्यात आता सांडपाणी प्रक्रिया केंद्राची भर पडली आहे. मग काय कामाचा फ्लॅट. आगीची धग...
मार्च 20, 2019
पुणे - शहरात नाइट लाइफ दिवसेंदिवस वाढत आहे. कोरेगाव पार्क, मुंढवा परिसरात हा प्रकार तुलनेने जास्त आढळतो. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी सायलेंट पार्टी हा नवीनच ट्रेंड सुरू झाला आहे. या प्रकारामध्ये कानाला हेडफोन लावून संगीतासह पार्टीचा आनंद घेता येते. यामुळे सध्या अशा पार्ट्यांचे आयोजन मोठ्या प्रमाणात...
मार्च 20, 2019
होळी म्हणजे रंगांची उधळण. मग हे रंग चेहरे रंगवणारे नव्हे तर, दुसऱ्यांच्या आयुष्यात सुखाचे आणि प्रेमाचे तरंग फुलवणारे आहेत. कृत्रिम रंगांचा वापर करून प्रदूषण न करता नैसर्गिक रंगांचा वापर करून दुसऱ्यांच्या आयुष्यात रंग भरण्याचे काम करा, असा संदेश छोट्या पडद्यावरील कलाकारांनी दिला आहे....
मार्च 18, 2019
कोडोली - येथील काखे-मांगलेदरम्यानच्या वारणा नदीचे पाणी दूषित झाल्याने नदीत मृत मासे तरंगत आहेत. पाण्यालाही दुर्गंधी आल्याने कोडोलीतील पाणीपुरवठा बंद ठेवला आहे. तीच अवस्था नदीकाठच्या गावांची झाली. चांदोली धरणातून पाणी सोडण्याची मागणी होऊ लागली आहे. कोडोली ग्रामपंचायतीने शुद्धीकरण प्रक्रिया वाढवूनही...
मार्च 17, 2019
कोल्हापूर - प्रदूषित पाणी पंचगंगेत मिसळण्याच्या प्रकाराची आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी गंभीर दखल घेतली. अतिरिक्त आयुक्तांसह प्रभारी जलअभियंत्यांना त्यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. शहरातील सांडपाणी जयंती नाल्यात येते. तेथून ते कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात जाते. सहा...
मार्च 15, 2019
मुंबई - वाहनांचा वापर टाळता येणार नाही; मात्र फटाके चैन म्हणून फोडले जातात. त्यामुळे प्रदूषणाच्या चर्चेत वाहने आणि फटाके यांची तुलना करणे योग्य नाही, असे मत पर्यावरण अभ्यासक व्यक्त करत आहेत. फटाक्‍यांमुळे वायुप्रदूषणाबरोबर ध्वनिप्रदूषणही मोठ्या प्रमाणात होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले....
मार्च 15, 2019
भरपूर परिश्रम आणि चिकाटीनंतर आम्ही असे तंत्र विकसित केले की, जे डिझेल खरेदी व्यवस्थापकास मोबाईल फोनच्या एका चुटकीसरशी डिझेल ऑर्डर करण्याची सुविधा देते. तसेच, कोणत्याही वेळी त्यांच्या कामाच्या ठिकाणी ते वितरित केले जाऊ शकते. काहीतरी विशेष करण्यासाठीच माझा जन्म झाला असून काहीतरी महान घडणे हा माझ्या...
मार्च 14, 2019
कोल्हापूर - रंकाळा, पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी हरित लवादाने घालून दिलेल्या उपाययोजना न केल्याने महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला हरित लवादाने प्रत्येकी पाच लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे, तसेच कामाच्या हमीसाठी ५० लाख रुपयांचे डिपॉझिट भरण्याचा आदेश दिला आहे.  प्रदूषण...
मार्च 14, 2019
पिंपरी - नाल्यातून थेट पवना नदीत मिसळल्या जाणाऱ्या पाण्याबाबत तत्काळ उपाययोजना करावी, यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला पाच लाखांची बॅंक गॅरंटी देण्याबाबत नोटीस दिली आहे. गेल्या महिन्यात थेरगावातील पवना नदी परिसरातील केजूबाई बंधारा भागात मासे मृत झाल्याचा प्रकार...
मार्च 13, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : लोक हे फटाके निर्मिती उद्योगाच्या पाठीशा का लागले आहेत? प्रदूषणातील सर्वांत मोठा वाटा हा तर वाहन उद्योगाचा आहे, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने या दोन्ही घटकांपासून होणाऱ्या प्रदूषणाचा केंद्राने तुलनात्मक अभ्यास केला आहे का, असा सवालही केला. दरम्यान, फटाकेबंदीमुळे या...
मार्च 12, 2019
सर्वांना सन्मानाने जगता आले पाहिजे  : डॉ. बाबा आढाव  पुण्यात सार्वजनिक जीवनात नागरिकांना सन्मानाने जगता यायचे असेल तर तरुणांना रोजगार, झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन, पार्किंगची व्यवस्था, रेल्वे, लष्कर अशा केंद्र शासनाच्या कार्यालयांची सहकार्याची भूमिका असली पाहिजे. पुण्याचे विस्तारीकरण होत असले तरी...
मार्च 11, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्ष जाहीरनामे घेऊन बाहेर पडतील. आश्‍वासनांचा महापूर दारात येईल. या पार्श्‍वभूमीवर सजग पुणेकर म्हणून आपले प्रश्‍न आणि त्या प्रश्‍नांवर तज्ज्ञांनी सुचविलेली उत्तरे ‘सकाळ’मध्ये प्रकाशित करीत आहोत. या चर्चेतून पुणेकरांचा जाहीरनामा तयार व्हावा आणि भविष्यातील...
मार्च 10, 2019
सोलापूर : राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, सोलापूर, नाशिक अशा मेट्रो सिटींमध्ये दरवर्षी सुमारे दीड ते दोन लाख वाहनांची भर पडते. त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. अनेकजण विविध आजारांनी त्रस्त असून काहींचा मृत्यूही त्यामुळे होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर वाहतूक मंत्रालयाने माहिती व तंत्रज्ञान विभागाला...
मार्च 10, 2019
विविध गोष्टी "सेन्स' करणारे सेन्सर्स आज अनेक क्षेत्रांत वापरले जातात. स्मोक डिटेक्‍टर, गॅस डिटेक्‍टरपासून कारच्या ड्रायव्हरला जागं ठेवण्यावर लक्ष ठेवणाऱ्या "अटेन्शन सेन्सर'पर्यंत किती तरी पर्याय आहेत. हे सेन्सर तयार कसे झाले, त्यांचं काम कसं चालतं आदी गोष्टींचा वेध. अनेक प्रकारचे सेन्सर्स आज...
मार्च 09, 2019
रत्नागिरी - देशाची इभ्रत वाचवायची असेल, तर भारतीय जनता पक्षाला हटवा, असे आवाहन करीत भारतीय रिपब्लिकन पक्ष व वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे पंतप्रधानांवर निशाणा साधला. एअर स्ट्राईकमध्ये मारल्या गेलेल्या ३५० अतिरेक्‍यांपैकी एकाचा तरी पुरावा द्या आणि परदेशातील भारताची नाचक्‍...
मार्च 09, 2019
सुका कचरा मंडई संकल्पना राबवा घनकचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण वेगळा केल्यास त्याचे व्यवस्थापन करता होईल. याला नव्या यंत्रणेची जोड दिल्यास परिणामकारकता वाढेल. त्यासाठी ‘सुका कचरा मंडई’ची संकल्पना राबविता येईल.- किशोरी गद्रे, जनवाणी भविष्यात कचरा टाकण्यासाठी जागा मिळणार नाही. त्यामुळे...
मार्च 08, 2019
नवी दिल्ली - भारतात विक्री केलेल्या डिझेलवरील मोटारगाड्यांमध्ये ‘फसवे यंत्र’ (चीट डिव्हाइस) बसवून पर्यावरणाची हानी केल्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादाने आज जगप्रसिद्ध जर्मन मोटार उत्पादक कंपनी फोक्‍सवॅगनला ५०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला. हा दंड दोन महिन्यांमध्ये जमा करण्याचे आदेश लवादाचे अध्यक्ष न्या....
मार्च 08, 2019
ठाणे - ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी मोठ्या आवाजाच्या वाद्यांना विरोध करून मोठ्या जोशात पारंपरिक ढोल-ताशा वाजवणाऱ्या तरुणींचे मातृत्व धोक्‍यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अवजड ढोल तासन्‌तास कंबरेला बांधल्याने गर्भाशयावर ताण येऊन गर्भधारणा होण्यात अडचण येत असल्याचे तज्ज्ञांच्या...
मार्च 08, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : भारतात विक्री केलेल्या डिझेलवरील मोटारगाड्यांमध्ये "फसवे यंत्र' (चीट डिव्हाइस) बसवून पर्यावरणाची हानी केल्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादाने आज जगप्रसिद्ध जर्मन मोटार उत्पादक कंपनी फोक्‍सवॅगनला 500 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. हा दंड दोन महिन्यांमध्ये जमा करण्याचे आदेश लवादाचे...
मार्च 07, 2019
नागपूर - औष्णिक प्रकल्पांमुळे होणारे प्रदूषण आणि खर्च लक्षात घेता शासनाने सौरऊर्जेवर भर दिला आहे. या सौर प्रकल्पांना चालना देण्यासाठी सवलतींचा वर्षावही करण्यात  येत आहे. मुद्रांक शुल्कातून सुट आधीच देण्यात आली असून आता प्रकल्प उभारणाऱ्याकडून तीस वर्षे मालमत्ता करही आकारण्यात येणार नाही...