एकूण 40 परिणाम
एप्रिल 14, 2019
"व्यक्तीचा अंतर्बाह्य वेध घेण्यासाठी लागणारी लय आणि सूक्ष्मातिसूक्ष्म शब्दच्छटा चितारणारी समचित्त वृत्तीची लेखणी आनंद अंतरकरांजवळ आहे. अशा वैशिष्ट्यांमुळंच रेखीव नि घोटीव शैलीतून ते आपल्या प्रिय व्यक्ती क्ष-किरणांच्या भेदकतेनं जिवंत करतात,' असं निरीक्षण "जे. जे. स्कूल ऑफ आर्ट'चे माजी अधिष्ठाता प्रा...
सप्टेंबर 05, 2018
पुणे - ‘‘अलीकडे माणसांमध्ये स्वार्थी वृत्ती वाढत आहे. यात बदल होऊन सर्वांना सोबत घेऊन जाणारी संस्कृती निर्माण होणे गरजेचे आहे. आज समाज विखुरला जाऊ लागल्याने हिंसाचारात वाढ होत आहे,’’ असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केले. दादा कोंडके मेमोरिअल फाउंडेशनच्या वतीने अभिनेता...
मे 24, 2018
नेहमीच्या परिचयाचा असलेला घरातला पुस्तकांचा कप्पा आवरणं, हे एखादा नवा शोध लागण्याइतकं विस्मयकारक असू शकतं, याचा विलक्षण अनुभव परवा आला. संदर्भासाठी संग्रहातलं एक पुस्तक हवं होतं. त्याचा आकार, मुखपृष्ठ, रंगसंगती हे सारं अगदी ओळखीचं होतं; पण पुस्तक नेमकं कुठं असेल, ते काही लक्षात येत नव्हतं. स्वतःकडं...
मे 17, 2018
खिडकीच्या चौकटीतून दिसणाऱ्या झाडावरचा चिवचिवाट दाट परिचयामुळं आता सवयीचा झाला आहे. परवा तिथं एकाएकी पाहुणा आवाज जाणवू लागला. आवाजाच्या रोखानं वेध घेतला, तर हिरव्या लुसलुशीत लोकरीचा गुंडा फांदीच्या एका बोटाशी खेळण्यात रंगून गेला होता. तो जीव उड्या घेत होता. नख्यांनी फांदी पकडून उलटे झोके घेत होता....
मार्च 17, 2018
पुणे - चित्रपट दिग्दर्शक दादा कोंडके यांच्या नियोजित स्मारकाबरोबरच त्यांचे चित्रपट, त्यातील भाषा, त्यांचा अस्सल मराठमोळेपणा अशा अनेक मुद्द्यांचा अभ्यास होण्याची गरज असल्याचे मत ‘सकाळ’चे संपादक मल्हार अरणकल्ले यांनी व्यक्त केले. दादा कोंडके मेमोरिअल फाउंडेशनने आयोजित...
मार्च 15, 2018
गोष्ट जुनीच आहे. एका शिल्पकाराची. बहुतेकांना ठाऊक असलेली. या शिल्पकाराला प्रश्न विचारला गेला ः इतकं देखणं शिल्प तू कसं साकार केलंस? शिल्पकाराचं स्पष्टीकरण ः मी विशेष काहीच केलं नाही; पाषाणातला नको असलेला भाग काढून टाकला. शिल्पकाराचं उत्तर अत्यंत मार्मिक होतं. एखाद्या गोष्टीला आपण ‘चांगलं’ असं लेबल...
मार्च 08, 2018
रद्दीच्या दुकानातून परवा एक पुस्तक घेतलं. जुन्या कवितांचं. प्रत्येक पानावर एक कविता. साधी-सोपी शब्दकळा. आशयघनतेचं सौष्ठव शब्दाशब्दांत भरलेलं. ओळींतले शब्द जणू स्वतःचेच सूर घेऊन आलेले. वाचताना सुरांची तान कानांत गुणगुणल्यासारखी भोवती घुटमळत राहिलेली. पुस्तकाच्या पानांचा मूळचा रंग पुरता बदलून गेलेला...
मार्च 01, 2018
संध्याकाळ जवळ येऊ लागली, की वाऱ्याच्या झोतांबरोबर अनेक काजळरेषाही वाहत निघाल्यासारखं वाटत राहतं. घरट्यांकडं परतणाऱ्या पक्ष्यांचे फडफडणारे पंख या रेषांना स्वतःबरोबर घेऊन जातात; आणि पंख उघडून मध्येच अलगद सोडून देतात. मग त्याच रेषा एकमेकींची बोटं पकडून जमिनीवर उतरतात. दिवेलागणीच्या ठिणग्या सगळीकडं...
फेब्रुवारी 15, 2018
काठोकाठ भरलेल्या भांड्यात आणखी पाणी ओतत राहिल्यावर जादा पाणी सांडत राहावं, तसा रस्त्यावरील कोलाहल सगळीकडं एकसारखा वाहत होता. संमिश्र आवाजांचा कॅलिडोस्कोप कानांत उलगडत होता. आपण यांतल्या कुठल्याही गावाचे नाही, अशा निर्विकार चेहऱ्यांची वाहनं आणि घाईतली माणसं रस्त्यांतून धावत होती. हेडफोन अडकविलेल्या...
फेब्रुवारी 07, 2018
पुणे - 'चित्रकलेतून प्रत्येक मुल व्यक्त होत असते. पण, मुलांमध्ये दडलेला अवलिया चित्रकार ओळखण्यात पालक कमी पडतात. त्यांच्यातील चित्रकाराला ते समजून घेत नाहीत. कमतरता असेल तिथे कल्पकता असते हे ओळखून पालकांनी मुलांमधील चित्रकाराला त्यांनी वाट द्यायला हवी आणि त्यांच्यातील चित्रकार घडवायला मदत करावी,''...
फेब्रुवारी 01, 2018
रसिकांना रंगीबेरंगी चित्रंच आवडतात, हा समज परवा पाहिलेल्या चित्रप्रदर्शनानं खोटा ठरविला. त्या प्रदर्शनात केवळ काळ्या रंगात केलेली रेखाटनं होती. म्हटलं, तर सारी रंगहीन चित्रं. उभ्या-आडव्या, तिरप्या, गोलाकार, लंबवर्तुळाकार, त्रिकोणी-चौकोनी असल्या आकारांना हातांत घेऊन उभी असलेली चित्रं. कॅनव्हासच्या...
जानेवारी 20, 2018
पुणे - 'मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी, तिचा सार्वत्रिक वापर होण्यासाठी महाराष्ट्रात मराठी भाषेचे विद्यापीठ असायलाच हवे. ती काळाची गरज आहे,'' असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले. सकाळ प्रकाशन आणि पुणे मराठी ग्रंथालय यांच्या वतीने...
जानेवारी 18, 2018
रस्त्याचे आयताकृती तुकडे मागं ढकलीत गाडी निघाली होती. सरकत गेलेल्या रस्त्याचे तलम कागद एकापुढं एक ठेवून दिल्यासारखा दृष्टिभ्रम पाठीकडील काच पुनःपुन्हा घडवीत होती. अंतर वाढत जाई, तसा या पांढुरक्‍या कागदांचा ढीग दिसू लागे; आणि आणखी पुढं गेल्यावर त्यांचा डोंगर होई. येताना धक्के दिलेल्या खड्ड्यांची-...
जानेवारी 14, 2018
पुणे : ''आयुष्य हे कोऱ्या कागदाप्रमाणे असते. त्यात आपणच भविष्याचे रंग भरत असतो आणि आपली स्वप्नांची दुनिया साकारत असतो. म्हणूनच त्यासाठीची मेहनत आणि चिकाटी घेऊन युवा पिढीने आयुष्याचे ध्येय गाठले पाहिजे. शेवटी 'कोशिश करनेवालों की कभी हार नही होती...' हेही खरेच आहे,'' अशा शब्दांत 'सकाळ'चे संपादक...
जानेवारी 11, 2018
हातांत शब्दकोश होता. नजर जाईल तिकडं शब्दार्थांच्या विविध छटा दिसत होत्या. परिचित शब्द, अपरिचित शब्द, माहीत असलेले आणि माहीत नसलेले त्यांचे अर्थ, मृदू शब्द, कठोर शब्द, संयमित शब्द, हल्ला करणारे शब्द, गंभीर करणारे शब्द, हसविणारे शब्द, आठवणींचा पूर आणणारे शब्द, स्वागताचे शब्द, निरोपाचे शब्द, कमी...
ऑक्टोबर 17, 2017
पुणे - ""काश्‍मिरी तरुणांच्या हाताला रोजगार, निसर्ग सौंदर्यावर आधारित उद्योगांचा विकास, आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा याकडे सरकारने अधिक लक्ष द्यायला हवे. लोकांशी संपर्क वाढवायला हवा. अशा वेगवेगळ्या धोरणांमधून "सरकार आपल्यासाठी काहीतरी करत आहे', असा विश्‍वास काश्‍मिरी जनतेत निर्माण व्हायला हवा. असे...
ऑक्टोबर 12, 2017
पुणे - "ती'च्या येण्यामुळे घरात निर्माण झालेला आनंद, जन्म ते लग्नापर्यंतच्या प्रवासातील तिच्या चेहऱ्यावरच्या विविध छटांनी-तिच्या प्रेमळ वागणुकीनं अवघ्या आयुष्याला आलेलं आनंदाच-समाधानाचं भरतं आणि ती सासरी गेल्यावरही तिच्याकडून आई-वडिलांची होणारी जपणूक...  "आपल्या' मुलीबद्दल बोलताना दाटून आलेला कंठ,...
ऑक्टोबर 11, 2017
पुणे - ""आदिवासींमध्ये प्रचंड आत्मविश्‍वास असल्याने कितीही प्रतिकूल परिस्थितीत ते आत्महत्येचा पर्याय स्वीकारत नाहीत. मुलगी कधीही गर्भात मारली जात नाहीच, उलट सहा-सात मुलानंतरही मुलीचा जन्म होण्यासाठी वाट पाहिली जाते. हुंड्यासाठी महिलेचा बळी घेतला जात नाही, तर मुलालाच हुंडा द्यावा लागतो. तिनं...
सप्टेंबर 21, 2017
पुणे -  ""सोपं असेल तर ते आयुष्य कसलं...? अडचणी, आव्हानं ही तर हवीतच ! गुळगुळीत रस्ते फार उपयोगाचे नाहीत. रस्त्यात खड्डे नसतील तर त्यातून मार्ग काढण्यासाठीची प्रगल्भता नाही येणार. तावून-सुलाखून निघालं नाही तर ते सोनं निखरेल कसं...?'' अशा अंगी स्फुल्लिंग फुंकणाऱ्या शब्दांत मंचावरून छवी राजावत बोलत...
सप्टेंबर 10, 2017
‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ आणि ‘युगल धर्म संघा’चा पुढाकार; ज्युनिअर मेंटल कॅल्क्‍युलेशन चॅम्पियनशिप  पुणे - बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकारातून गणिती आकडेमोडीची चमक स्पष्ट करणारी ‘ज्युनिअर मेंटल कॅल्क्‍युलेशन चॅम्पियनशिप २०१७’ स्पर्धा जर्मनीतील बेलफिल्ड येथे होत आहे. २९ सप्टेंबर ते ३ ऑक्‍टोबर...