एकूण 118 परिणाम
नोव्हेंबर 30, 2018
मुंबई - मोबाईल, टीव्ही, चित्रपट, इंटरनेट यामुळे शालेय वयातच, अगदी सातवी-आठवीतच विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या प्रेम प्रकरणांचे प्रमाण वाढू लागले आहे. पौगंडावस्थेतील प्रेम प्रकरणांमुळे अभ्यासावर अनिष्ट परिणाम होतो. शीव येथील एका शाळेतील सतत गैरहजर राहणाऱ्या एका विद्यार्थ्याचे समुपदेशन करण्यात आले....
नोव्हेंबर 25, 2018
समुपदेशन घ्यायची वेळ आपल्या घरातल्या कुणावर आली तर पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटते. आपल्या मुलाला किंवा मुलीला समुपदेशनाची आवश्‍यकता आहे, हा जणू आपला काहीतरी अपराध आहे असं वाटतं, ती आपली कमतरताही वाटते आपल्याला. मात्र, आवश्‍यक असेल तेव्हा समुपदेशन घेण्याचा निर्णय आपण काळजीपूर्वक घ्यायला हवा....
नोव्हेंबर 12, 2018
मुंबई - पदव्युत्तर पदविका उत्तीर्ण झाल्याची बनावट कागदपत्रे सादर करून बेकायदा नोंदणी करणाऱ्या 58 डॉक्‍टरांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यात पाच एमबीबीएस, 52 स्त्रीरोगतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, शल्यविशारद आदींचा समावेश आहे. याप्रकरणी आग्रीपाडा...
नोव्हेंबर 06, 2018
मुंबई : परळ येथील हाफकिन कार्यालयासमोर मोठ्या दिमाखात वसलेल्या केईएम अधिष्ठाता बंगल्यात राहण्यास नव्याने अधिष्ठाता पदाचे पदभार स्विकारलेल्या डॉ हेमंत देशमुख यांनी नकार दिला आहे. या अधिष्ठाता निवासात राहण्यास नकार देणारे डॉ हेमंत देशमुख हे पाचवे अधिष्ठाता ठरले आहेत. हा बंगला भूतबंगला असून, या...
ऑक्टोबर 28, 2018
नागपूर- अकरावीत असणाऱ्या विद्यार्थिनी-विद्यार्थ्यात फेसबुकवरून फ्रेंड्‌सशिप होते... नंतर दोघांत लव्ह होते... त्यानंतर दोघेही शारीरिक संबंध प्रस्थापित करतात. ती दोन महिन्यांची गर्भवती राहते... आईला प्रकार कळतो...आई मुलीसह पोलिस ठाण्यात मुलाविरूद्ध तक्रार देते... पोलिस 16 वर्षीय मुलाविरुद्ध...
ऑक्टोबर 16, 2018
आपल्याकडे मानसशास्त्रीय उपचारांमध्ये रूढ झालेल्या पाश्‍चात्त्य पद्धतीला, भारतीय पारंपरिक गोष्टी सांगण्याच्या तंत्राची जोड देत डॉ. नीलम ओसवाल यांनी वैद्यकीय-सामाजिक प्रणालींचा महत्त्वाचा संगम साधला आहे. बौद्ध तत्त्वज्ञानातील  विपश्‍यना पद्धतीचा उपयोग करून  मनाची सजगता, सतर्कता वाढविण्यावर त्यांचा भर...
ऑक्टोबर 14, 2018
औरंगाबाद : "मूल काय सांगते, ते आधी ऐका. सूचनांचा भडिमार करू नका. नाहीतर मुलं तुमच्याजवळ बोलायचं टाळतात. त्यापेक्षा सहज गप्पांमधून त्यांना आपलंसं करा,'' असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशकांनी विशेष कार्यशाळेत पालकांना दिला.  'सकाळ माध्यम समूह' आणि श्री सरस्वती भुवन शिक्षण...
ऑक्टोबर 05, 2018
सांगली : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा यंदाचा आद्यनाटककार विष्णूदास भावे गौरव पदक ज्येष्ठ अभिनेते डॉ मोहन आगाशे यांना जाहीर झाले आहे. प्रथेप्रमाणे येत्या 5 नोव्हेंबरला रंगभूमीदिनी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष भूषवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री किर्ती शिलेदार यांच्या हस्ते हा पुरस्कार...
सप्टेंबर 24, 2018
रत्नागिरी - औषधांच्या ऑनलाइन विक्रीला ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेने विरोध दर्शवला आहे. ऑनलाइन कंपन्या सर्रासपणे औषध कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन करत आहेत. अधिकारी कोणतीही कारवाई करत नाहीत. याच्या निषेधार्थ भारतातील सर्व केमिस्टस् दुकाने 28 सप्टेंबरला एक दिवसीय बंद पुकारला...
सप्टेंबर 20, 2018
पुणे - "सकाळ'चे संस्थापक संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या 121 व्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. भारत वाटवानी यांचे व्याख्यान होणार आहे. "सामाजिक बदलांमागील प्रेरणेचा प्रवाह' असा डॉ. वाटवानी यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. शिवाजीनगरमधील मॉडर्न...
सप्टेंबर 19, 2018
पुणे - क्षेत्र कोणतेही असो, समाजासाठी काही तरी करण्याची ऊर्मी मनात असली, की विधायक कार्य आपोआपच घडते अन्‌ त्यातून बदलांची नांदी होते आणि अनेकांना प्रेरणाही मिळते. जलसंधारणासाठी स्वतःचा पोकलेन देणारे विनायक वाळेकर, नोकरी सांभाळत आठ मुलांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी घेणारे श्रीपाद घोडके, महिला आणि...
सप्टेंबर 19, 2018
पुणे : क्षेत्र कोणतेही असो, समाजासाठी काही तरी करण्याची ऊर्मी मनात असली, की विधायक कार्य आपोआपच घडते. अन्‌ त्यातून बदलांची नांदी होते आणि अनेकांना प्रेरणाही मिळते. जलसंधारणासाठी स्वतःचा पोकलेन देणारे विनायक वाळेकर, नोकरी सांभाळत आठ मुलांच्या उच्चशिक्षणाची जबाबदारी घेणारे श्रीपाद घोडके, महिला आणि...
सप्टेंबर 10, 2018
औरंगाबाद : वाढती स्पर्धा आणि धकाधकीच्या जीवनात उंचावलेल्या अपेक्षापूर्तीसाठी विद्यार्थी धडपडत आहेत. त्यातून येणारे अपयश, पालकांची भीती व निराशेच्या गर्तेतून दर पंचावन्नव्या मिनिटाला देशात सतरा वर्षांच्या आतील एक विद्यार्थी आत्महत्या करीत असल्याची बाब नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या आकडेवारीतून...
सप्टेंबर 04, 2018
उपराजधानीत आठ महिन्यांत 84 हुक्‍का पार्लरवर कारवाई नागपूर : युवा पिढीचे वाढते हुक्‍का पार्लरचे व्यसन लक्षात घेता नागपूर पोलिसांनी छापासत्र सुरू केले आहे. गेल्या आठ महिन्यांत पोलिसांनी शहरातील 84 पेक्षा जास्त हुक्‍का पार्लरवर छापे घालून कारवाई केली. या कारवाईत हुक्‍का पार्लर संचालक आणि...
ऑगस्ट 18, 2018
भोसरी - काही वर्षांपूर्वी व्हाइटनरची नशा करण्याकडे लहान मुले, तसेच तरुणांचा कल होतो. त्याचे वाढते प्रमाण आणि धोके लक्षात घेऊन त्यावर बंदी आणली गेली. मात्र, व्हाइटरनची नशा करणारा वर्ग अलीकडे एका विशिष्ट प्रकारच्या सोल्यूशनकडे वळू लागला आहे; नव्हे तर त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे...
ऑगस्ट 11, 2018
औरंगाबाद : लहान मुलांची मानसिक क्षमता ओळखा. त्यांचे मित्र बना. मुलांच्या भविष्याची काळजी करतानाच थोडे वर्तमानाकडेही लक्ष दिले, तर मुले दुरावणार नाहीत, असा सल्ला समुपदेशक आणि मानसोपचार तज्ज्ञांनी पालकांना दिला आहे.  पालकांच्या अपेक्षांच्या भाराने मुलांच्या मनाचा कोंडमारा होत असल्याचे चित्र "सकाळ'...
ऑगस्ट 08, 2018
मुंबई - गतवर्षीच्या "ब्ल्यू व्हेल'च्या धुमाकुळानंतर यंदा "मोमो चॅलेंज' गेममुळे अर्जेंटिनात एका तरुणीचा मृत्यू झाल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. या गेममध्ये अतिशय भयंकर, हिंसक व्हिडिओ, फोटो, ऍनिमेशन्स पाठवून ब्रेनवॉशद्वारे हिंसक कृत्त्यांसाठी प्रवृत्त केले जाते. यातील शेवटचा टास्क आत्महत्येला...
जुलै 23, 2018
नागपूर - अस्तित्वात असलेली शिक्षण व्यवस्था केवळ पदवी मिळवून देणारी कारखाने बनली आहेत. पैशाने सारेच विकत घेता येते असा समज होऊन बसला आहे. परंतु, ज्ञान हे अनुभवातून येते असून अनुभव समृद्ध शिक्षणापासून समाज दूर गेल्याची खंत ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ आणि प्रख्यात अभिनेता डॉ. मोहन आगाशे यांनी...
जुलै 05, 2018
सोलापूरसह महानगरातील आई-वडिलांनी लढवली युक्ती सोलापूर - मुलांना पळवून नेणाऱ्या टोळीच्या दडपणामुळे राज्यभरात अनामिक भयाचे सावट पसरले आहे. त्यावर उपाय म्हणून सोलापूर, मुंबईच्या पालकांनी ‘पासवर्ड’ची युक्ती शोधली आहे. हा ‘पासवर्ड’ आई-बाबा आणि मुलांनाच ठाऊक असतो. धुळे जिल्ह्यातील राईनपाड्यात...
जुलै 03, 2018
पुणे - वयाची दोन वर्षेही न उलटलेल्या कोवळ्या बोटांमध्ये पेन्सिल देऊन मुलाचा शैक्षणिक पाया पक्का करण्याचा विचार तुम्ही करत असाल, तर क्षणभर थांबा. कारण, यातून पाया निश्‍चित पक्का होणार नाही, तर भविष्यात त्याची शैक्षणिक आणि सर्वांगीण प्रगती धोक्‍यात येऊ शकते. मुलांचे अभ्यासाचे नेमके वय, कोणत्या वयात...