एकूण 63 परिणाम
मे 11, 2018
बेळगाव, संकेश्‍वर - अनोळखी वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले, तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. हे चौघेही युवक गोटूर येथील असून ते पोहण्यासाठी एकाच दुचाकीवरून निघाले होते. यावेळी पाठीमागून आलेल्या वाहनांची दुचाकीला धडक बसली. आज सकाळी...
मे 09, 2018
बेळगाव - काळा पैसा परत आणून प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख जमा करु, असे सांगून सत्तेत आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटी आश्‍वासने देण्यात तरबेज आहेत. ते फेकू पंतप्रधान आहेत, अशी टीका राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी केली. ते मंगळवारी (ता. ८) काँग्रेस कार्यालयात आयोजित...
एप्रिल 25, 2018
निपाणी - येथील बेळगाव नाक्‍याशेजारी असलेल्या माने प्लॉटमध्ये बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 22 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख 50 हजार रुपये असा 7 लाख 54 हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी 8 वाजता उघडकीस आली. श्रीकांत बंडेराव घोडके यांच्या घरात ही चोरी झाली. आजारामुळे...
एप्रिल 13, 2018
बेळगाव - कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे (केडीसीसी) चार कोटी रुपये गुरुवारी (ता. १२) दुपारी ४ वाजता बुगटे आलूर (ता. हुक्केरी) चेकपोस्टवर जप्त करण्यात आले. केडीसीसीच्या संचालक व अधिकाऱ्यांनी तातडीने चेकपोस्टवर जाऊन रक्‍कम परत देण्याची मागणी केली. रात्री उशिरापर्यंत रक्‍कम परत ...
एप्रिल 11, 2018
रायबाग - हळे डीगेवाडी ( ता. रायबाग, जि. बेळगाव) येथील शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आज सकाळी आत्महत्या केली आहे. रावसाब बाबु चौगुले (वय 40) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, शेतकरी रावसाब चौगुले यांनी शेतीसाठी बँकेतून तसेच इतरांकडून हात...
एप्रिल 09, 2018
उचगाव - गावाशेजारी असलेल्या खाणीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (ता. ८) दुपारी ३.३० च्या सुमारास मण्णूरजवळ घडली. कुशन कल्लाप्पा चौगुले (वय १०), साहिल मनोहर बाळेकुंद्री (१४) व आकाश कल्लाप्पा चौगुले (१४, तिघेही रा. मरगाई गल्ली, मण्णूर, ता....
एप्रिल 04, 2018
बेळगाव -  शहापूर येथील भारत नगर पहिला क्रॉस येथे मुलाने स्वतःच्या घराला आग लावल्याचा प्रकार आज सकाळी साडेआठच्या सुमारास घडला. यात घराचे मोठे नुकसान झाले आहे.   याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,  गणेश वामन आरोंदेकर या युवकाने आईने खर्चाला पैसे देण्यास नकार दिल्यामुळे घरगुती...
मार्च 30, 2018
बेळगाव - दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या नऊ जणांच्या आंतरराज्य टोळीला अटक केली. मध्यरात्री एकच्या सुमारास बागेवाडी पोलिसांनी ही कारवाई केली. हे सर्वजण कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील व  महाराष्ट्रातील शिर्डी, पुणे व सोलापूर जिल्ह्यातील आहेत. या टोळीने 26 रोजी कोप्पळ जिल्ह्यातील गीनिगेरा...
मार्च 25, 2018
कुडाळ - येथील सॅमसंग कॅफेचे मालक शैलेश शाम तिरोडकर (वय ४६, रा. पिंगुळी सराफदारवाडी) हुबळी-राणेबेन्नूर येथे आज झालेल्या भीषण अपघातात ठार झाले. अन्य दोघे जखमी झाले. शृंगेरी मठात जाताना पहाटे साडेतीनला अपघात झाला. तिरोडकर मोटारीने काल (ता. २३) दुपारी तीन वाजता कुडाळहून शृंगेरी मठाकडे निघाले. समवेत...
मार्च 22, 2018
बेळगाव - चन्नम्मा सर्कल मध्ये आज अचानक ओमनी मोटारीने पेट घेतला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु मोटार जळून खाक झाली. कोल्हापूर येथील परशुराम जयवंत कागलकर हे त्यांच्या नातेवाईकांना घेऊन बेळगावला एका नातेवाईक रुग्णाला पाहण्यासाठी आले होते. चन्नम्मा सर्कल मध्ये अचानक...
फेब्रुवारी 21, 2018
बेळगाव - हेल्मेटसक्‍तीची काटेकोर अमंलबजावणी करण्यास पोलिस आयुक्‍तांनी कठोर पाऊल उचलले आहे. हुबळी-धारवाडपाठोपाठ आता बेळगावातही ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ज्या दुचाकीस्वाराकडे हेल्मेट नसेल त्यांना पेट्रोल देऊ नये, अशी सूचना पोलिस उपायुक्‍त सीमा लाटकर यांनी...
फेब्रुवारी 12, 2018
बेळगाव - दिड वर्षांपूर्वी बहिणीचे लग्न केले. वडील वृद्ध असल्यामुळे सर्व जबाबदारी मनोजवर पडली. फौंड्रीत कामावर जाऊन कर्ज कसे फेडायचे? ही चिंता त्याला भेडसावत होती. यातूनच त्याने रविवारी (ता. 11) रात्री रेल्वेखाली स्वतःला झोकून देऊन आत्महत्या केली. मनोज नंदाजी पाटील (24, रा. पाटील गल्ली...
फेब्रुवारी 05, 2018
बेळगाव - येथील आरटीओ सर्कलजवळ दुपारी साडेतीनच्या सुमारास दुचाकीला ट्रकची धडक  बसली. या अपघातामध्ये तरुण जागीच ठार झाला. यानंतर संतप्त जमावाने अपघातमधील संबंधीत ट्रक पेटविला. इनायत बशीर अहंमद शेख (वय 20, टोपी गल्ली) असे ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे  किल्ला तलावाकडून दुपारी साडेतीनच्या...
जानेवारी 30, 2018
बेळगाव - तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. साहील संतोष कोलवेकर (20, रा. नार्वेकर गल्ली, शहापूर) असे मृताचे नाव आहे. बारावीत सातत्याने नापास झाल्याने त्याने हे पाऊल उचलल्याची नोंद पोलिसांत आहे.  याबाबत शहापूर पोलिसांतून मिळालेली माहिती...
जानेवारी 27, 2018
बेळगाव : मध्यमवयीन अनोळखी महिलेचा खून झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. जिल्हा रुग्णालयातील परिसरात नव्याने सुरु होत असलेल्या इंदिरा कॅन्टीनच्या शेडमध्ये हा खून झाल्याचे आढळून आले. खुनापूर्वी सदर महिलेवर अत्याचार केल्याचा ही पोलिसांना संशय आहे. एपीएमसी पोलिसात घटनेची नोंद झाली आहे....
जानेवारी 25, 2018
बेळगाव - रात्रीच्या वेळी गळती झालेल्या सिलिंडरचा अंदाज न आल्याने पहाटे शेगडी पेटविण्यासाठी गेलेली महिला सिलिंडर स्फोट होऊन जागीच ठार झाली. सुधा दुर्गाप्पा पंगण्णवर ( वय 25, रा गौंडवाड तालुका बेळगाव ) असे मृत महिलेचे नाव आहे. आज पहाटे पाचच्या सुमारास राहत्या घरात ही घटना...
जानेवारी 23, 2018
कुडाळ - कुडाळ-पाट रस्त्यावरील एमआयडीसी येथे दुचाकी व डंपर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात शिवसेना पाट शाखाप्रमुख दुचाकीस्वार यशवंत आनंद परब (वय ३८) हे जागीच ठार झाले. याबाबत माहिती अशी तालुक्‍यातील पाट परबवाडा येथील यशवंत परब हे कुडाळ येथे कामानिमित्त आपल्या दुचाकीने येत होते. सकाळी घरातून कुडाळच्या...
जानेवारी 20, 2018
बेळगाव - आण्विक कचऱ्यापासून होणारी दुर्घटना टाळण्याबाबतचे प्रशिक्षण देणारे अग्निशमन दलाचे राज्यातील पहिले ‘आण्विक प्रशिक्षण केंद्र’ लवकरच बेळगावात सुरु होत आहे. यासाठी कित्तूरजवळ जमीन संपादीत करण्यात आली असून वर्षभरात तेथे प्रशिक्षण तळ उभारणीचे काम हाती घेतले जाणार आहे. एनडीआरएफच्या...
डिसेंबर 26, 2017
बेळगाव - मध्यवर्ती बस स्थानकाजवळ (सीबीटी) पार्क करण्यात आलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचे 4 तोळे सोन्याची बॅग, 2 हजार रुपयांची रोकड व 1 मोबाईल संच लंपास केला आहे.  गोवा येथील पुंडलिक विठ्ठल जावेर सोमवारी (ता.25) अथणी तालुक्‍यात ऐनापुरला गेले होते. औषध...
डिसेंबर 19, 2017
बेळगाव : सोमवारी रात्री खडक गल्ली, दरबार गल्ली खडे बाजार मधील शितल हॉटेल परिसरात धुडगूस घालणाऱ्या 23 संशयितांना पोलिसांनी अटक केली. जाळपोळ व दगडफेकीच्या वेळी दोन पोलीस अधिकारी जखमी झाले असून काही वाहनेही आगीच्या भक्षस्थानी पडले आहेत. आज सर्व संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले....