एकूण 717 परिणाम
मे 21, 2019
बेळगाव - मालमत्तेच्या वादातून माजी आमदार संभाजी पाटील यांच्या सुनेला व तिच्या बहिणीला पाच जणांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. सोमवारी (ता. २०) सकाळी ही घटना घडली असून याप्रकरणी साधना सागर पाटील (वय ३१, रा.बेनकनहळ्ळी) यांनी बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी रेखा...
मे 20, 2019
मलकापूर (बुलडाणा) : भरधाव कंटेनर व प्रवासी वाहनाची धडक दिल्याने 13 जण ठार झाल्याची झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर मलकापूर नजीक घडली. आज दुपारी तीन सुमारास हा अपघात झाला असून या अपघातामध्ये टाटा मजिक वाहनातील 13 जण जागीच ठार झाले असल्याची माहिती आहे.   मलकापूर नॅशनल हायवे 6 वर रसोय...
मे 19, 2019
मानवी मनाचा थांग आणि अंदाज लागणं केवळ अशक्‍य. कारण, काही काही प्रसंगी आपण असे काही मूर्खासारखे का वागतो, या स्वतःला पडणाऱ्या प्रश्‍नाचंच उत्तर कधी कधी सापडेनासं होतं. नंतरच्या काळात गैरसमज सांधले जातात, चुका दुरुस्त होतात; पण कधी कधी आपल्याच वर्तनानं जीव संकोचून जातो. असे किती तरी प्रसंग बहुतेकदा...
मे 16, 2019
दक्षिण भारतामध्ये चित्रपटसृष्टीतील कलाकार राजकीय क्षितीजावरही गेली पाच दशके मुख्य भुमिका निभावत आहेत. आता मात्र देशातील सर्वच भागात चित्रपट अभिनेते-अभिनेत्री लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे दिसून येते. अडचणीच्या जागा पक्षाकडे खेचून घेण्यासाठी राजकीय पक्षही या कलाकारांना निमंत्रित करून...
मे 15, 2019
हिंगोली : पोलिसांना सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते, दारुमुळे संसार उध्वस्त होत आहेत, आता दारु विक्री करू देणार नाही म्हणजे नाहीच, असा आक्रमक पवित्रा घेत वगरवाडी (ता.औंढा नागनाथ) येथील महिलांनी बेकायदेशीर देशीदारु विक्री करणाऱ्या टपरीवर हल्लाबोल करून दारु जप्त केली. यापुढे 'दारु विक्री...
मे 14, 2019
कोल्हापूर - रमणमळा येथे रस्त्यावर उभ्या केलेल्या सहा मोटारसायकली अनोळखी व्यक्तीने पेटवल्या. हा प्रकार मध्यरात्री घडला. परिसरातील नागरिकांनी पाण्याच्या सहाय्याने वाहनांना लागलेली आग आटोक्यात आणली. मात्र त्यात तीन मोटारसायकली जळून खाक तर इतर मोटारसायकलींचे मोठे नुकसान झाले. याबाबतची नोंद करण्याचे काम...
मे 14, 2019
धुळे : निराधार, निराश्रित, अनाथ असलेल्या बालगृहातील मुलींमध्ये आपणही स्वतःच्या पायावर उभे राहावे, स्वावलंबी व्हावे, अशी उमेद निर्माण झाली. ही अपेक्षा त्यांनी बालकल्याण समितीकडे व्यक्त केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या बहुमोल सहकार्याने आणि दानशूरांनी मदतीचा हात पुढे केल्याने ही अपेक्षापूर्ती झाली. लगोलग...
मे 13, 2019
पेठवडगाव - अंबप-मनपाडळे रोडवरील एका विहिरीत मृतावस्थेत सापडलेल्या तरुणाच्या खुनाची उकल करण्यात पेठवडगाव पोलिसांना यश आले. या तरुणाचा खून त्याच्याच आई-वडिलांनी इतर तीन साथीदारांच्या मदतीने केल्याचे उघडकीस आले आहे. या पाच जणांना अटक करण्यात आली. अनिकेत ऊर्फ अभिजित अरुण वाळवेकर (वय २४, रा. पाटील टेक,...
मे 13, 2019
जिज्ञासाचा जन्म 1970चा. तिच्यात कुठलाही जन्मजात दोष नव्हता. त्यांचं घर माझ्या दवाखान्याशेजारी असल्यानं ती भेटायला यायची. नंतर घर बदलल्यानं तिचं येणं बंद झालं. पुढे संपर्क आला, त्याला निमित्त झालं ते वर्तमानपत्रात आलेली तिची ओळख व तिच्या जगावेगळ्या कर्तृत्वाचा आलेख. मधल्या काळात तिच्या आयुष्यात...
मे 12, 2019
इतर अनेक नात्यांत माणसांचे मुखवटे गळून पडतात अन्‌ खरे चेहरे समोर येतात. मात्र, आईच्या नात्याचं तसं नसतं, त्यात जराही खोट नसते. आईच्या नात्यात सूर्याचा उजेड, चंद्राची शीतळता, गाईचं वात्सल्य, घारीचं चित्त, हरणीचं काळीज, नदीची निर्मळता, झाडांची हिरवळ, मातीची ओल अशा सगळ्या गोष्टींचं मिश्रण असतं......
मे 10, 2019
सातारा - आजही समाजात वंचित घटकांवर अन्याय करणाऱ्या प्रवृत्ती आहेत. त्या प्रवृत्ती बाजूला ठेवण्यासाठी कृतिशील कार्यक्रम राबविला पाहिजे. पण, लक्ष्मण माने वंचित समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोचले. वंचितांसाठी झटणाऱ्या सत्प्रवृत्ती समाजात आहेत, तोपर्यंत लक्ष्मण मानेंनी आपले कार्य पुढे सुरू ठेवावे, असा...
मे 10, 2019
नागपूर : केंद्र सरकारच्या समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत "यू-डाईज प्लस'च्या 33 पानी प्रपत्रात माहिती भरण्यासाठी अधिकचा वेळ देऊनही राज्यातील 52 टक्के शाळांनी माहितीच सादर केलेली नाही. मुख्याध्यापक व संचालकांची पाट्या टाकण्याची वृत्ती आणि शिक्षण विभागाचा नियोजनशून्य कारभार यामुळे चव्हाट्यावर आला आहे....
मे 08, 2019
नागपूर - माहेरी गेलेली पत्नी नांदायला परत येत नसल्यामुळे पती राजेंद्र रामकिसन ढोले (३५, रा. कपिलनगर, नारी रोड) याने काचाने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना जरीपटक्‍यात उघडकीस आली. राजेंद्र ढोले हा मॅकेनिक असून, त्याला दारूचे व्यसन आहे. व्यसनामुळे घरात नेहमी खटके उडायचे. नेहमीच्या...
मे 07, 2019
पिंपरी : एक कोटीचे दागिने असलेले कुरिअर पार्सल बसमधून लंपास केलेल्या टोळीतील तिघे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यांच्याकडून 25 लाखांच्या सोन्याच्या बिस्किटांसह 36 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.   तब्बल तीन महिन्यांच्या परिश्रमानंतर गुन्हे शोध शाखा आणि हिंजवडी ठाणे यांनी संयुक्तपणे मध्य...
मे 07, 2019
चिपळूण - अनेकांना अस्वस्थेत कसे व्यक्त व्हायचे हे कळत नाही. या पार्श्‍वभूमीवर व्यवस्थेला आव्हान देऊ पाहणारा "माकडहाड डॉट कॉम' हा कथासंग्रह आहे. वर्तमानात माणसे व्यवस्थेची गुलाम झालेली असताना हा कथासंग्रह वर्तमान काळाचा दस्तावेज बनू पाहतो आहे, असे प्रतिपादन नामवंत कवयित्री प्रा. नीरजा यांनी येथे...
मे 06, 2019
कोल्हापूर -  आपल्याला नेहमी सोबत करणारी आपली सावली अचानक साथ सोडून गेली तर? असे शक्‍य आहे का? याचा अनुभव आज येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील फिजिक्सच्या विद्यार्थांनी घेतला. येथील श्री अंबाबाई मंदिराच्या घाटी दरवाज्यामध्ये या विद्यार्थांनी हा शून्य सावलीचा प्रयोग प्रत्यक्षात अनुभवला. प्रा. डॉ...
मे 05, 2019
मुंबई ः व्यंग्यचित्रकारात जुलमी राजवट उलथविण्याची धमक असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. जागतिक व्यंग्यचित्रकार दिनानिमित्त ट्‌विटरच्या माध्यमातून व्यंग्यचित्रकार सहकाऱ्यांना शुभेच्छा देतानाही राज यांनी कुंचल्याची ताकद काय असते ते दाखवून दिले आहे. व्यंग्यचित्रकाराच्या कुंचल्यात इतकी...
एप्रिल 30, 2019
जीवन हे जगण्यासाठीच आहे. प्रत्येक क्षण आनंदाने जगा. दुसऱ्याच्या आनंदात सामील व्हा. जीवन हे जगण्यासाठीच आहे. जीवनात सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे सक्रिय वय संवर्धन. यासाठी माणसाला मेंदू सक्रिय ठेवण्याची गरज असते. जो प्रत्येक श्वास जगतो तो कधीच दु:खी होत नाही. आपल्याला आयुष्याबद्दल एक प्रकारची भीती...
एप्रिल 29, 2019
पुणे : संगीत, शिल्प आणि चित्र याला खूप जुना इतिहास आहे. या कला एकमेकांवर अवलंबून आहेत. आज जागतिक नृत्य दिनानिमित्त या शिल्पांकडे पाहिलं तर, ही शिल्प यामध्ये महत्त्वाचं योगदान देताना दिसतात. लेण्या, पुरातन मंदिरं यांच्या भोवती अनेक शिल्प रेखाटलेली दिसतात. या शिल्पांमधून फक्त प्रसंग दिसत नाहीत तर,...
एप्रिल 29, 2019
मुरगूड - येथील नगरपरिषदेकडून गेली कित्येक दिवस शहराला दूषित पाणीपुरवठा होत आहे. या पाणीप्रश्‍नावरूनच आज पालिकेत रणकंदन माजले. यात उपनगराध्यक्ष, पक्षप्रतोद व विरोधीपक्षनेत्यासह तब्बल 15 नगरसेवक - नगरसेविकांनी आपल्या पदाचा राजीनामा गटप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांच्याकडे पाठविला. त्यामुळे राजकीय...