एकूण 286 परिणाम
मे 24, 2019
वडवळ नागनाथ (लातूर) : कुटूंबात अत्यंत हलाकीची परीस्थिती होती. वडीलांनी रोज मजुरीसाठी दारोदार भटकावे तेव्हा कुठे खायला भाकरी मिळत होती. अशा स्थितीत कौटुंबिक मतभेद वाढल्याने गाव सोडून गेलेला एक मजूर अथक परिश्रमाने व कर्तृत्वाने आज लातूरचा खासदार झाला. लातूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे नवनिर्वाचित...
मे 21, 2019
पुणे - झोपडपट्ट्यांमध्ये घराची खरेदी अथवा विक्री करायची असेल किंवा घर बांधायचे असले तरी त्या-त्या परिसरातील ‘भाई’ किंवा आजी-माजी नगरसेवकांच्या कथित कार्यकर्त्यांना ‘कमिशन’ द्यावेच लागते. कधी मंडळाची वर्गणी म्हणून, तर कधी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाईची भीती दाखवून नागरिकांकडून पाच ते ५० हजार...
मे 21, 2019
पिंपरी - बांधकाम क्षेत्राबाबत ग्राहकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणात (महारेरा) आतापर्यंत ७ हजार ४६७ तक्रारी दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे त्यातील ४ हजार ५८३ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत...
मे 15, 2019
पुण : मंजूर आराखड्याप्रमाणे सोसायटीचे बांधकाम न करता सदनिकाधारकांना योग्य सोयी-सुविधा न दिल्याप्रकरणी बिल्डर आणि जागा मालकाला राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या पुणे खंडपीठाने दणका दिला आहे. संबंधित सोसायटीला बिल्डरने 14 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश खंडपीठाने दिला आहे...
मे 12, 2019
उत्तम आरोग्यासाठी माझा मंत्र म्हणजे योग्य तो आहार योग्य त्या प्रमाणात घेणं. स्वच्छ, उत्तम अन्न खा आणि त्यात भरपूर प्रमाणात प्रथिनं आणि फळांचा समावेश करा. शरीरातलं पाण्याचं प्रमाणही कायम राखा. उत्तम तब्येतीसाठी खाण्या-पिण्याच्या चांगल्या सवयी लावून घेणं आणि धूम्रपान व मद्यपानापासून दूर राहणं, या...
मे 10, 2019
नागपूर : जगदंबा रिअल इस्टेट लि. कंपनीचे संचालक कोंडावार बंधूंनी ऍग्रो कंपनीच्या नावे तीन कोटींचे कर्ज घेऊन कंपनीसह पुसद अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेचीही फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. गोपाल कोंडावार (52) आणि संजय कोंडावार (48) दोन्ही रा. रामदासपेठ हे बिल्डर असून जगदंबा रिअल इस्टेट...
एप्रिल 26, 2019
राशिवडे बुद्रुक - सेवानिवृत्तीनंतरचं गेट टुगेदर म्हणजे अनेक आठवणींना उजाळा, जीवनातील बऱ्या-वाईट घटना उलगडण्याचं निमित्त मानून ते सारे एकत्र येत. एक दिवसाची मौज करून घरी परतत. पण यावेळी त्यांचा मूड बदलला. ‘सकाळ’ने केलेल्या राधानगरी अभयारण्य स्वच्छतेवर प्रभावित होऊन त्या उपक्रमाचा एक हिस्सा होण्याचा...
एप्रिल 22, 2019
नगर: पहिल्या दोन टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर उद्या (ता.23)ला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या तिसऱ्या टप्प्यात राज्यभर गाजत असलेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचेही मतदान होणार आहे. यावेळी फेसबुकवर सुराज्य अहमदनगर या पेजवरून एक पत्र टाकण्यात आले आहे. दहशतीखाली असणाऱ्या...
एप्रिल 10, 2019
२० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सांगलीचं वर्णनच खोक्‍याचं शहर असं केलं जात होतं. दिवंगत नेते आर. आर. आबांची एक कृपा सांगलीवर नक्‍की आहे की, त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सांगलीत भरवलं आणि त्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना निमंत्रित केलं. राष्ट्रपती...
एप्रिल 10, 2019
अहमदाबाद: 56 इंच छाती कोणाची असते तर फक्त गाढवाची, असे गुजरात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोढवाडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना म्हटले आहे.   लोकसभा निवडणूकदरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पहायला मिळत आहेत. प्रचारासाठी सोशल मीडियाचाही मोठा वापर केला जात आहे. अनेक...
मार्च 15, 2019
अकोला : ग्रामीणसह शहरी भागातील जनतेची फसवणूक झाल्यानंतर त्यांना न्याय मिळत नव्हता. त्यामुळे नागरिकांना आपल्या हक्कासाठी ग्राहक मंचाचा दरवाजा ठोठावता यावा म्हणून जिल्हा ग्राहक तक्रार मंचाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर फसवणूक झालेल्या ग्राहकांचा अकोला जिल्हा ग्राहक मंचात निपटारा होत आहे. जानेवारी...
मार्च 14, 2019
सातारा : निवडणुका दर पाच वर्षांनी होत राहतात. लोकशाहीत निवडणूक लढविण्याचा सर्वांना अधिकार आहे. उदयनराजेंना निवडून का द्यायचे? असा प्रश्न तुमच्या मनात पडला असेल. पण मी एकच सांगतो, माझ्यापेक्षा तुमचे हित पाहणारा दुसरा उमेदवार असेल तर माझी उमेदवारी माघारी घेईन, असे साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे...
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवं आहे, याचा कानोसा ‘सकाळ’ने जनतेच्या जाहीरनाम्याद्वारे घेतला. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाहीरनाम्यात काय असावे याचे सविस्तर...
फेब्रुवारी 27, 2019
मुंबई - बांधकाम व्यावसायिकांना घरे बांधण्यासाठी ५४ एकरांपर्यंतच जमीन खरेदीचे असलेले बंधन सरकारने उठवले आहे. आता अमर्याद जमीन खरेदीचे अधिकार देण्यात आले आहेत. या धोरणात्मक निर्णयामुळे बिल्डरांना ‘अच्छे दिन’ येणार असल्याचा सूर विधानसभेत काही आमदारांनी लावला. महाराष्ट्र शेतजमीन जमीन धारणेची कमाल...
फेब्रुवारी 22, 2019
जागतिकीकरणात समाजाची घुसळण होऊन जात, धर्म, भाषेच्या पलीकडचा एक सुंदर नवसमाज निर्माण होईल, असे वाटत होते. पोटापाण्यासाठी लोक शहराकडे धावत असल्याने शहरीकरणातून ‘गावकूस’ ही संकल्पनाच लयाला जाईल, असाही समज होता. प्रत्यक्षात सुंभ जळाला तरी पीळ कायम आहे. येथे आता बंगलेवाले तथाकथित उच्चभ्रू संघटितपणे...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे : भाजपमधील काही सोंगाड्यांमुळे आपण पक्षापासून दुरावल्याची टीका राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी केली. हे सोंगाडे कोण, याचा आता प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मला भावासारखे आहेत. पण भावाने लाथ मारल्यावर दुसरे घर शोधावेच लागते, अशा शब्दांत काकडे यांनी उद्वेग व्यक्त...
फेब्रुवारी 10, 2019
शरीराला हानी पोचेल असं मी कधीच करत नाही. मी धूम्रपान आणि मद्यपान करत नाही. फक्त डाएट, व्यायाम करून आपण हेल्दी राहत नाही. हानिकारक गोष्टी टाळणंही तितकंच आवश्‍यक आहे. आपलं शरीर हे एक मंदिर आहे. ते चांगलं कसं ठेवता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. लहानपणापासूनच मला "सुपरमॅन', "बॅटमॅन', "हि-मॅन'...
फेब्रुवारी 08, 2019
नागपूर - नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) घुग्गुसच्या शेख हाजीबाबा शेख सरवरला अटक केल्यानंतर त्याच्या एका साथीदारालादेखील अटक केली. पिंटू ऊर्फ मंगेश उखनकर (वणी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बुधवारी एटीएसने कालू ऊर्फ जतिंदरसिंग (वेकोलि वसाहत, वणी)...
फेब्रुवारी 05, 2019
केंद्र सरकारने नुकतीच किनारपट्टी नियमनाविषयीच्या अधिसूचनेला मंजुरी देऊन  त्यासंबंधी कायदा केला. या कायद्यामुळे सागरी किनाऱ्यांचे किती नुकसान होईल, याचा गांभीर्याने विचार करायला हवा.  यासंबंधी निष्क्रियता दाखविल्यास सागरी किनाऱ्यांची आणि पर्यावरणाची होणारी हानी भरून निघणे अवघड बनेल. भा रताला ३७५०...
जानेवारी 26, 2019
नागपूर : देशातील प्रत्येक व्यक्तीला सन 2022 पर्यंत हक्काचे घर देण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बघितले. त्या दिशेने यंत्रणा कार्य करीत आहे. नागपूर महापालिका व क्रेडाईच्या वतीने आयोजित केलेल्या प्रॉपर्टी एक्‍स्पोच्या माध्यमातून पंतप्रधानांच्या स्वप्नांना बळ मिळेल, असा विश्‍वास महापौर नंदा...