एकूण 18 परिणाम
डिसेंबर 31, 2018
पुणे - सरत्या वर्षाला निरोप देतानाच (३१ डिसेंबर) पुणेकरांना नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करता यावे, यासाठी वाहतूक शाखेने प्रमुख रस्त्यांसह काही भागांमधील वाहतुकीमध्ये बदल केला आहे. काही भागांतील सिग्नल पहाटेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असून, रस्ते बंदी व काही ठिकाणी ‘नो व्हेईकल झोन’ करण्यात आला आहे....
ऑक्टोबर 14, 2018
पुणे : शिवाजीनगर पोलिस वसाहतीमध्ये तीन दिवसांपासून पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत संतप्त महिलांनी पालकमंत्री गिरिश बापट यांच्या निवासस्थानावर आज सकाळी हंडा मोर्चा काढला. संतप्त महिलांनी सूरू केलेले रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले आहे.    शिवाजीनगर पोलिस वसाहतीमध्ये गेल्या तीन...
ऑगस्ट 25, 2018
पुणे : समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकरांचा वारसा सांगणाऱ्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायणाची पूजा करण्याचा प्रकार गुरुवारी झाला. शैक्षणिक संस्थेत झालेल्या कर्मकांडाच्या या घटनेमुळे महाविद्यालयातील वातावरण चांगलेच तापले.  फर्ग्युसन...
ऑगस्ट 05, 2018
पुणे : हिमाच्छादित बर्फाळ प्रदेशातील उणे 28 डिग्री सेल्सिअस तापमानात कर्मा नावाच्या हिमबिबट्याचे मादीसोबतचे सहजीवन, शिकार आणि मृत्यूपर्यंतचा पट वन्य छायाचित्रकार राजेश बेदी यांनी कॅमेऱ्यातून अचूक टिपला आहे. "द स्टोरी ऑफ स्नो लेपर्ड' या माहितीपटाच्या काही मिनिटांच्या एका झलकेतून पुणेकरांनी...
जुलै 17, 2018
पुणे : मुसळधार पावसाचा परिणाम शहरातील वाहतुकीवरही सोमवारी झाला. मध्यभागात ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यातच पीएमपीच्या तब्बल 140 बस सायंकाळपर्यंत शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये बंद पडल्या होत्या, त्यामुळे कोंडीत भर पडून शहरातील वाहतूक धिमी झाली होती. एसटीच्याही पुणे- मुंबई मार्गावरील 26...
मे 19, 2018
पुणे : महाविद्यालयात पूर्ण शुल्क भरले नाही तर विद्यार्थ्याला परीक्षेला बसू दिले जात नाही. ग्रंथालयातील पुस्तक जमा न केल्यास निकाल मिळत नाही. कॉलेजमधून स्थलांतर दाखला (टीसी) हवे असल्यास संबंधित विद्यार्थ्यांकडे काही रक्कम बाकी नाही ना, हे काटेकोरपणे पाहिले जाते; परंतु प्रवेशाच्या वेळी...
मे 09, 2018
आयुष्याचे समीकरण मांडता येणे कठीणच असते. एका गणितज्ज्ञाच्या मार्गदर्शनामुळे आयुष्याचे गणित सोपे झाले. एक सामान्य कारकून, पण गणिताची शिस्त, तर्कशुद्धता आणि कलात्मक व्यवहारही अंगात मुरला. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गणितज्ज्ञ डॉ. श्रीराम अभ्यंकर यांनी "भास्कराचार्य प्रतिष्ठान' या गणित संशोधन संस्थेची...
एप्रिल 13, 2018
पुणे - रहदारीच्या रस्त्यावर डबल पार्किंग करणाऱ्या वाहनचालकावर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी गाडीच्या चाकाला लोखंडी जॅमर लावले. मात्र दंड भरणे दूर, याउलट चालकाने चक्क जॅमर लावलेले चाक बदलून दुसरे चाक बसविले. ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वाहनचालकाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करत हिसका...
फेब्रुवारी 08, 2018
'गाव तिथे ग्रंथालयासाठी' युवकांचा उपक्रम  पुणे | ग्रामीण महाराष्ट्रात गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, वाचनसंस्कृती जोपासली जावी व गावागावातील ग्रंथालये ही केवळ वाचनकेंद्र न राहता गावाची शाश्वत विकासकेंद्र असावीत ह्या उद्देशाने टीम एकलव्य ने गाव तिथे ग्रंथालय हा उपक्रम हाती घेतला असून,ग्रंथालय उभारणी...
डिसेंबर 06, 2017
पुणे - राज्याची सांस्कृतिक, शैक्षणिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुण्यात लवकरच ‘स्किल हब’ तयार करण्यात येणार असून, तसा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला जाणार आहे. घोले रस्त्यावरील शासकीय तांत्रिक विद्यालयाच्या परिसरात हे ‘स्किल हब’ उभारण्याचे प्रस्तावित आहे. गेल्या काही वर्षांपासून शहराभोवती नवनवीन...
सप्टेंबर 29, 2017
पुणे - स्वप्नपूर्तीचा ध्यास, प्रबळ इच्छाशक्ती, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर तुषार निकम या तरुणाने चिंचोशीसारखे छोटेसे गाव ते चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (ओटीए) हा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. चेन्नई येथे ४९ आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तो सैन्य दलात ‘लेफ्टनंट’ या...
ऑगस्ट 30, 2017
पुणे : फुलांची आकर्षक सजावट...वेगवेगळ्या मंदिरांच्या प्रतिकृती...काल्पनिक मंदिरं यात विराजमान झालेली बाप्पाची सर्वांगसुंदर मूर्ती अन्‌ पौराणिक आणि ऐतिहासिक हलते भव्य देखावे...हे डेक्कन, एरंडवणा परिसरातील गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत या परिसरातील अनेक मंडळांनी...
ऑगस्ट 29, 2017
पुणे - शहरात गणेशोत्सवाच्या कालावधीत वाहतूक सुरळीत राहण्यासाठी मंगळवार (ता. 29) पासून गणपती विसर्जनापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. हा बदल सायंकाळी सात वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत राहील. सर्व प्रकारच्या वाहनांसाठी हा बदल करण्यात आला आहे. * शिवाजीनगर येथून स्वारगेटकडे...
जुलै 28, 2017
पुणे - पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता परिसरात आलेल्या एका वृद्ध महिलेसह तिच्या सहकाऱ्यास डेक्कन पोलिसांनी गुरुवारी रात्री सापळा रचून पकडले. रात्री नऊच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.  गीता शहा (वय 70) आणि शैलेश चव्हाण अशी...
जून 18, 2017
पुणे - संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज पालख्यांचे पुण्यात रविवारी (ता. 18) आगमन होत असून, दोन दिवसांच्या मुक्कामानंतर त्या प्रस्थान करतील. या पालखी सोहळ्यानिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता शहरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल केले आहेत. हे बदल रविवार ते मंगळवार (ता. 20)...
जून 18, 2017
सोनिया गांधीप्रकाशक - राजहंस प्रकाशन, पुणे (०२०-२४४७३४५९) / पृष्ठं - ५१६ / मूल्य - ५०० रुपये सोनिया गांधी यांचं हे ललित चरित्र. त्यांच्या काहीशा गूढ व्यक्तिमत्त्वाचे पैलू दाखवणारं, त्यांच्या घडत जाण्याची प्रक्रिया उलगडणारं आणि त्यांच्या एकेक निर्णयांमागच्या कारणमीमांसा सांगणारं हे चरित्र. इटलीतल्या...
मे 12, 2017
शस्त्रास्त्र प्रदर्शनात रमले पुणेकर; "ब्राह्मोस', "रॉकेट लॉन्चर', तोफेचे ठरतेय आकर्षण पुणे - देशाच्या वैज्ञानिक आणि संरक्षण क्षेत्रातील प्रगतीचे प्रतीक असणारे ब्राह्मोस क्षेपणास्त्र, "डीआरडीओ'ने विकसित केलेली अत्याधुनिक शस्त्रास्त्रे अन्‌ तोफा प्रत्यक्ष पाहायला मिळाल्या किंवा बंदूक हातात...
जानेवारी 07, 2017
पुणे - पुण्याच्या वारसास्थळाशी जोडणारी चित्रे... निवांत गप्पा मारण्यासाठीचे कट्टे अन्‌ मन मोहून घेणारी वास्तुरचना...हे अवतरले आहे फर्ग्युसन महाविद्यालयाबाहेर. या ठिकाणी त्या जागांना "सांस्कृतिक कट्टे' असे नाव दिले आहे. या कट्ट्यांवर आकर्षक विद्युत रोषणाई, ऐतिहासिक-सामाजिक विषयांवर...