एकूण 1264 परिणाम
मे 21, 2019
पुणे - झोपडपट्ट्यांमध्ये घराची खरेदी अथवा विक्री करायची असेल किंवा घर बांधायचे असले तरी त्या-त्या परिसरातील ‘भाई’ किंवा आजी-माजी नगरसेवकांच्या कथित कार्यकर्त्यांना ‘कमिशन’ द्यावेच लागते. कधी मंडळाची वर्गणी म्हणून, तर कधी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाईची भीती दाखवून नागरिकांकडून...
मे 20, 2019
हट्टा (जि. हिंगोली) : वसमत तालुक्‍यातील नहाद येथे काकु व पुतण्याचा विवाह वादाच्‍या भोवऱ्यात सापडला असून या दोघांवर कारवाई करण्याच्‍या मागणीसाठी हट्टा (ता. वसमत) येथील गावकऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवली. तर दोन तास रास्‍तारोको आंदोलन केले. वसमत तालुक्‍यातील नहाद येथील 37 वर्षीय काकूचे अठरा वर्षीय ...
मे 19, 2019
सावंतवाडी - कोकण रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ निर्णय घ्या. लोकांच्या मागण्या पूर्ण करा. अन्यथा तुमच्या विरोधात आंदोलन छेडून मला त्या आंदोलनाचे नेतृत्व करावे लागेल, असा कडक शब्दात इशारा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे कोकण रेल्वेचे एमडी संजय गुप्ता यांना दूरध्वनीद्वारे दिला....
मे 18, 2019
महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याला देशभक्तीचे प्रमाणपत्र देऊन साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी, तोंडाळपणा आणि भाजप नेते यांचे "सख्खे" नाते पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. या देशामध्ये आपल्याला जेवढे कळत आहे तेवढे अन्य कोणालाही कळत नाही असा गोड (गैर)समज असलेल्या नेत्यांची मांदियाळी, हे...
मे 18, 2019
खरेतर आमच्या इंजिनिअरिंगच्या परीक्षेदरम्यान दरवर्षी ‘आयपीएल’चे सामने होतात; पण तरीही टीव्हीवर ते पाहिल्याशिवाय राहवत नाही. त्यात जाणारा वेळ गृहीत धरून मग अभ्यासाचं प्लॅनिंग करावं लागतं. या वेळी ‘आयपीएल’ संपल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला सुरवात होणार आहे. लोकसभा निवडणुकीचे...
मे 14, 2019
पुणे : तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. यात सिविल इंजीनिअरिंग अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षातील (चौथे सत्र) "बिल्डींग प्लॅनिंग ड्रॉईंग' विषयाचा पेपर सोमवारी झाला. या विषयाच्या प्रश्‍नपत्रिकेत दोन प्रश्‍नांमध्ये चुका झाल्याचे निदर्शनास आले आहे.  राज्य तंत्र शिक्षण...
मे 14, 2019
पाटणा : संयुक्त जनता दलाचे "बाण' हे पक्षचिन्ह कालबाह्य झाले असून, ते हिंसेचे प्रतीक आहे, अशी टीका राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी आज केली. चारा गैरव्यवहारप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या लालूंनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना खुले पत्र लिहीत त्यांच्यावर आणि त्यांच्या पक्षावर...
मे 14, 2019
मुंबई - वैद्यकीय पदव्युत्तर मराठा आरक्षणाला आज राजकीय वळण लागण्याची चिन्हे दिसू लागल्याने राज्य सरकारने तातडीने हालचाली करायला सुरवात केली. अडचणीत आलेल्या विद्यार्थ्यांसाठी अध्यादेश काढून त्यांचे प्रवेश नियमित करण्याची तयारी राज्य सरकारने दाखविली आहे. प्रवेशाचा उद्या (ता. 14) शेवटचा दिवस आहे....
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
मे 12, 2019
इतर अनेक नात्यांत माणसांचे मुखवटे गळून पडतात अन्‌ खरे चेहरे समोर येतात. मात्र, आईच्या नात्याचं तसं नसतं, त्यात जराही खोट नसते. आईच्या नात्यात सूर्याचा उजेड, चंद्राची शीतळता, गाईचं वात्सल्य, घारीचं चित्त, हरणीचं काळीज, नदीची निर्मळता, झाडांची हिरवळ, मातीची ओल अशा सगळ्या गोष्टींचं मिश्रण असतं......
मे 09, 2019
नागपूर : एका कुख्यात तडीपार गुंडाने पोलिस व्हॅनमध्ये बसून "टिक टॉक' व्हिडिओ तयार केल्याचे व्हायरल झाल्याने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शासकीय वाहनाचा गैरवापर केल्याने कोराडी पोलिसांनी आज गुंड मोबीनविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामुळे व्हॅनचालक व कर्मचारी अडचणीत येण्याची शक्‍यता आहे....
मे 09, 2019
कसबेतडवळे - खेड (ता. उस्मानाबाद) येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. साडेपाच हजार लोकसंख्येच्या गावाला चार अधिग्रहण केलेल्या कूपनलिकांद्वारे दिवसाला केवळ ४० हजार लिटर पाणी मिळत आहे. तर गावामध्ये आठवड्यातून एक वेळा नळयोजनेद्वारे चार घागरी पाणी मिळत असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी...
मे 08, 2019
पुणे - शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या झोपडपट्टीतील छोट्याशा खोलीत राहणारा एक तरुण. एका गुन्ह्यातील शिक्षा संपवून कारागृहाबाहेर पडला. त्यानंतर या उदयोन्मुख ‘भाई’च्या स्वागतासाठी टोळकीच्या टोळकी आली. शंभर दीडशे तरुण आणि त्यांच्या पाच-पन्नास दुचाकींच्या गर्दीत, बुलेटच्या सायलेंसरमधून फटाक्...
मे 08, 2019
पुणे - मध्य प्रदेशातून तस्करी करून पिस्तूल विक्री करणारा मोहसीन ऊर्फ मोबा बडेसाब शेख हा सराईत गुन्हेगार. वाघोलीतील जाधववस्तीमध्ये पाळलेल्या कबुतरांच्या ढाबळीमध्ये तस्करी केलेले पिस्तूल शेख लपवून ठेवत असे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्या ढाबळीतून पिस्तुलांसह काडतुसे जप्त केली. कबुतरांच्या ढाबळी...
मे 07, 2019
पुणे : महाराष्ट्राच्या इतर भागांप्रमाणेच, पुण्यामध्ये दर वर्षी उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाई जाणवू लागते आणि मग पाणी कपातीच्या गोष्टीवर चर्चा सुरू होते. पुण्यामधील पाणीकपात हा खरोखर एक संशोधनाचा विषय आहे. खरे तर पुणेच काय तर महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये वर्षातील ३६५ दिवस नियंत्रित...
मे 06, 2019
पुणे : सकाळ सोसायटी क्रिकेट लिग स्पर्धेत दुसऱ्या आठवड्यात तिसऱ्या शतकाची नोंद झाली. श्रीनिवास ग्रीनलॅंड कौंटी बी संघाच्या मयूर मानकर याने ही कामगिरी केली. त्यामुळे त्याच्या संघाचा मिथिला नगरीविरुद्ध विजय झाला. सिराटेक ग्रीन्स आणि सूर्यगंगा यांच्यातील सामना टाय झाला. त्यामुळे स्पर्धेतील रंगत कायम...
मे 06, 2019
मुंबई: मतदान यंत्रांच्या ‘स्ट्राँग रूम’मध्ये जॅमर बसविण्याची काँग्रेसच्या शिष्टमंडळाकडून मागणी करण्यात आली आहे. काँग्रेस  प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाला निवेदन दिले असून लोकसभा निवडणुकीत वापरलेल्या मतदान यंत्रांशी मोबाइल टॉवर्स किंवा वायफायच्या...
मे 03, 2019
पाटोदा : गडचिरोली जिल्ह्यातील जांबुरखेडा गावातील नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भुसुरुंग स्फोटात शहीद जवान शेख तौसीफ आरिफ यांना ‘शहीद जवान तौसिफ शेख अमर रहे’ घोषणा देत शासकीय इतमातात अखेरचा निरोप देण्यात आला. शहरातील क्रांतीनगर भागातील शेख तौसिफ आरिफ हे 2010 साली गडचिरोली पोलिसमध्ये शिपाई पदावर...
मे 03, 2019
रावेर तालुका एकेकाळी कायम हिरवागार, केळीने बहरलेला तालुका होता म्हणून कॅलिफोर्निया अशी महाराष्ट्रात त्याची ओळख होती; पण गेल्या पंधरा-वीस वर्षांत भूगर्भातील पाण्याचा झालेला अनिर्बंध उपसा, पाणी आडवा पाणी जिरवा आणि जलयुक्त शिवार योजना या योजनांचे अपयश, बंधाऱ्यांची बोगस कामे, प्रचंड वृक्षतोड,...
मे 03, 2019
मुंबई : गोरेगाव पूर्वमधील अरुण कुमार वैद्य मार्गावर गोकुलधाम परिसरात सकाळी सात ते साडेसातच्या सुमारास एका चालत्या बेस्ट बसने अचानक पेट घेतला. मात्र सकाळची वेळ असल्यामुळे या बसमध्ये जास्त प्रवासी नव्हते.  बसला आग लागेलीली कळताच बेस्ट बसचालक, वाहक व प्रवाशांनी बाहेर धाव घेतली. या घटनेत...