एकूण 110 परिणाम
जुलै 16, 2018
महाड- पावसाची संततधार अद्याप सुरूच असून महाड मध्ये सावित्री आणि गांधारी नद्या पुन्हा धोक्याच्या पातळीजवळ आल्या आहेत. महाड जवळ असलेल्या दस्तुरी नाका ते नाते खिंड या मार्गावर आज सकाळी पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला. महाबळेश्वर मध्ये देखील एका दिवसात 298 मि.मी. पावसाची...
जुलै 14, 2018
चार प्रमुख धरणांत ५० टक्‍क्‍यांवर साठा; पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस काशीळ - जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्यामुळे धरणांतील पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. गतवर्षीच्या तुलनेत प्रमुख धरणांत अधिक पाणीसाठा उपलब्ध असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. राज्याच्या...
जुलै 10, 2018
सातारा : राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. परंतु सातारा जिल्ह्यातील फलटण, माण, कोरेगाव या तालुक्‍यांत उगवण झालेली पिके पूरेशा पावसाअभावी धोक्‍यात लागली आहेत. दरम्यान जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाटण, जावली, वाई तालुक्‍यात पावसाचा जोर कायम आहे. इतर सर्व तालुक्‍यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस...
जुलै 10, 2018
खेड - सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोरे एक महिना अंधारात असून, या खोऱ्यातील २१ गावांतील ग्रामस्थ चाचपडत जगत आहेत. ही २१ गावे कायमच दुर्लक्षित आहेत. १ जूनपासून विजेचा लपंडाव सुरूच आहे. मार्चमधे विजेची समस्या सुरू झाली होती. परंतु, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच विद्युत तारा तुटल्याने जून महिन्यापासूनच...
जुलै 09, 2018
महाबळेश्वर - गेल्या दहा दिवसांपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे वेण्णालेक दुथडी भरून वाहू लागले आहे. काल (ता. ७) पहाटे वेण्णालेकच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले. काही काळ महाबळेश्वर-पाचगणी रस्ता जलमय झाल्याने वाहतूक धिम्यागतीने सुरू होती.  महाबळेश्वर व...
जुलै 08, 2018
खडकवासला : मागील पाच दिवसांपासून घाट रस्त्यांच्या भागांमध्ये 350 ते 500 पेक्षा जास्त पाऊस पडल्याने पुणे जिल्ह्यातील माथेरान, लोणावळा, कार्ला, याचबरोबर भिवंडी, महाबळेश्वर, अंबानी, वेल्हा, अम्बा, राधानगरी, आंबोली येथील घाट रस्त्यावरील दरडी पडणाऱ्या ठिकाणी अतिदक्षता घ्यावी. असे आवाहन...
जुलै 08, 2018
पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळेदेखील येत्या आठवड्यात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी बुधवारपर्यंत (ता.11) अतिवृष्टी होण्याची शक्‍यता असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा...
जुलै 02, 2018
असळज - निसर्गाचे अलौकिक वरदान लाभलेल्या व जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गगनबावडा तालुक्‍यात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे करूळ आणि भुईबावडा या दोन्ही घाटांतील लहान-मोठे धबधबे प्रवाहित झाले आहेत. दोन्ही घाटांतील पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी हौशी पर्यटकांचे...
जून 27, 2018
पाटण - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू होता. गेल्या 24 तासांत जलाशयात दीड टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली. कोयना जलाशयात एकूण 27.65 टीएमसी पाणीसाठा झाला असून, पाणीपातळी 2071.09 फूट झाली आहे. जलाशयात सात हजार 313 क्‍युसेक पाण्याची आवक होत आहे.  रविवारी रात्रीपासून...
जून 24, 2018
पुणे - निसर्गाचा समृद्ध वारसा लाभलेल्या वरसगाव आणि पानशेत धरणांच्या परिसरात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी धरणांभोवती स्वतंत्र रिंगरोड बांधण्यात येणार आहे. त्यामुळे या भागात पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे.  पुण्यातील अनेक पर्यटक वीकेंडला लोणावळा, खंडाळा, महाबळेश्‍वर आणि खडकवासला परिसरात...
जून 21, 2018
पुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून, मध्य महाराष्ट्र मराठवाडा, विदर्भातही पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. राज्यात आजपासून (ता. 21) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर शनिवारपासून (ता. 23) राज्यात...
जून 03, 2018
पुणे : पूर्वमोसमी पावसाने राज्याच्या बहुतांश भागांत शनिवारी दमदार हजेरी लावली. मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील तीन दिवसांमध्ये जोर वाढण्याची शक्‍यता असून, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी...
जून 02, 2018
मुंबई - राज्यात ठिकठिकाणी पूर्वमोसमी पाऊस पडत असताना मुंबईकरांना मात्र आज तीव्र उष्मा जाणवला. शहरात कमाल पारा 36.1 अंश सेल्सियस होता. सांताक्रूझ केंद्राच्या परिसरात सकाळी रिमझिम पाऊस पडला. दुपारनंतर असह्य उकाडा जाणवला. सायंकाळपर्यंत ही काहिली होती.  विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजेच्या...
जून 01, 2018
चिपळूण - कोयना धरणात 10 टीएमसीहून अधिक अतिरिक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी कोयना धरणाचे दरवाजे उघडून अतिरिक्त पाणी कोयना नदीत सोडण्याची शक्यता आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यावर्षी पूर्ण क्षमतेने पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे पावसाळ्यातही धरणाचे...
मे 29, 2018
पुणे - अरबी समुद्रातील ठळक कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव दक्षिण महाराष्ट्रात जाणवू लागला आहे. बुधवारपर्यंत (ता. ३०) या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर उद्या, बुधवारपासून (ता. ३०) राज्यात सर्वदूर पूर्वमोसमी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  अरबी...
मे 08, 2018
सातारा, ता. 7 : उन्हाची तीव्रता वाढली असून, यावर्षी पारा सर्वाधिक 41.02 अंश सेल्सिअसवर गेला आहे. जलस्त्रोतही अटल्याने दुष्काळ माण, खटाव, कोरेगाव तालुक्‍यास पश्‍चिमेकडील महाबळेश्‍वर, पाटण, जावळीतील काही गावांत लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. सध्या जिल्ह्यात 33 टॅंकरना मंजुरी मिळाली असून,...
एप्रिल 30, 2018
पुणे - राज्यात तापमानातील वाढ सुरूच असल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. विदर्भात चटका अधिक असून, चंद्रपूर, अकोला, वर्धा येथे तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले आहे. गुरुवारपर्यंत (ता. ३) उन्हाचा ताप अधिक राहणार असून, विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा...
एप्रिल 21, 2018
चंद्रपूर 46 अंशांवर पुणे - पूर्वमोसमी पावसाच्या शिडकाव्यानंतर महाराष्ट्र उन्हाच्या चटक्‍यांनी पुन्हा होरपळत आहे. चंद्रपूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील पुणे, महाबळेश्‍वर, सातारा आणि कोल्हापूर वगळता राज्यातील प्रमुख शहरांमधील कमाल...
एप्रिल 09, 2018
पुणे - वादळीवारा आणि गारपिटीसह पडलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे राज्यातील उष्णतेची लाट रविवारी ओसरली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 43 अंश सेल्सिअसपर्यंत उसळलेला कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षाही खाली गेला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील चार दिवसांमध्ये तुरळक ठिकाणी...
एप्रिल 06, 2018
पुणे : विदर्भातील वनी (जि. यवतमाळ) परिसरात गुरुवारी (ता. ५) पहाटे तीन वाजता मेघगर्जनेसह तुरळक पाऊस पडला. राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने शुक्रवारपासून (ता. ६) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भासह राज्यात ढगाळ वातावरण...