एकूण 202 परिणाम
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्ली - ‘पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानात घुसून बदला घ्या, त्यांना धडा शिकवा,’ अशा संतप्त प्रतिक्रिया आज देशभरातून उमटल्या. ‘हा हल्ला विसरणार नाही, बदला घेऊ’, असा स्पष्ट इशारा ‘सीआरपीएफ’ने दिला, तर ‘दहशतवादी संघटना आणि त्यांच्या पाठीराख्यांनी मोठी चूक केली आहे. त्यांना मोठी किंमत...
फेब्रुवारी 15, 2019
नांदुरा/मलकापूर : जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने काल (ता. 14) केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे 42 जवान शहीद झाले आहेत. त्यात मलकापूर येथील संजय राजपूत या जवानाचा समावेश असल्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली...
फेब्रुवारी 13, 2019
पुणे - शिवशाही बसच्या कमी झालेल्या दरांची अंमलबजावणी बुधवारपासून  (ता. १३) राज्यभरात सुरू होणार आहे. एसी स्लीपरच्या राज्यातील ४२ मार्गांचा त्यात समावेश आहे. सुमारे २० टक्‍क्‍यांहून अधिक दर कमी झाले आहेत. खासगी बसच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी एसटी महामंडळाने पहिल्यांदाच प्रवासाचे दर कमी करून...
फेब्रुवारी 12, 2019
वांगी - वांगी (ता. कडेगांव ) जवळ कडेपूरकडून ऊस भरुन भरधाव वेगाने चाललेल्या ट्रॅंक्‍टरची मोटारसायकलला धडक बसली. काल रात्री झालेल्या या अपघातामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला. दादासो बळवंत जगदाळे ( वय 68 रा. मलकापुर, ता. कराड ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.  चिंचणी-वांगी पोलीसांतून मिळालेली अधिक माहिती...
फेब्रुवारी 12, 2019
मलकापूर : भरधाव कारने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत घिर्णी येथील 35 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज 12 फेब्रुवारी सकाळी 10 वाजता मलकापूर जामनेर राज्य मार्गावर जांभुळधाबा नजीक घडली. तालुक्यातील घिर्णी येथील ईश्वरसिंह रमेशसिंह बघेले (वय 35) हे आज सकाळी मोटरसायकल...
फेब्रुवारी 12, 2019
कोल्हापूर - मौजे मोसम व घुंगूर (ता. शाहूवाडी) येथे अपहार करणाऱ्या विनायक पाटील याला सात दिवसांची पोलिस कोठडी मिळाली असल्याचा अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे पाठविला आहे. वनसंरक्षक अमृता कांबळे हिला ताब्यात घेण्यासाठी कोल्हापूर पुईखडी येथील तिच्या घरी पोलिस चौकशीसाठी गेले होते...
फेब्रुवारी 11, 2019
कोल्हापूर  - रोजगार हमी योजनेतील रोपे संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत (जेएफएम) तयार केल्याचे दाखवून २ लाख २१ हजार ४००  रुपयांच्या अपहारप्रकरणी वनपाल विनायक नाना पाटील (राशिवडे खुर्द, ता. राधानगरी, सध्या शाहूवाडी शासकीय निवासस्थान) याला अटक करून गुरुवार (ता. १४) पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे...
फेब्रुवारी 06, 2019
सोलापूर : साखर पेठेतील मुत्यालम्मा मंदिराजवळ गेल्या दोन दिवसांपासून पडून असलेल्या लालचंद धानू पवार या सत्तर वर्षाच्या आजोबांना सामाजिक कार्यकर्त्यांनी आधार दिला आहे. बुलढाणा परिसरातील मलकापूर पाणी टाकीजवळ घर असल्याचे आजोबा सांगत आहेत. त्यांना घरी पोचवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.  लालचंद...
जानेवारी 29, 2019
मुंबई -  राज्यातील पाच नगर परिषदांचा निकाल लागला असून, यामध्ये विदर्भात दोन नगर परिषदेवर भाजपने, पश्‍चिम महाराष्ट्रात दोन ठिकाणी काँग्रेसने, तर कोकणात शिवसेनेने एका ठिकाणी आपला नगराध्यक्ष निवडून आणला आहे. पाच नगर परिषदांच्या निवडणुकीत सर्वाधिक भाजपचे ३९ सदस्य, त्यानंतर काँग्रेसचे ३०, राष्ट्रवादी...
जानेवारी 29, 2019
कऱ्हाड - स्थानिक मुद्द्यांशिवाय विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून लढलेल्या मलकापूर पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह बहुमतांवर शिक्कामोर्तब करत काँग्रेस विजयी झाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ‘टार्गेट’ करून भाजपने खेळलेल्या विधानसभेच्या रंगीत तालमीत काँग्रेसने बाजी मारली. ...
जानेवारी 28, 2019
कऱ्हाड : अटीतटीच्या झालेल्या तालुक्यातील मलकापूर पालिकेच्या निवडणुकीत भाजपवर मात करत काँग्रेसच्या पॅनेलने विजय खेचून आणला. दोन्ही पक्षांसाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची बनवली होती. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना आगामी विधानसभेपूर्वी धक्का देण्याच्या दृष्टीने भाजपतर्फे विठ्ठल...
डिसेंबर 31, 2018
कोल्हापूर : मलकापूर ते उदगिरी अंतर 27 किलोमीटरचे. त्यातले नऊ किलोमीटर अंतर घनदाट जंगलाचे. किर्र अशा अर्थाने की, प्रखर उन्हालाही या जंगलात दबकत... दबकत उतरावे लागते. दिवस मावळत आला की, गव्यांचे कळप दिसू लागतात. बिबट्या समोर दिसला तर तो क्षणात वेगळा; पण रस्त्यावरच्या मऊ लालसर मातीत...
डिसेंबर 28, 2018
मुंबई - कर्जत (जि. रायगड), मलकापूर (जि. सातारा), श्रीगोंदा (जि. अहमदनगर), आरमोरी (जि. गडचिरोली) या नगर परिषदा व महादुला (जि. नागपूर) नगरपंचायतीच्या सार्वत्रिक; तसेच विविध नगर परिषदा व नगरपंचायतींमधील 11 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 27 जानेवारी 2019 रोजी मतदान होणार असल्याची माहिती...
डिसेंबर 28, 2018
कऱ्हाड - येथील कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा विळखा वाढत असून टेंभूसाठी सुमारे तीन महिन्यांपासून अडवलेल्या कृष्णा नदीपात्रात जलपर्णी वाढू लागली आहे. पालिकेकडून त्यावर तातडीने कार्यवाही होण्याची अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्‍त होत आहे.  टेंभू योजनेसाठी सप्टेंबरमध्ये गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवसापासून...
डिसेंबर 27, 2018
कऱ्हाड - तालुक्‍यात सुमारे चाळीसहून अधिक गावांत बिबट्याच्या वावर असल्याच्या नोंदी वन विभागाकडे आहेत. गावातील नागरी वस्ती वाढत असताना, आतापर्यंतच्या पाच वर्षांत सुमारे ३०० पाळीव प्राणी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले आहेत. जंगलात बिबट्याला खाद्य मिळत नसल्याने तो नागरी वस्तीकडे वळत असताना, लोकांमध्ये...
डिसेंबर 22, 2018
मलकापूर : वन्य प्राण्यांकडुन शेतीच्या होणाऱ्या नुकसान भरपाईमध्ये दुप्पट वाढ केली आहे. ती मदत तातडीने मिळावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र ती वेळेत न मिळाल्यास शेतकऱ्यांना व्याजासह भरपाई देण्याचा कायदा करणार आहे, अशी घोषणा वननंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी केली.  मलकापुर (जि....
डिसेंबर 22, 2018
कऱ्हाड - कऱ्हाड दक्षिणच्या राजकारणात प्रभावी ठरणाऱ्या माजी आमदार विलासराव पाटील- उंडाळकर यांच्या गटाला सोबत घेऊन मलकापूर पालिकेच्या निवडणुकीमध्ये माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा गट सक्रिय होतो आहे. नुकत्याच झालेल्या मुलाखतींमध्येही काका गटाच्या समर्थकांना स्थान देण्यात...
डिसेंबर 22, 2018
सातारा - सातारा ते कागल महामार्ग क्रमांक ४८ च्या सहापदरीकरणाची कागदोपत्री प्रक्रिया सुरू झाल्याने जिल्ह्यातील ३१ गावांतील रहिवासी, व्यावसायिक, शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने तब्बल ४१ हेक्‍टर क्षेत्राचे भूसंपादन करण्याची नोटीस काढल्याने त्यातून शेकडो घरे...
डिसेंबर 20, 2018
कऱ्हाड - जातीयवादी पक्षाचा बिमोड करून कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेस बचावचा नारा देणाऱ्या माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटाचे कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते भाजपकडे झुकले आहेत. दक्षिणेत स्थिर होण्यासाठी माजी आमदार उंडाळकर गटाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत....
डिसेंबर 18, 2018
मलकापूर पांग्रा (जि. बुलडाणा) - साखरखेर्डा (ता. सिंदखेडराजा) येथील दोन शालेय मुलींनी विहिरीत उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यातील एका मुलीचा मृत्यू झाला असून, दुसरीला वाचविण्यात यश आले आहे. ही घटना शेंदुर्जन येथे सोमवारी दुपारी घडली. साखरखेर्डा येथील एसईएस हायस्कूलमध्ये...