एकूण 412 परिणाम
मे 21, 2019
युरोपीय महासंघाची निवडणूक यंदा वेगळ्या पार्श्‍वभूमीवर होत आहे. युरोपियन महासंघ हा त्याच्या सदस्य राष्ट्रांच्या "अंतर्गत कायदे' करण्यावर नियंत्रण घालू शकत नाही. फक्त सर्व सदस्य देशांचा एकत्रित व्यापार, त्यांच्यातील दळणवळण सुलभ करणे, "यूरो' चलनावर नियंत्रण आणि काही दिशादर्शक नियम युरोपियन महासंघ तयार...
मे 10, 2019
इराण व व्हेनेझुएला या देशांची आर्थिक नाकेबंदी करून, तेथील जनतेला सरकारविरुद्ध उठाव करण्यास चिथावणी देण्याचा अमेरिकेचा डाव आहे. आपले तेल व वायू खपविण्यासाठी अमेरिका या दोन देशांच्या विक्रीवर निर्बंध लादत भारतासारख्या देशांवर दबाव आणीत आहे. इ राण आणि व्हेनेझुएला जगातले मोठे खनिज तेलसाठे असलेले दोन...
मे 09, 2019
चीनच्या "बीआर आय (बेल्ट अँड रोड फोरम)" व्यासपीठाची दुसरी परिषद नुकतीच बीजिंगमध्ये झाली. चीनचे भारतातील राजदूत लुओ झावहुई यांनी आज "द हिंदुस्तान टाईम्स"मध्ये लिहिलेल्या लेखानुसार परिषदेला, "150 देश व 92 आंतरराष्ट्रीय संघटनांतील तब्बल 6 हजार पाहुणे उपस्थित होते. बैठकीला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर...
मे 08, 2019
गोवा : भारत आणि फ्रान्स या देशादरम्यान मैत्रीपूर्ण संबंध दृढ होण्यासाठी दोन्ही राष्ट्रांच्या नौदलाकडूंन आयोजित करण्यात येत असलेल्या समुद्री कवायतींना वास्को येथील मुरगाव बंदरात प्रारंभ झाला असून, त्यानिमित्त या दोन्ही देशांच्या अत्याधुनिक लढाऊ जहाजे, पाणबुड्या मुरगाव बंदरात दाखल झाल्या...
मे 06, 2019
संयुक्त राष्ट्रसंघातर्फे "जैशे महंमद'चा म्होरक्‍या मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले. भारतीय कूटनीती व मुत्सद्देगिरीचा तो विजय मानला जात आहे. मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी भारताने दीर्घकाळ प्रयत्न चालविले होते. पुलवामा हल्ल्याची जबाबदारी मसूद...
मे 05, 2019
शमिंदरनं अलीकडंच एका प्रकरणाची चौकशी करून डिझेलची मोठी चोरी उघडकीस आणली होती, अशी माहिती राझ्वी यांच्याकडून मिळाली. काही लाखांचं नुकसान झाल्यानं काही लोक शमिंदरवर चिडून होते. कंपनीनं गैरव्यवहार करणाऱ्या लोकांवर काही कारवाई केली होती का? पोलिसांकडं तक्रार केली होती का?...तर, कंपनीनं याबाबतीत काहीच...
मे 03, 2019
लाहोरः संयुक्त राष्ट्रने पाकिस्तानस्थित 'जैशे महंमद'चा म्होरक्‍या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केल्यानंतर त्याला दुसरा मोठा फटका बसला आहे. पाकिस्ताननेही त्याला कोंडीत पकडले असून, त्याची संपत्ती जप्त करण्याबरोबरच प्रवासावर बंदी घातली आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत मसूदचे...
मे 03, 2019
मानवतावाद आणि त्याचे रक्षण करण्यासाठी जे तथाकथित धोरण अवलंबिले जाते, ते प्रत्येक वेळेस स्वयंनिर्णयाचा अधिकार आणि मानवी मूल्यांचा आदर करणारे असते असे नाही; तर ती दहशतवादाची ठिणगीदेखील असू शकते. ‘मानवी हक्क’ हे खरे म्हणजे महत्त्वाचे मूल्य. या संकल्पनेत अभिप्रेत असलेला आशय तिच्या राजकीय दृष्टीने...
एप्रिल 30, 2019
नवी दिल्ली : पाकिस्तानमधील "जैशे महंमद' या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहर याला बुधवारी (ता. 1 मे) "जागतिक दहशतवादी' जाहीर करण्याची शक्‍यता आहे. यावर उद्या संयुक्त राष्ट्रांमध्ये (यूएन) निर्णय होणार असून, त्या वेळी "जागतिक दहशतवादी' घोषित करण्याबद्दलच्या भूमिकेत चीन बदल करेल, असा अंदाज व्यक्त...
एप्रिल 28, 2019
श्रीलंकेत "ईस्टर संडे'च्या दिवशी दहशतवादी गटानं नुकताच तीन चर्च आणि परदेशी पर्यटकांनी गजबजलेल्या तीन आलिशान हॉटेलांवर आत्मघाती हल्ले करून साडेतीनशेहून अधिक लोकांचा बळी घेतला. धर्मकेंद्री दहशतवाद जगाच्या कानाकोपऱ्यात थैमान घालत असताना अनपेक्षित आणि धक्कादायक घटना घडत आहेत. या सगळ्या घटनांची मुळं...
एप्रिल 24, 2019
इराणकडून तेल घेऊ नका; नाहीतर निर्बंध लादू, हा अमेरिकेचा पवित्रा भारतासाठी तापदायक आहे. तेलावरील ८० टक्के अवलंबित्वाच्या जोखडातून बाहेर पडण्याची गरज लक्षात आणून देणारी ही घटना आहे. श त्रूचा मित्र तो शत्रूच, या शीतयुद्धकालीन मानसिकतेतून अद्यापही अमेरिका बाहेर पडलेली नसल्याचे इराणच्या ताज्या...
एप्रिल 16, 2019
फ्रान्स : पॅरिसमधील जगप्रसिध्द नोट्रे-डेम कॅथेड्रल चर्च आज आगीच्या आहारी गेले. या दुर्दैवी घटनेत पॅरिसने एक अत्यंत प्राचीन अशी ही वास्तू गमावली आहे. हे चर्च गॉथिक कॅथेड्रल या वास्तूरचनेचा अत्भुत नमुना मानला जातो. सीन नदीच्या काठावर आगीच्या भक्षस्थानी पडलेलं हे चर्च पुन्हा उभं...
एप्रिल 14, 2019
नवी दिल्ली : भारत सरकारने फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याची घोषणा केल्यानंतर महिनाभरातच अनिल अंबानी यांच्या मालकीच्या "रिलायन्स कम्युनिकेशन्स'शी संबंधित फ्रान्समधील उपकंपनीचा 143.7 दशलक्ष युरोंचा (1120 कोटी रुपये) कर तेथील सरकारने 2015 मध्ये माफ केल्याचा दावा फ्रान्समधील आघाडीचे दैनिक...
एप्रिल 13, 2019
औरंगाबाद : ज्यांचे दगडाखाली हात अडकले आहेत, अशा सहकार क्षेत्रातील नेत्यांवर दबाव टाकून भाजप दहशतीचे राजकारण करत आहे. त्यामुळेच भाजपमध्ये प्रवेशाचे सोहळे सुरू असून, तुमची प्रकरणे मिटवून घ्या, अन्यथा सरकार बदलल्यास आमच्याकडूनही त्रास होईल, असा सल्ला अनेकांना दिला असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज...
एप्रिल 13, 2019
नवी दिल्ली : राफेल करारानंतर फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी अनिल अंबानींच्या फ्रान्समधील टेलिकॉम कंपनीला 143.7 मिलियन युरो म्हणजे सुमारे 1120 कोटी रुपयांची करमाफी दिली, याबाबतचा दावा फ्रेंच वृत्तपत्र 'ले माँड'ने केला आहे. त्यानंतर आता ही माहिती समोर आली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून राफेल...
एप्रिल 04, 2019
नवी दिल्ली: संयुक्त अरब अमिरातकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'झाएद पदका'नं सन्मान करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये दोन्ही देशांमधील संबंध एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचले. यामध्ये मोदींचा मोठा वाटा असल्याने त्यांना हा सन्मान जाहीर करण्यात आल्याची माहिती अबूधाबीचे क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद...
मार्च 31, 2019
चुकीचं कृत्य कुणाच्याही हातून घडू शकतं. हार्दिक पंड्यानं उत्साहाच्या भरात आणि जरा चमकोगिरी करायच्या नादात वाट्टेल ते भाष्य टीव्ही शोदरम्यान केले. त्याचा मोठा भुर्दंड त्याला भरावा लागणार आहे. स्टीव्ह स्मिथनं गुन्ह्यात सहभागी न होता नुसती मूक संमती दिली आणि त्याला निंदा नालस्तीला तोंड द्यावे लागले....
मार्च 24, 2019
जगभरात अनेक ठिकाणी उजव्या विचारसरणीचं आणि डाव्या विचारसरणीचं राजकारण सुरू आहे. त्या-त्या देशांमधले विशिष्ट विचारसरणीचे नेते त्यांच्या चाहत्यांत लोकप्रिय आहेत. त्यामुळं मध्यममार्गी आणि मध्यमवर्गीय समाजाचं महत्त्व कमी होत चाललं आहे. दुसरीकडं भारतात मात्र मध्यमवर्गाचा प्रभाव मोठा आहे आणि भारतीय...
मार्च 22, 2019
पुणे : शहरातील वकिल असीम सरोदे (वय 45) यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. मात्र त्यांच्या प्रकृतीमध्ये आता सुधारणा झाली आहे.  सरोदे सध्या संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदेसाठी फ्रान्समध्ये आहेत. दक्षिण फ्रान्समध्ये ग्रीन ओब्ले शहात ते आहेत. तेथून गुरुवारी (ता. 22) ते परतणार...
मार्च 20, 2019
भारत-पाकिस्तान संबंधांबाबत आजवर अमेरिकेचा विशिष्ट दृष्टिकोन होता. भारताशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करायचा; पण पाकिस्तानला चुचकारणे सोडायचे नाही, असा महासत्तेचा पवित्रा असे. आता त्या धोरणात बदल होत असल्याचे दिसते. नुकत्याच झालेल्या द्विपक्षीय चर्चेने हा बदल अधोरेखित केला. पुलवामा येथील दहशतवादी...