एकूण 91 परिणाम
डिसेंबर 30, 2018
कॅमेरॉननं ‘टायटॅनिक’ला ‘प्रत्यक्षात घडलेली कादंबरी’ असं म्हटलेलं होतं. खरं तर ती ‘वास्तवात आलेली एक गझल’ मानली पाहिजे. अन्यथा, सन १९९७ मध्ये आलेल्या चित्रपटानं आणलेला तो भावसमुद्राचा कल्लोळ, जगजितच्या १९७८ मधल्या गझलेत आधीच कसा ओळखीचा झाला असता? भावबंधांचं काही सांगता येत नाही. कुठूनही कुठंही...
डिसेंबर 23, 2018
"टायटॅनिक'नं अजरामर प्रेमकहाणीचं समुद्ररूप दाखवलं. पाहतापाहता या चित्रसुरांच्या गारुडानं सात समुद्र ओलांडले. जगभर "टायटॅनिक'वर रसिकांच्या उड्या पडल्या. भावगर्भ संगीत, त्या कलाकृतीतला अभिजाताचा प्रत्येक चतकोर चंद्रकोरीसारखा उजळून निघालेला. मृत्यूदेखील देखणा असू शकतो, त्याचं रौद्र स्वरूप प्रीतीपुढे...
डिसेंबर 16, 2018
"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी गरजच नव्हती; पण संस्कृतीकरण, यांत्रिक प्रगती, विकास, औद्योगिक उलाढाली, राजकारणं, युद्ध...या असल्या गोष्टींच्या आहारी जात आपण कुठल्या थराला आलो आहोत,...
डिसेंबर 09, 2018
तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात शून्यात कुठं तरी तंद्री लावून बसला आहात...मनात कुठल्या कुठल्या आठवणींची पिसं इकडून तिकडं तरंगत आहेत. तशातच वास्तवातही एक पांढरंशुभ्र पीस एका झुळकीसरशी तरंगत तरंगत येऊन तुमच्या खांद्यावर येऊन बसतं. तुम्ही ते हळुवारपणे उचलता. हलेकच ते आंजारता-गोंजारता. आपल्याजवळच ठेवून...
डिसेंबर 02, 2018
फ्रॅंक अबाग्नेल या अफलातून ठकसेनाच्या चरित्रावर आधारित एक चित्रपट सन 2002 मध्ये सुविख्यात दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्गनं केला होता. त्याचं नाव होतं ः "कॅच मी इफ यू कॅन.' गुन्हेगारीतून बाहेर पडल्यावर फ्रॅंकनं याच शीर्षकाचं आत्मचरित्र लिहिलं होतं. त्यावर आधारित हा चित्रपट होता. मंचकावर रेलून बसत...
नोव्हेंबर 25, 2018
"बर्डमॅन' हा चित्रपट एखाद्या अमूर्त चित्रासारखा वाटतो. रंगांचे गहन फटकारे आणि त्या रंगसंगतीनं साधलेला त्याहूनही गहन उजेड काहीतरी वेगळं सांगू पाहतो. त्यातलं काही कळतं, काही नाहीच कळत; पण नाही कळलं, तरी अडत नाही. अर्थ न लागताही त्यांचं म्हणणं मनात उतरलेलं असतं. रामायणातली ही एक लोककथा आहे....
नोव्हेंबर 18, 2018
"बेन-हर' ही क्रिस्तकाळातली गाथा. आहे काल्पनिकच; पण तिचं क्रिस्ती इतिहासाशी असं काही घट्ट नातं आहे की खरीच वाटावी. विल्यम वायलरनं दिग्दर्शित केलेला "बेन-हर' हा चित्रपट बरोब्बर साठ वर्षांपूर्वी, 18 नोव्हेंबर 1959, रोजी प्रदर्शित झाला होता. त्या महाचित्रगाथेची ही षष्ट्यब्दी, त्यानिमित्त......
नोव्हेंबर 04, 2018
आग्यावेताळाबद्दल तुम्ही ऐकलंय? हा भुताचा एक टाइप आहे. मुंजा, चकवा, समंध, कर्णपिशाच्च, हडळ...तसा हा आग्यावेताळ. एकदम कडक प्रकार. याचा मंत्र जपला की कुठल्याही वस्तूला क्षणार्धात आग लावता येते म्हणे. अर्थात त्याआधी आग्यावेताळाला वश करता यायला हवं. ते एकदम मस्ट आहे. आपल्या लोककथांमधलं हे एक जुनं-पुराणं...
ऑक्टोबर 28, 2018
"सायको' हा चित्रपट हिचकॉक यांच्या कारकीर्दीचा मेरुमणी मानला जातो. सन 1960 मध्ये आलेल्या या चित्रपटानं प्रेक्षक थरारून गेले होते. आता हा चित्रपट पाहताना तितकं काही वाटत नाही; पण 1960 च्या दशकात थिएटराबाहेर रुग्णवाहिका लागत म्हणे. एका सत्यकथेवर आधारित कादंबरीवरून हिचकॉक यांनी "सायको' निर्माण केला...
ऑक्टोबर 21, 2018
डंकर्कमध्ये अडकून पडलेलं सैन्य तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी रयतेच्या पाठबळावर सोडवून आणलं. क्रिस्तोफर नोलान या प्रतिभावान दिग्दर्शकानं वेगळी शक्‍कल लढवली. इतिहासानं चर्चिल या नायकावर रोखलेला "कॅमेरा' उचलून त्यानं तो डंकर्कचा किनाऱ्यावर नेऊन ठेवला. थेट युद्धभूमीवरची कहाणी सादर...
ऑक्टोबर 14, 2018
"ट्‌वेल्व्ह अँग्री मेन' हा एक अफलातून चित्रपट. 1957 मध्ये आलेल्या या चित्रपटात खरं तर चित्रपटच नाहीये! शहाण्णव मिनिटांच्या या कृष्णधवल चित्रपटात फक्‍त तीन मिनिटांचं बाह्य चित्रीकरण आहे. बाकी सर्व चित्रपट घडतो, तो एका खून खटल्यावर वितंडवाद घालणाऱ्या ज्युरींच्या दालनात. सतरा बाय चोवीस फुटाच्या एका...
ऑक्टोबर 07, 2018
चिरंजीवित्वाचा शाप लाभलेल्या अश्‍वत्थाम्याचं महाभारतातलं मिथक कमालीचं गूढ आहे. बारा वर्षापूर्वी अशाच एका अश्‍वत्थाम्याची कहाणी सांगणारा चित्रपट येऊन गेला होता. त्याचं नाव होतं ः "द मॅन फ्रॉम द अर्थ'... पृथ्वीवरचा माणूस. चमत्कारिकच नाव! हा पृथ्वीवरचा माणूस आहे, तर मग आपण कोण आहोत? चित्रपटाचा फार...
सप्टेंबर 30, 2018
गेल्या साठ वर्षांत किती तरी सुंदर रोमॅंटिक चित्रपट येऊन गेले; पण "रोमन हॉलिडे'सारखा चित्रपट तोच. त्याला अजूनही तोड नाही साऱ्या तारांगणात. आयुष्याच्या मस्त मस्त उतारावर गुणगुणत वाटचाल करावी, अशी ती एक मस्त गझल आहे किंवा चटकन आठवणाऱ्या जुन्या रम्य स्मृतीसारखी, अवचित अंगावर टपकलेल्या पारिजाताच्या...
सप्टेंबर 23, 2018
सूड तो सूड...त्यातून साधायचं काय, हा वरकरणी भाबडा वाटणारा सवाल विख्यात चित्रकर्मी स्टीव्हन स्पीलबर्गनं 2005 मध्ये एका चित्रपटाद्वारे केला होता. नाव होतं ः म्युनिक. मन विषण्ण करणारा हा चित्रपट कधीही चुकवू नये असाच आहे. सूडभावनेनं एकमेकांत लढणं निरर्थक नाही का? "आय फॉर ऍन आय' या बायबलमधल्या चिरंतन...
सप्टेंबर 09, 2018
गेल्या वर्षी "अमेझॉन'वर एक छोटासा चित्रपट येऊन गेला होता. नाव होतं ः द वॉल. अवघा 89 मिनिटांचा चित्रपट. एक पडकी भिंत या चित्रपटाची चक्‍क नायिका आहे.दोन राष्ट्रांच्या निरर्थक युद्धखुमखुमीची साक्षीदार बनलेली इराकच्या मरुभूमीतली निराधार भिंत!. अमेरिकेत या चित्रपटाला समीक्षकांनी जाम हाणलं. तरीही असा...
सप्टेंबर 02, 2018
हिटलरच्या बॉंबफेकी विमानांनी माणसांची घरं उद्‌ध्वस्त केलीच; पण वॉर्सातलं प्राण्यांचं घरही सोडलं नाही. बॉंबहल्ल्यांत कित्येक प्राणी जळून मेले. कित्येक जायबंदी झाले. कित्येक पिंजऱ्यातून सुटून शहरात घुसले आणि नाझी सैनिकांची नेमबाजीची "प्रॅक्‍टिस' झाली. बिचारी मुकी जनावरं...माणूस नावाच्या प्रजातीनं हे...
ऑगस्ट 26, 2018
"ब्यूटिफुल माइंड" हा चित्रपट म्हणजे रसेल क्रो याच्या कारकीर्दीतला लखलखता मेरुमणी आहे. त्याहूनही अधिक तो पटकथालेखक अकिवा गोल्डमन यांच्या प्रतिभेचा आविष्कार आहे. मूळ जीवनकहाणीतल्या वास्तव घटनांना त्यांनी बगल दिली आहे हे खरंच; पण गणित ही भाषाही होऊ शकते, हे त्यांनीच दाखवून दिलं. - महाभारताच्या तेलगू...
ऑगस्ट 19, 2018
बेनामसा ये दर्द ठहर क्‍यूँ नही जाता जो बीत गया है वो गुजर क्‍यूँ नही जाता -निदा फाजली, (1938-2016) एरिक लोमॅक्‍स नावाच्या एका युद्धसैनिकाचं तर अवघं आयुष्य असं वेदनामय होतं. एरिकची जगावेगळी गोष्ट सांगणारा चित्रपट "द रेल्वेमॅन' सन 2013 मध्ये येऊन गेला. अद्भुत अभिनय आणि वेगळाच आशय असलेला हा चित्रपट...
ऑगस्ट 12, 2018
"कॅप्टन फिलिप्स' ही समुद्रसाहसकथा शंभर टक्के खरीखुरी होती. एका अमेरिकी मालवाहू बोटीच्या कप्तानाच्या वास्तवातल्या अपहरणावर आधारित. अमेरिकेच्या नौदलानं अचूक मोहीम राबवत त्या कप्तानाला सहीसलामत सोडवून आणलं. जहाजकंपनीचं नुकसान वाचवलं. त्या खऱ्याखुऱ्या मालवाहू बोटीचा खराखुरा कॅप्टन रिचर्ड फिलिप्स...
ऑगस्ट 05, 2018
सुरवातीलाच एक इटालियन लोककथा थोडक्‍यात सांगणं भाग आहे. इतालो काल्विनो नावाचे एक लेखक-पत्रकार होते. त्यांनी सन १९५६ मध्ये लिहिलेल्या इटालियन लोककथांच्या पुस्तकातली ही छोटीशी गोष्ट : गावात एक विधवा होती. तिला तेरा वर्षांचा मुलगा होता. त्याचं नाव जॅक. ‘पैसा कमावण्यासाठी मलाही बाहेरगावी जायला हवं’, असा...