एकूण 60 परिणाम
ऑगस्ट 01, 2018
महाबळेश्वर - कोकणातून महाबळेश्वरकडे येण्यासाठी 150 वर्षांपूर्वी इंग्रजांनी तयार केलेल्या आंबेनळी घाटाची दुरुस्ती व देखभालीची गरज असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. परंतु, निर्ढावलेल्या व्यवस्थेमध्ये मोठा अपघात झाल्याशिवाय त्याकडे बघितले जात नाही, हेही...
जुलै 17, 2018
कोल्हापूर - अंबाबाई मंदिराला कसे जायचे? राहण्यासाठी खात्रीलायक हॉटेल्स्‌ कोठे आहे? पार्किंग कोठे करायचे? जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळांना जायचे कसे?... असे विविध प्रश्‍न पडणाऱ्या पर्यटकांना आता घाबरून जाण्याची गरज नाही. त्यांच्या मदतीसाठी आता पोलिस धावून येणार आहेत. शहरात लवकरच ‘पोलिस पर्यटन मदत...
जुलै 09, 2018
महाबळेश्वर - गेल्या दहा दिवसांपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे वेण्णालेक दुथडी भरून वाहू लागले आहे. काल (ता. ७) पहाटे वेण्णालेकच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले. काही काळ महाबळेश्वर-पाचगणी रस्ता जलमय झाल्याने वाहतूक धिम्यागतीने सुरू होती.  महाबळेश्वर व...
जून 30, 2018
सावंतवाडी - सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या पर्यटनाला जीआय (भौगोलीक मानांकन) टूरीझम सर्किटची झालर देण्याच्या दृष्टिने प्रयत्न सुरू झाले आहेत. याबाबतचा आराखडा बनवण्याच्या दृष्टिने कामही सुरू झाले आहे. दिल्लीत याबाबत नुकतीच उच्चस्तरीय बैठक होवून यात कोकणातील या दोन्ही जिल्ह्यांबरोबरच महाबळेश्‍वर,...
जून 29, 2018
खेड - तालुक्‍यातील व कोयनेच्या जलाशयामुळे महाबळेश्‍वर तालुक्‍याशी संपर्क तुटलेल्या दहा गावांचा बाह्यजगाशी संपर्क जोडणारा रघुवीर घाट पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. तालुक्‍याचे महत्त्व पर्यटन नकाशावर अधोरेखित होत आहे. महाबळेश्‍वर माथेरानप्रमाणेच रघुवीर घाटमाथा देखील एक पर्यटनस्थळ म्हणून जगाच्या...
जून 24, 2018
सावंतवाडी - वर्षा पर्यटनासाठी जगाच्या नकाशावर कोरला गेलेला आंबोलीचा प्रसिद्ध धबधबा अडचणीत आला आहे. वरच्या दिशेने येणारा नैसर्गिक स्त्रोत कमी झाल्यामुळे दरवर्षी ओसंडून वाहणारा पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. या प्रकाराची स्थानिक ग्रामस्थांकडून माहिती मिळाल्यानंतर सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर...
जून 11, 2018
कऱ्हाड - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पर्यटन आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यात आखण्यात आलेल्या टॅकिंग रूट, जंगलातील निवास व्यवस्था, गाइड यांसारख्या पर्यटनास चालना देणाऱ्या वेगवेगळ्या प्रकल्पात बफर झोनमधील गावांतील लोकांना प्राधान्य देण्यात येणार आहे.  वन्यजीव विभागाकडून त्याचा आराखडा तयार...
जून 04, 2018
आंबोली - कबुलायतदार गावकर प्रश्‍न न सुटल्याने हिल स्टेशन असलेल्या आंबोलीला अतिक्रमणाचा वेढा पडला आहे. याचा येथील पर्यटन विकासावरही परिणाम होत आहे. आंबोलीला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचे प्रयत्न ब्रिटिशकाळापासून सुरू झाले; मात्र हे हिल स्टेशन महाबळेश्‍वर व इतर ठिकाणांइतके विकसित होऊ शकले नाही....
एप्रिल 29, 2018
मुंबई : आजपासून सलग चार दिवस सुट्ट्या मिळाल्याने मुंबईकरांनी पर्यटनासाठी शुक्रवारी (ता. 27) रात्रीपासूनच शहराबाहेर जाण्यास सुरुवात केल्याने मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वे आणि मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. या दोन्ही महामार्गांवर वाहनांच्या तब्बल पाच किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्यामुळे...
फेब्रुवारी 15, 2018
महाबळेश्वर - महाबळेश्वर शहरातून प्रतापगडाला वीजपुरवठा करणारी वाहिणी स्वतंत्र केल्याने भविष्यात प्रतापगड परिसरातील विजेचे काम करताना महाबळेश्‍वरमधील वीजपुरवठा खंडित होणार नाही. महाबळेश्वर व तालुक्‍यातील पश्‍चिम परिसरातील ग्रामीण भागाला स्वतंत्र वीज वाहिनीमुळे...
डिसेंबर 27, 2017
कऱ्हाड : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गड किल्ल्यावर विना परवाना होणाऱ्या पार्ट्यांवर कारवाई होणार आहे. पार्टीतही डॉल्बी लावण्यास बंदी आहे, तसा दणदणाट झाल्यास तो लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. कोल्हापूर परिक्षेत्रात मोठा महामार्ग येतो. त्यावर दारू पिऊन वाहन चालवण्याचे प्रकार 31 डिसेंबरला होतात...
डिसेंबर 27, 2017
कोल्हापूर - नवीन वर्षाचे स्वागत करताना एन्जॉय करा, पण मस्ती नको, असा सल्ला आज कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी नागरिकांना दिला. "थर्टी फर्स्ट'च्या निमित्ताने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर त्यांनी हा सल्ला दिला आहे. थर्टी फर्स्ट आणि नव वर्षाच्या...
डिसेंबर 21, 2017
सातारा - स्वच्छ भारत अभियानातील दुसरा टप्पा असलेल्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन उपक्रम राबविण्यासाठी जिल्हा परिषदेने आता कंबर कसली आहे. घनकचरा व्यवस्थानासाठी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २१७ गावांची निवड केली असून, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी नवीन वर्षात केली जाणार आहे. त्याबाबतच्या सूचनाही...
डिसेंबर 20, 2017
पुणे - नाताळ सण, सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुणेकरांसह राज्यातील पर्यटक किनारपट्टीला अधिक पसंती देत आहेत. गणपतीपुळे, तारकर्ली, अलिबाग, देवगड या किनारपट्टी परिसरातील असलेले हॉटेलचे दीड-दोन महिन्यांपूर्वीच ‘बुकिंग फुल’ झाले आहेत. यातून वर्षाच्या अखेरीस पर्यटनासाठी कोकण...
डिसेंबर 13, 2017
महाबळेश्वर - पोलिसांनी येथे वाहतुकीस अडथळा करत व्यवसाय करणाऱ्या दहा हातगाडीवाल्यांवर कारवाई करून त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना प्रत्येकी ५०० रुपये दंड झाला.  महाबळेश्वर सध्या पर्यटनामुळे बहरत आहे. शनिवार, रविवार पर्यटकांची येथे मोठी गर्दी होत असते. त्यामुळे...
डिसेंबर 11, 2017
नाशिक - गौरवशाली इतिहासाची साक्ष असलेले छोटे-मोठे सुमारे साडे तीनशे गड-किल्ले राज्यभरात आजही खुले आहेत. गड-किल्यांच्या पाहणीसाठी हौशींपासून तर तज्ज्ञ गिर्यारोहकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे; पण या गड-किल्यांवरील धोक्‍याच्या ठिकाणी उभे राहून सेल्फी, छायाचित्र टिपण्याचा मोह अनेकांच्या जिवावर बेतत...
नोव्हेंबर 27, 2017
नागठाणे - खडतर आयुष्य जगणाऱ्या कोयना विभागातील लोकांचे कित्येक वर्षांचे दळणवळणाचे स्वप्न आता साकार होत आहे. रेणोशी अन्‌ कोट्रोशी या गावांदरम्यान कोयना नदीवर कोट्यवधी रुपयांच्या निधीतून उभ्या राहिलेल्या ‘जीवनसेतू’मुळे हे शक्‍य झाले आहे. स्थानिकांबरोबरच पर्यटकांसाठीही नवा पूल आकर्षण ठरणार आहे. कोयना...
नोव्हेंबर 22, 2017
लोणावळा - लोणावळा- खंडाळा म्हटलं की थंड हवेचं ठिकाण, जगप्रसिद्ध चिक्कीचा आस्वाद, पावसाळी पर्यटनाचं केंद्र, रेल्वेने असो वा वाहनाने घाट चढताना आणि उतरताना दिसणारं सह्याद्रीचं निसर्ग सौंदर्य यामुळे पर्यटकांचा ओढा लोणावळा-खंडाळ्याकडे अधिक आहे. पुण्या-मुंबईसह लगतच्या परिसरातील पर्यटक बोचऱ्या थंडीतही ‘...
ऑक्टोबर 24, 2017
महाबळेश्वर  - दीपावली सुटीमुळे महाबळेश्‍वर, पाचगणी ही शहरे पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेली आहेत. येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी व बाजारपेठेत पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. पोलिसांनीही वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी शर्थीचे प्रयत्न केले असून, पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे वाहतूक...
ऑक्टोबर 09, 2017
मुंबई - राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी ध्वनी आणि वायुप्रदूषण रोखण्यासाठी लवकरच सायकलसारखी ई-वाहने चालविण्यात येणार आहेत. त्यासाठी ई-वाहनांचा झोन तयार करण्यात येईल, अशी माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली. पाचगणी, महाबळेश्‍वर या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर सायकलचा वापर केला...