एकूण 1045 परिणाम
मे 20, 2019
कोल्हापूर - खंडणी, मारामारीसह अवैध धंदे केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या इचलकरंजीतील टोळीविरोधात ‘मोका’चा प्रस्ताव पोलिसांनी तयार केला आहे. यात नगरसेवक संजय तेलनाडेसह १८ जणांचा समावेश आहे. हा प्रस्ताव आज विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांच्याकडे मंजुरीसाठी देण्यात आला. त्यानंतर नगरसेवक...
मे 20, 2019
नागपूर - रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी ११ एप्रिल रोजी मतदान पार पडल्यानंतर विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. रामटेकमधून कोण सरशी साधणार असा सवालही लोक एकमेकांना विचारून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. सकाळच्या तालुका बातमीदारांनी स्थानिक नेते व लोकांशी बोलून रामटेकचा शिलेदार कोण असेल याची...
मे 19, 2019
सोलापूर : माती आणि शेणखताचे समप्रमाणात मिश्रण केले...त्यात पाणी घालून पिठासारखे मळून घेतले...छोटे-छोटे गोळे करून त्यात बिया घातल्या...त्याला हाताने बॉलसारखा आकार दिला...त्यानंतर काही वेळातच तयार झाले सीड बॉल! इको फ्रेंडली क्‍लब आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने सीड बॉल (बीज गोळे) बनविण्याची...
मे 19, 2019
"साध्वी' प्रज्ञासिंह यांचे एक यश सर्वांनाच मान्य करावे लागेल. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना बचावात्मक पातळीवर आणण्याचे आतापर्यंत कोणालाही न जमलेले काम त्यांनी केले. याचबरोबर आणखी एक बाब घडली असून, पक्षातील नेत्यांनाही ती मोठ्या प्रमाणात खटकत आहे. ती बाब म्हणजे शहा यांनी "मथळे' ठरविण्याची गमावलेली...
मे 18, 2019
देशाच्या राजकारणात महाराष्ट्र कुठंय? या प्रश्‍नाला विविध पक्षांत कार्यरत मराठी नेतृत्वाने, कार्यकर्त्यांनी उत्तर दिले आहे ते आपल्या कृतिशीलतेने. विविध राज्यांत ते महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्याविषयी... महाराष्ट्र ही कार्यकर्त्यांची खाण आहे, असे महात्मा गांधींनी नमूद केले होते....
मे 18, 2019
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात युती, आघाडीबरोबरच वंचित आघाडी किती प्रभाव टाकते, यावरच विधानसभेचा सारा पट अवलंबून असेल. वंचित आघाडी कुठे आणि किती मते घेते, यानुसारच विधानसभेसाठी गणिते आखली जातील.  हातकणंगले लोकसभा मतदारसंघांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील चार आणि सांगली जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ...
मे 17, 2019
प्रश्‍न : नरेंद्र मोदी यांची एक विचारधारा आहे. इंदिरा गांधींची विचारधारा काँग्रेस पुढे नेत आहे. तुमच्यावर तुमच्या आजींच्या (इंदिरा गांधी यांचा) विचारांचा मोठा प्रभाव आहे. या विचारधारांकडे तुम्ही कसे पाहता? उत्तर : प्रश्‍न राहुल गांधीच्या किंवा इंदीरा गांधींच्या विचारधारेचा नाही. काँग्रेसची...
मे 16, 2019
हैदराबादः तेलंगणमधील टीव्ही अभिनेत्री भार्गवी (वय 20) आणि अनुषा रेड्डी (वय 21) यांचे बुधवारी मोटार अपघातात निधन झाले. एका मालिकेचे चित्रीकरण पूर्ण करून त्या हैदराबादला परत येत असताना हा अपघात झाला आहे. आज (ता.16) सकाळी अप्पारेड्डी गुडा येथे ट्रकशी होणारी धडक चुकविताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने...
मे 16, 2019
देवरूख - मागील विधानसभा निवडणुकीत माझ्या विजयात तुषार खेतल यांचा मोलाचा वाटा असल्याची कबुली आमदार सदानंद चव्हाण यांनी दिली.लक्ष्मीबाई खेतल प्रतिष्ठानच्या वतीने देवडेतील वेताळेश्ववर यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आमदार चव्हाण उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. ...
मे 14, 2019
कोल्हापूर - खासगी सावकार सूरज साखरेसह त्याचा साथीदार अभी ऊर्फ युवराज महाडिकवर ‘मोका’ कारवाईनंतर आज जुना राजवाडा पोलिसांनी दोघांच्या घरांची झडती घेतली. तेथून कर्जदारांची स्वाक्षरी असलेले कोरे स्टॅम्प तसेच अन्य कागदपत्रे जप्त केली. अपहरण प्रकरणात कोठडी संपल्याने आज त्यांना न्यायालयात हजर...
मे 13, 2019
सासवड : राज्यमंत्री विजय शिवतारे मित्रमंडळ, पुरंदर – हवेली.. यांच्यातर्फे यंदाही 13 व्या वर्षीही 32 जोडप्यांचा कऱहेकाठी सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. काल रविवारी (ता. 12) रात्री सासवडच्या पालखी मैदानावर या उपक्रमात सर्व जातीधर्माच्या विवाह इच्छुक वधू - वरांचा विवाह मोठ्या थाटामाटात झाला. ...
मे 11, 2019
विरार : नारंगीत राहणाऱ्या तरुण अष्टपैलू क्रिकेटरने आपल्या आईसह आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली. मायलेकाच्या या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होतेय. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला. विनय प्रकाश चौगुले उर्फ दादू असे (25) तरुणाचे नाव होते तर सरस्वती...
मे 10, 2019
पश्‍चिम बंगालमधील दोन मोठ्या रक्‍तरंजित समस्या सोडवण्याचे श्रेय ममता बॅनर्जी यांना जाते. पहिली जंगलमहलमधील माओवाद्यांची अन्‌ दुसरी दार्जिलिंगमधील गोरखालॅंड आंदोलनाची. यांपैकी गोरखालॅंड आंदोलनाला अनेक राजकीय, जातीय, भाषिक आणि झालेच तर आर्थिक पदर आहेत. ती गुंतागुंत ममतादीदींनी ज्या पद्धतीने हाताळली,...
मे 09, 2019
गोवा : काँग्रेसचे उमेदवार अतानासिओ ऊर्फ बाबुश मोन्सेरात यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर गुन्हा नोंद असलेल्या फौजदारी तक्रारींची माहिती दिली आहे. यासंदर्भात माहिती त्यांना तसेच काँग्रेस पक्षाला जाहीर करणे सक्तीचे आहे. ती अजून त्यांनी वृत्तपत्रातून जाहीर केली नसल्याने...
मे 09, 2019
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीवर घणाघाती टीका करत आहेत. काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा, जीएसटी, काश्‍मीर, राष्ट्रवादाचा मुद्दा, हिंदुत्व अशा अनेक विषयांवर राहुल गांधी यांनी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय...
मे 09, 2019
कोल्हापूर - खुद्द विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी खासगी सावकारांचा पिच्छा सुरू केला आहे. ‘सावकाराविरोधात तक्रारी द्यायला पुढे या’, असे आवाहन केले आहे. त्यामुळे खासगी सावकार आणि त्याने पोसलेल्या टोळक्‍यांना न घाबरता आता पिचलेल्या कर्जदाराकडून जबरदस्तीने किंवा व्याजापोटी घेतलेला एखादा...
मे 08, 2019
कोल्हापूर - संशयित खासगी सावकारांच्या घरांची आता सहकार खात्याच्या मदतीने झडती घेतली जाईल. त्यात तारणापोटी घेतलेली आक्षेपार्ह कागदपत्रे, कोरे धनादेश असे प्रकार आढळून आल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी येथे दिला. संघटित गुन्हेगारी व...
मे 07, 2019
जेवळी : जेवळी (जि. उस्मानाबाद) येथील ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांच्या यात्रेला मंगळवारी (ता. 7) पहाटे पाचच्या सुमारास मंदिरातील शिवलिंगाची पंचकलश पूजा, रुद्राभिषेकाने सुरवात झाली. त्यानंतर परिसरातील अनेक बैलजोड्यांची गावातून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. यावेळी उत्कृष्ट पशूंच्या पालकांना...
मे 07, 2019
बेळगाव - दरवर्षी उन्हाळयात पाण्याची गरज भासल्यानंतर महाराष्ट्र सरकार कर्नाटकाला पाणी सोडते. त्यामोबदल्यात पैसे दिले जातात. पहिल्यांदा पाण्याच्या मोबदल्यात पाण्याची मागणी महाराष्ट्र सरकारने केली आहे. शिवाय कायस्वरुपाची करार करण्याचा प्रस्ताव आहे. यावर निर्णय घेण्यासाठी तांत्रिक समिती स्थापण्याचा...
मे 07, 2019
सांगली - सांगलीचे हरित वैभव असलेल्या आमराईच्या समृद्धीसाठी काल शेकडो सांगलीकरांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येत श्रमदान केले. महापालिकेच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांनीही नागरिकांच्या बरोबरीने योगदान देत आमराई चकाचक करण्यात  हातभार लावला. यावेळी आमराईतील सुमारे हजार झाडांभोवती श्रमदानातून आळी करणे, खत...