एकूण 918 परिणाम
जून 29, 2019
मुंबई - वैद्यकीय प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज करण्याची मुदत गुरुवारी सायंकाळी संपली. या मुदतीपर्यंत 69 हजार 576 विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून, यापैकी 59 हजार 276 विद्यार्थ्यांनी अर्जाचे शुल्क भरले आहे. यात मुंबईतील विद्यार्थ्यांची 5,803 संख्या अधिक आहे, तर सर्वांत कमी...
जून 28, 2019
मुंबई : जून महिना संपत आला तरी मुंबईमध्ये पावसाला सुरवात झाली नव्हती. मात्र, आज अखेर पावसाची प्रतिक्षा संपली. मुंबई शहर आणि उपनगरात आज सकाळपासून जोरदार पावसाला सुरवात झाली आहे.  पुढील काही तासांत मुंबईसह उपनगरात जोरादार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबईसह...
जून 27, 2019
कोल्हापूर - लाखो कागदपत्रांची छाननी, त्यातून शोधलेले पुरावे व यासाठी चार - पाच महिने रात्र दिवस केलेल्या कामाचे आज चीज झाले, अशी प्रतिक्रिया राज्य मागासवर्ग आयोगाचे विधी सल्लागार व कोल्हापुरचे सुपुत्र निवृत्त प्रमुख जिल्हा न्यायाधीश के. डी. पाटील यांनी व्यक्त केली. आम्ही दिलेल्या अहवालानुसार मराठा...
जून 27, 2019
पंढरीच्या पांडुरंगाला युगानुयुगे विटेवरी उभे करून ठेवणाऱ्या भक्त पुंडलिकाप्रमाणे माणसांचे वर्तन असावे, असा संदेश देणारा उपक्रम म्हणजे ‘साथ चल’. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि फिनोलेक्‍स केबल्स कंपनी यांनी गेल्या वर्षी तो सुरू केला. ‘वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या सेवेची’ ही त्याची मूळ संकल्पना. त्याची...
जून 26, 2019
नाशिक - येथील गंगाघाटावर दिवसभर तळपत्या उन्हात, कडाक्‍याच्या थंडीत अन्‌ ऊन, वारा, पावसात बसलेले काही भिकारी हे दानशूरांनी दिलेल्या पै-पैच्या जिवावर सावकार झालेत. व्यापाऱ्यांना गंगाघाटावरील काही भिकारी हे १२ टक्के व्याजाने पैसे देतात. त्याच वेळी फुलेनगरमधील काही गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तींकडून...
जून 25, 2019
मुंबई : ठाण्याची डिअँड्रा वॅलाडॅरेस तसेच पुण्याचा जयकुमार गावडे यांनी राज्य ऍथलेटिक्‍स स्पर्धेत वेगवान धावपटूचा किताब पटकावला. प्रतिस्पर्ध्यांपेक्षा वाढत्या उकाड्यानेच मरिन लाइन्स येथील विद्यापीठ क्रीडा मैदानावर झालेल्या या स्पर्धेत स्पर्धकांचा कस पाहिला.  पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीत...
जून 24, 2019
मुंबई - गिरणी कामगारांना मुंबईबाहेर घरे उपलब्ध करून द्यावीत, असे वक्तव्य गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केल्याने गिरणी कामगार संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मुंबईत सर्वसामान्यांना परवडणारी घरे शिल्लक नाहीत; तसेच अतिरिक्त भूखंडही नाही. त्यामुळे आता महानगर क्षेत्रात...
जून 23, 2019
मुलांची शिक्षणातली रुची वाढावी आणि शिक्षकवर्गालाही शिकवण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी मुंबई आणि परिसरातल्या चारशेहून अधिक शाळांमध्ये एक अभिनव उपक्रम राबवला जात आहे. "रोजनिशी' हा त्या उपक्रमातला मुख्य भाग. शिक्षणपद्धती सुधारावी यासाठी राबवल्या जात असलेल्या या उपक्रमाविषयी... भिवंडीला...
जून 22, 2019
नागपूर :  राज्यातील 16 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांसहित मुंबई, ठाणे महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांत एकूण 970 एमबीबीएसच्या जागा वाढविण्यात आल्या आहेत. विशेष असे की, यातील तीनशे जागा विदर्भातील मेडिकल, मेयोसहित सहा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वाढल्या...
जून 21, 2019
मुंबई - तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातील अनेक मौल्यवान दागदागिने, वाहिलेल्या वस्तू व पुरातन नाणी गैरव्यवहाराची राज्य गुप्तवार्ता विभाग (सीआयडी) मार्फत चौकशी केली जाणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिली.  तुळजाभवानी देवस्थानचा खजिना व भिवंडी तालुक्‍...
जून 19, 2019
एलनजी वापरणारे देशातील पहिले राज्य; एक हजार कोटींची बचत होणार  मुंबई - एसटीच्या डिझेलवर धावणाऱ्या 18 हजार गाड्यांपैकी, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील 1200 गाड्या एलएनजीवर (लिक्विफाईड नॅचरल गॅस) चालविण्यात येतील. त्यामुळे वर्षाला एक हजार कोटींची बचत होईल. अशा प्रकारे एलएनजी वर...
जून 19, 2019
मुंबई - शहरी पायाभूत प्रकल्पांचा अर्थसंकल्पात उल्लेख आहे. तसेच खर्चाची आकडेवारी दिली आहे. मात्र, निधीची तरतूद नाही. समृद्धी महामार्गासाठी ५५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. असे असले तरी या प्रकल्पासाठी खर्चाची तरतूद या अर्थसंकल्पात केलेली नाही.      मुंबई...
जून 17, 2019
नवी मुंबई : तक्रारींची खातरजमा न करता दोन कामगारांना थेट चोरीच्या गुन्ह्याखाली गोवण्याचा रायगड जिल्ह्यातील दिघी सागरी पोलिसांचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. वडवली गावात सूतार काम करणारे कामगार रवी शिलकर आणि दिलीप गुहागरकर यांच्यावर एका घरापाठीमागील जूनी पडीक कौले चोरून याच गावातील...
जून 17, 2019
मुंबई - आलेल्या तक्रारींची खातरजमा करणे व ज्यांनी चूक केली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे हे खरे तर पोलिसांचे कर्तव्य... परंतु तेच कर्तव्य पाळण्यात रायगड पोलिसांकडून कसूर झाल्याचे नुकतेच एका घटनेतून समोर आले आहे. श्रीवर्धन तालुक्‍यातील वडवली गावात दूरध्वनीवरून आलेल्या अशाच एका...
जून 12, 2019
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या सत्तावीस गावांमधील घर नोंदणी प्रक्रियेत आठशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. या गावांची स्वतंत्र नगरपालिका व्हावी यासाठी संघर्ष करणाऱ्या सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या...
जून 09, 2019
रत्नागिरी - विकासाच्या नावाखाली वृक्षतोड होते. त्यामुळे फुलपाखरांचा अधिवास नष्ट होतो. फुलपाखरे सोंगाडी असतात, शत्रूपासून वाचण्यासाठी अनेक युक्त्या करतात हे मी पाहिल्यावर अभ्यास सुरू केला. काही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ठाण्याप्रमाणेच रत्नागिरीतही ही स्थिती येऊ शकते, असा धोक्याचा इशारा...
जून 09, 2019
कळवा : गेल्या काही वर्षांत कळवा, ठाणे, मुंबई येथील रेल्वे रूळालगत असणाऱ्या गटारातील सांडपाण्यावर भाजीपाला पिकवला जात असल्याच्या अनेक बातम्या आपण ऐकल्या आणि वाचल्याही असतील, परंतु कळवा, खारीगाव व ठाण्यातील महिलांनो भाजी खरेदी करताना जरा सावधान...मानवी मनाला चीड व संताप आणणारी आणि...
जून 05, 2019
जळगाव - ‘फस्टलाईफ इन्शुरन्स’च्या मुंबई येथील मुख्य कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून तत्काळ पॉलिसीचा प्रीमियम ऑनलाइन भरण्यास भाग पाडून १ लाख १४ हजार ३८८ रुपयांत फसवणूक केल्याची घटना घडली होती. तक्रारदार यांनी जिल्हापेठ पोलिस ठाणे व तेथून सायबर पोलिस ठाण्यात या प्रकरणी दिलेल्या...
जून 04, 2019
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समिती सभापती पदाची निवडणूक बुधवार ता. 12 जूनला दुपारी 12 वाजता होणार असून या निवडणुकीचे निवडणूक अधिकारी म्हणून ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे पाहणार असून परिवहन समिती सभापती पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.  कल्याण...
मे 31, 2019
पिंपरी - राज्यातील पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. याबाबत विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) राजेश प्रधान यांनी आदेश काढला आहे. त्यामध्ये पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील दोन निरीक्षक, एक सहायक निरीक्षक व दोन उपनिरीक्षकांचा समावेश आहे. तर, पाच निरीक्षक, दहा सहायक...