एकूण 18623 परिणाम
एप्रिल 26, 2019
रावेरः येत्या सात मेपासून सुरू होत असलेल्या रमजान महिन्याच्या पार्श्‍वभूमीवर रावेर तालुक्यातून दररोज बारा ते पंधरा कंटेनर्स म्हणजे सुमारे ३ हजार क्विंटल केळी अरब देशात निर्यात होत आहे. या निर्यातक्षम केळीला दीडशे ते दोनशे रुपये जादा भाव दिला जात आहे. अजून किमान महिनाभर ही निर्यात सुरू राहील, असे...
एप्रिल 26, 2019
कोल्हापूर - भारतातील सर्वांत मोठी हवाई वाहतूक कंपनी इंडिगो १२ मेपासून कोल्हापूर-तिरुपती आणि कोल्हापूर-हैदराबाद या उड्डाणांची सेवा सुरू करत आहे. दररोज सुरू होणाऱ्या या सेवेचे सुरवातीला १९९९ रुपये प्रवास भाडे आकारले जाणार असल्याचे इंडिगोचे मुख्य कमर्शियल अधिकारी विल्यम बोल्टर यांनी एका पत्रकाद्वारे...
एप्रिल 26, 2019
नवी दिल्ली - एप्रिल २०२० पासून डिझेलवर चालणाऱ्या सर्व वाहनांची निर्मिती थांबवणार असल्याची घोषणा देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती-सुझुकी इंडियाने गुरुवारी (ता. २५) केली. भारतात सध्या या कंपनीच्या विक्री होत असलेल्या गाड्यांमध्ये डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांचे प्रमाण २३ टक्के आहे. मात्र  ही...
एप्रिल 26, 2019
भोपाळ - मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये सध्या एकच चर्चा आहे. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह ऊर्फ दिग्गीराजा यांच्यासमोर साध्वींचेच आव्हान का उभे राहते आणि या वेळीदेखील साध्वी त्यांना मात देतील काय? उमा भारती आणि प्रज्ञासिंह ठाकूर या दोन साध्वी. एकेकाळी मध्य प्रदेशात तीन राजकीय व्यक्तींचा बोलबाला...
एप्रिल 26, 2019
गाझीपूर (उत्तर प्रदेश) (पीटीआय) : "विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या हाती देश सुरक्षित राहणार नाही,'' अशी टीका करीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी कॉंग्रेस, बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्षाला लक्ष्य केले. गाझीपूर मतदारसंघातील सभेत बोलताना शहा म्हणाले, की पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये केलेल्या हवाई...
एप्रिल 26, 2019
लखनौ (पीटीआय) : भारतीय जनता पक्षाचा नवा अर्थ 'भागती जनता पक्ष' असल्याचे सांगत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. पत्रकार परिषद आणि जेव्हा जेव्हा पत्रकार प्रश्‍न विचारतात त्यापासून पलायन करणारा पक्ष असे नव्याने वर्णन त्यांनी केले. ‘विकास’ पूछ रहा है: आपने भी कुछ नया...
एप्रिल 26, 2019
जागतिक बौद्धिक संपदा संस्था ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक घटक संस्था म्हणून कार्यरत आहे. पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क, भौगोलिक उपदर्शन (GI) आणि इंडस्ट्रीयल डिझाईन या जगातील बौद्धिक संपदांचे रक्षण करणे हे तिचे एक प्रमुख उद्दिष्ट. या बौद्धिक संपदांना आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त करून देऊन त्यांचा दर्जा...
एप्रिल 26, 2019
अखिल भारतीय "खिलाडी' व सुप्रसिद्ध कुंग फू, तसेच जुजुत्सुतज्ज्ञ श्री अक्षयकुमार ह्यांनी आमचे लाडके दैवत श्रीश्री नमोजी ह्यांची "न भूतो न भविष्यति' छापाची मुलाखत पाहिल्यानंतर आमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. थोर पुरुषाची बरीचशी लक्षणे आमच्याही ठायी असल्याचा साक्षात्कार होऊन आम्ही आधी लाजून चूर झालो...
एप्रिल 25, 2019
नाशिक ः लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक प्रहार करत व्हिडिओच्या माध्यमातून राज्यभर गाजत असलेल्या राज ठाकरे यांची शेवटची सभा शुक्रवारी (ता.26) सायंकाळी हुतात्मा अनंत कान्हेरे...
एप्रिल 25, 2019
परभणी : परभणीत उष्णतेच्या लाटेने कहर केला असून गुरुवारी (ता.25) यंदाच्या आतापर्यंतच्या तापमानाचा उच्चांक गाठला गेला आहे. आग ओकणाऱ्या सुर्यप्रकाशाने परभणीकर हैरान झाले असून गुरुवारी पारा तब्बल 45 अंशावर पोचला आहे. मार्च महिण्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून परभणी तापली आहे. अख्खा मार्च महिणाभर तापमान 40...
एप्रिल 25, 2019
24 एप्रिल 2019 @RahulGandhi राहुल गांधी यांनी ट्विटरवर एक व्हि़डीओ शेअर करत हिंदीत 'चौकीदार' या मुद्द्यावर चार ओळी लिहील्या आहेत. या व्हिडीओत जनता मोदी सरकारला देशात भांडणं लावण्याचा आणि खोटं बोलण्याचा आरोप करत आहेत. यावर कॅप्शन देत गांधी म्हणतात, 'खरेपणा उघड झाला तर नाटकं चालत नाही. जनतेसमोर...
एप्रिल 25, 2019
पुणे - मलबार गोल्ड आणि डायमंड्‌सने ‘ब्राइड्‌स ऑफ इंडिया’ची सातवी आवृत्ती सादर केली आहे. या वर्षी ‘ब्राइड्‌स ऑफ इंडिया’ कॅंपेन परंपरा थीमवर आधारित आहे.  भारतात अनेक प्रांत व समाज आहेत. प्रत्येकाची निराळी परंपरा आहे. या थीममध्ये विविधतेचा अनोखेपणा उठून दिसतो. ‘अनेक उत्सव, एक भारत’, हाच...
एप्रिल 25, 2019
मुंबई - शेअर बाजारातील घसरणीचे वारे अखेर बुधवारी चौथ्या सत्रात संपुष्टात येऊन तेजी अवतरली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ४८९ अंशांची उसळी घेऊन ३९ हजार ५४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १५० अंशांची वाढ होऊन ११ हजार ७२६ अंशांवर बंद झाला. सेन्सेक्‍समध्ये आज...
एप्रिल 25, 2019
जालना - जालना लोकसभेच्या जालन्यासह बदनापूर, भोकरदन, पैठण, सिल्लोड आणि फुलंब्री या सहाही विधानसभेच्या क्षेत्रात ६४.५० टक्के मतदान झाले आहे. आता लोकांना निकालाचे वेध लागले आहेत. २३ मे २०१९  रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. या मतदारसंघातून कोण विजयी होणार, याची उत्सुकता शिगेला पोचली आहे....
एप्रिल 25, 2019
काही दिवसांपासून दक्षिणेकडील अभिनेत्री साई पल्लवी हिने एका सौंदर्य प्रसाधनाची दोन कोटींची जाहिरात नाकारली असल्याची बातमी सगळीकडे दिसत होती. सर्वत्र तिच्या या निर्णयावर सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव झाला. मात्र, साईने जाहिरात नाकारून "चेहरा क्‍या देखते हो... दिल में उतरकर देखो ना!', हाच संदेश...
एप्रिल 25, 2019
कोल्हापूर - लाल मातीचे सुबक माठ असलेले एखादे भांडे, या मातीचीच एखादी मूर्ती पाहिली, हे कसं आणि कोणी बनवलं असेल? हाच विचार मनात येतो; पण आपणही थोड्याशा सरावानंतर हे बनवू शकतो, असा विश्‍वास गौरव काईंगडे या कलाकाराने दिला आहे आणि जे ही कला शिकू इच्छितात, त्यांना अगदी मोफत शिकवणे चालू केले आहे. कला...
एप्रिल 25, 2019
कोल्हापूर - महापालिकेच्या आरोग्य विभागाने कचरा संकलन हायटेक पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागाच्या ताफ्यात लवकरच नव्याने १०४ टिपर दाखल होणार आहेत. या टिपरना ‘जीपीएस’ सिस्टीम आहे. त्यामुळे कचरा संकलन कोणत्या भागातून कसे सुरू आहे. हे ट्रॅकिंग केले जाणारच आहे. याशिवाय प्रत्येक...
एप्रिल 25, 2019
कोल्हापूर - शालेय सुटीचा हंगाम आणि लग्नसराई सुरू आहे. काल निवडणुका झाल्या आहेत, त्यामुळे पर्यटकांच्या गर्दीने कोल्हापूर हाउसफुल्ल होत आहे. पुढे महिनाभर पर्यटकांची अशीच वर्दळ येथे राहणार आहे. कोकण आणि गोव्याकडे जाणारे पर्यटक कोल्हापुरात मुक्कामाला पसंती देतात, त्यामुळे येथील अर्थकारणाला गती मिळते....
एप्रिल 25, 2019
नागपूर - वाढत्या तापमानात आरोग्याच्या समस्या डोकं वर काढतात. अशातच महिलांमध्ये युरिन इन्फेक्‍शनचा त्रास वाढला असून, ७० टक्के महिलांना यूटीआयचा त्रास उद्‌भवत असल्याची माहिती स्रीरोग तज्ज्ञांनी दिली.  बाहेर नोकरी करणाऱ्या महिलांसोबतच महिला पोलिसांमध्ये यूटीआयचा त्रास अधिक प्रमाणात आहे. महिला...
एप्रिल 25, 2019
पुणे - अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे धडे मिळावे, त्यांना स्टार्टअप सुरू करण्यासाठी प्रेरणा मिळावी, यासाठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) विद्यापीठे आणि महाविद्यालयांना ‘इनोव्हेशन लॅब’ करण्याचे सूचित केले आहे.  महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधा असतात....