एकूण 29208 परिणाम
नोव्हेंबर 15, 2016
मुंबई - ज्येष्ठ रंगकर्मी, मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी तसेच मालिकांत अनेक भूमिका आपल्या अभिनयाने अविस्मरणीय केलेल्या जयंत सावरकर यांची ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली. ६१ वर्षांहून अधिक काळ त्यांनी रंगभूमीची सेवा केली आहे. एकमताने निवड झाल्याने...
नोव्हेंबर 15, 2016
मुंबई - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘यंग इन्स्पिरेटर नेटवर्क’ (यिन) च्या महाविद्यालयीन स्तरावर निवडून आलेल्या प्रतिनिधींतून सोमवारी (ता. १४) रायगड, नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईसाठी जिल्हा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. ते राज्यस्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील. ‘...
नोव्हेंबर 15, 2016
मुंबई -पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटाबंदीचा फटका चित्रपटसृष्टीला चांगलाच बसलेला आहे. काही चित्रपटांचे चित्रीकरण ठप्प झाले आहे; तर काही चित्रपट निर्मात्यांनी आपापल्या चित्रपटाचे चित्रीकरण पुढे ढकलले आहे. चित्रपटनिर्मितीची संख्या काहीशी घटणार आहे; शिवाय कलाकारांच्या सुपारीलाही याचा...
नोव्हेंबर 15, 2016
मुंबईमुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपची अमराठी मतांसाठी धडपड सुरू आहे. यासाठी कार्यकारिणीवर अमराठी भाषिकांची सर्वाधिक वर्णी लावली आहे. मुंबई भाजपची नवी कार्यकारिणी मुंबई भाजपचे अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांनी सोमवारी जाहीर केली....
नोव्हेंबर 15, 2016
मुंबई - युवा पिढीला शास्त्रीय संगीताचे महत्त्व पटवून देण्यासाठी ‘क्‍लासिकूल’ ही शास्त्रीय फ्युजन संगीत रजनी होणार आहे. ही मैफील शुक्रवारी (ता. १८) वरळीतील नेहरू सेंटरमध्ये संध्याकाळी ७ वाजता होणार आहे. या कार्यक्रमात गायक शंकर महादेवन सहभागी होणार आहेत. ‘क्‍लासिकूल’ कार्यक्रमात...
नोव्हेंबर 15, 2016
मुंबई - ‘कौल’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण केवळ १० जणांनी केले आहे. हा चित्रपट १८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. लेखक व दिग्दर्शक आदिश केळुसकरने ‘कौल’ चित्रपटाची कथा निर्माते चिंटू सिंग यांना ऐकवली. त्यांना आदिशला काय म्हणायचे आहे, हे कळलेच नाही; मग त्याने स्वत:च चित्रीकरण करण्याचे...
नोव्हेंबर 15, 2016
मुंबई -  बलात्कारित मुली-स्त्रियांच्या मागे उभे राहण्याची, त्यांचे सामर्थ्य वाढविण्याची जशी गरज आहे, तशीच एकल पालकत्व, परित्यक्ता, कुमारी माता, घटस्फोटिता, विधवांसाठी अक्षर चळवळ चालवून जनजागृती करण्याची व संकटकाळात त्यांना आश्वासक साथ देण्याची आवश्‍यकता आहे, असे प्रतिपादन डॉ. विजया वाड...
नोव्हेंबर 15, 2016
मुंबई - जुन्या पाचशे आणि एक हजारच्या नोटा बदली करताना बॅंकांच्या ठेवींमध्ये मोठी वाढ होत आहे. ही प्रक्रिया ३० डिसेंबरपर्यंत सुरू राहणार असून, या कालावधीत बॅंकिंग यंत्रणेत मोठ्या प्रमाणात रोकड उपलब्ध होईल. यामुळे नजीकच्या काळात कर्ज आणि ठेवींवरील  व्याजदर कमी होतील, असे सूतोवाच भारतीय...
नोव्हेंबर 15, 2016
अमरावती - संत्र्याला चांगले भाव मिळण्याचे संकेत असतानाच अचानक पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्याने त्याचा लाभ व्यापाऱ्यांनी घेतला. याचा फटका शेतकऱ्यांना बसला. आता तोंडाशी आलेला घास जाण्याची भीती शेतकऱ्यांत व्यक्त करण्यात येत आहे.  जिल्ह्याच्या मोर्शी, वरुड, अचलपूर, चांदूरबाजार या...
नोव्हेंबर 15, 2016
मुंबई -एसटी बसमधून २४ नोव्हेंबरपर्यंत ५० किलो भाजीपाला निःशुल्क वाहून नेण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. चलनातून ५०० व हजाराच्या नोटा रद्द झाल्याने शेतकऱ्यांनाही फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राज्य एसटी परिवहन...
नोव्हेंबर 15, 2016
मुंबई - दर गळीत हंगामाच्या अगोदर नियमितपणे होणारी ऊस नियंत्रण मंडळाची बैठक येत्या 25 तारखेला होणार आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत ऊसउत्पादक शेतकरी, ऊसतोड कामगार ते साखरनिर्मिती करणारे कारखाने यांच्या मागण्या आणि समस्या यावर चर्चा करण्यात येणार आहे.  स्वाभिमानी शेतकरी...
नोव्हेंबर 15, 2016
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठातील कुलसचिवपदासाठी उद्या (ता. 15) मुलाखत प्रक्रिया होत आहे. प्रलंबित प्रश्‍नांची जाणीव ठेवून सतरा उमेदवारांना मुलाखत प्रक्रियेस सामोरे जावे लागणार आहे. मुख्य इमारतीतील व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहात सकाळी नऊ वाजता मुलाखत प्रक्रियेस सुरवात होईल.  विद्यापीठातील...
नोव्हेंबर 14, 2016
सदरील मजकूर आम्ही जापानमधील कोबे रेल्वे स्टेशनवरील वेटिंग रूममध्ये बसून लिहीत आहो! नुकताच आम्ही टोक्‍यो ते कोबे असा बुलेट प्रवास केला असल्याने आमचे डोकीवरचे सर्व केस मोरीच्या ब्रशासारखे उभेच्या उभे आहेत. साकेची आख्खी बाटली आदल्या रात्री घशात गेल्याप्रमाणे डोळे तांबडेलाल झाले आहेत. (अज्ञांसाठी...
नोव्हेंबर 14, 2016
टीप मिळत नसल्याने ५० टक्के बारबाला आणि वेटर घरी मुंबई - चलनातून पाचशे-हजारच्या नोटा रद्द झाल्याचा फटका मुंबईतील डान्स बारनाही बसला आहे. चार दिवसांपासून डान्स बारमध्ये शुकशुकाट पसरला आहे. बारबाला आणि नोकरांना टीप मिळत नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. येत्या...
नोव्हेंबर 14, 2016
मुंबई - मुलांना कोवळ्या वयात शिक्षण देण्याऐवजी त्यांना कामाला जुंपणाऱ्या ठेकेदारांना मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने चांगलाच दणका दिला आहे. पोलिसांनी दहा महिन्यांत कारवाई करून तब्बल ६७० बालकामगारांची सुटका केली आहे. बालकांना कामाला जुंपणाऱ्या ४५६ जणांना गजाआड केले....
नोव्हेंबर 14, 2016
मुंबई - रविवारच्या सुटीचा दिवस अनेकांचा आरामात जातो. हक्काची रजा असल्याने कुटुंबीयांसमवेत वेळ घालवता येतो...  मात्र, आजचा रविवार काहीसा वेगळा ठरला. अनेक मुंबईकरांनी कुटुंबीयांना सोबत घेऊन सकाळीच बॅंक गाठली. तिथली गर्दी बघून एटीएम सेंटरकडे धाव घेतली... आराम, मांसाहार अन्‌ पोटपूजा सोडून...
नोव्हेंबर 14, 2016
मुंबई - टाटा समूहातील कंपन्यांवर नियंत्रण मिळविण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे, हा आरोप धादांत खोटा, असा प्रतिवाद टाटा सन्सचे हकालपट्टी केलेले अध्यक्ष सायरस मिस्त्री यांनी रविवारी केला. टाटा सन्सकडून स्वतंत्र संचालकावर सुरू असलेली टीका दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.  टाटा सन्सच्या...
नोव्हेंबर 14, 2016
ज्या कॉंग्रेसने (महाष्ट्रातील) भाजपला सळो की पळो करून सोडणे अपेक्षित होते तसे होताना मात्र दिसत नाही. विधानसभेचे अधिवेशन असू द्या किंवा घेतलेला कोणताही निर्णय असू द्या! विरोधीपक्षाची भूमिका कॉंग्रेस नव्हे तर शिवसेना घेत आहे. विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे-पाटील नसून उद्धव ठाकरे आहेत की काय ? असा...
नोव्हेंबर 14, 2016
निमित्त...जिप्सी शिवाजी पार्क मुंबईतल्या शिवाजी पार्कजवळच्या ‘जिप्सी’ या प्रसिद्ध हॉटेलचे संस्थापक राहुल लिमये यांच्या आठवणींचा हा संग्रह. लहानपणीच्या व्रात्यपणापासून ते या हॉटेलच्या उभारणीपर्यंतचा प्रवास त्यांनी सविस्तरपणे लिहिला आहे. त्यांच्या कारकिर्दीतले टप्पे, हॉटेल उभारण्याचा प्रवास,...
नोव्हेंबर 14, 2016
सध्याच्या शिक्षणव्यवस्थेविषयी अधिकारवाणीने लिहू शकणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे. बालवाडी ते पदव्युत्तर वर्गांना अध्यापन करण्याचं कौशल्य आणि भाग्य लाभलेले उपक्रमशील शिक्षक म्हणून संपूर्ण राज्यात त्यांचा लौकिक आहे. ‘नवे शिक्षण, नवे शिक्षक’ हे नावीन्याचा ध्यास घेऊन त्यांनी...