एकूण 1477 परिणाम
March 07, 2021
श्रीरामपूर : तालुक्यातील बेलापूर येथील अपहरण झालेल्या व्यापाऱ्याचा मृतदेह येथील वाकडी रस्त्यावरील रेल्वे मार्गासमोरील यशवंतबाबा चौकी परिसरात रविवारी (ता.७) सकाळी आढळून आला. बेलापूर बायपास परिसरातून व्यापारी गौतम झुबरलाल हिरण यांचे सोमवारी (ता.१) अपहरण झाले होते. पोलीस तपास सुरु असतांना आज सातव्या...
March 07, 2021
लाखनी (जि. भंडारा) : राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव / सडक येथे रस्ता ओलांडणार्‍या आजोबा व नात यांना भरधाव व्हॅगनार कारने धडक दिली. या अपघातात आजोबासह चिमुकली नात यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. ६) सकाळी ७ वाजता घडली. अपघातानंतर व्हॅगनार चालक वाहनासह पसार झाला. सुखदेव विठोबा लांजेवार (वय...
March 07, 2021
औरंगाबाद  : नाशिक येथे दिनांक 26, 27, व 28 मार्च 2021 रोजी ठरलेले 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय आज अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी जाहीर केला. कोरोनामुळे यंदा साहित्य संमेलन घ्यायचेच नाही असे महामंडळाने ठरविले होते पण...
March 07, 2021
जळगाव : खोटेनगर ते पाळधी बायपास व अजिंठा चौफुली ते तरसोद प्रवेशद्वारपर्यंत महामार्गाच्या नूतनीकरणाचा लाभ ग्रामीण भागासह जळगावातील कॉलनी परिसरातील जनतेलाही होणार असून, या माध्यमातून गत निवडणुकीच्या काळात दिलेल्या वचनाची पूर्ती होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले, तर...
March 07, 2021
औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाचा संसर्ग तेजीत असून एकाच दिवशी आज (ता. सहा) ४४० जण कोरोनाबाधित आढळले आहेत. तसेच पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५२ हजार ५४३ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार २८९ जणांचा मृत्यू झाला. सध्या २ हजार ९५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत....
March 07, 2021
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी दोन दिवसांत संपल्यापासून इंग्लंडमधील अनेक माजी कसोटीपटू खेळपट्टीवर टीका करत आहेत. यात मायकेल वॉन आघाडीवर आहे; पण त्यालाच आपल्या मायभूमीत खेळलेल्या आणि दोन दिवसांत संपलेल्या कसोटीचा विसर पडला. त्या वेळी इंग्लंडनं वेस्ट इंडीजला दोन दिवसांत ‘लीडस्’ला पराजित...
March 06, 2021
बारामती : शहर व तालुक्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाला या पुढील काळात गृहविलगीकरणात राहता येणार नाही, अशा रुग्णाला कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये 14 दिवस राहावे लागणार आहे.  बारामतीतील कोरोना रुग्णाच्या आकड्याने आज पन्नाशी ओलांडल्यानंतर प्रशासनाने तातडीची बैठक घेतली. तहसिलदार विजय पाटील यांच्या...
March 06, 2021
श्रीरामपूर : बेलापूर येथील व्यावसायिक गौतम हिरण यांच्या अपहरणाच्या निषेधार्थ बेलापूर बंद ठेवण्यात आले होते. अपहरणाचा तपास लागत नसल्याने लोकांंमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरिक्षक संजय...
March 06, 2021
लाखनी (जि. भंडारा) : येथील एकात्मिक बाल सेवा प्रकल्पाच्या युवा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी कुटुंबीय झोपी गेल्यावर भाड्याच्या घरी बाथरूममधील लाकडी गजाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. ६)पहाटे ३.३० वाजता उघडकीस आली. शितल अशोक  फाळके  (वय 28 वर्ष रा. पाळडी  ता....
March 06, 2021
शिरपूर  : पक्षबांधणी हा आमचा एकमेव उद्देश आहे. पक्षाच्या ध्येयधोरणांना अनुसरूनच पदाधिकाऱ्यांची वाटचाल असावी. मतभेद मिटवून टाका. मिटत नसतील, तर आम्हाला सांगा. गरजेनुसार मलमपट्टी करू. जखम मोठी असेल, तर प्रसंगी शस्त्रक्रिया करण्यासही मागेपुढे पाहणार नाही; पण पक्ष संघटन हा एकमेव अजेंडा असून, तो राबवला...
March 05, 2021
जळगाव : येथील पांडे चौक ते इच्छादेवी चौफुलीदरम्यान पिस्तुलाचा धाक दाखवून १५ लाखांची लूट केल्याप्रकरणी मोहाडी (जि. धुळे) येथील दोन संशयितांना उल्हासनगर (मुंबई) येथून पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. त्यांच्याकडून नऊ लाखांची रोकड, पिस्तूल जप्त केले आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण...
March 05, 2021
सातारा : येथील बसाप्पा पेठेतील प्रतापसिंह शेती फार्मच्या संरक्षक भिंतीलगत असणारी अतिक्रमणे पालिकेने आज हटविली. या कारवाईवेळी त्याठिकाणी शाहूपुरी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.  येथील राज्यपाल गणपतराव तपासे पथावर (राधिका रस्ता) जिल्हा परिषदेच्या मालकीचा प्रतापसिंह शेती फार्म आहे. या...
March 05, 2021
सोलापूर : "ओल्ड इज गोल्ड', ही म्हण तरुणांमध्ये सध्या फारच रूजते आहे. आजकाल टॅटू म्हणजेच गोंदन शरीरावर रेखाटण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. युवकांमध्ये वाढतेय टॅटूची क्रेझ वाढत आहे. मात्र, कोरोनाची भीती कायम आहे. याबद्दल टॅटू व्यवसायिक आम्ही सर्वतोपरी काळजी घेतोय अशा प्रतिक्रिया एकसूरात काढत आहेत. ...
March 05, 2021
कोपरगाव (अहमदनगर) : मागील सहा महिन्यांपासून येवला रस्ता परिसरातील अनेक दुकाने वारंवार फोडली जात आहेत. चोरही दुकानांतील कुठलीही वस्तू न चोरता केवळ रोकड चोरत आहेत. मंगळवारीही (ता. 2) चोराने पाच दुकाने फोडून 52 हजार 500 रुपयांची रोकड लांबविली. या अजब चोरीच्या गजब कहानीने नागरिकांमध्ये मात्र दहशत...
March 04, 2021
मुंबई, ता. 04 : राज्यात कोविडचे रुग्ण वाढत असल्यामुळे पोलिसांना मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यासाठी शिवडी येथे राबवण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेत मास्क न घातल्याप्रकरणी दंडात्मक कारवाईपासून वाचण्यासाठी पोलिसाच्या अंगावरच ट्रक घातल्याचा गंभीर प्रकार घडला...
March 04, 2021
औरंगाबाद: शाळा अनुदानासाठी २९ जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षकांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी (ता. चार) सर्व शाळांमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाकडून घंटानाद करण्यात आले. २९ जानेवारीपासून मुंबई येथील आझाद मैदानात राज्यातील विनाअनुदानित शिक्षक...
March 04, 2021
नगर ः महापालिकेतील स्थायी समिती सभापतिपदासाठी काल शिवसेनेचे विजय पठारे यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, दोन्ही अर्जांवरील अनुमोदकांच्या स्वाक्षऱ्याच बोगस असल्याचा आक्षेप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अविनाश घुले यांनी घेतला. अर्ज दाखल करतानाही सूचक व अनुमोदकांसह शिवसेनेचे पदाधिकारी गैरहजर...
March 04, 2021
मानोरा (जि.वाशीम) : मुलीचा जल्मदर वाढविण्यासाठी मुलगी जल्मताच १८ वर्षांसाठी एक हजार रूपये फिक्स, गावातील शेकडो महिलांना विमा सुरक्षा कवच, निराधार महिलांना महिन्याकाठी मोफत धान्य तालुक्यातील कारखेडा येथील नवनियुक्त सरपंचा सोनाली सोळंके यांनी सरपंच पदाचा पदभार स्विकारताच जनहिताच्या मोठ्या घोषणा...
March 04, 2021
नाशिक : भद्रकाली पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या छळाला कंटाळून एकाने आत्महत्या केल्याचा व्हिडिओ गाजत असतानाच, आणखी एका तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.    पोलीसांनी केला खुलासा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की कुणाल गायकवाड व बिना ऊर्फ प्रिया निकम यांचा विवाह २०१४ ला झाला. विवाहानंतर...
March 04, 2021
सातारा : सातारा पालिकेने राजवाडा येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयात, तसेच गोडोली येथील (कै.) दादामहाराज आरोग्य केंद्रात शासनाच्या सूचनेनुसार ज्येष्ठ नागरिकांना कोविड 19 (Covid 19 Vaccine) वरील मोफत लसीकरण अभियान सुरू करण्यात आले आहे. या लसीकरणाचा लाभ नागरिकांना घ्यावा, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले...