एकूण 111 परिणाम
सप्टेंबर 03, 2019
इस्लामपूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी भाजपतर्फे हुतात्मा उद्योग समूहाचे नेते वैभव नायकवडी यांना पक्षात घेण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू आहेत. इस्लामपूरचे नगराध्यक्ष व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील...
सप्टेंबर 01, 2019
कोल्हापूर - कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कडकनाथ घोटाळा तर केलाच; पण धुळ्यातील दूध संघही बुडवला. तसेच माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेकडो एकर जमीन लाटली. त्यामुळे नाव स्वाभिमानी आणि काम बेईमानी, असा उद्योग या दोन्ही नेत्यांनी चालवल्याचा घणाघाती आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा...
जुलै 09, 2019
सांगली -  साखर कारखानदारांना इथेनॉलऐवजी अल्कोहोलमध्ये अधिक रस आहे. मोदींचे सरकारला पाच वर्षे होऊनही इथेनॉलचे धोरण पक्के करता आले नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यातील मंत्री सुभाष देशमुख, पंकजा मुंडे यांच्याकडे अनेक कारखाने असतानाही इथेनॉल निर्मितीसाठी दबाव न टाकता केवळ चर्चाच केली जाते....
एप्रिल 16, 2019
१९७९ नंतर राज्यभर शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेचे वादळ घोंगावत असताना पश्‍चिम महाराष्ट्रात मात्र हे वारे उशिराच म्हणजे १९९० च्या दशकानंतर घोंगावायला सुरवात झाली. जोशी यांनी संघटनेचा स्वतंत्र राजकीय पक्ष म्हणून स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना केली. पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून ...
एप्रिल 09, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीत अर्ज माघारीनंतर दोन्ही मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले. कोल्हापूर मतदारसंघातून १५, तर हातकणंगलेतून १७ उमेदवार रिंगणात आहेत. कोल्हापुरातून सात, तर हातकणंगलेतून तीन अशा दहा जणांनी आपले अर्ज मागे घेतले.  दोन्ही मतदारसंघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान होत असून, उद्यापासून...
मार्च 15, 2019
सांगली - स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस आघाडी सोबत जाणार असून दोन जागा देण्याची काँग्रेसची तयारी आहे, अशी माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली.  श्री. शेट्टी म्हणाले, काँग्रेसचे केंद्रीय नेते अहमद पटेल यांच्याशी थोड्यावेळापूर्वी माझी चर्चा झाली. हातकणंगले सोबत सांगली किंवा वर्धा येथील जागा...
फेब्रुवारी 07, 2019
पुणे - शेतकऱ्यांना उसाचा रास्त व किफायतशीर भाव (एफआरपी) एकरकमी देणे कायद्यानुसार बंधनकारक असून, तो शेतकऱ्यांचा हक्‍कच आहे. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन करण्याची गरज नव्हती. साखर कारखाने आणि खासदार राजू शेट्टी यांच्यात दिलजमाई असून, ही ‘नुरा कुस्ती’ असल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते...
फेब्रुवारी 03, 2019
पुणे - यंदाच्या हंगामात ऊसबिलाचा रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) थकविणाऱ्या साखर कारखान्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारताच तब्बल सव्वातीन हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत जमा झाले आहेत. राज्यातील केवळ ११ कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्‍कम दिली आहे. मात्र, परळीच्या वैद्यनाथ कारखान्यासह सात...
फेब्रुवारी 03, 2019
पुणे : यंदाच्या हंगामात ऊसबिलाची रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) थकविणाऱ्या साखर कारखान्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारताच तब्बल सव्वातीन हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा झाले आहेत. राज्यातील केवळ 11 कारखान्यांनी "एफआरपी'ची पूर्ण रक्‍कम दिली आहे. मात्र, परळीच्या वैद्यनाथ कारखान्यासह सात...
जानेवारी 31, 2019
पुणे - यंदाच्या गाळप हंगामात  शेतकऱ्यांना रास्त आणि किफायतशीर दर  (एफआरपी) न देणाऱ्या ३९ साखर कारखान्यांना साखर आयुक्‍तांनी बुधवारी आरआरसीची नोटीस बजावली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संबंधित साखर कारखान्यांच्या उत्पादित साखरेसह मालमत्तेवर टाच आणता येणार आहे. तसेच, निम्म्याहून अधिक एफआरपी...
जानेवारी 26, 2019
पुणे - साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊस बिलाचा रास्त आणि किफायतशीर भाव (एफआरपी) एकरकमी दिला पाहिजे. कारखान्यांकडे पैसे नसतील तर केंद्र सरकारने साखर विकास निधीतून रक्कम द्यावी. तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी, याबाबत साखर आयुक्‍तांनी लेखी आश्‍वासन देईपर्यंत साखर...
नोव्हेंबर 29, 2018
भवानीनगर - काझड येथील शंकर ज्ञानदेव वीर बारामतीतल्या इंडियन ओव्हरसीज बॅंकेचे कर्जदार व थकबाकीदार आहेत. आज त्यांना बॅंकेच्या व्यवस्थापकांनी बोलावून घेऊन कर्ज भरता येत नसेल तर दोन एकर विकून टाका, असा सल्ला दिला. तर दुसऱ्या घटनेत सणसरच्या महाराष्ट्र बॅंकेत कर्जदाराची संमती नसताना त्याच्या बचत...
नोव्हेंबर 10, 2018
सांगली : साखर कारखान्यांनी मागील थकबाकी व्याजासह अंतिम बिले दिल्याशिवाय कारखाने सुरू होऊ देणार नाही. साखर पोती विक्रीसाठी कारखान्यांच्या बाहेर पडू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनांच्या समन्वय समितीच्या आज येथे झालेल्या बैठकीत देण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उद्या (ता. 11) होणाऱ्या बंद...
नोव्हेंबर 10, 2018
मुंबई - विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनातील कार्यकर्ते सुरेश पाटील यांनी "महाराष्ट्र क्रांती' या नव्या पक्षाची पाडव्याच्या मुहूर्तावर स्थापना केली आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी मराठा समाजाने "एक मराठा लाख मराठा' अशा घोषणा देत लाखोंच्या...
नोव्हेंबर 10, 2018
भवानीनगर - ‘या देशाला बुडवून पळून जाणाऱ्यांचा पंतप्रधान सत्कार करीत असतील तर कर्जाचा धिटाईने सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार का नको?’ ही भूमिका मांडत शेतकरी संघटनेने चक्क ५ लाखांपासून ३० लाखांपर्यंत कर्ज घेतलेल्या ‘टॉप टेन’ थकबाकीदार शेतकऱ्यांचा दिवाळीनिमित्त येथे ‘गौरव’ केला. भवानीनगर येथील...
ऑक्टोबर 29, 2018
ऊस उत्पादकांच्या प्रश्‍नावर ऑक्‍टोबरमध्ये होणारी खासदार राजू शेट्टी यांची ऊस परिषद ही आता नित्याची बाब झाली आहे. गेल्या सोळा वर्षांचा हा शिरस्ता यंदाही कायम राहिला. यंदा तर राजू शेट्टी यांच्या ऊस परिषदेबरोबरच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची शेतकरी कष्टकरी परिषद, रघुनाथदादा ...
ऑक्टोबर 11, 2018
कोल्हापूर - कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत वारणानगर येथे घेत असलेली ऊस परिषद ही मुख्यमंत्र्यांची आणि खासदार राजू शेट्टी जयसिंगपूर येथे घेत असलेली ऊस परिषद ही राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची आहे. या ऊस परिषदेत शेतकऱ्यांच्या हिताचे काहीही होणार नाही, अशी टीका रघुनाथदादा...
सप्टेंबर 25, 2018
सांगली - सरकार एफआरपीचे तुकडे करून शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. एफआरपी एक रकमीच मिळाली पाहिजे. यासाठी, १० ऑक्‍टोबरला कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे ऊस परिषद घेणार आहे. यामध्ये भूजल कायदा, वीज दर आकारणीबाबत आवाज उठवला जाईल, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील...
सप्टेंबर 20, 2018
कुडित्रे - स्वातंत्र्यानंतर १९५२ मध्ये पाणीपुरवठा संस्थांचे बीज सहकारातून रोवले गेले. पाणीपुरवठा संस्थांमुळे जमीन सिंचनाखाली येऊन पश्‍चिम महाराष्ट्रात हरितक्रांती झाली. मात्र, शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे वीज बिल व सरकारी पाणीपट्टी दरवाढीमुळे तसेच त्या पट्टीत शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित दर...
ऑगस्ट 17, 2018
सांगली - पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदार संघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधातील पहिला पैलवान ठरला आहे. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील शेट्टींनी आव्हान देत मैदानात उतरणार आहेत. त्यांनी स्वतःच तशी घोषणा केली...