एकूण 14005 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
"शब्द' देणे आणि तो पाळणे याला जीवनात एक महत्त्व आहे. जो दिलेला शब्द पाळतो, त्याच्यावर विश्‍वास व्यक्त केला जातो. जळगाव महापालिका कर्जमुक्त करण्याचा शब्द आपण गेल्या निवडणुकीत दिला होता. तो आपण पूर्ण करून जळगावकरांना कर्जमुक्त केले आहे. त्यामुळे गेल्या 35 वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : मध्य रेल्वेच्या स्थानकांत "हेल्थ चेकअप एटीएम' बसवण्यात येणार आहेत. या आरोग्य तपासणी एटीएमद्वारे प्रवाशांना फक्त 60 रुपयांत 21 प्रकारच्या आरोग्य चाचण्या अवघ्या 10 मिनिटांत करता येतील. या आरोग्य तपासणीचा अहवाल तत्काळ मिळणार आहे.  मध्य रेल्वेकडून प्रवाशांना उत्तम सुविधा देण्याचा...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाला केंद्रीय शिक्षण मंडळाकडून पुरेसे स्थान देण्यात येत नसल्याची टीका राज्यातून सातत्याने होत असताना राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने नेमका तोच कित्ता गिरवला आहे....
ऑक्टोबर 17, 2019
नवी मुंबई : लोकलच्या दरवाजात उतरण्यासाठी उभ्या असलेल्या एका महिलेच्या हातातील पर्स रेल्वेस्थानकावर उभ्या असलेल्या चोरट्याने खेचून पलायन केले. ही घटना रविवारी रात्री सानपाडा रेल्वेस्थानकात घडली.   तक्रारदार महिला हरजित कौर हरजित सिंग माटा (वय ६२; रा. घणसोली) या रविवारी दुपारी मुंबईत...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : राज्यात शिवसेनेसोबत पुन्हा सत्तेवर येऊ असे म्हणत असलेल्या भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात ते लढत असलेल्या 164 जागांपैकी 122 जागांवर विजय निश्चित असल्याचे समजले जात असून, 40 जागांवर जोरदार लढत होईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर, बारामती आणि मालेगाव मध्य येथे भाजपने आताच पराभव...
ऑक्टोबर 17, 2019
नवी मुंबई : एमआयडीसी, सिडको व वन विभागाच्या मोकळ्या भूखंडावर अनधिकृतपणे झोपड्या बांधणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने पोलिस बंदोबस्त उपलब्ध होत नसल्यामुळे, या घरांवर कारवाई होत नसल्याचा फायदा घेत काही भूमाफियांचे शासकीय जमिनी गिळंकृत करण्याचे प्रयत्न सुरू...
ऑक्टोबर 17, 2019
पुणे - आंबिल ओढ्याच्या पुराने शेकडो घरादारांचे-वाहनांचे नुकसान तर केलेच; पण त्याचबरोबर माणसांचेही जीव घेतले. या पुरामागचे कारण येऊन ठेपले ते ओढ्यावरील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवर. अर्थात हे वास्तव असले, तरी या पुरामागची आणखी एक गोम आहे, ती म्हणजे कात्रज घाट. या घाटातील पाणी वाहून नेणारी गटारे...
ऑक्टोबर 17, 2019
नवी मुंबई  : आठ वर्षीय मेहुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला 20 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. नूर आलम जमशेद शेख (28) असे आरोपीचे नाव आहे. ऑक्‍टोबर 2018 मध्ये उरणच्या करळ भागात ही घटना घडली होती. या गुह्यातील पीडित अल्पवयीन...
ऑक्टोबर 17, 2019
सातारा : "विकास करायचाय' या एकाच मुद्दामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यात नजीकच्या काळात राजकीय स्थित्यंतरे झाली आहेत. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (ता. 17) येथे येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आगामी काळात काय कायापालट होणार याची दिशा मोदींच्या भाषणातून समोर येणार का,...
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर : रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात नागरिकांनी महापालिका व वाहतूक पोलिस विभागाने उपलब्ध करून दिलेल्या सोशल मीडिया साईट्‌सवर तक्रार दाखल करावी. या तक्रारींची सात दिवसांत संबंधित विभागाने दखल घ्यावी. मुदत संपल्यानंतरही तक्रारीची दखल न घेतल्यास पोलिस विभागाने प्रकरणाच्या चौकशीची...
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर : गुजरातच्या व्यापाऱ्याची पाच कोटींनी फसवणूक करून एक कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेला झोपडपट्टी डॉन संतोष आंबेकर याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. पीसीआरमध्ये असताना त्याला चांगला पाहुणचार देण्यात आल्यामुळे त्याची प्रकृती बिघडल्याची चर्चा आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई ः मुंबई रेल्वे पोलिस दल स्थापन झाल्यापासून त्याच स्वरूपात असणारी पोलिसांची टोपी आता नव्या रूपात समोर आली आहे. मुंबई रेल्वे पोलिस आयुक्त रवींद्र सेनगांवकर यांच्या संकल्पनेतून प्रथमच टोपी बदलण्यात आली आहे. मंगळवारी (ता. १५)  डॉ. अब्दुल कलाम यांच्या...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : दररोज सुमारे दोन लाख नोकरदारांची भूक भागवणाऱ्या डबेवाल्यांना सध्या मोनो आणि मेट्रो गाड्यांतून प्रवास करण्यास प्रतिबंध आहे. त्यामुळे नव्या मोनो आणि मेट्रो सेवेत डबेवाल्यांसाठी आरक्षित जागा किंवा वेगळा डबा द्यावा, अशी मागणी डबेवाला संघटनांनी एमएमआरडीएकडे केली आहे. डबेवाला...
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंझावती प्रचारसभांनी आज महाराष्ट्राचा राजकीय अवकाश ढवळून काढला. अकोल्यातील पहिल्या सभेत त्यांनी पुन्हा एकदा ३७० व्या कलमाचा मुद्दा उपस्थित करताना विरोधकांना धारेवर धरले, तर जालना जिल्ह्यातील परतूर येथील सभेत मराठवाड्याचा...
ऑक्टोबर 17, 2019
नवी मुंबई : सध्या मंदीची लाट असल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र दिवाळ सणावर त्याचा फारसा परिणाम जाणवत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या दिवाळीसाठी बाजारपेठ तेजीत असून, ग्राहकांचीही खरेदीसाठी लगबग सुरू आहे. कंदील व इतर सजावटीच्या सामनासह फटाक्‍यांची...
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो; मात्र २००९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे पुंडलिक म्हात्रे यांच्यावर अपक्ष उमेदवार गणपत गायकवाड यांनी मात केली. २०१४ च्या ‘मोदी लाटे’तही गायकवाड यांनी भाजपसह शिवसेनेला पराभवाची धूळ चारली. आता गायकवाडच...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई - पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंकेवरील (पीएमसी) निर्बंधांमुळे बॅंकेचे खातेदार आणि ठेवीदार प्रचंड मानसिक तणावात आहेत. या तणावामुळे दोन खातेदारांचा मृत्यू झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पीएमसी बॅंकेच्या प्रशासकांनी बुधवारी रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरांची भेट घेतली....
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : आरे वसाहतीची देखभाल करणाऱ्या दुग्धविकास (डेअरी) विभागाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) मेट्रो भवन बांधकाम करण्यासाठी नुकतीच परवानगी दिली. परंतु, त्यासाठी आणखी ७० झाडे तोडली जाण्याची शक्‍यता असल्याने पर्यावरणप्रेमींनी या बांधकामाला तीव्र विरोध...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : देशातला प्रत्येक वर्गातील माणूस त्रस्त असताना उद्योगपतींना लाखो कोटी रुपयांची कर्जमाफी मोदी सरकार देत आहे. मोदी व फडणवीस सरकारला लोकभावनेची कदर नाही, त्यामुळे हे सरकार उलथवून टाका, असे आवाहन करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र व राज्य सरकारवर हल्लाबोल केला. चेंबूर...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : दादर-परळ स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे आज (ता.16) मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळित झाली. परिणामी सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत होत्या. मध्य रेल्वेचे बिघाडसत्र सुरू असतानाच बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास दादर-परळ...