एकूण 425 परिणाम
फेब्रुवारी 15, 2019
जळगाव : येथून जवळच असलेल्या नशिराबाद गावाजवळ एकाच आठवड्यात सलग तिसरा भीषण अपघात झाला असून दोघांना प्राण गमवावा लागला आहे. रात्री एक वाजेच्या सुमारास झालेल्या प्रवासी रिक्षा आणि कारच्या धडकेत दोन ठार तर तीन जखमी झाले आहेत.  शुक्रवारी रात्री 1 वाजेच्या सुमारास नशिराबादजवळील एका धाब्यावर...
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्ली - पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ३९ जवानांचा बळी घेणाऱ्या आत्मघातकी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा आणि सरकारच्या पातळीवर प्रचंड अस्वस्थता आहे. या भ्याड हल्ल्यानंतर सरकार आक्रमक झाले असून, दहशतवाद्यांना सडेतोड प्रत्युत्तर मिळेल, असा सज्जड इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी...
फेब्रुवारी 10, 2019
औरंगाबाद - सूतगिरणी भागातील काबरानगर मार्गावर असलेल्या मैदानातील कचऱ्यामुळे मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. या मैदानावर शनिवारी (ता. नऊ) दुपारी आठ-दहा कुत्र्यांच्या टोळीने पाचवर्षीय चिमुकलीला घेरून लचके तोडत फरफटत नेले. परिसरातील नागरिक वेळीच धावल्याने चिमुकलीचे प्राण वाचले....
फेब्रुवारी 07, 2019
अण्णा हजारे यांनी वारंवार उपोषण करून आणि तेवढ्याच वेळा त्यांना आश्‍वासने मिळूनही ‘लोकपाल’विषयीचे प्रश्‍नचिन्ह कायमच आहे. लोकपाल, तसेच लोकायुक्‍त यांच्या नियुक्‍तीबाबत सरकारकडून विक्रमी संख्येने आश्‍वासने मिळवण्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यशस्वी झाले आहेत! हे आश्‍वासन त्यांनी एकदा-दोनदा नव्हे,...
फेब्रुवारी 05, 2019
जीवनातील साथीदार जातो, तेव्हा इतरांनी सांत्वन करूनही मनाची समजूत घातली जात नाही. अहो, ऐकलंत का? तुम्ही अंतराळात गेल्यावर डॉ. शेखर, वंदना, सुलभाबेन, शीलूताई आल्या होत्या. डॉ. शेखर काय म्हणाले, माहीत आहे? "भाभी, मी डॉक्‍टर आहे. मी असंख्य रुग्ण पाहिले आहेत. कित्येक मृत्यू पाहिले आहेत. रुग्णाच्या वेदना...
जानेवारी 31, 2019
पुणे : 'आई वडिलाचे प्राण तुम्ही, त्यांच्यासाठी सुरक्षित या घरी', 'वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा', 'वेगवान आनंदी आयुष्यसाठी, वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवा', 'वेग कमी, जीवनाची हमी' यांसारखे वाहतूक नियम पालनाबाबतचे फलक हाती घेऊन विद्यार्थ्यांनी वाहनचालकांमध्ये जनजागृती केली. याबरोबरच...
जानेवारी 29, 2019
बारामती : साडेचार महिन्यांची मुलगी तोंडातून लाळ गाळते म्हणून जिवंत मासा तोंडातून फिरवला तर लाळ गाळायचे बंद होईल, अशी घरगुती उपचाराची अपुरी व अर्धवट माहिती मिळाल्याने मावशीने मुलीच्या तोंडात जिवंत मासा फिरवला. पण, गुळगुळीतपणामुळे मासा निसटून थेट अन्ननलिकेत जाऊन अडकला. अन् त्या चिमुकलीची आयुष्याशी...
जानेवारी 29, 2019
पुणे : कुत्र्याने संकटातून मालकाची सुटका केल्याची आतापर्यंत आपण अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. पुण्यात तर चक्क कुत्रीच्या सतर्कतेमुळे हृदयविकाराचा झटका आलेल्या एका डॉक्टरचे प्राण वाचले आहेत. कुत्रा हा प्रामाणिक प्राणी म्हणून ओळखला जातो, त्याचबरोबर माणसाचा सच्चा मित्रही आहे. पुण्यातील...
जानेवारी 28, 2019
कुपवाड :  कुपवाड एमआयडीसीला जाण्यासाठी अहिल्या देवी होळकर चौक ते कुपवाडएमआयडीसीला रस्ता जातो. परंतु या रस्त्यावर महापालिकेने मोठे होर्डिंग उभे केले आहे. या होर्डिंग मुळे येणाऱ्या मोठ्या 10 चाकी व कंटेनर यांना वळण घेणे अवघड आणि कमालीची कसरत करावी लागते. तसेच याच रस्त्याला अगदी रस्त्याच्या मध्येच...
जानेवारी 16, 2019
घोडेगाव (पुणे): फलोदे (ता. आंबेगाव) या भागातील रूग्णांना तातडीच्या वेळेस रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कंपेटीटोर्स फाऊंडेशन पुणे आणि आदिम संस्कृती संस्था फलोदे यांच्या एकत्रित सहकार्यातून रूग्णवाहिका उपलब्ध केली आहे. या रुग्णवाहिकेचे स्थानिक संयोजन शहीद राजगुरू...
जानेवारी 07, 2019
मुंबई- मंत्रालयात एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन या तरुणाने उडी मारली, मात्र सुदैवाने खाली लावलेल्या संरक्षक जाळ्यांमध्ये हा तरुण अडकला आणि त्याचे प्राण बचावले. आज (ता.07) दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. लक्ष्मण चव्हाण असे उडी...
जानेवारी 04, 2019
जळगाव - मकर संक्रांतीच्या पर्वावर पतंग उडविण्याची परंपरा असून, हा उत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र, पतंग उडविताना नायलॉन मांजावर बंदी असूनही त्याची सर्रास विक्री व वापर होत असून, त्याविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी पक्षमित्रांमधून केली जात आहे. घातक मांजामुळे अनेक पक्षी, पशू व माणसांना...
डिसेंबर 29, 2018
सिन्नर - नायलॉन मांजामुळे अवघ्या तेरा दिवसांपूर्वी एका युवकाचा गळा कापल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी (ता. 26) दुचाकीवरून जाणाऱ्या गणेश कोठुरकर (वय 32) या युवकाचा नायलॉन मांजामुळे गळा कापला गेला. या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक पालक आपल्या चिमुकल्यांना घराबाहेर पाठवण्यास...
डिसेंबर 27, 2018
मोहोळ : मालट्रकला टेंपोने मागून धडक देऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य चौघेजण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी (ता. 27) सकाळी साडेसहा वाजता मोहोळजवळील नागनाथ विद्यालयाशेजारी असलेल्या पुलावर झाला. अली महंमद शेख (रा. इटकळ ता. तुळजापुर) असे मृताचे नाव आहे. तर चांद बाबुलाल नदाफ, फर्जाना...
डिसेंबर 23, 2018
परिपूर्ण पालक हे एक मिथक आहे; पण तरीही पालकत्व हा एक सुंदर अनुभव आहे, त्यातल्या सगळ्या अपरिहार्य अधुरेपणासकट!... आणि वरवर पाहता परिपूर्णतेपासून दूर असलेल्या आपल्या मुलांबरोबर वाढणं, मोठं होणं ही आपल्याला आणि त्यांना श्रीमंत करून सोडणारी एक अविस्मरणीय सफर आहे. मग मुक्कामाला पोचणं हे ध्येय...
डिसेंबर 20, 2018
मुंबई: समाजात मोठ्या प्रमाणावर विष पसरले आहे. यामुळे माझ्या मुलांना भारतात ठेवायला भीती वाटत असल्याचे विधान अभिनेते नसरुद्दीन शहा यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात तथाकथित गोरक्षकांनी एका पोलिस अधिकाऱ्याची हत्या केली होती. त्या घटनेवर शहा यांनी भाष्य केलं आहे. भारतातील...
डिसेंबर 19, 2018
सज्जन कुमार या काँग्रेसच्या नेत्याला जन्मठेपेची शिक्षा झाल्याने उशिरा का होईना न्याय मिळतो, याचा प्रत्यय आला. परंतु, घाऊक द्वेषाची प्रवृत्ती आणि सत्ताधाऱ्यांच्या कलाने पोलिस यंत्रणेने काम करणे, या दोन गंभीर उणिवांचे काय? इंदिरा गांधी यांच्या १९८४ मध्ये झालेल्या दुर्दैवी आणि निर्घृण हत्येनंतर शीख...
डिसेंबर 17, 2018
मुंबईः अंधेरीतील ईएसआयसी म्हणजेच कामगार रुग्णालयाला आज (सोमवार) दुपारच्या सुमारास आग लागली आहे. या आगीमध्ये दोघांना प्राण गमवावे लागले असून, 108 जण जखमी झाले आहेत. सायंकाळी 6च्या सुमारास आग आटोक्यात आली. ईएसआयसी रुग्णालयाच्या इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर आज दुपारी चारच्या सुमारास आग...
डिसेंबर 13, 2018
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांना समावेशक वृत्ती अंगीकारण्याशिवाय पर्याय नाही, हे स्पष्ट झाले आहे. संवाद हे लोकशाहीचे प्राणभूत तत्त्व आहे, याचे भान विसरता कामा नये. विधानसभा निवडणुकांच्या निकालांत काँग्रेसला मिळालेल्या यशामुळे देशातील सारीच राजकीय समीकरणे...
डिसेंबर 09, 2018
उपचारांचा खर्च परवडत नाही म्हणून मुलानं आईची हत्या केल्याची घटना मुंबईत नुकतीच घडली. एकीकडं उपचारांमुळं विलक्षण असे परिणाम दिसत असताना दुसरीकडं उपचारांचे खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर जात चालले आहेत, असंही दिसतंय. एकाबाजूला आपल्याला अद्ययावत वैद्यकीय उपकरणं, आंतरराष्ट्रीय दर्जा मिळालेल्या...