एकूण 427 परिणाम
डिसेंबर 22, 2018
31 डिसेंबर नंतर व्हॉट्सऍप काही जुन्या ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट करणं बंद करणार आहे. त्यामुळे त्यांच्या मोबाइलमधील व्हॉट्सऍप चालणार नाही.  व्हॉट्सऍपने दिलेल्या माहितीनुसार, नोकियाचा जुना ऑपरेटिंग सिस्टम व्हॉट्सऍपचा वापर करू शकणार नाही. नोकिया S40, या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या फोनमध्ये 31...
सप्टेंबर 23, 2018
अनेक सुविधा वेळोवेळी अपडेट होत असतात. त्यामुळं वेळेची बचत होत असते आणि सुरक्षेपासून गोपनीयतेपर्यंत अनेक गोष्टींबाबतची चिंता मिटते. जीमेलमध्येही असेच "स्मार्ट' बदल होत आहेत. त्यामुळं ई-मेलला "स्मार्ट रिप्लाय' देण्याबरोबर तिचा ऑफलाइन वापर करण्यापर्यंत अनेक गोष्टी करता येतील. या नवीन सुविधांवर एक नजर...
ऑगस्ट 05, 2018
सुरवातीलाच एक इटालियन लोककथा थोडक्‍यात सांगणं भाग आहे. इतालो काल्विनो नावाचे एक लेखक-पत्रकार होते. त्यांनी सन १९५६ मध्ये लिहिलेल्या इटालियन लोककथांच्या पुस्तकातली ही छोटीशी गोष्ट : गावात एक विधवा होती. तिला तेरा वर्षांचा मुलगा होता. त्याचं नाव जॅक. ‘पैसा कमावण्यासाठी मलाही बाहेरगावी जायला हवं’, असा...
ऑगस्ट 05, 2018
व्यावसायिक कौशल्य असलेल्या व्यक्ती व्यावहारिक यश मिळवतीलच अशी हमी देता येत नाही. सर जेम्स डायसन यांच्याबाबत मात्र हे विधान लागू होत नाही. ‘फोर्ब्स’ मासिकाच्या  सन २०१८ च्या अब्जाधीशांच्या यादीनुसार, त्यांची वैयक्तिक मालमत्ता ५४० कोटी अमेरिकन डॉलर्स आहे. सन १९७० मध्ये रॉयल कॉलेज ऑफ आर्टसमध्ये...
ऑगस्ट 05, 2018
‘फॉर्म २६ एएस’ ही एक अत्यंत उपयुक्त अशी करप्रणाली प्राप्तिकर विभागानं प्राप्तिकर भरणाऱ्या करदात्यांसाठी विकसित केली आहे, ही समांतर अशी करप्रणाली ‘ट्रेसेस’ (TRACES)  या सेलकडून चालविण्यात येते, जी ‘टीडीएस सलोखा विश्‍लेषण’ व ‘दुरुस्तीसाठीची यंत्रणा’ या मूळ संकल्पनेवर आधारित कार्यान्वित आहे....
ऑगस्ट 05, 2018
अमेरिकेतल्या माध्यमव्यवस्थेचं चित्रण करणारी आणि त्यावर विशिष्ट भाष्य करणारी ‘द न्यूजरूम’ ही मालिका खूप वादग्रस्त आणि चर्चेची ठरली. अमेरिकेतल्या वृत्तवाहिन्यांचं काम कसं चालतं याचा आरसा असलेल्या आणि तत्कालीन सामाजिक, राजकीय परिस्थितीवर मोकळेपणानं भाष्य करणाऱ्या या मालिकेविषयी.... ‘‘अमेरिका हा जगातील...
ऑगस्ट 05, 2018
लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर... तीनेक वर्षांपूर्वी मी झपाट्यानं त्या दोघांवरच जे जे मिळेल ते वाचलं, अभ्यासलं होतं. मला त्या दोघांच्या राजकारणाइतकाच त्या दोघांच्या मैत्रीचा पट भव्य वाटला, खुणावत गेला. त्यांचं डेक्कन कॉलेजमध्ये भेटणं, रात्री बेरात्री टेकडीवर भटकायला जाणं, देशासाठी काय करता येईल...
ऑगस्ट 05, 2018
मनोरंजनाच्या रूढ चौकटी मोडणारी ‘व्हिडिओ ऑन डिमांड’ सेवा देणारी वेब चॅनेल्स ही सध्याची ‘इन थिंग’ आहे. विशिष्ट शुल्क भरून वेगवेगळ्या प्रकारच्या वेब सिरीज, चित्रपट आणि इतर मनोरंजन थेट तुमच्यापर्यंत आणून पोचवणाऱ्या या व्यवस्थेविषयी माहिती.  गेल्या दोन दशकात आपण टेलिव्हिजनची तांत्रिकदृष्ट्या होणारी...
ऑगस्ट 05, 2018
पाकिस्तानात निवडणुकीच्या नावानं जे काही झालं, त्यातून इम्रान खान यांचा पंतप्रधानपदाचा मार्ग मोकळा झाला. ता. २५ जुलैला पाकिस्तानी नागरिकांनी मतं जरूर दिली मात्र निवडून कोण यावं, यासाठीची फिल्डिंग आधीच लावली गेली होती. पाकमध्ये तसंही यात अगदी नवं काही नाही. बहुतेक निवडणुकांत त्या कुणासाठी तरी मॅनेज...
ऑगस्ट 05, 2018
माहिती-तंत्रज्ञान उद्योग आणि संगणकीय प्रणालीचा, संगणकांचा प्रचंड प्रमाणात वापर यामुळं गेल्या दहा वर्षांत जगभर प्रचंड स्थित्यंतरं घडून आली. यातला महत्त्वाचा भाग किंबहुना गाभा म्हणजे डेटा किंवा माहिती. जगात कोणीही कोणतीही सेवा मोफत देत नाही. गुगलसारख्या कंपनीला गोळा होणाऱ्या डेटामधून मिळणारं उत्पन्न...
ऑगस्ट 05, 2018
‘‘अ  गं, आटप लवकर. झालं की नाही अजून,’’ असा प्रश्न मी विचारला, तेव्हा अर्थातच अख्ख्या सोसायटीला ऐकू गेला. सौभाग्यवती तशा लवकर आवरतात हो; पण काही वेळा कॅलेंडरचीही आठवण करून द्यावीच लागते. (इतरही काही गोष्टींची आठवण होतेय; पण गृहसौख्यापोटी त्या जरा बाजूला ठेवतो...तर सांगायचा मुद्दा एवढाच की)...
ऑगस्ट 05, 2018
हिवरेबाजारमध्ये झालेलं ग्रामपरिवर्तनाचं काम सुरू करण्यामागं माझी सर्वांत मोठी प्रेरणा होती, ते म्हणजे बालपणी पाहिलेलं नैसर्गिक साधनसंपत्तीनं परिपूर्ण असं हिवरेबाजार. गावाच्या परिसरात पसरलेली विविध फळझाडं, फुलझाडं, वेली लोकांना आपल्या वाटायच्या. झऱ्यांना पाणी असायचं. जे आम्ही गुडघ्यावर बसून ओंजळीत...
ऑगस्ट 05, 2018
प्रिय चिनू, काल सहज जुने फोटो बघत होतो. माझे लहानपणाचे वाढदिवसांचे, बक्षीस समारंभांचे, आम्ही कुठंकुठं केलेल्या ट्रिप्सचे, असे कितीतरी फोटो होते त्यात. मला एकदम आमचं ते जुनं, छोटंसं घर आठवलं. एका वाड्यात, भाड्याच्या घरात राहत होतो आम्ही. खासकरून आठवतायत ते हायस्कूलचे दिवस! त्यावेळची अस्वस्थता,...
ऑगस्ट 05, 2018
ज्या  घरात तंबोरे सतत लागलेले असायचे, गायनक्षेत्रातल्या अनेक दिग्गजांचे स्वर ज्या वास्तूनं ऐकले, अशा घरात माझा जन्म झाला, हे माझं मोठंच भाग्य. घरात केवळ गाणं आणि गाण्याचेच संस्कार माझ्यावर झाले.  माझे वडील सुधीर दातार आणि आई शैला दातार याचं मी ज्येष्ठ अपत्य.  आणखी थोडी कौटुंबिक पार्श्‍वभूमी...
ऑगस्ट 05, 2018
शी  र्षकासाठी चार्वाकाची ओळ मुद्दामच वापरली आहे. साठ-सत्तर-ऐंशीच्या दशकात काही लेखकांनी जणू स्वतःला या ओळीचा अर्थ बजावून सांगितला होता. एकदा आपण मेलो की या देहाची राख होणार आहे आणि पुनर्जन्माची कोणतीही खात्री नाही, तेव्हा दर्जेदार अथवा अजरामर साहित्यनिर्मितीची उठाठेव करण्यापेक्षा जे लिहून आजची रोजी...
ऑगस्ट 05, 2018
साईनाथ हाउसिंग सोसायटीच्या पार्किंगच्या जागेतली एक छोटीशी बाग...तीत एक झोपाळा ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. मी संध्याकाळी शांतपणे बसून झोके घेतोय...मागं आणि पुढं...मनाचं आंदोलनही असंच...विचार मागं आणि पुढं...आज सोसायटीची मीटिंग आहे. मी सोसायटीच्या ‘सेक्रेटरी’च्या पदाचा राजीनामा देणार आहे...का? तुम्हाला...
ऑगस्ट 04, 2018
नवी दिल्ली : 'युनिक आयडेन्टिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया'चा (यूआयडीएआय) हेल्पलाईन क्रमांक (1800-300-1947) कोणतीही अतिरिक्त माहिती न देता अनेकांच्या मोबाईलमध्ये आपोआप सेव्ह होत आहे. मात्र, या हेल्पलाईन क्रमांकाबाबत 'आधार'कडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.  देशातील अनेक मोबाईल...
जुलै 29, 2018
इंटरनेटचा वापर आता खूप वाढला आहे. मात्र, त्यामुळं अनेक धोकेही वाढले आहेत. आपली माहिती चोरली जाण्यापासून आर्थिक फसवणुकीपर्यंत अनेक प्रकार होऊ शकतात. त्यासाठी ‘नेट’की आणि नेमकी खबरदारी घेणं आवश्‍यक आहे. सुरक्षिततेबाबत असेच काही सोपे कानमंत्र. फेसबुक, ट्‌विटर, व्हॉट्‌सॲप आणि इन्स्टाग्राम यांसारख्या...
जुलै 29, 2018
डॉन मायकेल कोर्लिओनेच्या भाळावर नियतीनं कसलं उफराटं नशीब लिहिलं होतं कोण जाणे. आपला तल्लख बुद्धीचा, शांत स्वभावाचा मायकेल या धंद्यात येऊ नये, उलटपक्षी तो चांगला अंमलदार व्हावा, किमान प्रतिष्ठित वकील व्हावा, असंच डॉन व्हितोला वाटायचं. मायकेललाही गुंडगिरी, स्मग्लिंग, जुगार असल्या गोष्टींचा तिटकाराच...
जुलै 29, 2018
इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळणं म्हणजे काय दिव्य असतं हे विराट कोहलीला २०१४च्या दौऱ्यात लगेच समजलं. पाच कसोटी सामन्यांत त्याला फलंदाज म्हणून मोठं अपयश आलं होते. त्याच जखमा उरात घेऊन विराट इंग्लंड दौऱ्यात सहभागी झाला आहे. कर्णधार म्हणून कोहलीला आणि प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रीला इंग्लंड दौऱ्यातल्या...