एकूण 1862 परिणाम
डिसेंबर 10, 2018
पुणे - शाळेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अथवा पालकांना कोणत्याही प्रकारची अट घालू नये, असा शिक्षण विभागाचा आदेश असतानाही पालकांना काही शाळांत प्रश्‍नोत्तरांना सामोरे जावे लागत आहे. ‘तुम्ही गृहिणी आहात का?’, ‘प्रवेश निश्‍चित झाल्यावर तुम्ही घरी असणार ना?’, अशा प्रश्‍नांचा भडिमार पालकांवर होत आहे....
डिसेंबर 10, 2018
पिंपरी - महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षण समितीने "अध्ययन स्तर निश्‍चिती'वर भर दिला आहे. इयत्तेनुसार शिक्षकांना निकष ठरवून दिले आहेत. त्यानुसार शाळांचा सर्वे करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता तपासली जाणार आहे. येत्या जानेवारीपासून "उन्नती प्रकल्प'...
डिसेंबर 09, 2018
भिगवण : तालुकास्तरीय यशवंतराव चव्हाण कला क्रिडा स्पर्धेमध्ये विविध दहा क्रिडा प्रकारामध्ये पारितोषिक मिळवत भिगवण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने तालुकास्तरीय सर्वसाधारण चॅम्पियन चषक पटकावत स्पर्धेवर आपला ठसा उमटविला. तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी खेळाडुंना प्रोत्साहनपर बक्षीस प्रदान करत...
डिसेंबर 08, 2018
भंडारा : तुमसर तालुक्‍यातील सुकळी (देव्हाडी) येथील जिल्हा परिषद शाळेतील जलकुंभात दारूची बाटली टाकल्याचा प्रकार उघडकीस आला. शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत पोलिस व गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. सुकळी येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. शाळेच्या आवारातच...
डिसेंबर 08, 2018
मांजरी - शाळा व्यवस्थापन समितीवर तेथे शिक्षण घेत असलेल्या पाल्याचे माता, पिता किंवा पालकच असावेत. असा नियम असतानाही जिल्ह्यातील विविध गावात सत्ताधारी गटांनी आपल्या कार्यकर्त्यांना त्याठिकाणी बसविलेले पाहवयास मिळत आहे. शिक्षण विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने गावातील...
डिसेंबर 08, 2018
तांबडं फुटायच्या आत नंदी आणि खंडोबा उठले होते. नंदीनं दोन्ही पोरांना अंघोळीला पाणी टाकलं अन् चहा करून दुपारच्या न्याहारीसाठी भाकरी थापत बसली होती.  खंडोबा सगळं उरकून पाराकडं गेला होता. पाराजवळच सकाळी आणि संध्याकाळी एसटी येवून थांबायची. सातच्या एसटीचा वेळ झालाच होता. गावही बऱ्यापैकी जागं झालं होतं....
डिसेंबर 08, 2018
नवी मुंबई - महापालिका शाळांतील आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा पूरक आहार पुन्हा राजकीय वादाचे कारण ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. प्रशासन आणि शिवसेना न्याहरीसाठी आग्रही असताना सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने मात्र स्थायी समितीत आज पुन्हा चिक्कीसाठी आग्रह धरला. विशेष म्हणजे...
डिसेंबर 08, 2018
महाराष्ट्र राज्याची स्थापना १९६०ची. गेल्या ५८ वर्षांत विविध व्यवहारक्षेत्रांमध्ये मराठीचा वापर अनिवार्य करायला हवा होता. ते न करता आपण अमराठी शाळांमध्ये मराठी अनिवार्य करावं का, करायचं तर कुठल्या टप्प्यावर करावं, याचा खल करतो, ही गोष्ट आपल्या भाषाधोरणाची सद्यःस्थिती व्यक्त करायला पुरेशी आहे. इतर...
डिसेंबर 08, 2018
मुंबई - रुबेला लसीकरण ऐच्छिक असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत असताना नोडल अधिकाऱ्यांनी मात्र शाळांमध्ये लसीकरणाच्या दिवशी 100 टक्के विद्यार्थी उपस्थित राहतील, याबाबतचे निर्देश मुख्याध्यापकांना दिले आहेत. शहरातील काही पालक लसीकरण ऐच्छिक असल्याचे सांगत पाल्यांना शाळेत पाठवत नसल्याने शाळेत 100...
डिसेंबर 08, 2018
सातारा - नावीन्यपूर्ण उपक्रमांवर भर देत गुणवत्तावाढीसाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांनी उचलेली पावले पुन्हा एकदा अधिक गतीने पुढे जात असल्याने निष्पन्न झाले आहेत. गेल्या वर्षी 905 विद्यार्थ्यांनी खासगी माध्यमांच्या शाळांना रामराम ठोकून जिल्हा परिषदेच्या शाळांत प्रवेश घेतला होता. या शैक्षणिक...
डिसेंबर 07, 2018
पिंपरी - शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शहरातील खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांना प्रवेश नाकारल्यास कारवाई करण्यासाठी शाळांवर प्रशासक नेमण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. मात्र, अद्याप मनुष्यबळाअभावी बहुतांशी शाळांवर प्रशासकच नेमले नाहीत. यंदा शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत १ हजार ८८३...
डिसेंबर 07, 2018
कऱ्हाड - गरज नसतानाही विद्यार्थ्यांच्या दप्तरातून शाळेला दररोज नेण्यात येणारी पुस्तके, वह्यांमुळे दप्तराचे ओझे कमी कसे करायचे, हा बहुतांश शाळांसमोर प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेच्या येथील सद्‌गुरू गाडगे महाराज प्राथमिक शाळेतील उपशिक्षक अमोल कोळेकर यांनी नावीन्यपूर्ण मार्ग...
डिसेंबर 06, 2018
पिंपरी - शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शहरातील खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांना प्रवेश नाकारल्यास कारवाई करण्यासाठी शाळांवर प्रशासक नेमण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. मात्र, अद्याप मनुष्यबळाअभावी बहुतांशी शाळांवर प्रशासकच नेमले नाहीत.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी...
डिसेंबर 05, 2018
टाकळी हाजी (पुणे): कॅनडाच्या परदेशी पाहुण्याचे स्वागत, गावातून त्यांची निघालेली सवाद्य मिरवणूक, मनोरंजनासाठी पारंपारीक लोकनृत्य पाहून परदेशी पाहुणे भारावले. हसा मुलांनो हसा... असेच म्हणत मलठण (ता. शिरूर) येथील न्यू इंग्लिश शाळेत तब्बल 1 हजार विद्यार्थ्यांना कॅनडातील परदेशी पाहुण्यांनी शैक्षणिक...
डिसेंबर 05, 2018
मोहोळ : गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेअंतर्गत सात दिवसाच्या कालावधीत मोहोळ तालुक्यातील एकवीस हजार बालकांना लसीकरण केले असुन अद्यापही हे काम सुरूच आहे . या कामी  एकुण 650 कर्मचाऱ्यांची नेमणुक केली असुन एकुण 92 टक्के काम झाले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ  अरूण प्राथ्रुडकर यांनी दिली. 27...
डिसेंबर 05, 2018
नाशिक - महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी आणि आठवीसाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत नोंदणी करणाऱ्या परीक्षार्थींची संख्या ५० टक्क्यांनी घटली आहे. परिणामी, विद्यार्थी संख्या वाढण्यासाठी पुन्हा एकदा शिक्षण विभागास अर्ज प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्याची वेळ आली आहे....
डिसेंबर 05, 2018
पुणे - गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लसीची पुण्यातील सात विद्यार्थ्यांना ‘रिॲक्‍शन’ आल्याची माहिती पुढे आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या सर्व विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.  सकाळचे मोबाईल...
डिसेंबर 05, 2018
पुणे - राज्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या पदोन्नतीला शालेय शिक्षण विभागाने तात्पुरती स्थगिती दिली असून, त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. या स्थगितीमुळे सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याऐवजी अनुभव कमी असणाऱ्या शिक्षकांच्या पदोन्नतीला आळा बसणार आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन...
डिसेंबर 05, 2018
पिंपरी - ‘‘शिक्षण क्षेत्रामध्ये खासगीकरणाच्या नावाखाली बाजारीकरण सुरू आहे, त्यामुळे शिक्षण व्यवस्था खिळखिळी होत आहे. मराठी  शाळा कमी होत असून त्या टिकवण्यासाठी समाजात सकारात्मक बदल होण्याची आवश्‍यकता आहे,’’ असे मत विविध शाळांमधील प्राचार्य व मुख्याध्यापकांनी व्यक्त केले. सकाळचे मोबाईल...
डिसेंबर 05, 2018
ठाणे - ठाण्यातील एका नामांकित शाळेतील शिक्षिकांना भेटणं झालं, तेव्हा चक्क त्या काश्‍मिरी भाषेतील वाक्‍यं पाठ करत बसल्या होत्या. आश्‍चर्याने विचारलंच, आपल्याकडे कधीपासून काश्‍मिरी शिकवायला लागले? तेव्हा कळलं, की त्या रोज वेगवेगळ्या भाषेतली पाच-पाच वाक्‍य पाठ करताहेत आणि यामुळे साऱ्या भाषांचा...