एकूण 23 परिणाम
नोव्हेंबर 23, 2019
घनसावंगी (जि. जालना) - राष्ट्रवादी विधीमंडळाच्या पक्षाचे नेते अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे पक्षात फूट पडली आहे. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीचा कोण आमदार कोणाबरोबर याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच आमदार राजेश टोपे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते...
नोव्हेंबर 20, 2019
जालना -   राष्ट्रवादी कॉंग्रेस,कॉंग्रेस व शिवसेना अशा आघाडीची सत्ता असलेल्या जालना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. मुंबईत झालेल्या सोडतीचे वृत्त धडकताच विविध पक्षांच्या वतीने जल्लोष साजरा केला. हे पद आपल्याकडे खेचून आणण्यासाठी येणाऱ्या काळात मोर्चेबांधणी...
ऑक्टोबर 24, 2019
औरंगाबाद- घनसावंगी विधानसभा मतदारसंघात सुरु असलेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीच्या दहाव्या फेरी अखेर शिवसेनेचे डाॅ. हिकमत उढाण यांनी 6 हजार 90 मतांची आघाडी घेतली आहे. चुरशीच्या होत असलेल्या या लढतीत शिवसेनेच्या हिकमत उढाण यांना दहाव्या फेरी अखेर 46 हजार 129 मते तर राष्ट्रवादी काॅग्रेसचे राजेश...
ऑक्टोबर 24, 2019
घनसावंगी (जि. जालना) - येथे शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये टस्सल पाहायला मिळत असून, तिसऱ्या फेरीत राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांनी 3948  तर शिवसेनेचे हिकमत उढाण यांनी 3920 मते घेतली. श्री. उढाण यांना 288  मतांची आघाडी आहे. घनसावंगीत श्री. टोपे यांनी...
ऑक्टोबर 24, 2019
जालना -    जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांत बुधवारी (ता. 24) सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरवात होणार आहे. पाचही मतदारसंघांतील मतदान केंद्रावर महसुली कर्मचाऱ्यांसह कडक पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मतमोजणीनंतर आमदारपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल, ते स्पष्ट होईल. दरम्यान, प्रत्येक मतदारसंघात...
ऑक्टोबर 10, 2019
घनसावंगी : 'सध्या मुंबईचं पार्सल मुंबईला परत पाठवून देऊ, असा विरोधकांकडून प्रचार केला जातोय. मी जरी मी पराभूत झालो तरीही घनसावंगी सोडून जाणार नाही' असा खुलासा करीत मतदारसंघाच्या २० वर्षांपासून रखडलेल्या कामासाठी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मला संधी द्या, असं शिवसेनेचे घनसावंगी मतदारसंघाचे उमेदवार डॉ...
सप्टेंबर 20, 2019
जालना : ''विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे शुक्रवारी (ता.20) संध्याकाळी किंवा उद्या राष्ट्रवादी आपला कार्यक्रम जाहीर करेल. दिवाळी दरम्यान मतदान होण्याची शक्यता आहे,'' असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले.   - नारायण राणे भाजपमध्ये आल्यानंतर युतीचे काय? जालना येथे...
सप्टेंबर 10, 2019
तीर्थपुरी (जि. जालना) - अंबड आणि घनसावंगी तालुका कार्यक्षेत्र असलेल्या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखाना तसेच सागर सहकारी साखर कारखान्यातर्फे वर्ष 2019-20 च्या गाळप हंगामाची तयारी सुरू करण्यात आली आहे. दोन्ही कारखान्यांनी यंदाच्या हंगामात जवळपास सात लाख टन ऊस गाळपाचे नियोजन...
ऑगस्ट 18, 2019
मुंबई : राज्यातील पूरपरिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरवात झाली असताना आता राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर दोन्ही काँग्रेसमध्ये पुन्हा गळती सुरू झाली असून, रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या समर्थकांनी शिवसेनेत...
जुलै 25, 2019
सातारा : शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी साताऱ्यातून इच्छूक उमेदवार म्हणून अर्ज न करण्यावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले, की त्यांनीच काय मी पण ही चूक केली आहे. ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू.  शिवेंद्रराजे यांनी साताऱ्यातील जावळी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारीही मागितली नाही. पक्षाने...
जून 08, 2019
जालना : लोकसभा निवडणुकीच्या दोन महिन्यांपूर्वीच मी आणि अर्जुन खोतकर यांनी सेटलमेंट केली होती, त्यानंतर आमचे फक्त नाटक सुरू होते, असे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. केंद्रीय राज्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आज (शनिवारी) रावसाहेब दानवे यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन...
जानेवारी 19, 2019
पुणे : ''आपल्या देशात राष्ट्रगीत, राष्ट्रचिन्ह आहे, मात्र राष्ट्रदेव नाही. त्यामुळे सर्वगुणसंपन्न विद्येची देवता असणारा गणपती हा देव आपला राष्ट्रदेव असला पाहिजे. देश धर्मनिरपेक्ष असला, तरीही त्याला राष्ट्रदेवाची आवश्‍यकता आहे,'' असे मत आध्यात्मिक गुरू रमेशभाई ओझा यांनी व्यक्त केले.  एमआयटी वर्ल्ड...
डिसेंबर 16, 2018
पुणे : राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. सरकार या उद्योगाच्या पाठीशी असून, ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने आणि कारखान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (...
डिसेंबर 15, 2018
पुणे : ''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी राहील. ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने आणि साखर कारखान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील राहील.'',असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. वसंतदादा शुगर...
नोव्हेंबर 04, 2018
जालना : जालना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.  मुख्यमंत्र्यांचा शनिवारी जिल्ह्यात दुष्काळी दौरा होता. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन त्यांनी...
ऑक्टोबर 25, 2018
औरंगाबाद : "दुष्काळ हे राज्यासमोरचे भीषण आव्हान आहे. मराठवाड्यात पाण्याची कमतरता भासेल. म्हणूनच पुढीच चार-सहा महिने सगळ्यांनी एकीने कामाला लागावे. तुम्ही व्यवसायाला तर लागाच, पण दुष्काळासाठी काय करता येईल, हा विचारही या व्यासपीठावर करावा'', अशी साद बिझनेस महाएक्‍स्पोच्या उद्‌घाटनप्रसंगी खासदार...
सप्टेंबर 26, 2018
औरंगाबाद : मराठवाड्यातील अनेक भागात भर पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा केला जात असून पावसाअभावी पिके करपली आहेत. त्यामुळे खरीपाची सर्वच पिके हातची गेली असल्याने मराठवाड्यात तातडीने मंत्रीमंडळाची बैठक बोलावून तत्काळ दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा माजी...
ऑगस्ट 13, 2018
तीर्थपुरी/सेलू : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात एका व्यक्तीने; तर धनगर समाजाच्या आरक्षणासाठी परभणी जिल्ह्यात एका युवकाने आत्महत्या केल्याच्या घटना आज उघडकीस आल्या.  अंतरवाली टेंभी (ता. घनसावंगी, जि. जालना) येथील गणेश तुकाराम नन्नवरे (वय 45) यांनी शेतात विष घेऊन आत्महत्या केली....
जुलै 19, 2018
नागपूर - गायीच्या दुधाचा खरेदी दर प्रति लिटर 25 रुपये करण्याचा निर्णय पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री महादेव जानकर यांनी गुरुवारी विधानसभेत जाहीर केला. खासगी व सहकारी दुधप्रक्रिया संस्थांनी या निर्णयाला मान्यता दिली. जादा दुधाचे रुपांतरण करण्यासाठी प्रति लीटर पाच रुपये अनुदान देण्यात येणार...
जुलै 19, 2018
नागपूर : शेतकऱयांच्या उत्पादक कंपन्या, साखर कारखाने व सहकारी संस्था यांना भाडेतत्त्वावर यंत्र व अवजार बॅंक स्थापन केल्यास त्यांना कमाल 40 टक्के अनुदान देता येईल. मात्र शेतकऱयांनी वैयक्तिक ऊस तोडणी यंत्र घेतल्यास, योजना नसल्याने त्यांना अनुदान देता येणार नसल्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी...