एकूण 495 परिणाम
एप्रिल 19, 2019
पुणे - गेल्या चाळीस वर्षांच्या राजकीय जीवनात जाती-पातीचे गलिच्छ राजकारण मी कधीच केले नाही. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या जिवावर पाच वेळा आमदार व तीन वेळा नगरसेवक झालो. कार्यकर्ता हीच माझी ओळख आणि ताकद आहे, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी येथे केले....
एप्रिल 17, 2019
पुणे - ‘सुरक्षित पुणे, गतिमान पुणे’, ‘हरित पुणे आणि आनंदी पुणे’ या पुण्याच्या विकासाच्या चतु:सूत्रीवर भर देणारा जाहीरनामा काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी मंगळवारी जाहीर केला. तुमच्या-आमच्या मनातील पुणे साकारण्यावर माझा भर राहील, असे आश्‍वासनही जोशी यांनी दिले. महात्मा ...
एप्रिल 13, 2019
पुणे - शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याबरोबरच पादचाऱ्यांची सुरक्षितता व अपघात कमी करण्यासाठी महापालिका व पोलिस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौथी बैठक झाली. तीत वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे व विजेचे खांब काढणे, दुभाजक व सिग्नल दुरुस्ती, पादचाऱ्यांसाठी पदपथ चांगले करणे आदी उपाययोजना...
एप्रिल 07, 2019
तारीख 13 एप्रिल 1919. दिवस रविवार. शिखांचा बैसाखी सण. वेळ दुपारनंतरची. रौलेट ऍक्‍टच्या निमित्तानं ब्रिटिश दडपशाहीच्या निषेधार्थ अमृतसरमधील जालियनवाला बागेत हजारो लोक जमलेले. त्यांच्यावर बेछूट गोळीबार करणारा "बचर ऑफ अमृतसर' जनरल डायर व त्याचे शिपाई. गोळ्या संपेपर्यंत गोळीबार चालला. भीषण नरसंहार....
एप्रिल 06, 2019
एरंडोल (जि. जळगाव) : शेतीमालाला भाव द्या, कर्जमुक्त करा, मुलाबाळांना सुखाने जगू द्या, एवढीच मागणी शेतकऱ्यांची मागणी होती; परंतु गेल्या पाच वर्षांच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी केली. शेतीमालाला भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशातील शेतकरी...
एप्रिल 04, 2019
पुणे - घोषणा आणि ढोल-ताशा, हलगीच्या तालावर वंचित बहुजन आघाडीचे पुण्यातील उमेदवार अनिल जाधव आणि बारामतीचे उमेदवार नवनाथ पडळकर यांनी बुधवारी (ता. ३) जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तर पडळकर...
मार्च 27, 2019
‘सर्वांना आरोग्यसेवा’ हे ध्येय गाठताना मोफत आरोग्यसेवा पुरवण्याची व्यवस्था उभी करणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारी आरोग्य खर्चात मोठी वाढ करण्याबरोबरच सार्वजनिक आरोग्यसेवा लोककेंद्री बनविण्याचे प्रयत्न व्हावेत. या मुद्द्यांची दखल राजकीय पक्ष घेतील काय?   भा वनिक, आभासी किंवा संकुचित स्वार्थ जपणाऱ्या...
मार्च 22, 2019
भिलार - जन्मतः शारीरिक अपंगत्व लाभल्यामुळे आई-वडिलांचा आधार, जिद्द आणि बुद्धीच्या मनोधैर्यावर सहायक लेखनिक मदतीला घेऊन येथील हिलरेंज हायस्कूलची विद्यार्थिनी साक्षी संतोष घोणे हिने दहावीच्या परीक्षेपर्यंत मजल मारली आहे.   साक्षी जन्मतः ८० टक्के अपंग, विकलांग आहे. ती हात व पाय या दोन्हीचे व्यंग घेऊन...
मार्च 16, 2019
पुणे - नारायण पेठेतील शिवाजीराव आढाव वाहनतळावर चारचाकीसाठी तासाला दहा रुपये, तर तेथून अवघ्या शंभर मीटरवर असलेल्या क्रीडामहर्षी हरिभाऊ साने वाहनतळावर पाच रुपये. हाच दर महात्मा फुले मंडईतील वाहनतळांवर आहे वीस रुपये. मनमानी पद्धतीने आकारल्या जाणाऱ्या या पार्किंग शुल्काबाबत...
मार्च 12, 2019
सोलापूर : देशातील सर्वसामान्य कुटुंबांना पाच लाखांपर्यंत आरोग्य सेवा मोफत मिळावी, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्यमान भारत योजना सुरू केली. आतापर्यंत राज्यातील 83 लाख 63 हजार पात्र कुटुंबांपैकी 44 लाख 70 हजार लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले होते. आता मात्र, निवडणुकीच्या...
मार्च 11, 2019
अहमदपूर (लातूर) : महात्मा फुले विद्यालयाच्या दहावी बोर्ड परीक्षा केंद्रावर सोमवारी (ता. 11) सिलबंद लिफाफ्यात  इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका ऐवजी मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका निघाल्याने एकच गोंधळ उडाला. शेवटी बोर्डाकडून प्रश्नपत्रिका आल्यानंतर दोन तास उशीराने परीक्षा...
मार्च 09, 2019
कोल्हापूर - जिद्द, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्याच्या जोरावर काहींनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, तर काहींनी कुटुंबीयांचे स्वप्न साकारले. सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश येते, हे फौजदार परीक्षेतील यशस्वितांनी दाखवून दिले आहे. कष्टाची तयारी ठेवल्यास आयुष्यात काहीही अशक्‍य नसते, असा संदेशच जणू...
मार्च 08, 2019
दाभोळ - दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरीचे (पुणे) संचालक डॉ. संजय सावंत यांची नियुक्‍ती करण्यात आली. डॉ. सावंत सोमवारी (ता. ११) कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.  डॉ. संजय दीनानाथ सावंत यांनी, दापोलीच्या कोकण कृषी...
मार्च 06, 2019
सोलापूर : सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळेल. विद्यापीठाचा दर्जा वाढण्यासाठीही मदत मिळेल, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणात केले.  मंत्रिमंडळाच्या ठरावानंतर मंगळवारी, सोलापूर विद्यापीठाचा...
मार्च 03, 2019
कोल्हापूर - गावागाड्यातल्या शाळेत जे शिकतात ते जगाच्या व्यासपीठावर नापास होत नाहीत. गावगाड्यातल्या शाळा समाजमन कळण्याचे ठिकाण असून, तेथे माणूसपण पाहायला मिळते. विद्यार्थ्यांच्या मनाचा भक्कम पाया या शाळांत रचला जातो, असे प्रतिपादन कृषी व फलोत्पादन, पणन खात्याचे राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज येथे...
मार्च 02, 2019
पुणे : तोलाईच्या प्रश्नावर हमाल, मापाडी आणि भुसार व्यापार्‍यांत तोडगा न निघाल्याने शनिवार पासून मापाडी आणि हमालांनी मार्केटयार्डातील भुसार बाजारात बेमुंदत बंद पुकारला आहे. त्यामुळे या विभागात सकाळपासून गाड्या उतरूण घेणे तसेच भरणे हे काम ठप्प होते. उर्वरित कामे मात्र गाळ्यावर सुरू होते.  गेल्या काही...
मार्च 01, 2019
दाभोळ - दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या नावाची घोषणा केव्हाही होणार आहे. कुलगुरू शोध समितीने पाच नावांची शिफारस केलेला लखोटा राज्यपालांकडे दिला आहे. त्यानुसार या पाच जणांच्या मुलाखती राज्यपालांनी घेतल्या आहेत. पाचपैकी एकाचे नाव कुलगुरू म्हणून राज्यपाल घोषित ...
फेब्रुवारी 25, 2019
जळगाव ः शेतकऱ्यांना निश्‍चित उत्पन्न मिळावे, यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जिल्हास्तरीय प्रारंभ आज ममुराबाद (ता. जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्रात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.  आमदार सुरेश भोळे, जिल्हा अधीक्षक कृषी...
फेब्रुवारी 25, 2019
नागपूर - शेतकऱ्यांचे मरण हेच देशाचे आर्थिक धोरण असल्याची टीका समाजप्रबोधनकार ॲड. गणेश हलकारे यांनी केली. अखिल कुणबी समाजाच्या महामेळाव्यात ते बोलत होते. भावी पिढीचे हित साधायचे असेल तर केवळ निवडणुकीपुरता पुढारी म्हणून मिरवण्याचे सोडून द्यावे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाची कास धरण्यासाठी भावी पिढीला...
फेब्रुवारी 24, 2019
कोल्हापूर - महानगरपालिकेच्या रुग्णालयाला शासन मदत करेल म्हणून पाठपुरावा केला; मात्र रक्त आटले तरी मदत मिळेना. आता आपल्यालाच आपले बघावे लागेल, असा टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावला. सावित्रीबाई फुले रुग्णालयातील महात्मा फुले जनआरोग्य योजना व इतर सुविधांच्या...