एकूण 1205 परिणाम
फेब्रुवारी 16, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला करून झालेल्या हत्येला चार वर्षे झाल्यानंतरही गुन्ह्यात वापरलेले वाहन, शस्त्र जप्त करण्याचे आव्हान तपास यंत्रणेसमोर आहे. मुळातच तपास यंत्रणेला स्वतःला संशयित आरोपी शोधण्यात यश आलेले नाही. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाच्या तपासातून...
फेब्रुवारी 16, 2019
मुंबई - राज्यातील ३६ साखर कारखाने अवसायनात आणून ते विकल्याप्रकरणी राज्य सरकारने काय कारवाई केली, अशी विचारणा शुक्रवारी उच्च न्यायालयाने केली. याप्रकरणी गुन्हा नोंदवलेल्या माता रमाबाई आंबेडकरनगर पोलिस ठाण्यातील तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सुनावणीस उपस्थित राहावे, असा आदेशही न्यायालयाने दिला....
फेब्रुवारी 15, 2019
नागपूर - भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू प्रशांत श्रीधर वैद्य, त्यांचे भाऊ प्रफुल्ल श्रीधर वैद्य आणि वहिनी वर्षा प्रफुल्ल वैद्य (सर्व रा. पुष्पकुंज कॉम्प्लेक्‍स, न्यू सेंट्रल बाजार रोड, रामदासपेठ) यांच्याविरुद्ध बॅंक ऑफ बडोदाची दोन कोटी ४० लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात...
फेब्रुवारी 15, 2019
पुणे - अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी एका वकिलाने न्यायालयात खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून, न्यायालयाचीच फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी संबंधित वकिलासह चौघांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर सूर्यवंशी, असे गुन्हा दाखल झालेल्या वकिलाचे...
फेब्रुवारी 15, 2019
मुंबई - मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्‍वर ते अरवलीदरम्यान मोठे खड्डे पडले आहेत. याबाबत राज्य सरकार करत असलेला दावा चुकीचा आहे, असा आरोप गुरुवारी याचिकाकर्त्यांनी केला. त्यामुळे या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याने न्यायालयात उपस्थित राहावे; तसेच खड्ड्यांच्या स्थितीबाबत...
फेब्रुवारी 13, 2019
पुणे - बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या मिळकतींचा लिलाव करून गुंतवणूकदारांना पैसे देण्याबाबतची सुनावणी आता 25 फेब्रुवारी रोजी विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांच्यासमोर होणार आहे. कुलकर्णी यांच्या 143 मिळकतींचा लिलाव करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात यादी सादर केली आहे. त्या मिळकतींचा...
फेब्रुवारी 13, 2019
मुंबई - आगामी अर्थसंकल्पात वकिलांसाठी विकासात्मक योजना राबवण्याची मागणी करत मंगळवारी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या वतीने आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मुंबईसह राज्यभरातून हजारोंच्या संख्येने विविध...
फेब्रुवारी 12, 2019
सिंधुदुर्गनगरी - वेळगीवे (ता. देवगड) येथील सुमित्रा वामन दळवी यांच्या खूनप्रकरणी आरोपी मुकेश राजू साटम (वय २५) याला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी दोषी ठरवत आज जन्मठेप व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे वकील सूर्यकांत खानोलकर यांनी काम पाहिले...
फेब्रुवारी 12, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे हत्येप्रकरणी एसआयटीने अमोल काळेसह चौघांविरोधातील पुरवणी दोषारोपपत्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांच्या न्यायालयात सादर केले. ते ३०० पानांचे आहे. गुन्ह्यातील याआधीच्या संशयितांशी चौघांचे असलेले संबंध, त्यांचे कॉल डिटेल्स यासंदर्भातील पुरावे...
फेब्रुवारी 12, 2019
मुंबई - भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी डॉ. आनंद तेलतुंबडे यांना उच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला. अटकेपासून संरक्षणाची मुदत मंगळवारी (ता. १२) संपत असून, तेलतुंबडे यांनी १४ व १८ फेब्रुवारीला तपास अधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहावे, असे निर्देश न्यायालयाने दिले. अटक झाल्यास त्यांची वैयक्तिक हमीपत्रावर...
फेब्रुवारी 10, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीने ताब्यात घेतलेल्या चार संशयितांविरोधात सोमवारी (ता. ११) जिल्हा सत्र न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांच्यासमोर हे पुरवणी दोषारोपपत्र सादर केले जाण्याची शक्‍...
फेब्रुवारी 10, 2019
मुंबई : साखर आयुक्तालयाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकबाकी न देणाऱ्या कारखान्यांना जप्तीच्या नोटिसा बजावल्या होत्या. त्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी राज्य सहकारी साखर संघाने केली होती. त्याबाबत उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. साखर आयुक्तालयाने कारखान्यांवर केलेल्या कारवाईला स्थगिती...
फेब्रुवारी 09, 2019
पुणे : ''कोणत्याही व्यवसायात भांडवल गुंतविताना अस्तित्वात असणाऱ्या कायद्यानुसार अंमलबजावणी व्हावी. तसे न झाल्यास अनेक प्रकरणे सर्वोच्च न्यायालया पर्यंत जातात. अशा प्रकरणांमध्ये सरकारच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने एखादा निर्णय दिल्यानंतर सरकारने तो स्वीकारला पाहिजे. परंतु, निकाल विरोधात...
फेब्रुवारी 08, 2019
पुणे - घरात कोणी नसल्याचा फायदा घेत तरुणीवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला सात वर्षे सक्तमजुरी आणि ७ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जी. पी. आगरवाल यांनी हा आदेश दिला आहे.  गुलाब लालमा पठाण (वय ४५, रा. कोंढवा खुर्द) याला शिक्षा झाली आहे. याबाबत १९ वर्षांच्या...
फेब्रुवारी 08, 2019
औरंगाबाद - आजारी मुलाला पत्नी माहेरी घेऊन गेल्याने दोन मुलांदेखत पत्नीचा दोरीने गळा घोटणाऱ्या, तसेच विरोध करणाऱ्या स्वत:च्या आईच्या हनुवटीला चावणाऱ्या आरोपीला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. भीष्मा यांनी सक्तमजुरीसह जन्मठेप व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा गुरुवारी (ता. 7) ठोठावली. विलास...
फेब्रुवारी 07, 2019
मुंबई -  एल्गार परिषदेशी संबंधित असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि वकील सुधा भारद्वाज यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर 18 फेब्रुवारीला न्या. एन. डब्लू. साम्ब्रे यांच्यासमोर सुनावणी होण्याची शक्‍यता आहे.  एल्गार...
फेब्रुवारी 07, 2019
पुणे -  गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांची मुलगी अश्‍विनी संजय देशपांडे यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन सांबरे यांनी फेटाळला, तर डीएसके यांच्याकडील उच्च पदस्थ अधिकारी धनंजय पाचपोर यांचाही नियमित जामीन उच्च...
फेब्रुवारी 06, 2019
औरंगाबाद - एटीएसने मुंब्रा व औरंगाबादेतून अटक केलेल्या इसिसच्या नऊ समर्थक संशयितांच्या चौदा दिवसांच्या कोठडीत माहिती समोर आली आहे. मंदिरात वाटप करण्यात येणाऱ्या प्रसादात विष कालविण्याचा त्यांचा डाव होता. त्यांनी पदार्थसुद्धा तयार केल्याचे एटीएसने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे एटीएसचे...
फेब्रुवारी 06, 2019
मुंबई - अंध व्यक्तींना नव्या नोटा ओळखता याव्यात यासाठी "आयबिल' यंत्रे घेतली जाणार आहेत. त्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती रिझर्व्ह बॅंकेने उच्च न्यायालयात दिली. मोबाईल सॉफ्टवेअरच्या मदतीने नोटा आणि नाण्यांचे मूल्य ओळखता येईल का? याची चाचपणी करा, अशी सूचनाही उच्च न्यायालयाने रिझर्व्ह...
फेब्रुवारी 06, 2019
मुंबई - मालेगावमध्ये 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातील अपिलांची सुनावणी सुरुळीत सुरू व्हावी, यासाठी या सुनावणीत येणारे अडथळे दूर करा, असे  निर्देश उच्च न्यायालयाने मंगळवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) दिले.  या खटल्याशी संबंधित असलेल्या विविध व्यक्तींनी विविध मुद्द्यांवर 20 अर्ज केले...