एकूण 808 परिणाम
एप्रिल 23, 2019
निवडणुकीच्या आधीच्या दोन टप्प्यांत राष्ट्रवाद आणि सुरक्षा या मुद्यांवर भाजपने भर दिला होता; पण तिसऱ्या आणि सर्वाधिक जागा असलेल्या तिसऱ्या टप्प्यात प्रचाराचा बाज बदलून टाकताना भाजपने आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा समोर आणण्याची खेळी केली आहे. संपूर्ण देशाचेच नव्हे, तर अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या लोकसभा...
एप्रिल 22, 2019
मुंबई: विदर्भातील हरिसाल हे देशातील पहिले डिजिटल गाव म्हणून मोदी सरकारच्या काळात याचे खूप कौतुक करण्यात आले होते. या गावातील वास्तव परिस्थिती दाखविणारा व्हिडिओ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या जाहीर सभेत दाखवीत नरेंद्र मोदी आणि भाजपवर कडाडून टिका केली होती. मात्र, राज ठाकरेंनी दाखविलेला...
एप्रिल 22, 2019
मतदान सज्जता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 6 लाख 59 हजार 757 मतदार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असून जिल्ह्यात एकूण 916 मतदान केंद्रांवर 5030 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच 2015 बॅलेट युनिट, 1020 कौंटिग युनिट व 1049 व्ही. व्ही. पॅट मशिन्स...
एप्रिल 21, 2019
बारामती : 'श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी,' 'लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहानी....' कवी दासु वैद्य यांच्या कवितेतील दोन ओळी खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या भाषणात सादर केल्या. यामध्ये वडील शरद पवार व त्यांच्यामधील बाप-लेकीच्या नात्यामध्ये असणाऱ्या मायेची, प्रेमाची, लढवय्या मुलीसाठी बुलंद...
एप्रिल 21, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वसामान्यांच्या मनामध्ये नेमके काय चालले आहे, याबद्दल 'सकाळ'च्या #कारणराजकारण या फेसबुक लाईव्हद्वारे जाणून घेतले. पर्वती मतदार संघातील सर्वसामान्य मतदारांशी संवाद साधताना पुढे आलेले मुद्दे, उमेदवारांविषयी त्यांच्या मनातील भावना मतदारांनी रोखठोकपणे व्यक्त केल्या.   जनता...
एप्रिल 21, 2019
विटा - पाणी आले म्हणून साखरेचे उत्पादन न करता इथेनॉलचे उत्पादन घ्या, तरच पश्‍चिम महाराष्ट्र वाचेल. साखरेचे उत्पादन घेत बसला तर तुम्हाला वाचवण्याची ताकद सरकारमध्ये नाही. आणखी खड्ड्यात जाल,  असा इशारा केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी आज दिला. त्यांनी टेंभूचे पाणी, महामार्गांची कामे हा फक्त...
एप्रिल 21, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसच्या "न्याय' योजनेवर होणाऱ्या टीकेचा प्रतिवाद करण्यासाठी अर्थतज्ज्ञ माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग पुढे सरसावले असून "भारताला गरिबीमुक्त देशांच्या श्रेणीत आणण्याचे सामर्थ्य न्याय योजनेत आहे. माझ्या समोरच देश हे ऐतिहासिक उद्दिष्ट देश साध्य करेल,' अशा शब्दांत 86 वर्षीय डॉ....
एप्रिल 21, 2019
कोल्हापूर - ‘‘निवडणुकीत कोण तरी पैसा गुंतवते. ते वसूल करण्यासाठी पुढे सरकारी तिजोरी लुटली जाते. कंत्राटी पद्धतीत शोषण होते. कंत्राटी काम म्हणजे मनुवाद्यांची गुलामगिरी आहे. भांडवलदारांचा तो कैदखाना आहे, त्यातून सुटण्यासाठी कंत्राटीनी वंचित बहुजन आघाडी सोबत यावे, आमची सत्ता आल्यानंतर त्यांना...
एप्रिल 20, 2019
शास्त्रीनगर (पुणे) : रस्त्यावर कचरा, वस्तीत ड्रेनेज फुटलेल्या आहेत, त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. पाणी व्यवस्थित येत नाही, सरकारच्या योजनांचा लाभ मिळालेला नाही. अशा परिस्थितीत जगायचे कसे असा संतप्त सवाल शास्त्रीनगरमधील नागरिक करत आहेत.  कारणराजकारण मालिकेत कोथरूड विधानसभा मतदारसंघात...
एप्रिल 20, 2019
खराडी : अपुरे रस्ते, सर्वत्र लाईटच्या तारांचे जाळे, कचरा, रस्त्यावर बेसुमार खड्डे, दूहेरी पार्किंग आणि अपुरा पाणीपुरवठा अशा एक ना अनेक समस्यांनी त्रस्त खराडीमधील थिटे वस्तीतील नागरिक सत्तारूढ भाजपावर नाराजी व्यक्त करीत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक झाल्यानंतर विजयी उमेदवार याठिकाणी फिरकले...
एप्रिल 20, 2019
लोकसभा निवडणुका होणार आहेत? ‘होय माहीत आहे की’, उमेदवार कोणकोणत्या पक्षाचा आहे माहिती आहे का? ... ‘नाही’. राजू शेट्टी, धैर्यशील माने यांच्याकडून कोणी आले होते काय? ‘नाही, आम्हाला शेट्टी पण माहिती नाही आणि माने पण.’ मतदान करणार काय? ‘होय करणार की’, उमेदवार माहिती नाही म्हणता तर मतदान कसे करणार?...
एप्रिल 20, 2019
वसंतदादांनी सांगली जिल्हाच नव्हे तर राज्य समोर ठेवून विकासाचा दृष्टिकोन ठेवला. जात-पातीपलीकडे जाऊन संकुचित विचारांना थारा न देता सर्व समाजघटकांचा विचार केला पाहिजे हा माझ्यावरील पिढीजात संस्कार आहे. त्यामुळे कुणावर टीका करण्यात मला काडीचे स्वारस्य नाही. सांगली परिसर जिल्ह्याच्या विकासाचे  इंजिन आहे...
एप्रिल 20, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गेल्या पाच वर्षांत जे धाडसी निर्णय घेतले व दहशतवादाविरोधी जी कठोर भूमिका घेतली, त्यातून देशाचे सामर्थ्य व सुरक्षा स्पष्ट झाली आहे. त्यांच्यावर विरोधकांकडून फक्त आश्वासनांसंदर्भात जे आरोप केले जात आहेत, ते बिनबुडाचे आहेत. ‘कुछ पाने के लिये...
एप्रिल 20, 2019
रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचा पुढील पाच वर्षांसाठीचा "मास्टर प्लॅन' तयार आहे. यात सिंचन, रस्ते, रेल्वे, मोबाईल नेटवर्क व रोजगार निर्मिती आदींवर भर दिला जाईल. राजकारणाचे क्षेत्र सुरवातीला माझ्यासाठी नवीन होते. गेल्या टर्ममध्ये स्वतःला रिप्रेझेंट कसे करायचे, तसेच जनतेची कामे कमी...
एप्रिल 20, 2019
पुणे : पाणी आहे, वीज आहे, रस्ते आहेत पण रेशनच  मिळत नाही,  गेल्या तीन वर्षांपासून हा त्रास सुरु झाला आहे. याबाबत कोथरूडमधील  केळेवाडीतील नागरिकांनी 'सकाळ'च्या 'कारणराजकारण' या मालिकेत संताप व्यक्त केला.   कोथरूड मध्ये वाहतुकीची समस्या गंभीर होत आहे, पीएमपीने प्रवास करताना वृद्धांना जागा मिळत नाही...
एप्रिल 20, 2019
एखाद्या भागात औद्योगिक वसाहती स्थापन करण्यासाठी जागा ताब्यात घ्यायला ज्या घाईने कोणतेही सरकार सुरवात करते; त्याच घाईने त्या भागात येऊ घातलेल्या उद्योगांसाठी पुरेसे मनुष्यबळ स्थानिक पातळीवरच मिळावे, यासाठीही प्रयत्न झाले पाहिजेत.  मोठ्या प्रकल्पांचा फायदा कुणाला होतो, याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न...
एप्रिल 19, 2019
गेल्या पाच वर्षांत मी एकूण सुमारे ३० हजार कोटींचा निधी मतदार संघात आणला. त्यात केंद्र, राज्य  सरकारच्या निधीचा समावेश आहे. टेंभू, ताकारी योजनेचे कासव गतीने सुरू असलेले काम झपाट्याने पुढे नेले. अनुशेषाचा तिढा सोडवून पंतप्रधान कृषी सिंचन  योजनेतून मंजुरी आणली. दोन्ही योजनांना सुधारित प्रशासकीय...
एप्रिल 19, 2019
कणकवली - सिंधुदुर्गात श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकुश राणे, मंचेकर आदींना संपविले. न्यायालयात निर्दोषही सुटलात. पण, पुन्हा अशी मस्ती कराल तर खपवून घेणार नाही, असे सज्जड पुरावे गोळा करू की त्यात तुम्हाला पुरून टाकू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील सभेत दिला. आम्हाला येथे...
एप्रिल 19, 2019
लोकसभा 2019 जनवाडी (पुणे) : पूरग्रस्त वसाहतीच्या संघर्षाची तिसरी पिढी, सकाळी उठल्यावर नळाला पाणी येणार का? हा उभा राहणारा पहिला प्रश्न आणि घरातून बाहेर पडल्यावर आज तरी हाताला काम मिळणार का? ही धाकधुक. अशा वातावरणात जनवाडीतला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.  राष्ट्रावादाबरोबरच हाताला रोजगार...
एप्रिल 18, 2019
मालवण - एलईडी मासेमारीने मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. एलईडीधारकांशी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांचे साटेलोटे असल्याने ती बंद करण्याची कारवाई पोलिस व मत्स्य व्यवसाय विभागाकडून होत नाही. येत्या निवडणुकीनंतर एलईडी मासेमारीविरोधात तीव्र लढा उभारणार आहे. तत्पूर्वी शासनाने एलईडीचा...