एकूण 360 परिणाम
मे 19, 2019
प्रत्येकाला काहीतरी चांगलं काम करायचं असतं, लोकांसाठी काम करायचं असतं; पण काय करायचं हे नेमकं माहीत नसतं. मात्र, पुण्यातल्या काही तरुणांना अशा चांगल्या कामाचा मार्ग माहीत आहे. हा मार्ग म्हणजे अन्नदान-चळवळीचा....हॉटेल्स, वेगवेगळे समारंभ आदी ठिकाणचं उरलेलं, वाया जाऊ शकणारं अन्न गोळा करून ते गरजूंना...
मे 18, 2019
पुणे : पैशांच्या देवाण-घेवाणीच्या वादातून बालेवाडीमधील एका व्यवसायिकाचे टोळक्‍याने अपहरण करुन काही वेळाने सोडून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.  याप्रकरणी माथी वेंकटरत्नम दिनकर (वय 40, रा. मिरॅकल ग्लोरी, बालेवाडी) यांनी चतुःश्रृंगी पोलिस...
मे 17, 2019
वीकएंड हॉटेल कोणत्याही देशाची खाद्यसंस्कृती आठवून पहा, त्या प्रांताचे अनेक पदार्थ नजरेसमोर येतील. जसं चायनीज म्हटलं, की किती तरी डिशची नावं समोर येतात. अगदी इटालियन, मेक्‍सिकन, थाय अशा विविध देशांच्या डिशबाबतही असंच जाणवेल. याला अपवाद आहे तो म्यानमारचा. इटालियन, मेक्‍सिकन, थाय डिश जेवढ्या आपल्याला...
मे 14, 2019
पुणे -  उरुळी देवाची येथे बेकायदा उभारलेल्या साडीच्या शोरूमला आग लागून पाच जणांचा जीव गेल्यानंतरही महापालिकेने ही घटना गांभीर्याने घेतलेली नाही. येथील कापड दुकानांमध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजना न करणाऱ्या दुकानदारांकडे महापालिकेने साधी विचारणाही केलेली नाही. अहवाल मिळाल्यानंतर कारवाई सुरू होईल, असे...
मे 12, 2019
पुणे : मेट्रो प्रकल्पासाठी पायघड्या घालणाऱ्या महापालिकेने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या बस रॅपिड ट्रान्झिटकडे (बीआरटी) दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या तीन वर्षांत एकही नवा बीआरटी मार्ग साकारलेला नाही. उलट असलेले मार्ग आता बंद होऊ लागले आहेत. त्यामुळे बीआरटीला घरघर लागली आहे...
मे 10, 2019
पुणे - ‘बीआरटी’च्या मार्गात वेगवेगळ्या कारणांमुळे विघ्न येऊ लागली आहेत. त्यातच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते राजीव गांधी पुलादरम्यानचे ‘बीआरटी’चे पन्नास टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र वाहतूक पोलिसांनी आक्षेप घेतल्यामुळे बीआरटीचे थांबे हलविण्याची प्रक्रिया सुरू आहे. परिणामी ४०...
मे 10, 2019
पुणे - भाडेतत्त्वावर घेतलेल्या; परंतु वारंवार बंद पडणाऱ्या पीएमपी बस मार्गावर न पाठविण्याचा निर्णय प्रशासनाने गुरुवारी घेतला. तसेच शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील सर्व बसथांब्यांवर येत्या १० दिवसांत वेळापत्रक लावण्याचेही जाहीर करण्यात आले.  पीएमपीच्या ताफ्यात स्वतःच्या १३६१ बस असून, भाडेतत्त्वावरील ५७७...
मे 06, 2019
पुणे : सकाळ सोसायटी क्रिकेट लिग स्पर्धेत दुसऱ्या आठवड्यात तिसऱ्या शतकाची नोंद झाली. श्रीनिवास ग्रीनलॅंड कौंटी बी संघाच्या मयूर मानकर याने ही कामगिरी केली. त्यामुळे त्याच्या संघाचा मिथिला नगरीविरुद्ध विजय झाला. सिराटेक ग्रीन्स आणि सूर्यगंगा यांच्यातील सामना टाय झाला. त्यामुळे स्पर्धेतील रंगत कायम...
मे 06, 2019
पुणे : महापालिकेतील 15 पैकी 12 प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद मिळवून सत्ताधारी भाजपने सत्तेत आपला पहिला क्रमांक टिकविला. विशेष म्हणजे, एका समितीसाठी झालेल्या 'चिठ्ठी'च्या माध्यमातून भाजपला बोनस मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसकडे तीन समित्यांचे अध्यक्षपद आले. या समित्यांच्या अध्यक्षपदांसाठी...
मे 06, 2019
माले - मुळशी धरण भागातील दाट अंधारबन जंगलात ट्रेकिंग करताना रात्रीच्या अंधारात अडकलेल्या तीन पर्यटकांची ग्रामस्थ, पोलिस, वनखात्याचे कर्मचारी यांनी सुखरूप सुटका केली. शनिवारी पिंपरी (ता. मुळशी) येथील अंधारबनातील दरीत हा प्रकार घडला. गगनदीप हरचरण सिंग, प्रांशू प्रदीपसिंह चौधरी (दोघेही रा. बाणेर...
मे 03, 2019
पुणे : पाषाण येथील टेकडीवरील जैवविविधता टिकवण्यासाठी पर्यावरणप्रेमी नागरिक या भागात काम करत आहेत. मात्र काही दिवसापूर्वी टेकडीवर सुशोभीकरणाच्या नावाखाली महापालिकेच्या वतीने बांधकाम केल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत होता. या नाराजीतूनच बुधवारी (ता. 1) बहुसंख्य नागरिकांनी एकत्र येत मानवी...
मे 03, 2019
वीकएंड हॉटेल माध्यमांचा प्रभाव अधिक परिणामकारक असतो, अगदी खाद्यपदार्थांच्या बाबतीतही. फ्रिकशेक याचं एक उदाहरण. इन्स्टाग्रामच्या प्रभावामुळं अधिक प्रसिद्धीला आलेलं हे डेझर्ट. इन्स्टाग्रामवरून प्रसिद्धीला येण्यामुळं सतत त्याच्या प्रेझेंटेशनमध्ये कसे बदल करता येतील, याचाही विचार होत राहिला. यातूनच...
एप्रिल 28, 2019
पुणे : स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत जीआयएस मॅपिंगद्वारे शून्य कचरा प्रकल्प राबविण्यात आला आहे. यामुळे या भागातील कचऱ्याचे उत्तम व्यवस्थापन झाले आहे. याच धर्तीवर पुणे महापालिकेने महापौर आणि उपमहापौर यांच्या प्रभागात शून्य कचरा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर शहराच्या इतर भागात त्याची...
एप्रिल 27, 2019
पुणे - चिप असलेले डेबिट, क्रेडिट कार्ड सुरक्षित असल्याचे बॅंका सांगत असल्या तरी, अशा चिप असूनही गेल्या तीन महिन्यांत सुमारे पाचशे खातेदारांच्या खात्यातून परस्पर पैसे काढून घेण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत.  नागरिकांची ऑनलाइन फसवणूक होऊ नये, यासाठी रिझर्व्ह बॅंकेच्या सूचनेनुसार सर्व बॅंकांनी...
एप्रिल 25, 2019
पुणे - कोथरूड विधानसभा मतदारसंघ हा भाजप आणि शिवसेनेचा गड आहे. येथे सरकारांविरोधातील जनमताचा फायदा उठवून शिरकाव करण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रयत्न असतानाच यंदा मात्र, मतदानाचा टक्का कमी झाला.  तो ५.६४ टक्‍क्‍यांनी घसरला. परिणामी, हे चित्र विरोधकांच्या पथ्यावर पडेल आणि कोथरूडमध्येच धक्का बसून...
एप्रिल 20, 2019
पुणे : कोणतीही एक व्यक्ती विकास करू शकत नाही त्यामुळे स्थानिक नगरसेवक व प्रशासकीय व्यवस्था यांनी एकत्रित काम केले तर विकास होऊ शकतो असे मत बाणेरकरांनी व्यक्त केले. कारणराजकारण मालिकेत कोथरूड विधानसभा मतदारसंघात बाणेर भागातील नागरिकांशी संवाद साधला. सरकार कोणतेही निवडून आले. तरी जर...
एप्रिल 17, 2019
पुणे  : बाणेर रस्त्यावर अत्यंत बेशिस्तपणे पदपथावरून सुसाट दुचाकी चालवतात. त्यामुळे पादचांऱ्यांची गैरसोय होत असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. दुचाकी चालकांनी हटकल्यास उद्धटपणे बोलतात. नक्की पदपथ कुणासाठी ? हा प्रश्न आहे. हे तातडीने थांबवणे गरजेचे आहे. अत्यंत कडक शिक्षा देऊन अश्या...
एप्रिल 17, 2019
गोखलेनगर - मी गेल्या एक वर्षापासून झोमॅटोसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत आहे. यामुळे दिवसाला मला एक हजार ते अकराशे रुपये मिळू लागले. त्यामुळे माझा बेरोजगारीचा प्रश्‍न सुटला... सांगत आहे गोखलेनगर-जनवाडीतील अनिल खुडे. अशा कंपन्यांमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत, त्याचा तरुणांनी फायदा...
एप्रिल 14, 2019
पुणे : भाच्याच्या वाढदिवसासाठी गेलेल्या एका महिलेच्या कारच्या काचा फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व महत्वाची कागदपत्रे असा दिड लाख रुपयांचा ऐवज असलेली हॅन्डबॅग चोरुन नेली. ही घटना गुरूवारी सायंकाळी बाणेर पाषाण लिंक रोड येथे घडली.  याप्रकरणी स्नेहल कौलवकर (वय 28, रा. कर्वेनगर) यांनी...
मार्च 27, 2019
पुणे - वकील संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीला होत असलेला विलंब, नवीन वकिलांना पाठ्यवृत्ती, शिवाजीनगर न्यायालय परिसर आणि विविध दुय्यम निबंधक कार्यालयात पार्किंग सुविधा तसेच इंटरनेटची रेंज नसणे, चांदणी चौकापासून विद्यापीठपर्यंत एकही स्टॅंप व्हेंडर नसणे, ‘रेरा’साठी विनाकारण मुंबईला मारावे लागणारे...