एकूण 96 परिणाम
एप्रिल 24, 2019
नवी दिल्ली: साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरच्या उमेदवारीवर आक्षेप घेणारी याचिका विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावली. भोपाळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उमेदवारीला स्थगिती देणे हे न्यायालयाचे काम नसून निवडणूक आयोगाचे आहे. आरोपींना...
एप्रिल 18, 2019
भोपाळ: मध्य प्रदेशच्या निवडणूक आयोगाने काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या 'चौकीदार' चोर है या जाहीरातीवर बंदी घातली आहे. या जाहीरातींचे प्रसारण बंद करण्याचे आदेशही आयोगाने दिले आहेत. काँग्रेसने लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधात चौकीदार चोर है अशी मोहीम उघडली होती....
एप्रिल 18, 2019
जयपूर, भोपाळ, अहमदाबाद : महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, मणिपूर आणि गुजरातमधील काही भागांना आज विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह झालेल्या अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला असून, त्यात एकूण 50 जणांचा बळी गेला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका राजस्थान...
एप्रिल 07, 2019
भोपाळ: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे स्वीय सहाय्यक (ओएसडी) यांच्या घरावर प्राप्तीकर विभागाने छापा टाकला असून जवळपास 15 अधिकाऱ्यांनी त्यांच्या घराची झडती घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असताना प्राप्तीकर विभागाने देशातील तीन राज्यात ठिकठिकांनी धाडी टाकून...
एप्रिल 02, 2019
भोपाळ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात चोख सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात येत आहे. तसेच विविध ठिकाणांवर पोलिसांकडून छापेमारीची कारवाईही केली जात आहे. त्यातच आता मध्यप्रदेशातील भाजप नेते संजय यादव यांच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये त्यांच्या घरातून 17 देशी बॉम्ब...
मार्च 08, 2019
भोपाळ (मध्य प्रदेश): काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या बोटाला आणि तोंडाला गुप्तरोग झाला असून, भारताविरोधात विधान केल्याशिवाय त्यांना जेवण जात नाही, असे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपाल भार्गव यांनी म्हटले आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जम्मू-...
मार्च 07, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : मध्य प्रदेशातील इंदूर शहराला देशातील सर्वांत स्वच्छ शहर म्हणून सलग तिसऱ्यांदा मान मिळाला आहे. राजधानीच्या श्रेणीत भोपाळ शहराची, तर छत्तीसगडला स्वच्छतेच्या कामात सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य म्हणून निवडण्यात आले. भारत सरकारच्या वतीने स्वच्छता सर्व्हेक्षण-2019...
मार्च 03, 2019
मध्य प्रदेशची खाद्यसंस्कृती अतिशय वैविध्यपूर्ण आहे. मध्य प्रदेश भारताच्या मध्य भागात असल्यामुळं देशाच्या संपूर्ण खाद्यसंस्कृतीचं दर्शन इथं होतं. इंदूर, भोपाळ, ग्वाल्हेर, उज्जैन अशा ठिकाणी अनेक उत्तमोत्तम पदार्थ मिळतात. इंदुरी सराफा तर जगप्रसिद्ध आहे. अनेक वेगळे पदार्थ मध्य प्रदेशातून...
फेब्रुवारी 25, 2019
सांगली -  भोपाळ येथील निर्मल इन्फ्राहोम कॉर्पोरेशन लिमिटेड या अर्थसाहाय्य करणाऱ्या कंपनीने गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. तब्बल १४ लाखांची फसवणूक केल्याची फिर्याद शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार कंपनीच्या संचालकांसह सातजणांवर फसवणूक केल्याप्रकरणी...
जानेवारी 30, 2019
भोपाळ : साधारणपणे राजकीय नेतेमंडळी श्रीमंत असतात, परंतु मध्य प्रदेशात नव्याने निवडून आलेल्या एका भाजप आमदाराकडे राहण्यासाठीही पक्के घर नाही. म्हणूनच त्यांच्या समर्थकांनी पक्के घर बांधण्याचे नियोजन केले आहे. सध्या ते झोपडीप्रमाणेच एका कच्च्या घरात राहतात.  मध्य प्रदेशातील श्‍योपूर...
जानेवारी 23, 2019
भोपाळ- मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने सरकार स्थापन केल्यावर तातडीने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. परंतु ही कर्जमाफी फसवी असल्याचे आता स्पष्ट होताना दिसत आहे. कुणाचे पाच तर कुणाचे दहा रुपये माफ झाले असल्याची स्थिती मध्य प्रदेशात दिसत आहे. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता...
जानेवारी 21, 2019
भोपाळ : मध्य प्रदेशातील कान्हा नॅशनल पार्कमध्ये वाघाने वयस्कर वाघिणीला मारल्यानंतर खाऊन टाकल्याची दुर्मिळ घटना घडली आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. वन अधिकाऱ्यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. वाघ व वाघीणीमध्ये भांडण झाले. वाघाणे वयस्कर असलेल्या वाघिणीला ठार मारले. विशेष म्हणजे या...
जानेवारी 21, 2019
मुंबई: अभिनेत्री करिना कपूर मध्य प्रदेशातील राजकारणात आपले नशीब आजमवण्याचा प्रयत्न करणार असल्याच्या चर्चेबरोबरच मोदी सरकारविरोधात करिना रिंगणात आहे. करिनाला भोपाळमधून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देण्याची मागणी भोपाळ काँग्रेसने केली आहे. गेली 40 वर्षे काँग्रेस भोपाळमध्ये पराभूत होत आहे....
जानेवारी 20, 2019
भोपाळ- मॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची दगडानं ठेचून आणि धारधार शस्त्रांनी हत्या केल्याची घटना मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यातील बलवाडी येथे घडली आहे. सकाळी त्याचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे नाव मनोज ठाकरे असे आहे. माहितीनुसार, मनोज ठाकरे रविवारी (20 जानेवारी...
जानेवारी 03, 2019
भोपाळ- मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतर महिन्याच्या पहिल्या तारखेला होणारे 'वंदे मातरम्' न झाल्याने मोठा वाद झाला होता. 'वंदे मातरम्'च्या मुद्द्यावर विरोधकांसह सोशल मीडियावरही काँग्रेसबरोबरच मध्यप्रदेश सरकारचे आणि कमलनाथ यांचे वाभाडे निघाले होते. त्यामुळे जाग आलेल्या...
जानेवारी 01, 2019
भोपाळ : गोमाता (गाय) ही रस्त्यावर दिसली नाही पाहिजे. लवकरात लवकर गोशाळा उभारून करून गायींचे तेथे संगोपन केले पाहिजे, असे आदेश मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिले आहेत. मध्य प्रदेशात काँग्रेसने सत्ता स्थापन केल्यानंतर कमलनाथ यांनी शपथ घेतली. देशभरात गायींवरून राजकारण सुरु असताना...
डिसेंबर 20, 2018
भोपाळ : पराभव झाला तरी काळजी करण्याची गरज नाही. कारण, टायगर अभी जिंदा है, असे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटले आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा काँग्रेसने पराभव करत सत्ता स्थापन केली आहे. कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले आहे. भाजपच्या या...
डिसेंबर 18, 2018
भोपाळ : काँग्रेसचे नेते आणि नवनिर्वाचित मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज ठाकरेंकडून गुरुमंत्र घेऊन त्याचा गंडा बांधला की काय असा प्रश्न पडला आहे. कारण, कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर उद्योजकांना इशारा देत 70 टक्के स्थानिकांना नोकऱ्या देण्याचे आदेश दिले आहेत....
डिसेंबर 17, 2018
भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीच्या या सोहळ्यात एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते शिवराजसिंह चौहान मंचावर उपस्थित होते. त्यांनी कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांचं अभिनंदन करताना त्या दोघांचा...
डिसेंबर 12, 2018
भोपाळ : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पदाचा राजीनामा दिला. तसेच त्यांनी मी आता मुक्त आहे, असे म्हटले आहे. मध्य प्रदेशात आज (बुधवार) मतमोजणी पूर्ण झाली. काँग्रेसला 114 जागा मिळाल्या असून, भाजपला 109 जागा जिंकता आल्या....