एकूण 243 परिणाम
जुलै 18, 2019
नगर : रोहित पवार इच्छुक असल्यामुळे राज्याचे लक्ष वेधलेल्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे. ही जागा काँग्रेसकडेच होती व ती पुढेही काँग्रेस सोडणार नाही, असे स्पष्ट करून नूतन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. दोन वर्षांपासून रोहित पवार कर्जत-...
जुलै 18, 2019
सांगली - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा गुरुवारी (ता. १८) पन्नासावा स्मृतिदिन. पुढील महिन्यात एक ऑगस्टला जन्मशताब्दी वर्ष सुरू होतेय. भाषा आणि प्रांतांच्या सीमा ओलांडून जागतिक साहित्यक्षेत्रात नावारूपाला आलेल्या या प्रतिभावंताची जन्मभूमीतच उपेक्षा झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्यांनी आपल्या...
जुलै 18, 2019
सांगरुळ - एक महिना महा ई-सेवा चालक व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यात आधार केंद्रावरून गोधळ चालू आहे, तातडीने आधार मशीन जमा करण्याचे फर्मान काढल्याने केंद्र चालक व आधार काढणारे यांच्यात अस्वस्थता आहे. शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असून विद्यार्थी शाळा सोडून महा ई-सेवा केंद्रावर रांगेत दिवसभर थांबत...
जुलै 17, 2019
सायगाव  : कुलभुषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून फाशीची स्थगिती मिळाल्याने आनेवाडी (ता. जावळी) येथे ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करुन भारतमाता की जयचा नारा दिला.  दरम्यान, गेल्या नऊ वर्षांपासून श्री. जाधव यांनी आनेवाडी (ता. जावळी) येथे फार्म हाऊस बांधल्यावर ते त्यांच्या आई- वडिलांसमवेत...
जुलै 17, 2019
मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा बोजवारा उडत असून, अनेक अपघातही झाले आहेत. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 31 जुलैला महामार्गावरील खड्डे मोजण्याची स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना 1 ऑगस्टला समारंभपूर्वक...
जुलै 17, 2019
मुंबई : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ 24 सप्टेंबरला संपत आहे. त्यामुळे नवीन अध्यक्ष कोण ही उत्सुकता जिल्ह्यात असली तरी अद्याप आरक्षण जाहीर झाले नसल्याने राजकीय गोटात शांतता आहे. जिल्हा परिषदेत शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि...
जुलै 17, 2019
चंद्रपूर : तालुक्‍यातील आठ गावांसाठी सुरू करण्यात आलेल्या चिंचाळा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला ग्रहण लागले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून ही योजनाच बंद पडल्याने आठही गावांतील नागरिकांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, शेतातील विहिरीवरून नागरिक पाणी आणून आपली तहान...
जुलै 17, 2019
अमरावती : जिल्हा परिषदेंतर्गत शिक्षकांच्या करण्यात आलेल्या बदल्यांमधील आरोप प्रत्यारोपांचे गुऱ्हाळ अद्यापही कायम आहे. मेळघाटमध्ये बदली झालेल्या 27 शिक्षकांनी बदली विरोधात न्यायालयात धाव घेतली. अन्य 22 जणांनी न्यायालयाकडून "स्टेटस को' (जैसे थे) चे आदेश प्राप्त केले. पर्यायाने मेळघाटमधील शिक्षणाची...
जुलै 17, 2019
चिपळूण - कोकणातील दऱ्या - खोऱ्यांमधील धरण क्षेत्रात शोधमोहिमेत येणाऱ्या अनंत अडचणी भेंदवाडीत संपर्क यंत्रणेचा अभाव, नदी प्रवाहात कोठूनही अचानक लोंढा येण्याची शक्‍यता अशा स्थितीत शोध कार्यासाठी भौगोलिक परिघ दिवसागणिक वाढला. चाळीस किलोमीटर लांबीवरील वाशिष्ठीपासून धरणापर्यंत वेगवेगळ्या मार्गाने उलट...
जुलै 17, 2019
नागपूर : खुशी परिहारच्या निर्दयी खुनाला प्रेम असल्याचे सांगून वादग्रस्त ट्‌विट करणारी प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू सध्या चांगलीच ट्रोल झाली आहे. या सर्व वादाला "कबीरसिंग' चित्रपटातील एका प्रसंगावर बॉलिवूडमध्ये सुरू असलेला वाद कारणीभूत आहे. खुशीची नुकतीच प्रियकराने गाडीच्या जॅकने निर्घृण हत्या...
जुलै 16, 2019
नाशिक ः नांदूरवैद्य (ता. इगतपुरी) येथील साडेतीनशे वर्षांपूर्वीचा रोकडेवाडा उत्तमस्थितीत उभा आहे. वाडा पाहण्यासीा देश-विदेशातील पर्यटकांची पावले आपसूक वळतात. दोन एकरामध्ये तीन मजली दोन वाडे गावात आहेत. यशुजी रोकडे यांनी बांधलेल्या वाड्यासाठी ब्रह्मदेशातील सागाचा वापर करण्यात आला आहे. हे लाकूड वर्षभर...
जुलै 16, 2019
नाशिकः कुणी पुलंच्या साहित्यातील फुलराणी सादर केली तर कुणी त्यांच्या साहित्यातील पात्र असलेले नारायण, वटवट्या अशी पात्रे रंगवली. कुणी पुलंची कविता समजून दुसऱ्याच साहित्यिकाची कविता सादर केली तर कुणी आपल्या कसदार अभिनयाने रसिकांना खिळवून ठेवत होते. शहरासह विविध तालुक्‍यातील सहभागी झालेल्या...
जुलै 16, 2019
कुडाळ - मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा उडालेला बोजवारा, निष्क्रिय शासन, निष्क्रिय पालकमंत्री यांच्या विरोधात आज  सर्वपक्षीय विरोधकांनी जेल भरो आंदोलन केले. आज लोकशाहीच्या मार्गाने लढा दिला. यापुढे विकासात्मक पावले तात्काळ न उचलल्यास ठोकशाहीचे हत्यार हाती घ्यावे लागेल असा इशारा सर्व विरोधक...
जुलै 16, 2019
तुंग - कर्ज काढून सांभाळलेल्या बैलाने मालकालाच कर्जमुक्त केले. कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील कृष्णा यशवंत सायमोते व त्यांचा आवडता बैल ‘गज्या’ याची ही कथा. चार राज्यात ख्याती असलेल्या सुमारे टनभर वजनाच्या गज्याची आज देशातील बलदंड बैलात गणना होते. आता त्याच्या या वजनदार कामगिरीची लिम्का बुकमध्ये नोंद...
जुलै 16, 2019
जळगाव ः जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी कासोदा गावातील अंगणवाडींना अचानक भेट दिली. या भेटीदरम्यान अंगणवाडी पोषण आहारात घोळ सुरू असल्याचे पाहण्यास मिळाले. अंगणवाडीतील उपस्थित 50 बालकांना केवळ एक ते दीड किलोचा आहार शिजविला जात असल्याचे निदर्शनास आले.  कासोदा (ता. एरंडोल) येथील...
जुलै 16, 2019
नंदुरबार ः जिल्हा परिषदेअंतर्गत करण्यात येणाऱ्या सर्व बांधकामांसाठी आता "प्रोजेक्‍ट मॅनेजमेंट सिस्टिम' (पीएमएस) लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याद्वारे बांधकामाच्या सर्व मोजमापांचे रेकॉर्ड कामाच्याच दिवशी ऑनलाइन करावे लागणार आहे. एकदा रेकॉर्ड केलेल्या "एमबी'मध्ये फेरफार अथवा खाडाखोड...
जुलै 16, 2019
कुडाळ - विरोधकांनी जेलभरो आंदोलनाचे हत्यार उगारताच गेल्या चार दिवसांपासून सुप्तावस्थेत असणारी प्रशासन यंत्रणा जागी झाली. रस्त्यातील खड्डे बुजविण्याची प्रक्रिया संबंधित विभागाने केली; मात्र उद्याचे (ता.16) जेलभरो आंदोलन होणारच, असा इशारा मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर, स्वाभिमान...
जुलै 16, 2019
कणकवली - येथे झालेले चिखलफेक आंदोलन हे फुकटचे श्रेय घेण्यासाठी होते. ती एक प्रकारची स्टंटबाजी होती. खरं तर आम्ही आदेश दिल्यानंतर हायवेची कामं सुरू झाली. आता पुढील पंधरा दिवसांत शहरात महामार्ग दुतर्फा सर्व अतिक्रमण हटविण्यात येतील आणि महामार्ग मोकळा करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर...
जुलै 16, 2019
नानीबाई चिखली - मराठी शाळेत शिकून ‘त्या’ बंधूंनी आज उंच भरारी घेतली आहे; मात्र, ही भरारी मातीतील शाळेत शिकून घेतली, याची जाणीव त्यांनी नेहमीच ठेवली. म्हणूनच शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी सुमारे दीड लाख रुपये खर्चून संपूर्ण शाळाच रंगवून दिली. यामुळे सुवर्णमहोत्सवी वर्षात वाटचाल...
जुलै 16, 2019
नागपूर : मेडिकल असो की, शासकीय दंत महाविद्यालय. येथील विद्यार्थ्यांना वर्गात बसण्यास रस नाही. वर्गाला दांडी मारल्यामुळे विद्यार्थ्यांची हजेरी कमी असते. यामुळे यावर्षी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात बीडीएसच्या अंतिम वर्षाच्या काही विद्यार्थी, विद्यार्थिनींची हजेरी कमी असल्याने आरोग्य...