एकूण 176 परिणाम
फेब्रुवारी 18, 2019
गुरुवारी (14 फेब्रुवारी) पुलवामात झालेला दहशतवादी हल्ला भीषणच होता. या हल्ल्याच्या जखमा अनेक वर्षे प्रत्येक भारतीयांच्या मनावर भळभळत राहतील. या हल्ल्याबद्दल भारतीय म्हणून प्रत्येक देशवासीयाच्या मनातून संताप, तीव्र भावना व्यक्त होणे स्वाभाविक आहे, त्या भावनांचा आदर; परंतु प्रत्यक्ष अथवा सोशल...
फेब्रुवारी 15, 2019
मुंबई : परळच्या ग्लोबल रुग्णालयातील यकृत प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षायादीत असलेल्या रुग्णासाठी रुग्णालय प्रशासनाने ठाणे ते दादर लोकलमधून दात्याकडून मिळालेले यकृत आणले. दुपारच्या मार्गातील वाहतूक कोंडीचा अडथळा टाळण्यासाठी हा प्रकार केल्याची माहिती ग्लोबल रुग्णालय व्यवस्थापन दिली आहे. पहिल्यांदाच देशात...
फेब्रुवारी 14, 2019
बारामती शहर - दळणवळणाच्या दृष्टीने बारामती ते पुणे अशी रेल्वेची लोकलसेवा सुरू करण्याबाबत आपण रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करत असून, लवकर ही सेवा सुरू व्हावी, असा आपला प्रयत्न असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिली. बारामतीतील बांधकाम व्यावसायिकांनी बारामतीच्या संदर्भात विविध विषयांवर...
फेब्रुवारी 12, 2019
महाड - शहरातील कोटेश्वरी तळे येथील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिची फसवणुक करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणा-या महाडमधील तरुणावर महाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव शंतनु लक्ष्मण निंबाळकर (रा.महाड) आहे. याबाबत मृत तरुणीच्या वडिलांनी तक्रार दाखल...
फेब्रुवारी 12, 2019
कल्याण - केंद्र सरकार, राज्य सरकार, पालिका आणि रेल्वेचे विविध कर नागरिक भरत असताना त्यांना दररोज प्रवास करताना दमछाक होत आहे. अनेक जण मानसिक तणावात असून, या नागरीकांना मोकळा श्वास कधी मिळणार ? असा प्रश्न विचारला जात आहे. नागरिकांचा अंत पाहू नका, नागरीकांना मोकळा श्वास घेण्यासाठी राज्यशासनाने ठोस...
फेब्रुवारी 10, 2019
ठाणे : घरातली कामे लगबगीने आवरून धावतपळत स्टेशन गाठा. स्टेशनवर गर्दीचा लोंढा पाहून अर्धे अवसान तेथेच गळते. लोंबकळत कशीबशी लोकल पकडा. त्यातही अनेकदा लोकलच्या उशिरामुळे लेटमार्क. त्यामुळे कापला जाणारा पगार आणि चार शब्द ऐकावे लागणार हे वेगळेच... यापेक्षा राहणाऱ्या ठिकाणीच नोकरी करून चार...
फेब्रुवारी 08, 2019
रसायनी (रायगड) - रसायनीतील पनवेल रोहा रेल्वे मार्गावर रूळ ओलांडताना बंद फाटकामुळे नागरिकांचा होणारा खोंळबा तसेच भविष्यात मार्गावर आणखीन लोकल गाड्या सुरू कराव्या लागतील आदि बाबी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनांने परीसरात लाडिवली, कष्टकरीनगर आणि देवळोली या गावांच्या तीन ठिकाणी रेल्वे...
फेब्रुवारी 06, 2019
कल्याण - कल्याण पुढील कसारा आणि कर्जत मार्गावर लोकल फेऱ्या आणि अतिरिक्त लोकल सोडा ही मागणी केल्यावर रेल्वे प्रशासन हे शक्य नसल्याचे कारण सांगते आहे. यामुळे कसारा आणि कर्जत मधील राहणारा सर्वसामान्य चाकरमान्याला रेज त्रास होत आहे. आता नव्याने कल्याण ते नाशिक आणि कल्याण ते...
फेब्रुवारी 06, 2019
पुणे - पुणे-मुंबईदरम्यान लोकल सेवा लवकरच प्रत्यक्षात साकारण्याची चिन्हे आहेत. या मार्गावरील घाट पार करण्यासाठी चेन्नई येथे तयार केलेली विशेष १२ डब्यांची लोकल नुकतीच मुंबईत आली. या लोकलची घाटमार्गात येत्या महिन्यात चाचणी होणार आहे. ती यशस्वीपणे पार पडल्यावर पुणे-...
फेब्रुवारी 05, 2019
सांगली -  कोल्हापूर - पुणे आणि मिरज - कुर्डुवाडी या लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी डेमू रेल्वे सोडू नये, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. सुरक्षिततेचा अभाव, पुरेशी बंदिस्त नसल्याने वयस्कर प्रवाशांना होणारा त्रास यासह अनेक गैरसोयींमुळे हैराण झाल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे.  सध्या मिरज विभागासाठी...
फेब्रुवारी 05, 2019
मुंबई - ‘हेवी ब्रेक सिस्टिम’ असलेली अद्ययावत लोकल मुंबईत दाखल झाली आहे. कर्जत ते लोणावळा आणि कसारा ते नाशिक घाटांमध्ये या लोकलच्या चाचण्या या महिन्यातच घेतल्या जाणार आहेत. चाचण्या यशस्वी ठरल्यास मुंबई-नाशिक आणि मुंबई-पुणे लोकल सेवा सुरू होईल. त्यामुळे दैनंदिन प्रवाशांची...
फेब्रुवारी 03, 2019
डोंबिवली : नजीक असलेल्या कोपर रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे रूळ ओलांडत असताना एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी तीन वाजता घडली. ता कुटुंबातील एकाचे ओण वाचले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  संबंधित कुटुंब हे कोपर रेल्वे स्थानकात रूळ ओलांडत असताना ही दुर्देवी...
फेब्रुवारी 02, 2019
मुंबई - पश्‍चिम रेल्वे मार्गावरील ब्रिटिशकालीन पुलावरील गर्डर काढण्यासाठी लोअर परेल स्थानकावर आज (शनिवारी) रात्री 10 वाजल्यापासून ते 3 फेब्रुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत 11 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. यादरम्यान नवे गर्डरही टाकण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील 404 पैकी 205 लोकल...
फेब्रुवारी 02, 2019
मुंबई - हंगामी अर्थमंत्री तथा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी मांडलेल्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 65 हजार 587 कोटींची तरतूद करण्यात आली. मुंबई उपनगरातील विविध एमयूटीपी प्रकल्पांसाठी 578 कोटी 70 लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे एमयूटीपी 2, एमयूटीपी 3, एमयूटीपी 3 अ प्रकल्पातील...
जानेवारी 24, 2019
मुंबई : माटुंगा ते सायन दरम्यान सकाळी 8.50 वाजता धीम्या मार्गावर रुळाला तडा गेल्याने, कामावर पोहचणार्या रेल्वे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. त्यानंतर 9.10 वाजेपर्यंत रुळाचे काम पूर्ण करण्यात आले.दरम्यान काही लोकल जलद मार्गावर वळविण्यात आल्या असून, काही लोकल रद्द...
जानेवारी 24, 2019
महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी अशी बिरुदावली मिरवणाऱ्या मुंबईत माणसांचे इनकमिंग वर्षागणिक वाढते आहे. या बेटांवरची जमीन टोलेजंग इमारतींनी व्यापली आहे. त्यामुळे आता पाय पसरायला जागा नाही. इमारती आता आकाशाकडे झेपावत आहेत. मुंबईत येणाऱ्यांना त्या इमारतींमध्ये सहजासहजी घर मिळत नाही....
जानेवारी 16, 2019
कल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि बदलापूर ते कल्याण रेल्वे स्थानक परिसरात लोकसंख्या वाढली. मात्र लोकल फेऱ्या न वाढल्याने प्रवाश्याना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. हा जीवघेणा प्रवास कधी थांबणार असा प्रश्न केला जात आहे. कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत...
जानेवारी 08, 2019
मुंबई : बेस्ट कामगारांचा मध्यरात्रीपासून संप और झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. बेस्टने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज मेट्रो, रेल्वे, एसटी, ओला, उबर असा वेगळा पर्याय निवडावा लागतो आहे. यामध्ये एसटी, मेट्रोने अतिरिक्त सेवा चालवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता पश्चिम रेल्वेने सहा अतिरिक्त फेऱ्या...
जानेवारी 06, 2019
सन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला, ऊर्जा आली. राजकीय समीकरणं आली, पेच-डावपेच आले, शह-काटशह आले...या सगळ्याचं विश्‍लेषण करणारं, परिशीलन करणारं, ताळेबंद मांडणारं, झाडा-झडती घेणारं हे सदर...
जानेवारी 05, 2019
मुंबई - कसारा ते उंबरमाळी रेल्वेमार्गावर सकाळी 9 वाजताच्या दरम्यान थंडीमुळे रुळाला तडा गेल्याने कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिशेने येणाऱ्या रेल्वे गाड्यांची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. गुलाबी थंडीने मुंबईकर सुखावले असले तरी रेल्वे प्रवासी...