एकूण 409 परिणाम
मार्च 11, 2019
सोलापूर - राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्यातील १,६२८ शाळांनाच ४० टक्के अनुदानाचा टप्पा जाहीर केला. मात्र, एक व दोन जुलै २०१६ ला जाहीर केलेल्या ७८९ शाळा व ६९० तुकड्यांना अनुदानाचा पुढील टप्पा मंजूर केला नाही. त्यामुळे याचा फटका त्याठिकाणी काम करणाऱ्या ८९७० कर्मचाऱ्यांना बसणार आहे...
मार्च 09, 2019
मुंबई - राज्यातील दूध भुकटी व द्रवरूप दुधाची निर्यात करण्यासाठी सहकारी व खासगी दूध भुकटी प्रकल्पांना अनुदान देण्याची योजना पूर्वलक्षी प्रभावाने पुढील तीन महिन्यांच्या कालावधीसाठी म्हणजेच 30 एप्रिल 2019 पर्यंत सुरू राहणार आहे. तसेच, या कालावधीसाठी प्रतिलिटर तीन रुपये याप्रमाणे अनुदान देण्यास आज...
मार्च 07, 2019
मालवण - समुद्राच्या उधाणामुळे शेतपीकाचे किंवा शेतजमिनीचे नुकसान झाल्यास आता शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत मिळणार आहे. आतापर्यंत अशा नुकसानीसाठी शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळत नव्हती; मात्र खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते यांनी अशा प्रकरणी मदत देण्यासंदर्भात महिन्यापूर्वी केलेल्या मागणीला...
मार्च 06, 2019
हातकणंगले - हातकणंगले तालुक्‍याच्या ठिकाणी नगरपंचायत व्हावी, यासाठी कृती समितीच्या दोन वर्षांच्या लढ्याला अखेर आज यश आले. हातकणंगलेला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्याची घोषणा आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केली. याबाबतचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या...
मार्च 06, 2019
मुंबई - उच्च शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या विविध शिक्षण संस्थांमधील शिक्षक व शिक्षक समकक्ष संवर्गांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी, तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित शैक्षणिक अर्हता लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  उच्च शिक्षण विभागांतर्गत...
मार्च 06, 2019
आजची तिथी : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० माघ वद्य चतुर्दशी. आजचा वार : ट्यूसडेवार. आजचा सुविचार : प्रयागतीर्थावरी। घेऊनि गंगेमध्ये बुडी। झाली धन्य कुडी। महाराष्ट्राची!! ........................... ।।श्री।। नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे. ) आजपासून जपाची नवी वही सुरू केली आहे....
मार्च 05, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान कृषी सन्मान योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यांवर दोन दोन हजार रुपये जमा करण्याच्या योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचा निर्णय घेतल्यावर म्हणजे येत्या माघी अमावास्येनंतर (ता. 6) आठवडाभरात कोणत्याही दिवशी लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याचे संकेत मिळाले आहेत. याआधी महाशिवरात्रीनंतर हा मुहूर्त...
मार्च 03, 2019
मुंबई - धनगर समाजाला आदिवासीत समाविष्ट करण्याची मागणी संवैधानिक कसोटीवर टीकणार नसल्याचे संकेत मिळालयने शनिवारी राज्य सरकारने संतप्त धनगर समाजाला शांत करण्याचा प्रयत्न केला. आदिवासी समाजाला दिल्या जाणाऱ्या सर्व सवलती धनगर समाजाला देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ...
मार्च 03, 2019
मुंबई - राज्यातील १७ सरकारी वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी मंगळवारपासून (ता. ५) बेमुदत संपावर जाणार आहेत. या रुग्णालयांत मुंबईतील जे. जे. समूह रुग्णालयातील जे. जे., कामा, सेंट जॉर्जेस आणि जी. टी. या चारही रुग्णालयांचा समावेश आहे. नोकरीत कायम करण्याचे आश्‍वासन सरकारने न...
मार्च 02, 2019
मुंबई - धनगर समाजाला आदिवासी समाजाचे राजकीय आणि शैक्षणिक आरक्षण देण्याचा अधिकार नसल्याचे वास्तव राज्य सरकारने स्वीकारले आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आदिवासी समाजाला असलेले सर्व प्रकारचे आर्थिक लाभ धनगर समाजाला देऊन गोंजारण्यासाठी राज्य सरकार लवकरच मोठी घोषणा करणार आहे....
फेब्रुवारी 20, 2019
मुंबई: राजकारणात अनेकांचे बळी जात असतात त्यामध्येच प्रकल्पाचे बळी जाणे हे काही नवीन नाही. अखेर युतीच्या राजकारणातही कोकणात होणाऱ्या नाणार प्रकल्पाचा बळी जाणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. नाणार प्रकल्प होणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी युतीच्या पत्रकार परिषदेत दिले आहे. आजच्या...
फेब्रुवारी 20, 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता (डीए) वाढवून देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतला. यामुळे त्यांचा सध्याचा नऊ टक्के डीए 12 टक्‍क्‍यांवर जाईल व एक कोटी दहा लाख केंद्रीय कर्मचारी व निवृत्त कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळेल, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी...
फेब्रुवारी 18, 2019
पिंपरी - पुणे ते लोणावळादरम्यान प्रस्तावित तिसऱ्या आणि चौथ्या लोहमार्गाचा अंतिम अहवाल तयार झाला असून, येत्या महिन्यात तो मान्यतेसाठी रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात येणार आहे. बोर्डाकडून याला हिरवा कंदील मिळाल्यानंतर तो मंत्रिमंडळ समिती आणि निती आयोगाकडे मंजुरीसाठी जाणार आहे. या...
फेब्रुवारी 13, 2019
औरंगाबाद - सरकारी कामे कशी होतात, याचा अनुभव फार वाईट, अशीच सहजपणे व्यक्‍त होणारी प्रतिक्रिया असते. मराठवाड्याचा विकास करण्याच्या बाता मारत चार ऑक्‍टोबर 2016 रोजी येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 32 निर्णय झाले. मात्र, 28 महिने उलटूनही अद्याप 14 हून अधिक निर्णय अपूर्णच आहेत. यावरून...
फेब्रुवारी 10, 2019
भारतात बेरोजगारीचा प्रश्‍न भेडसावतो आहे हे उघड दिसणारं वास्तव आहे. मात्र, सहा महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "प्रश्‍न नोकऱ्यांच्या कमतरतेचा नाही, तर नोकऱ्यांविषयीच्या आकडेवारीच्या उपलब्धतेचा आहे,' असं सांगितलं होतं. याचीच री तमाम मंत्री आणि समर्थकवर्ग ओढत होता. नॅशनल सॅम्पल सर्व्हे...
फेब्रुवारी 08, 2019
नवी दिल्ली: भारतरत्न म्हणजे ब्राह्मण व सवर्णणांचा क्लब आहे, असे वादग्रस्त वक्तव्य एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. भारतरत्न पुरस्कारावरून ओवेसी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. मोदी सरकारने नुकतीच माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख...
फेब्रुवारी 07, 2019
प्रि य मित्र श्रीमान उधोजीसाहेब यांसी, शतप्रतिशत प्रणाम, दंडवत, मुजरा आणि सा. नमस्कार! फार दिवसांत गाठभेट नाही. आमचे पक्षाध्यक्ष श्रीमान मोटाभाई तूर्त भलतेच काळजीत पडले आहेत. गेले अनेक दिवस ते तुमचा फोन ट्राय करत होते. परंतु, तुमचा फोन व्यग्र असून ‘कृपया प्रतीक्षा करें’ असे सांगण्यात आले. त्यांनी...
फेब्रुवारी 03, 2019
मी मागं म्हटल्याप्रमाणे प्रत्येक गुन्ह्याची एक स्वतंत्र कथा असते. तशी गुन्ह्यांच्या तपासाचीही स्वतंत्र कथा असते. त्याचं एक स्वतंत्र तंत्र असतं. गुन्ह्याची उकल करण्यासाठी गुन्हेगाराचीच मदत घ्यायची हा त्या तंत्राचा एक भाग. चोराच्याच मदतीनं चोराचा माग काढण्याची ही क्‍लृप्ती ब्रिटिश पोलिस अधिकारी खूपदा...
फेब्रुवारी 01, 2019
मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांना वाढीव वीजदराचा फटका बसू नये, यासाठी उच्चदाब उपसा जलसिंचन योजनांना प्रतियुनिट १ रुपया १६ पैसे असा सवलतीचा वीजदर लागू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिल्यानंतर दोन दिवसांतच आज ऊर्जा विभागाने तातडीने शासन निर्णय जारी केला. त्यामुळे शेतकऱ्यांना आता...
जानेवारी 30, 2019
महात्मा गांधींच्या सगळ्या शिकवणुकीचे सार एका शब्दात सांगायचे म्हटले तर तो शब्द आहे - स्वराज्य'. स्वराज्य ही संकल्पना भारताला नवी नाही. वेदकाळामध्येही ती माहिती होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या पराक्रमामागचे ध्येय स्वराज्य हे होते. लोकमान्य टिळकांनी "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क असून, तो...