एकूण 12836 परिणाम
ऑगस्ट 09, 2016
इमारतींच्या तळघरांत साचलेल्या पाण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष नाशिक - धुवाधार पावसानंतर शहराची परिस्थिती पूर्वपदावर येत असताना साथीच्या आजारांनी घेरले आहे. त्यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय व आरोग्य विभागाने विविध उपाययोजना करून आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत, तरी डासांची...
ऑगस्ट 09, 2016
सांगली - मिरज पूर्व भागातील लोकांनी प्रचंड संघर्ष करून मिळवलेल्या मिरज-सलगरे रस्त्याला पहिल्या पावसातच मोठमोठे खड्डे पडले आहेत. दोनच महिन्यांपूर्वी या नवीन रस्त्याची बांधणी झाली होती. त्याच्या दर्जाचा पंचनामा पावसाने केला असून टक्केवारीने बरबटलेल्या व्यवस्थेमुळे लोकांना पुन्हा एकदा खड्ड्यांतून...
ऑगस्ट 08, 2016
गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याविषयी सर्वांनाच उत्सुकता होती. भारतीय जनता पक्ष तेथे जुन्या जाणत्या नेत्याला संधी देणार की नव्या नेतृत्वाला वाव देणार, याविषयीही चर्चा आणि तर्कवितर्क सुरू होते. आता मुख्यमंत्रिपदी विजय रुपानी यांची निवड होऊन त्यांचा शपथविधी झाला आहे. या...
ऑगस्ट 08, 2016
महावितरणची पदभरती - विभागात दोन हजार 542 जागांची भरती; शासनाने लक्ष द्यावे कारंजा (जि. वर्धा) - चंद्रपूर, कोराडी येथील औष्णिक महावीज निर्मिती कंपनीमध्ये तारतंत्री अनुभवी उमेदवारांना एक वर्षाचेच अनुभव प्रमाणपत्र मिळत असल्यामुळे महावितरणच्या पदभरतीपासून शेकडो उमेदवार वंचित राहणार आहेत. या...
ऑगस्ट 08, 2016
नागपूर - शहरातील फेरीवाल्यांचे 31 डिसेंबर 2016 पर्यंत पुनर्वसन करण्यात येईल. यासाठी महापालिकेने 51 हॉकर झोन निश्‍चित केले आहेत, असे शपथपत्र गुरुवारी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केले.  शहरातील विविध वाहतूक व अतिक्रमणाच्या समस्येकडे लक्ष...
ऑगस्ट 08, 2016
देवगड- तालुक्‍यातील तांबळडेग येथील समुद्रकिनारी हवेवरील रबरी बोट (लाइफ राफ्ट) सापडल्याने एकच खळबळ उडाली. सुमारे वीस जण बसतील एवढी त्याची क्षमता आहे. बोटीत पाण्यासारखी दिसणारी पाकिटे, तसेच अन्य साहित्य असलेल्या बॅगाही सापडल्या आहेत. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बोटीची पाहाणी केली....
ऑगस्ट 08, 2016
शिराळा - जिवंत नाग पूजेची परंपरा अनेक वर्षे जोपासणाऱ्या शिराळकरांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत सलग तिसऱ्या वर्षी उत्साहाला मुरड घालत नागप्रतिमांची पूजा केली.  जिवंत नागांची पूजा करणारे शिराळकर यंदा कशी पूजा करणार, याबद्दल पर्यटक व प्रशासकीय यंत्रणेला उत्सुकता होती. परंतु अंगावर पावसाच्या सरी...
ऑगस्ट 08, 2016
मुंबई - संवेदनशील खटल्यांसह अन्य फौजदारी खटल्यांमधील साक्षीदारांना संरक्षण देण्याच्या सरकारी धोरणाची अजूनही प्रतीक्षा आहे. त्याबाबतचा प्रस्तावित मसुदा तयार असला तरी अजून त्याला कायद्याचे स्वरूप मिळालेले नाही.    राज्यातील महत्त्वाच्या खटल्यांमधील साक्षीदारांसह पोलिस साक्षीदार आणि सामाजिक कार्यकर्ते...
ऑगस्ट 08, 2016
औरंगाबाद - महाराष्ट्र सेवेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी संवर्गात आल्यावर पदोन्नतीच्या संधी अतिशय कमी प्रमाणात असतात. त्यामुळे या संवर्गात निर्माण झालेली कुंठितावस्था दूर करण्यासाठी या संवर्गातील निवडश्रेणी वेतनश्रेणीसाठी राज्यात 148 पदे चिन्हांकित करण्यात आली आहेत.    उपमुख्य...
ऑगस्ट 08, 2016
चिपळूण :  नव्याने अस्तित्वात येणारा गुहागर-चिपळूण-विजापूर राष्ट्रीय महामार्ग मिरजोळीतून पागकडे जाणाऱ्या बायपासमार्गे बहादूरशेख नाक्‍याला मिळणार आहे. त्यामुळे शहराला बायपास करून महामार्ग जाणार हे आज स्पष्ट झाले. या राज्य मार्गाची सद्यपरिस्थिती तपासण्यासाठी सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. ...
ऑगस्ट 08, 2016
वैभववाडी : करूळ घाटात रस्ता खचल्यामुळे पुढचा पावसाळाभर येथील वाहतुकीवर टांगती तलवार राहणार आहे. दिंडवणेनजीक कोसळलेल्या दरडीमुळे हा प्रकार घडला आहे. पावसाचा जोर असाच राहिला, तर रस्त्याला भगदाड पडण्याची शक्‍यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने खबरदारी म्हणून रस्त्यालगत बॅरल उभे केले आहेत. तालुक्‍यात...
ऑगस्ट 08, 2016
वेंगुर्ले : येथील समुद्रात एप्रिलमध्ये झालेल्या स्फोटसदृश आवाजांचा छडा लावा, अशी मागणी मच्छीमारांनी कोस्ट गार्ड व पोलिस अधिकाऱ्यांकडे केली.   सागरी सुरक्षारक्षक, मच्छीमार संस्था प्रतिनिधी, क्रियाशील मच्छीमार व नौकाधारक यांची बैठक आज भारतीय तटरक्षक समिती रत्नागिरीचे कोस्ट गार्ड अधिकारी कुमार यांच्या...
ऑगस्ट 08, 2016
रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर आज दिवसभर कायम होता. समाधानकारक पावसामुळे लावणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. सुमारे 90 टक्‍के लावण्या झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.  आज सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी 99.78 मि.मी. पाऊस झाला. त्यात मंडणगड- 100, दापोली- 88, खेड-...
ऑगस्ट 08, 2016
चिपळूण- दापोली तालुक्‍यातील शिवाजीनगर गाव संततुकाराम वनग्राम योजनेत राज्यात दुसरे आले आहे. शुक्रवारी (ता.29 ) नागपूर येथे या गावाचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय वनाधिकारी विकास जगताप यांनी "सकाळ‘ला दिली.  दापोली शहरापासून 5 किमीवर जैवविविधतेने नटलेले शिवाजीनगर गाव आहे. 1100...
ऑगस्ट 08, 2016
कणकवली - मुंबई-गोवा महामार्गावरील जानवली रतांब्याचा व्हाळ येथील अपघातात हरकुळ खुर्द येथील तलाठी उत्तम रत्नू पवार (वय 48) यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. महामार्गावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात त्यांची दुचाकी समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. यात पवार यांच्या डोकीला मार...
ऑगस्ट 08, 2016
सोलापूर - आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने यंदाच्या आषाढीसाठी राज्यभरातून 3 हजार 300 बस उपलब्ध करून दिल्या होत्या. 11 ते 20 जुलै या कालावधीत राज्य परिवहन महामंडळाला 13 कोटी 9 लाख रुपयांचे (अंदाजे) उत्पन्न मिळाले...
ऑगस्ट 08, 2016
मुंबई - मुंबई महापालिकेने काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदारांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कंत्राटदारांना यापुढे कोणतेही काम करता येणार नाही. तसेच त्यांना महापालिकेने दिलेली काही कामे आधीच रद्द केलेली आहेत, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत...
ऑगस्ट 08, 2016
मुंबई - राज्याच्या मंत्रिमंडळात सुमारे सोळा मंत्री विविध आरोपांच्या चक्रव्यूहात अडकलेले असताना मुख्यमंत्री मात्र या भ्रष्ट मंत्र्यांची पाठराखण करत आहेत, असा आरोप करत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच गुरुवारी हल्लाबोल केला. विरोधी पक्षाच्या वतीने...
ऑगस्ट 08, 2016
नवी दिल्ली- शहरामध्ये ‘हाय प्रोफाइल सेक्स‘ रॅकेट चालविणाऱया 63 वर्षीय वृद्धाला अटक करण्यात आली असून, पी. एन. सान्याल असे त्या व्यक्तीचे नाव आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. दिल्लीच्या सफदरगंज परिसरात आयकर विभागाने 2 जुलैला छापा टाकला होता. यावेळी सान्याल याच्या घरात एक रशियन युवती आढळून आली होती....
ऑगस्ट 08, 2016
लखनौ - बहुजन समजा पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्यावर टीका करताना असभ्य भाषेचा वापर करणाऱ्या दयाशंकर सिंह यांची जीभ कापून आणणाऱ्याला बहुजन समाज पक्षाच्या एका नेत्याने 50 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. आज (गुरुवार) बसपचे उत्तर प्रदेशमधील विविध जिल्ह्यातील कार्यकर्ते लखनौमध्ये एकत्र आले आणि...