एकूण 683 परिणाम
मे 26, 2019
सांगली - द्राक्ष व डाळिंब बागांचे पाऊस, गारपिटीपासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना प्लास्टिकचे आच्छादन (शेडनेट) प्रायोगिक तत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. आमदार अनिल बाबर यांनी याबाबत सातत्याने विधिमंडळात पाठपुरावा...
मे 13, 2019
मुंबई - नालेसफाईच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांना मुंबई पालिका नोटीस बजावणार आहे. ४० टक्के कामही पूर्ण न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. निवडणूक आचारसंहितेचे कारण देत नालेसफाईची कामे करण्यात कंत्राटदारांनी दिरंगाई केल्याचे आढळले आहे. मे महिन्यापूर्वी...
मे 03, 2019
नवी मुंबई - पाठीवर भले मोठे पोते आणि हातात काठी घेऊन कचऱ्याच्या ढिगात प्लास्टिक, धातूचे तुकडे आणि इतर वस्तू शोधत फिरणाऱ्या कचरावेचक महिलांचे आरोग्य धोक्‍यात आहे. रोजंदारी चुकेल या भीतीने दवाखान्यात जाण्यास टाळाटाळ करणाऱ्या या महिलांमध्ये कर्करोग आणि गर्भाशयाचे आजार बळावत असल्याचे...
मे 02, 2019
३३८ जलचर प्रजातींना ‘आय नॅचरलिस्ट’ संकेतस्थळाची मान्यता मुंबई - प्रदूषणामुळे मरणासन्न झालेल्या मुंबईतील सागरी किनाऱ्यावरील ३३८ प्रजातींच्या जलचरांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. ‘आय नॅचरलिस्ट’ या आंतरराष्ट्रीय विज्ञान संकेतस्थळाने ही मोहर उमटवली आहे. ‘मरिन लाईफ ऑफ मुंबई’ ही संस्था मुंबईतील...
एप्रिल 29, 2019
चिपळूण - गेल्या काही वर्षापासून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या श्री सदस्यांनी स्मशानभूमी आणि कब्रस्ताने चकाचक करून वेगळा आदर्श निर्माण केला. शहर आणि परिसरात शेकडो श्री सदस्यांनी रविवारच्या स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेत स्मशानभूमी व कब्रस्तानातील अस्वच्छता दूर केली आहे.  डॉ. नानासाहेब...
एप्रिल 28, 2019
असे कितीतरी रम्या आणि जित्या इथल्या वस्त्यांमध्ये आढळून येतात. रम्या, रम्याची आई, रम्याचा अप्पलपोट्या बाप, जित्या...अशी कितीतरी पात्रं. एकदा तरी जिवाची मुंबई करावी, अशी हौस जवळपास सगळ्यांनाच असते. अनेकजणांची ती हौस कधी ना कधी भागतेही... पण हीच जिवाची मुंबई अनेकांचा जीव घेते, अनेकांचा जीवनरस शोषून...
एप्रिल 26, 2019
राशिवडे बुद्रुक - सेवानिवृत्तीनंतरचं गेट टुगेदर म्हणजे अनेक आठवणींना उजाळा, जीवनातील बऱ्या-वाईट घटना उलगडण्याचं निमित्त मानून ते सारे एकत्र येत. एक दिवसाची मौज करून घरी परतत. पण यावेळी त्यांचा मूड बदलला. ‘सकाळ’ने केलेल्या राधानगरी अभयारण्य स्वच्छतेवर प्रभावित होऊन त्या उपक्रमाचा एक हिस्सा होण्याचा...
एप्रिल 23, 2019
नवी मुंबई - शहरातून प्लास्टिकचे समूळ उच्चाटन करण्यासाठी महापालिकेच्या प्लास्टिक विरोधी मोहिमेंतर्गत बड्या व्यावसायिकांनंतर किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई सुरू झाली आहे. सोमवारी दिवसभरात प्लास्टिक विरोधी पथकाने बेलापूर, वाशी, कोपरखैरणे परिसरातील रस्त्यांवर बसणारे फेरीवाले व...
एप्रिल 16, 2019
पिंपरी - महापालिकेच्या आरोग्य विभागाने वर्षभरात प्लॅस्टिक पिशव्यांची विक्री केल्याप्रकरणी ४८६ दुकानदारांवर कारवाई करून २१ लाख पाच हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल केला. मात्र, अद्याप प्लॅस्टिकच्या पिशव्यांची विक्री सुरूच असल्याचे चित्र आहे. पालिकेच्या ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’, ‘ई’, ‘फ’, ‘ग’ आणि ‘ह’ या आठ...
एप्रिल 12, 2019
आळंदी : पिसाळलेले कुत्र्याच्या चाव्याने अवघ्या तासाभरात पंचवीस जखमी झाले. गालाचा चावा घेतल्याने माउली इंगळे हा साडेतीन वर्षाचा लहान मुलगा गंभीर जखमी असून ससून रूग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान स्थानिक युवकांनी रात्री कुत्र्याला मारून टाकल्याने शहरवासियांची पिसाळलेल्या कुत्र्यापासून सुटका झाली. ही...
एप्रिल 08, 2019
साडवली - गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर मंदिरासमोरील भागात लाटेबरोबरोबर तेलाचा चिकट थर किनाऱ्यावर येत आहे. याचा अभ्यास होणे गरजेचे आहे, असे मत देवरूख आठल्ये- सप्रे-पित्रे महाविद्यालयाचे भूगोल विभागप्रमुख प्रा. सरदार पाटील यांनी व्यक्त केले.  गणपतीपुळे समुद्रकिनारी फिरत असताना एका भागात काळसर रंगांचे...
एप्रिल 06, 2019
मुंबई -  प्लास्टिकबंदीच्या घोषणेला गुढीपाडव्याच्या दिवशी वर्ष पूर्ण होत असले तरी अंमलबजावणी झालेली नाही. घाऊक बाजारांत कारवाई करणाऱ्या महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना धमक्‍या दिल्या जात आहेत. त्यामुळे संवेदनशील भागांत पोलिसांच्या मदतीशिवाय कारवाई न करण्याचा निर्णय...
एप्रिल 04, 2019
पाली : उन्हाचा तडाखा सर्वत्रच वाढला आहे. अशातच जनावरांसाठी हिरव्या व सुक्या चाऱ्याचा देखील अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे मोकाट जनावरांना खाण्यासाठी अन्न पाण्याची कमतरता भासू लागली आहे. मग ही मोकाट गुरे शहराच्या व गावाच्या उकिरड्यावर जाऊन मिळेल ते खात आहेत. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले....
एप्रिल 02, 2019
जोतिबा डोंगर - येथील घाटात मुदत संपलेले प्लास्टिक पिशव्यातील पशुखाद्य टाकण्यात आले आहे. विशेष म्हणजे या पिशव्यांचा दोन ट्रक इतका कचरा येथील घाटात ओतण्यात आला आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. हा कचरा टाकणाऱ्यांवर त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थ व भाविकांतून होत आहे...
मार्च 31, 2019
नागपूर - तापमान वाढल्याने ऊस तसेच फळांचा रस किंवा लस्सी घेताना अनेकजण त्यात बर्फची मागणीही करताना आढळून येत आहे. खाण्याचा बर्फ (आइस क्‍यूब) व ‘पॅकेजिंग’चा बर्फ यातील फरकापासून अनभिज्ञ असल्याने नागरिक नकळतपणे परतताना विविध आजारही सोबत घेऊन येत असल्याचे चित्र आहे. शहरातील रसवंतीमध्ये सध्या मोठ्या...
मार्च 26, 2019
जळगाव ः शहरात प्लॅस्टीक विक्री कारवाई थंडावली असल्याने महापालिका आयुक्त आयुक्त उदय टेकाळे यांनी सोमवारी दिलेल्या आदेशावरून महापालिकेच्या आरोग्य व अतिक्रमण निर्मूलन विभागाने  आज शहरातील विविध भागात कारवाई केली. या कारवाईत सुमारे सहा लाख रुपये किंमतीचे साडे तीन क्विंटल प्लास्टिक पिशव्या...
मार्च 26, 2019
जळगाव ः राज्य शासनाने प्लास्टिक बंदी लागू केल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकांकडून प्लास्टिक व थर्माकोलच्या वस्तू विक्रेत्यांवर जोरदार कारवाई केली. परंतु, ही कारवाई गेल्या काही महिन्यांपासून थंडावल्याने पुन्हा शहरात सर्रास प्लास्टिकचा वापर सुरू होता. याबाबत...
मार्च 26, 2019
कोल्हापूर - कोल्हापूरच्या फुटबॉललाच आज रेडकार्ड देण्यात आले. फुटबॉल स्पर्धेदरम्यान शाहू स्टेडियमवर होणाऱ्या हुल्लडबाजीचा परिणाम स्थानिक फुटबॉल स्पर्धा स्थगित ठेवण्यापर्यंत येऊन ठेपला. हुल्लडबाजी, शिवीगाळ, बाटल्यांची फेकाफेक, अश्‍लील हावभाव हे नित्याचे झाले होते. रविवारी (ता. २४) झालेल्या एका...
मार्च 19, 2019
पाली - दुष्ट आणि वाईट प्रवृत्तीचं निर्दालन करणारा म्हणून होळीचा सण साजरा केला जातो. हा सण रंगांचा आणि सर्वांचा आनंद द्विगुणित करणारा असतो. याचे रुप असेच राहण्यासाठी धुलिवंदन व रंगपंचमीला घातक रासायनिग रंगांचा वापर, पाण्याचे फुगे व पाण्याचा वापर टाळुन प्रदूषणविरहीत आणि सुकी होळी साजरी करू या… तसेच...
मार्च 18, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीसाठी एक प्लेट वडा-पाव, पोहे, उपीट, शिरा व एक ग्लास कोकम, लस्सी असे प्रत्येकी १० ते २० रुपये, तर चहासाठी ५ ते १० रुपये असे खर्चाचे स्टॅंडर्ड दर निश्‍चित केले आहेत. प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांची मागणी असणाऱ्या मटण थाळीसाठी १५० ते २०० रुपये दर निश्‍चित आहे. प्रत्येक...