एकूण 78 परिणाम
जुलै 06, 2017
इस्राईलबरोबर सर्व पातळ्यांवर राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तब्बल 25 वर्षांनी भारतीय पंतप्रधानांनी जेरुसलेमच्या ऐतिहासिक भूमीवर पहिले पाऊल ठेवले, तेव्हाच ते द्विपक्षीय संबंधांना नवे वळण देणारे पाऊल असणार, हे स्पष्ट झाले होते. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती...
जुलै 06, 2017
जेरुसलेम - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्राईलचे अध्यक्ष रुवन रिवलिन यांची भेट घेऊन द्विपक्षीय संबंध आणखी भक्‍कम बनविण्यासंबंधीच्या उपाययोजनांवर व्यापक चर्चा केली. इस्राईलच्या अध्यक्षांनी माझे अतिशय उत्साहात स्वागत केले. त्यांनी राजशिष्टाचार मोडला. हे भारताच्या लोकांप्रती आदराचे संकेत आहेत, असे...
जुलै 04, 2017
तेल अवीव - इस्राईलच्या ऐतिहासिक दौऱ्यावर आलेल्या भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खुद्द इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आज (मंगळवार) विमानतळावर उपस्थित राहून जातीने स्वागत केले. "आप का स्वागत हैं मेरे दोस्त,' अशा आश्‍वासक शब्दांत नेतान्याहू...
जुलै 02, 2017
कॉफी हाउसचं प्रस्थ भारतात आता वाढलं असलं, तरी जगभरात या एरवी साधारण वाटणाऱ्या वास्तूमध्ये इतिहास घडल्याचं दिसतं. रोममधलं ग्रीक कॅफे, व्हिएन्ना इथलं कॅफे सेंट्रल, बुडापेस्टमधलं हंगेरीया कॅफे, तर कोलकता इथलं कॉलेज स्ट्रीट कॉफी हाउस अशा काही कॅफेंमध्ये राजकीय, साहित्यिक क्रांतीची बीजं रोवली गेली....
जून 28, 2017
इस्राईली माध्यमांकडून आगामी दौऱ्याला महत्त्व; मोदींबाबत उत्सुकता जेरुसलेम : "सज्ज राहा : जगातील सर्वांत महत्त्वाचे पंतप्रधान येत आहेत', अशा शब्दांत येथील आघाडीच्या वृत्तपत्राने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी इस्राईल दौऱ्याचे महत्त्व स्पष्ट केले आहे. पुढील आठवड्यात मोदी इस्राईलला जात असून, या...
जून 27, 2017
तेल अविव (इस्राईल) - सायबर सुरक्षेची गरज वाढत असताना जगभरातल्या अन्य देशांनाही सायबर सुरक्षा यंत्रणा उभारण्यासाठी मदत देण्याची तयारी असल्याचे इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आज सांगितले. सातव्या आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा परिषदेचे उद्‌घाटन करताना ते बोलत...
मे 23, 2017
तेल अवीव : आखाती देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची दुर्मिळ संधी सध्या निर्माण झाली असल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केला. सौदी अरेबियाचा दौरा संपवून त्यांनी आज इस्राईलला भेट दिली, त्या वेळी ते बोलत होते. इस्राईलबरोबर असलेले 'अतूट मैत्रीच्या' संबंधांवर विश्‍वास व्यक्त...
एप्रिल 23, 2017
नागपूर : अमेरिकेचे बेंजामिन पेरी यांचा सलग 40 तास स्वयंपाकाचा विश्‍वविक्रम मोडीत काढून सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी आज (रविवार) 53 तासांचा नवा विश्‍वविक्रम नोंदवला. नागपूर येथील इन्स्टीट्यूट ऑफ इंजिनियर्सच्या सभागृहात त्यांनी हा विक्रम रचला. गिनेस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये लवकरच त्यांचे...
फेब्रुवारी 28, 2017
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी नुकतीच भेट घेतली. अमेरिका नेहमीच इस्राईलचा खंदा पाठीराखा राहिली आहे. मात्र, या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी अमेरिकेच्या इस्राईलबाबतीत बदलत असलेल्या धोरणांचे सूतोवाच केले...
फेब्रुवारी 16, 2017
वॉशिंग्टन - इराणबरोबर झालेला आण्विक करार हा अमेरिकेने आत्तापर्यंत केलेला सर्वांत वाईट करार असल्याचे मत व्यक्त करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी "इराणला अण्वस्त्र तयार करण्यात कधीही यश येणार नाही,' असे आश्‍वासन इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना...
फेब्रुवारी 08, 2017
वॉशिंग्टन: ओबामा प्रशासनाने भारताला दिलेला "विशेष संरक्षण भागीदार' हा दर्जा नव्या प्रशासनानेही मान्य केला असून, भारताच्या सोयीसाठी आपल्या निर्यात नियंत्रण कायद्यात आवश्‍यक बदल केले आहेत. या बदलामुळे भारताला तंत्रज्ञान आणि शस्त्र निर्यात करणे अधिक सोपे जाणार आहे.  अमेरिकेने कायद्यात बदल केल्याने...
जानेवारी 26, 2017
दूरध्वनीवरील चर्चेवेळी मोदींना अमेरिका भेटीचे निमंत्रण नवी दिल्ली/वॉशिंग्टन- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी रात्री उशिरा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या वेळी बोलताना ट्रम्प म्हणाले, की भारत हा अमेरिकेसाठी जवळचा सहकारी आणि एक चांगला मित्र आहे....
जानेवारी 24, 2017
वॉशिंग्टन- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताचे पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज (मंगळवार) रात्री साडेअकरा वाजता फोनवरून चर्चा करणार आहेत, अशी माहिती व्हाईट हाऊसने दिली आहे.  व्हाईट हाऊसच्या वतीने ट्रम्प यांचे आजचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामध्ये अध्यक्ष ट्रम्प यांची भारताचे...
डिसेंबर 16, 2016
वॉशिंग्टन - डेव्हिड फ्रीडमन हे इस्राईलमधील अमेरिकेचे नवे राजदूत असतील, अशी घोषणा अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारमोहिमेदरम्यान फ्रीडमन हे ट्रम्प यांचे अमेरिका-इस्राईल संबंधांसदर्भातील सल्लागार होते. "फ्रीडमन यांच्या इस्राईलशी...
नोव्हेंबर 14, 2016
न्युयॉर्क - अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीकडे साऱ्या जगाचे लक्ष लागलेले असते. निवडणूक निकालांच्या आधी एक्झिट पोलची देखील जोरदार चर्चा असते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण होणार? निवडणूकीचा निकाल काय लागणार? याबाबत यॉर्कटाउन येथील बेंजामिन फ्रँकलिन प्राथमिक शाळा गेले 48 वर्षे आपला अंदाज...
नोव्हेंबर 04, 2016
सुरक्षा, शिक्षण, ऊर्जा क्षेत्रांत सहकार्य वाढविणार जेरुसलेम - इस्राईलचे अध्यक्ष रोवेन रिव्हलीन हे या महिन्याच्या मध्याला सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. या वेळी त्यांच्याबरोबर वरिष्ठ मंत्री, अधिकारी आणि व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ असेल. भारत आणि इस्राईलदरम्यान सुरक्षा, शिक्षण, सायबर, ऊर्जा, जल...
ऑगस्ट 08, 2016
कुठल्याही महामानवाचा शब्द न्‌ शब्द वेचत जाणं, संदर्भमूल्याच्या दृष्टिकोनातून त्याचं जतन-संवर्धन करून ठेवणं ही गोष्ट सोपी नाही. आयुष्यभर समर्पणभावनेनं हे केलं तरच ते प्रत्यक्षात उतरू शकतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी भारावून गेलेलं असंच एक समर्पित व्यक्तिमत्त्व आहे सातारा जिल्ह्यातल्या...