एकूण 591 परिणाम
मे 25, 2019
महाविद्यालयाच्या पहिल्या दिवशी मी बावरले होते. गोंधळले होते. त्यामुळे शब्दही गडबडले होते. महाविद्यालयातील माझे पहिले पाऊल गांगरलेपणानेच पडले. एकदम मोकळ्या वातावरणात वावरणारे भावखाऊ कॉलेजकुमार आणि कॉलेजकन्या पाहता मी शाळकरी नवीन साडीचा लफ्फा सावरत प्रवेश करीत होते. आईने एक कंपास बॉक्‍स टाईप पर्स मला...
मे 22, 2019
रखरखीत दुपार. निवडणुकीच्या कामाचे प्रशिक्षण होते. मूड थोडा वैतागलेलाच होता. प्रशिक्षण देणारी व्यक्ती उत्साहमूर्ती होती. "इलेक्‍शनला जाताना पिकनिकला जातोय असे समजायचे, तुम्हाला काहीच त्रास वाटणार नाही, उलट एन्जॉय कराल एक वेगळा दिवस,' या त्यांच्या शब्दांनी सर्वांचा मूड बदलला. वैताग गेला आणि आम्ही...
मे 20, 2019
चांदणी म्हटले की आकाशात चमचमणारी चांदणी आठवायची. पण हल्ली चांदणी चमकते ती "अटी लागू' हे शब्द उजळण्यासाठी. सकाळपासून रात्रीपर्यंतच्या सर्व वस्तूंच्या खरेदीवर "ऑफर्स' असतात. या ऑफर्समध्ये या चांदणीला अढळ स्थान असते. म्हणजे की, चार शर्ट अगदी मोफत फक्त एका शर्टच्या खरेदीवर, सिमला, कुलू-मनाली सहल फक्त...
मे 18, 2019
आज भाच्यांच्या गाडीतून फिरतो, पण त्यांच्या वडिलांबरोबर भाड्याच्या सायकलवरून फिरण्यात अधिक आनंद होता. अकरावी झाल्यानंतर पुण्यात आलो. माझे मेहुणे एच. वाय. सय्यद पुण्यात पोलिस खात्यात लेखनिक होते. त्यांनी प्रयत्न करून किर्लोस्कर फिल्टर्स कंपनीत नोकरी मिळवून दिली. त्यांच्याकडेच राहून तीन वर्षे या...
मे 17, 2019
लहान असताना न समजलेले काही अर्थ आजी झाल्यावर उमगतात आणि आठवत राहते आपल्या आजीच्या मायेची साय. माझ्या वडिलांच्या अचानक मृत्युमुळे माझी आजी (आईची आई) आमच्याकडे राहायला आली. शाळेतून आल्यावर आजीने केलेल्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेत मी आजीला शाळेतल्या गंमतीजंमती सांगत असे. मैत्रिणींशी धरलेला अबोला,...
मे 16, 2019
पिंपरणीच्या सावलीत गुरेही विसावायची आणि मुलेही खेळायची. सगळ्यांनाच पिंपरणीचा लळा होता. बारमाही वाहणाऱ्या तीन ओढ्यांनी वेढलेल्या, मळ्यांनी नटलेल्या; कडुलिंब, चिंच, पिंपरणी, वड, पिंपळानी घराघरांवर छत्र धरलेल्या गावात बालपण गेले. माझ्या तीनही मुलांचे प्राथमिक शिक्षण तिथेच झाले. घराशेजारी मोठी पिंपरणी...
मे 15, 2019
पाइपात कुत्रीने सहा पिल्लांना जन्म दिला. उपाशीपोटी दोन दिवस तिथेच काढले. तिला बाहेर येता येत नव्हते की हालचालींना जागा नव्हती. सकाळची वेळ. फोन वाजला, एका सफाई कामगाराचा होता. तो म्हणाला, "ताई, परिहार चौकात लवकर या. थोडं काम आहे.'' मी लागलीच निघाले. तो सफाई कामगार एका उघड्या गटाराजवळ उभा होता....
मे 11, 2019
ऐकू येत नाही म्हणून ती एकटी पडली होती; पण तिच्या कानातील मळ काढला आणि ती फुलली. खाटपेवाडीत रुजू होऊन आठवडा झाला होता. लक्षात आले, चौथीतल्या प्रियांकाला इतर सामावून घेत नाहीत. मुलांची भांडणे म्हणून दुर्लक्ष केले. पण लक्षात आले, की सर्व जण तिच्याकडे दुर्लक्ष करायचे. गटकार्यात, उपक्रमात, खेळात तिला...
मे 10, 2019
सुटीत दिवसभर मुले टीव्हीसमोर किंवा मोबाईलवर गेम खेळत बसतात. त्याऐवजी त्यांना गुंतवणारे काम दिले तर? बेल वाजली. दारात चार-पाच छोटी मुले उभी. ""काकू, तुम्हाला नारळ हवे आहेत का? आमच्या बागेतील माडांचे नारळ आणि खोबऱ्याच्या वाट्या आहेत.'' प्रत्येकाच्या खांद्याला पिशवी होती. ""अरे, तुम्ही कुठून आलात...
मे 09, 2019
हातमागांच्या आवाजाच्या लयीत बालपण गेले. त्याचे ताणे-बाणे अजूनही प्रेरणा देतात. माझे माहेर पाथर्डीला. आम्ही कसबा पेठेत राहत होतो. माझ्या आजोबांचा साड्या विणण्याचा व्यवसाय होता. मोठ्या वाड्यामध्ये मागच्या बाजूला कारखाना व जोडूनच पुढे घर. पंधरा हातमागांवर साडी विणण्यासाठी बसलेले विणकर अजूनही आठवतात....
मे 08, 2019
समस्या सगळ्यांनाच असतात; पण तरीही मनमोकळे हसा. आपण हसल्यावर आसपासचे जग उजळून निघेल. हास्य हे चैतन्य आहे, आनंदाचे स्वरूप आहे. हास्य ही प्रत्येक माणसाच्या मनाची गरज आहे. हास्य, आनंद आणि समाधान यापेक्षा जगात दुसरे मौल्यवान काही असूच शकत नाही. मनावरचे ताणतणाव दूर करण्याची ताकद हास्यामध्ये आहे. एखादा...
मे 07, 2019
सोसायटीतील वॉचमन केवळ प्रवेशद्वारावरचा चौकीदार नसतो, तो असतो त्या सोसायटीतील प्रत्येकाचा जवळचा कुणीतरी. अनिलमामा आमच्या सोसायटीचे वॉचमन होते. दिवसभर त्यांची ड्युटी. अपार्टमेंटची झाडलोट किंवा इतरही कामे, सभासदांसाठी दिलेले निरोप, नोटिसा वगैरे करून ते प्रवेशद्वारासमोर असणाऱ्या टेबल खुर्चीशी येऊन बसत...
मे 06, 2019
चाळीस वर्षांपूर्वी मी आदिवासी भागात बॅंकेत होतो. त्या डोंगराळ भागात शेतीचे क्षेत्र तुटपुंजे असल्याने व घरटी एक तरी मुंबईला नोकरी-धंद्यानिमित्त असे. गावी स्त्रिया, लहान मुले, म्हातारी माणसे व असलाच तर कुटुंबातील एखादा तरुण शेती पाहात असे. शाखेत निवृत्तिवेतनधारक खातेदारांचे प्रमाण जास्त होते. एक...
मे 04, 2019
वाढते वय होते कातर अन्‌ आपसूक आठवते आईच्या हातची चव. त्या दिवशी रात्रीचे जेवण झाल्यावर मुलाने सांगितले, की उद्या सकाळी लवकर बाहेर जायचे आहे, नाश्‍त्यासाठी साबूदाण्याची छान खिचडी कर. माझे मन आठवणींच्या हिंदोळ्यावर बसून माहेरच्या अंगणात गेले. तिथून स्वयंपाकघरात जाऊन आई कोपऱ्यात ठेवायची तो पाटा-वरवंटा...
मे 01, 2019
केवळ उत्तरपत्रिकेतील ती रेषा नव्हती, ती रेषा होती त्या मुलींच्या आत्मविश्‍वासाची, अचूक निर्णयक्षमतेची. शाळेची वार्षिक परीक्षा सुरू होती. नववी व अकरावीच्या विद्यार्थिनी मन लावून पेपर लिहीत होत्या. वर्गात एकदम शांतता होती. पेपर संपायला साधारण दहा-पंधरा मिनिटे बाकी होती. विद्यार्थिनींची उत्तरपत्रिका...
एप्रिल 30, 2019
जीवन हे जगण्यासाठीच आहे. प्रत्येक क्षण आनंदाने जगा. दुसऱ्याच्या आनंदात सामील व्हा. जीवन हे जगण्यासाठीच आहे. जीवनात सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे सक्रिय वय संवर्धन. यासाठी माणसाला मेंदू सक्रिय ठेवण्याची गरज असते. जो प्रत्येक श्वास जगतो तो कधीच दु:खी होत नाही. आपल्याला आयुष्याबद्दल एक प्रकारची भीती...
एप्रिल 29, 2019
गेले वर्षभर दातांच्या दुखण्याने हैराण झाले होते. अशा स्थितीत आम्ही कर्वे रस्त्यावरील ध्यान मंदिर मार्गावरच्या दंतवैद्यांच्या दवाखान्यात पोचलो. आम्हा दोघांच्या हातात काठी. येताना रिक्षा मिळाली, जातानाचे काय? पण काही चौकशी करण्याआधीच सांगण्यात आले, की आमचा माणूस रिक्षा आणून देईल. तोंडाचा एक्‍स रे...
एप्रिल 27, 2019
ते दोघे श्रेष्ठ अभिनेते होतेच; पण त्याहून अधिक संवेदनशील मन असलेले माणूस होते. निळू फुले व राम नगरकर हे दोघे जिवलग मित्र होते. राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकात त्या दोघांची ओळख झाली. पुढे त्या ओळखीचे रूपांतर मैत्रीमध्ये झाले. 1970 च्या दशकात "हाऱ्या नाऱ्या झिंदाबाद' या कृष्णधवल चित्रपटातून या दोघांची...
एप्रिल 26, 2019
माझे वडील वैद्यकीय सेवेतून निवृत्त झाले होते. त्या काळी मला टॉन्सिलचा त्रास व्हायचा. कोल्हापूरच्या सरकारी दवाखान्यातील घसातज्ज्ञांशी प्राथमिक चर्चा करून टॉन्सिल काढण्याची शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. ही शस्त्रक्रिया विनागुंतागुंतीची नियमितपणे होणारी साधी सोपी आहे. डॉ. एस. व्ही. गोगटे यांनी...
एप्रिल 25, 2019
बाळ घरात आले, की सारे घर त्या बाळाभोवती नाचू लागते. बाळलीलांमध्ये गुंतून जाते. लेकीने सांगितले, की ती आई होणार आहे; तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झाला. आईच्या नात्यांमधून आजीच्या नात्यांत बढती मिळणार असते तेव्हा मनात काय भावना निर्माण होते, हे कागदावर उतरविणे खरेच कठीण आहे. मन उल्हासित झाले....