एकूण 449 परिणाम
डिसेंबर 14, 2018
शाळेत गुणवंतांचे सत्कार होतात; पण सारा परिसर स्वच्छ ठेवणारे हात हातात घेऊन कौतुक होते तो क्षण अधिक मोलाचा. गेल्या महिन्यात विद्यापीठ हायस्कूलमध्ये व्याख्यान देण्यासाठी गेलो होतो. महर्षी कर्वे शिक्षण संस्था संचलित हे हायस्कूल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात आहे. हायस्कूलच्या इमारतीचा...
डिसेंबर 13, 2018
आयुष्यात हवेसे, नकोसे अनेक स्पर्श आपण अनुभवत असतो. अवघे आयुष्य सुगंधी करण्याची ताकद स्पर्शात असते. बहिणीच्या नातवाच्या घनदाट, किंचित कुरळ्या जावळाला, गुलाबी तळव्यांना स्पर्श करताच गोड शिरशिरी आली. लहान मुले आई-वडिलांना स्पर्शज्ञानानेच ओळखतात ना? आईचा मायेने डोक्‍यावरून फिरणारा हात हवाहवासा वाटतो....
डिसेंबर 12, 2018
स्त्रियांची कर्तबगारी, हस्तकौशल्य सगळेच जाणतात. तिचे कौतुक नजरेत हवे. शब्दांत हवे. तिच्या हाताला किती छान चव आहे, प्रत्येक पदार्थ उत्कृष्ट. पदार्थ खाल्ला की तृप्त होतं. समाधान मिळते प्रत्येकाला. तिच्या हाताला किती छान वळण आहे, अक्षर कसे मोत्याच्या दाण्यांसारखे. तसेच चित्रकलाही तिची सफाईदार आहे....
डिसेंबर 11, 2018
आयुष्यातील वाईट क्षण दूर ठेवून चांगले तेच आठवायचे. मन आनंदाने, शांतीने भरून जाते. आमचे मित्र त्यांच्या "आनंद केंद्रा'त साऱ्यांना एक गुळगुळीत छोटा पाषाण देतात, ज्याला ते "कृतज्ञता पाषाण' असे म्हणतात. ते सांगतात, "हा पाषाण हातात घेऊन, ज्यांनी आपल्यासाठी काहीतरी चांगले केले असेल, त्यांचे...
डिसेंबर 08, 2018
परीक्षेला निघालो आणि बस चुकली. पुरेसे पैसे जवळ नव्हते; पण एका रिक्षावाल्या काकांनी मला परीक्षेला नेऊन वेळेत सोडले. मी द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगला होतो. माझा पेपर सकाळी दहा वाजता होता. त्या हिशेबाने मी माझ्या गोखलेनगरमधल्या "विद्यार्थी सहायक समिती' वसतिगृहातून विद्यापीठ बसथांब्यावर आलो. तेथून मला "...
डिसेंबर 06, 2018
गडचिरोलीला जाताना मनात अनेक शंका होत्या. परतताना केवळ चैतन्य होते. आमच्या भटक्‍या आयुष्यातील सर्वांत आनंददायी सहल म्हणजे गडचिरोलीतील डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांच्यासोबत घालवलेला काळ. त्यांच्या "सर्च' शोधग्राम प्रकल्पात आमचे अतिशय आस्थेने स्वागत झाले. अत्यंत साधेपणा व कमालीची स्वच्छता ही...
डिसेंबर 05, 2018
सकारात्मकतेवर बोलणारे खूप असतात; पण मी सकारात्मक जगणाऱ्यांना पाहिले. खूप शिकले. माझी भाची दीपिका हिचा गाण्याचा कार्यक्रम होता, सिप्ला सेंटर (वारजे)मध्ये. आम्ही कार्यक्रमासाठी सभागृहात पोहोचलो. प्रेक्षक म्हणजे "सिप्ला'मधील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक असतील ही कल्पना होती; पण एकेक प्रेक्षक "बेड'सह...
डिसेंबर 04, 2018
दोन दिवस खूपच चिंतेत गेले. रुग्णाला असलेला धोका टळला आहे, असे डॉक्‍टरांनी सांगितले अन्‌ आनंदाश्रू वाहू लागले. आम्ही कोंढव्याला राहतो. ईदसाठी दुचाकीवरून पंढरपूरजवळच्या करकंबला निघालो होतो. वाटेतच जस्मीनच्या पोटात दुखायला सुरवात झाली. ऍसिडिटीचा त्रास असेल म्हणून दुर्लक्ष केले. परंतु, गाव जवळ येत गेले...
डिसेंबर 01, 2018
एखादा विचार मनात येऊन गेलेला असतो, पण एखाद्या प्रसंगाने त्याचा अर्थ खऱ्या अर्थाने उमगतो. मी व माझी पत्नी, ससून रुग्णालयाच्या आवारातील "श्रीवत्स' या संस्थेत देणगी देण्यासाठी नुकतेच गेलो होतो. दुपारी साधारण सव्वाबाराची वेळ. सहा महिन्यांपासून सहा वर्षांपर्यंतच्या अनाथ मुलांचे संगोपन या संस्थेत केले...
नोव्हेंबर 28, 2018
मांजरी आम्हाला आवडत नाहीत. पण दूधपित्या पिलांची आई हरवली आणि त्या पिलांना दूध पाजून जगवण्याची जबाबदारी अंगावर आली. एका मांजरीने दोन-तीन वेळा घरात येण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही तिला घरात येऊ दिले नव्हते. परंतु एकेदिवशी पहाटेच्या सुमारास व्हरांड्याच्या जिन्याखालून काही आवाज येऊ लागला. मधला दरवाजा...
नोव्हेंबर 27, 2018
प्रवासात आपल्या सामानाची आपणच काळजी घेतली पाहिजे, म्हणजे सुरक्षा यंत्रणांवर विनाकारण ताण येणार नाही. मुलगा बिकानेरला असताना आम्ही दोघे व आम्हा दोघांच्या बहिणी त्याच्या पतींसह असे सहा जण राजस्थानला गेलो होतो. तीन आठवड्यांची सहल करून परतीला निघालो. परतीची गाडी बिकानेरवरून सकाळी नऊच्या सुमारास होती....
नोव्हेंबर 24, 2018
खूप स्वस्तातील खरेदी केली होती. घासाघीसही करावी वाटली नव्हती; पण घरी येऊन पाहताच फसवले गेल्याचे दुःख वाट्याला आले. आम्ही "संगीत कान्होपात्रा' या नाटकाच्या प्रयोगासाठी दिल्लीला गेलो होतो. नाटक संध्याकाळी होते. आम्ही तिघे-चौघेजण जरा थोडीशी खरेदी आणि फेरफटका मारून येऊ, अशा उद्देशाने बाहेर पडलो. आपल्या...
नोव्हेंबर 23, 2018
थंडी-तापाचे कौतुक करीत घरात बसण्याऐवजी मी नाटिका पाहायला गेलो अन्‌ आनंदात परतलो. काही वर्षांपूर्वीची हकीकत. माझी नात, मोठ्या मुलीची मुलगी दहा-बारा वर्षांची असतानाची गोष्ट. गणपतीचे दिवस होते. औंधला राहणाऱ्या ऋचाच्या सोसायटीने रंजन कार्यक्रमात "वयम्‌ मोठम्‌ खोटम्‌' हे बालनाट्य सादर करण्याचे ठरवले....
नोव्हेंबर 22, 2018
समोर धुके दिसल्यावर मन बालपणात सहजतेने गेले. त्या आठवणींनी मनात नवी उमेद निर्माण झाली. नेहमीपेक्षा आज अगदी सकाळी सकाळी जाग आली. 5 वाजले होते. थंडीचे दिवस होते. खिडकीतून बाहेर पाहिले, जरा जास्तच अंधार वाटला. पुन्हा बिछान्यात पडले, पण आता उठावेच असे म्हणून उठले. चहा करायला स्वयंपाकघरात गेले. बाहेरचे...
नोव्हेंबर 21, 2018
काही प्रश्‍नांची उत्तरे आपल्याकडे नसतात. नियती स्वत:हून त्या प्रश्‍नांची उकल करते. आयुष्यातल्या काही घटना भुतासारख्या मानगुटीवर बसलेल्या असतात. कितीही प्रयत्न केले तरी त्या उतरत नाहीत. अशीच काहीशी घटना माझ्या मनात आजही घर करून आहे. पावसाळ्याचे दिवस होते. एके दिवशी माझी एक जुनी पेशंट आली. तिला...
नोव्हेंबर 20, 2018
गरीबीत काढलेले दिवस त्यातून मिळालेल्या गोड कटू अनुभवाने आयुष्याला मिळालेली कलाटणी. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी म्हणत जीवन फुलले गेले. मिळालेले वैभव व संपत्ती ही घामातून केलेल्या काबाडकष्टाची आहे. निखाऱ्यावर भाजून गोल आकारात तयार झालेली ही भाकरी खूप रूचकर आहे. तिला कमवाय़ला खूप यातना सहन...
नोव्हेंबर 20, 2018
हॉटेलच्या वेटिंगमध्ये थांबले असताना चमचमीत पदार्थांबरोबर अनेकविध प्रश्‍नांनी मनात गर्दी केली. तेवढाच छान टाइमपास झाला. त्या दिवशी, कामाला बाई येणार नव्हती. एकच बाई धुणीभांडी, झाडू-पोशा करून पोळ्या करून द्यायची, "बाई आज येणार नाही, आपण बाहेर जाऊ, हिंडू फिरू खाऊन घरी परत येऊ,' असे ह्यांना स्पष्ट...
नोव्हेंबर 17, 2018
कोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे पालखी मार्गावरचे छोटेसे पण महत्त्वाचे गाव. या गावापासून उत्तरेला 5 किलोमीटर अंतरावर शिंदेवाडी हे भाटघर धरण क्षेत्रातील समृद्ध गाव. अशा गावात रयत शिक्षण...
नोव्हेंबर 16, 2018
वडीलधाऱ्यांचं छत्र हरपल्यावर खचून न जाता पुढील पिढीला हाताशी धरून मार्गक्रमण केले पाहिजे. यातच भावी पिढी अधिक सक्षम होत जाईल. माझ्या आईचं पत्र हरवलं... हा खेळ आम्ही लहानपणी खेळायचो. शाळेमध्ये हा खेळ खेळताना होस्टेलच्या मैत्रिणी हळव्या होत. पत्र हरवलं म्हणताना त्या हिरमुसत, तर पत्र सापडलं म्हणताना...
नोव्हेंबर 14, 2018
सुमारे चाळीस वर्षांपूर्वी आम्ही तिनसुकीयाला (आसाममध्ये) होतो. तेव्हाचा प्रसंग अजूनही जसाच्या तसा डोळ्यांसमोर दिसतोय. एका निवांत दुपारी मी व सासूबाई जेवत होतो. यांचे जेवण झाल्याने बाहेरच्या हॉलमध्ये आराम करीत होते. मुले शाळेत होती. आमच्या गप्पा सुरू असताना अचानक मोठा आवाज झाला. मी धावतच बाहेरच्या...